मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कविते, हे तर तुझेच देणे..!)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माताय! असला लॉलीपॉप हाफवॉली मिळाल्यावर काय करावं बरं म्या पामरानं? ;) वेळी अवेळी, कविता भाळी परज लेखणी नवी नव्हाळी ओळ ढोबळी, सूर पाघळी तळमळणार्‍या 'जालो'माळी पिसे कवीला, वेड जनाला झुळझुळ कोरा, कागद ओला कोण मेंबरा, उगा हासला तीट लावतो काव्या मेला शब्दढोकळा सहस्र माळा वाचक मेळा, रोज आगळा बर्‍याच वेळा, त्याचत्या कळा दंग लेखणी, शब्द पांगळा गारठलेली, जनता ल्याली पुन्हा विडंबन, भर्जरि शाली ग्लेनफिडिचची मैफ़ल सजली 'पूनम'वरच्या, भव्य महाली अस्सल बेणे, रंग उधळणे, ढासू गाणे, चिकन तोडणे 'चतुरंगाचे' शब्द गुंफ़णे कविते, हे तर तुझेच देणे..! चतुरंग (खुद के साथ बातां : आम्हाला 'कविता कसली अढळ वस्तरा, साफ दुहेरी कल्ले कटले!' ह्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली! ;) )

वाचन 3410 प्रतिक्रिया 0