Skip to main content

प्रेम कविता

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 13/10/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले (जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला.

दो डोळ्यांचे....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/10/2019 या दिवशी प्रकाशित केले.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

संध्याकाळी तू गंगेतीरी

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 01/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

तू मी अन पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस! पाऊस!! पाऊस! पाऊस!! झाला सारा भणाणलेला त्यासवे आला वारा वारा उडवीतो माझे मन मनामध्ये तू आहेस खरा चिंब मी भिजलेली माझ्यासवे तुझे भिजले तन हिरव्या रानात घेवूनी कवेत मीच हरवले माझे मन पाणी आले पानोपानी झाडे भिजली रानोरानी मिठीत तुझ्या मी आलंगूनी विसरले मी, गेले हरवूनी - बी ऑलवेज लाईक मी - ऑलवेज युवर्स पाभे ०३/०८/२०१९
काव्यरस

झरझर झरझर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

पावसाविषयी असूया

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाविषयी असूया पाहून माझे खुप हाल झाले पावसाने केले तुझे केस ओले गवतावर पडताच पाऊल शहारले अंग भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली ओली करून साडी पाऊस मातलेला बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले पाषाणभेद ०७/०७/२०१९
काव्यरस

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

कुरबुर झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कुरबुर झाली (काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले.

प्रेम...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . . तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या