Skip to main content

मुक्त कविता

तिथे ओठंगून उभी...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते असे झाड फुलताना पान पान किल्बिलते क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते तिथे ओठंगून उभी.. ...एक कविता असते
काव्यरस

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 23/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
च्या मायला बॅट घ्यायची होती हातात अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं पण व्हायचं होतं येगळंच तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं एकदा का लग्न झाले नक्की समजा झाली तुमची चक्की दळत राहा जात्यावाणी पळत राहा चोरावाणी चंद्र सूर्य मग एक भासतील तारका क्षणात लुप्त होतील सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील उरलेसुरलेले केसही उडतील जसं जसं कुटुंब वाढेल तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल थोरामोठ्यांचं बघता बघता आयुष्य सार्थकी लागेल माझे पण असेच काहीसे झाले जास्त जाच नको म्हणून गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे त्याने सांगितल्या प्रमाणे वडाला उलट फेरे मारले गणपतीला अ

तेव्हा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 15/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तवाच्या लाक्षागृही पुन्हा पुन्हा मी जळलो माझ्या स्वप्नांच्या अंताची तेव्हा सुरुवात झाली मग अश्रुंच्या पुरात निराधार भोवंडलो करूणेच्या सागराची गाज तेव्हा निनादली आभाळाच्या तुकड्यात थोड्या पेरल्या चांदण्या तेव्हा आकाशगंगेची किनखाप झळाळली शब्द शब्द मग केला कवितेचा वज्रलेप कवितेची वही तेव्हा पाण्यावर तरंगली
काव्यरस

जालफ्रेझीची सोय

लेखक खिलजि यांनी शनिवार, 05/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला

लाल करा ओ माझी लाल करा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

(साहेब असेच) ठोकत राहा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 02/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
ठोकत राहा घडत जाईन बोलत राहा ऐकत जाईन येऊन दे मनातले बाहेर सारे कल्पनेला अनाहूत बळ मिळेल शब्दपंखानी उडत जाईन पोहोचेन सत्वर कवींच्या गावा सुंदर कविता लिहीत जाईन रांगतोय सध्यातरी असं वाटतेय हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन ठोकत राहा असेच हळूहळू घडत जाईन शोधत राहा स्वतःमध्ये मला इथेच पुढे असेन तुमच्यासमोर जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन बनायचंय थंडगार बर्फ़ावानी माया करा मजवर आपुल्या लेकरावानी कल्पनेच्या जगात रमतो मी गाठेन मना " उन्मनी " {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

अनघड शब्दांनो..

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावणार्‍या, जिज्ञासेच्या तेज:पुंज आकाशातून दिपवणार्‍या, अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळणार्‍या, अंतिम सत्याच्या मृगजळातून अथक ठिबकणार्‍या, स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरणार्‍या, जडचेतनाच्या जटिल कोड्यातून उलगडणार्‍या, क्षुद्रतेतून बुजबुजणार्‍या, विराटाला वेधणार्‍या, कोलाहलातून गजबजणार्‍या, एकांतातून निनादणार्‍या, माणुसकीतून पाझरणार्‍या, अनावर भोगातून- वीतरागी वैराग्यातून हेलकावणार्‍या, जाणिवेतून- नेणिवेतून धपापणार्‍या, अनघड शब्दांनो... ...वेचून वेगळं करतोय तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
काव्यरस

बाई पलंगावर बसून होती

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 26/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

हो मी अर्जुन आहे..

लेखक निओ यांनी मंगळवार, 24/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
हो मी अर्जुन आहे.. तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा गुणवत्तेने भरलेला नव्या चक्रव्यूहात अडकलेला न लढताच पराभूत झालेला हो मी अर्जुन आहे.. या महाभारतात कृष्ण शोधतो आहे जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा जरी सापडला तरी माझ्या वाटणीला किती यायचा ईथे अवती भवती सारेच अर्जुन दिशा हरवलेले... तो कृष्ण.. सखा गुरू ज्ञाता परिस्थितीची जाणीव करून देणारा ध्येयाची जाणीव करून देणारा मला कृष्ण हवाय मार्ग दाखवणारा माझ्या रथाचं सारथ्य करणारा माझं मनोधैर्य ऊंचावणारा नारायणा....