चल उसात दंगा करू
लेखनविषय:
काव्यरस
चल उसात दंगा करू
मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)
हिरो:
पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू
हिरो:
डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?
हिरवीन:गाव बोलंना काहीबाही पन लगीन आपलं र्हायलंय ठरू लाजायची येळ गेली अन मी फिकीर कशाची आता करू
हिरो:आसंच आसलं तर मग अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:पाटपान्यात भिजलेत पाय लागल्यात मासोळ्या दिसू हात लागता हाताला मग डाळींबी दाण्यांना आलं हसू
हिरवीन:मी तर मैना लाडाची रे सच्या तुच माझा राघू तरीबी सांगते नका उगा कौतीक करू
हिरो:आरं..र्रर्रर्र.... अग पारू... चल उसात दंगा करू
वाचने
2958
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
पाषाणभेदजी,
आज दादा कोंडके असते तर त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. ;)
मला कवितेच शिर्षकच लै भावलं...
येक नंबर...
दंगा चालुदे...
'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला! :D
(ऊस तोडणी कामगार)चतुरंग
In reply to तुमचा by चतुरंग
>>>'ऊस लावणी ' ते 'उसातली लावणी' असा प्रवास पाहून अत्यानंद झाला!
=)) आरं आवरा रे कोणी या चतुरंगाला...!
बाकी गाणं लिव्हित राव्हा....!
-दिलीप बिरुटे
[तमाशा आणि लावणीचा रसिक]
"चल जोसात दंगा करू" असं शीर्षक द्यायचं होतं का तुम्हाला? :)
ते अमेरीकेत कसं नवी लोकं "सॅन होसे" ला "सॅन जोसे" म्हणतात माहीत नसल्यानी तस काहीतरी.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
शिर्षक लय भारी.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
-----
सौरभ :(
ऐन वेळेला संपवलीत... +१
binarybandya™
उसातला दंगा आवडला.. :)
शब्दाशब्दामध्ये ठासून भरलाय...मस्त.
पाषाणभेदजी