Skip to main content

miss you!

तव नयनांचे दल

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 13/12/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस असण्याचे तापत्रय भोग-उपभोगल्यावर, दुनियादारीचा तिरका खेकडा सर्वांगावर नाचवल्यावर, प्रवासाची मोठीच मजल मारून, थकून येतो तुझ्या घरी. तुझ्या मंद हालचाली डोळे भरून पाहीन, तुझ्या खांद्यावर शांत झोपून जाईन. बोल बोल बोलण्याचे खापर फुटून गेलेलं असेल. तुझ्या ओठांवरचं लालभडक हसू आणि खोल काही शोधत जाणारी नजर, दोन्हीत हरवून जायचंय. डोळ्यात समाधान असेल तू जवळ असल्याचे, असेल स्पर्शात निरामय ओलावा, तेव्हा सैल झालेलं अंग आवडता कंटाळा मागेल. तुझ्या उबेची आस लागेल कसलीच घाई नसलेली. भटकून रानात खालेल्या मटण-भाताचे, सुसाट गाडी पळवून कुठेतरी चहा पिल्याचे, बसच्या उशिराच्या वैतागाचे, थेटरातल्या काळोख
काव्यरस

उत्तररात्र

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 13/12/2018 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
ओढ्यावर माळावरच्या थांबला चांद शरदाचा, कडब्याच्या पडवीपाशी चमचमतो हिरवा वेचा सौंदळीच्या झाडाखाली भूजलात पेटली धुनी, वाहते मंद ही रात्र थिजलेल्या वाऱ्यामधुनि. सिगरेट कधीची विझली बोटांत जळुनि सबंध, श्वासातून येतो अजुनि त्या सातविणीचा गंध ना मागत नाही निद्रा ही पहाट समंजस क्षीण, धाडली तिला कवितेच्या माहेरी पाठराखीण स्मरणांच्या फिकट धुक्याचे पडतील कुठे दहिवर? कुसळाच्या सुकल्या देठी आधीच अडकले गहिवर
काव्यरस

राया उशीर का जाहला...

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 09/11/2018 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात सरली पहाट झाली झुंझुरल्या सार्‍या दिशा झोप नाही ,जीव झाला सखया वेडापिसा वाट पहाते तुमची राया, उशीर का जाहला सख्या सांगा उशीर का जाहला ....... काल दुपारी राघू आला निरोप तो घेउनी मी मैना हरखून गेले सांगावा ऐकुनी ऐकुन माझे रूप खुलले, चमचम जणू चांदणी दिवा ठेवते दो नयनांचा तुमच्या वाटंला राया उशीर का जाहला..... ...... विडा केशरी सायंकाळी , काया माझी कातकेवडा मिठीत घेता विरघळले मी, ओठ साखर खडा. खयाल येता किणकीण वाजे, हाती हिरवा चुडा हुरहूर का ही मनी दाटली , जीव पिसा जाहला....
काव्यरस

गर्भार सातव्या महिन्याची

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 01/08/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

पहिली नजर

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 29/06/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी काय माहिती काय ,काय पुढे होईल पण हा क्षण मिळून , साजरा होइल मी तर इथे , तू ही इथे माझ्या मिठीत ये , ये ना... हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे.. हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे तुझीच आस मज हदयास असे तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही.. ज्या दिवशी गवसलीस मजला माझा जीव तो कुठे हरपला हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , ये ना.. वेडापिसा झालो मी ह्या वेदनेने हिसकावले स्वास्थ ह्या प्रेमभावनेने तडफडे प्राण माझे तुझ्
काव्यरस

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

लाल करा ओ माझी लाल करा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/05/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान