लेखकअनन्त्_यात्रीयांनी बुधवार, 15/11/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर
पायतळी आज माझ्या
अब्ज-रंगी पखरण
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान
आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
कोडे गहन कधीचे
विनासायास सुटेल
लेखकमाहितगारयांनी शुक्रवार, 10/11/2017 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत
तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.
सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज
गुन्हेगारी आभाळाला टेकली
राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली
महागाईचा पारावर गेला
प्रदुषणाने कळस केला
प्रगती कशी प्रतिगामी झाली
प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली
प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले
स्
लेखकअनन्त्_यात्रीयांनी सोमवार, 23/10/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची
हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्या
विश्वाच्या अटळ अंताची#
या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?
तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्या
क्षणभंगूर वर्तमानात
(*entropic end of the universe#)
लेखकmr.panditयांनी मंगळवार, 17/10/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही
परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता
हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?
आता आळस झटका आणि लागा कामाला
आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला
परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही
नशिब अस सहजासहजी बदलायच नाही.
- निखिल १७-१०-१७
लेखकचामुंडराययांनी शनिवार, 14/10/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना : ओळखा पाहू
लार्ज पेग कुणा मिळे पतियाळा
दोन थेंबांचे शिंतोडे कुणा पामराला ।। धृ ।।
किक कैसी
नशा कसली
मद्य ते दुर्मिळ भासतसे
स्कॉच ची जरी हाव नसे
देशीच फक्त नशिबाला ।।१।।
टोस्ट करी
ऑन द रॉक्स कुणी
चखणाच, हाय! कुणा मुखाला
व्हिस्की, रम अन टकीला
कधी मिळेल मज पिण्याला? ।।२।।
मला देशी
त्याला विदेशी
मद्यनशा ही जबरी
कसाबसा प्याला हाती धरी
सोनेरी पेय्य तो प्यालेला ।।३।।
- चामुंड रायणे
लेखकअनन्त्_यात्रीयांनी शनिवार, 30/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हे बहुरुपी मृत्यो
एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज
कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज?
उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी?
की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई?
कळत नाही, दोष देऊ कुणा ?
या बजबजपुरीचा बकालपणा ?
की तुझा निरंतर मायावीपणा ?
लेखकचामुंडराययांनी शनिवार, 30/09/2017 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
बघ तुला जमतं का ...
तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर
किंवा बटाट्याच्या चिप्स साठी
मर्जी तुझी...
उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल
पण
एकादशी दुप्पट खाशी हे
नेहमी लक्षात ठेव.....
तू जिम मध्ये
रोज जा किंवा नको जाऊस
इच्छा तुझी...
तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल
पण
वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला
मात्र विसरू नकोस.....
तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर
फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस
युअर विश...
पण
फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला
मात्र विसरू नकोस.....
तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये
सहभागी हो किंवा नको होऊस
हक्क तुझा...
पण
सोशल मीडियावर लॉग-इन करायला
मात्र विसरू नकोस.....
लेखकशिव कन्यायांनी मंगळवार, 12/09/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!
शिवकन्या
लेखकअनन्त्_यात्रीयांनी गुरुवार, 07/09/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
ये पुन्हा, छेदून ये त्या काल-पटलाला, इथे
ये जरा, समजावया ही शब्दविरहित भाषिते
ये जरा, स्पर्शून पुन्हा अद्भुताची ती मिती
जी दिसे स्वप्नात सरत्या जागृतीच्या शेवटी
ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी
चल पुन्हा, बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी