मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम कविता

प्रेम रंग

तृप्ति २३ ·
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

आठवण

सुमित_सौन्देकर ·
लेखनविषय:
काव्यरस
सरसरत्या सरिनी तुझी आठवण यावी रिमझिम पावसात माझ्या सवे तू भिजावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी कधी उगवतो दिस तोहि मावळू पाहतो तुला कुशीत ग घेण्या जिव कासाविस होतो झालो मायेला पारखा तुझ्या माझ्या विरहाने दोन शब्दाच्या प्रेमाला आत्ता किती ग बहाने कधी डोळे मिटताहि स्वप्ने तुझीच का यावी किलबीलती पहांट तुझ्या सवेच दिसावी आता ओढ़ या मनाची कशी कुणाला कळावी राती चांदण्या साथीने माझ्या अंगनी तू यावी

सैल असावी मिठी जराशी...

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
सैल असावी मिठी जराशी, हळूच वळुनी तुला बघाया, अर्ध्या मिटल्या तव नयनांचे, ओले हळवे चुंबन घ्याया.. रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम आखीव रेखीव, घटद्वयांना व्यर्थ लपवती... जरा विसावून सिंहकटीवर, मधूर मादक श्वास फुलावे, अधीर कोडे या विश्वाचे, गहि-या डोही उकलून यावे.. पहाटवारा लगबग करतो, घेऊन येतो थोडे केशर, स्वर्णीम करतो शर्मिल गाला, तलम तृप्तीचे शिंपून अत्तर.. ( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)

मोह

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
मंद धुंद ही हवा... सहवास तुझा हवा हवा.. नितळ कांतीवरील दवातून.. ओघळू दे गंध नवा! पहाट वारा... सरसर काटा.. नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती.. कोकीळ कंठी माळ अडकली; युगुल कबुतरे मूक होती! मोहक कटीवर घट्ट मिठी अन्.. कुंतलात त्या मन बहकले! नव यौवना तू.. मोहक.. सुंदर.. सूर्य किरणांनाही मोह पडे!

नजरेतच सारे..

समयांत ·
लेखनविषय:
तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही. तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो. तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही. कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत. तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते. माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

तू माझा?

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
हे तुझं असं अवेळी येणं आणि मोकळं मोकळं होणं... कसं बरं झेलू मी? माझं मन आणि ओंजळ; अपुरी आहे तुझ्या प्रपातासमोर! आणि सगळं जाणूनही, हे तुझं मला आपलंसं करणं.... आवडत मला. आणि मग... तू मागे ठेऊन गेलेल्या आठवणी.. जपते मी मनात हळुवार. तुझ्या आवेगला भितेही.... आणि तुझ्यात सामावून जायला आतुर अशी तुझी विरहणी!! अन् तू माझा... माझा..?

पहिला पाऊस

तृप्ति २३ ·
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे . ☔ पहिला पाऊस ☔ पहील्या पावसात भीजतांना आठवण तुझी होते पावसाच्या त्या सरीमधे मन माझे उमलते ☔☔☔☔☔ हाती तुझा हात घेऊन भीजावेसे वाटते दाटलेल्या त्या धुक्यांमधे रमावेसे वाटते ☔☔☔☔☔ पावसाच्या सरीने दरवळतो सुगंध मातीचा भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा

ती मला आवडते

निओ ·
ती मला आवडते जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा किरकोळ गोष्टीला खट्याळपणे Oh My God म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते माझ्या टोमण्यांवर गुद्द्यांचा प्रसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते मी टकाटक आवरून बाहेर जाताना हूं...

पुस्तक

शिव कन्या ·
ते पुस्तकच आहे. दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड. एकदा तू वाचलेलं. तू तिथं नसताना मी वाचलेलं. तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही. एकदा तू, नंतर मी. कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली मी तुझे डोळे वाचले. ते पुस्तकच आहे? अजूनही? दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड... -शिवकन्या

धुंद पाऊस

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला पाने हलता मोती ओघळे तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे गंध तुझा सावळ्या रानी विसावला पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला विहग जलधारांचे पालवींत लोपले गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला