मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू मी अन पाऊस

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
पाऊस! पाऊस!! पाऊस! पाऊस!! झाला सारा भणाणलेला त्यासवे आला वारा वारा उडवीतो माझे मन मनामध्ये तू आहेस खरा चिंब मी भिजलेली माझ्यासवे तुझे भिजले तन हिरव्या रानात घेवूनी कवेत मीच हरवले माझे मन पाणी आले पानोपानी झाडे भिजली रानोरानी मिठीत तुझ्या मी आलंगूनी विसरले मी, गेले हरवूनी - बी ऑलवेज लाईक मी - ऑलवेज युवर्स पाभे ०३/०८/२०१९

वाचने 3556 वाचनखूण प्रतिक्रिया 6

नाखु Sun, 08/04/2019 - 11:54
कविता पण अस्सल पाभे नाही,काही शब्द अगदी मीटरच्या बंधनात अडकत आहेत. पाभे यापेक्षाही सरस काव्य करु शकतात याची खात्री असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु