भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी
रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी
रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी
(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3173
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
समर्पक
शब्दचित्र आवडले.
वाह!
वाह!
सुरेख
शब्दचित्र आवडले,
पैजारबुवा,
जबरदस्त चित्रदर्शी शब्दयोजना...क्या बात है
खूप भाsssssssरी कविता !
मी गेलो होतो दोन महीन्यापूर्वी महिन्यात.
(आपल्यापासून स्फूर्ती घेऊन, ह्या ओळी खरडल्या...)
पँगाँग-लेक उंच सरोवर,
जणू आकाश वितळले!
पाणी कसे नीळेशार,
जागेपणी स्वप्न निथळले !!
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
छान शब्दचित्र!
सुंदर वर्णनकाव्य
आवडली
लडाख/लद्दाख हा एक वेगळाच
लडाख/लद्दाख हा एक वेगळाच अनुभव आहे...