Skip to main content

आठवण

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 08/03/2018 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

सरसरत्या सरिनी
तुझी आठवण यावी
रिमझिम पावसात
माझ्या सवे तू भिजावी

हुरहुर काळजात
किती माझ्या ग मनाची
तगमग फार होई
कशी तुला कळवावी

हुरहुर काळजात
किती माझ्या ग मनाची
तगमग फार होई
कशी तुला कळवावी

कधी उगवतो दिस
तोहि मावळू पाहतो
तुला कुशीत ग घेण्या
जिव कासाविस होतो

झालो मायेला पारखा
तुझ्या माझ्या विरहाने
दोन शब्दाच्या प्रेमाला
आत्ता किती ग बहाने

कधी डोळे मिटताहि
स्वप्ने तुझीच का यावी
किलबीलती पहांट
तुझ्या सवेच दिसावी

आता ओढ़ या मनाची
कशी कुणाला कळावी
राती चांदण्या साथीने
माझ्या अंगनी तू यावी

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1268
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया