मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देणे

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे स्वप्नात तुझे येणे बेभान वादळांनी श्वासात जागवावे आवेग जीवघेणे अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी जादूभरे तराणे हळुवार भावनांना फुलवून जागवावे माझे अबोल गाणे मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य रात्र घाली नवे उखाणे ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली ते चांदणे दिवाणे भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे

वाचन 2420 प्रतिक्रिया 0