Skip to main content

गुलाबाचा सण होता

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 14/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2223
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अंमळ छान कविता.. तात्या.

व्वा. सुंदर कविता... पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे झकास... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

व्वा सुंदर !!! फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत अहाहा!! मन इतकं तरल झालं या ओळी वाचून .... ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

एकदम तरल आहे कविता...मस्त

आवडली कविता. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥