Skip to main content

मुक्त कविता

एकदा टारझन अंगात आला

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 24/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो

दिवसातून छप्पन वेळा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातून छप्पन वेळा माझा चेहेरा बदलत असतो अस्थिर अचपळ पारा माझ्या नसानसात दौडत असतो दोन देतो दोन घेतो चेहेरा तेव्हा निब्बर होतो अचाट ऐकतो अफाट बघतो तेव्हा चेहेरा कोकरू होतो कोsहं प्रश्न छळतो तेव्हा मुमुक्षूचा होतो भास टपरी चहा भुरकताना मीच टपोरी टाईमपास जुनी गाणी, जुने छंद, वार्‍यासंगे विस्मृत गंध, दर्वळतात भोवती जेव्हा चेहेरा कवळा होतो तेव्हा तोच लोलक, तिरीप नवी जुना पडदा, हुरहूर नवी अनंतरंगी अद्भुत खेळ बघायचा तर हीच वेळ
काव्यरस

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

लेखक खिलजि यांनी शनिवार, 21/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भि

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 20/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला आधीच फिल्डिंग लागली होती पण कॅच मी केला कित्येकांनी हाय खाल्ली बऱ्याच जणांनी माघार घेतली सर्वांदेखत चाटून पार फस्त केला गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥ दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो मैत्रिणींच्या कळपात आलो दोन फारच जिवलग होत्या, तिच्या नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो बघता बघता सेमीला गेलो ॥ सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी एकुलती एक बहीण होती त्यांची शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा अन अंतिम फेरीत

निनावी कल्लोळ

लेखक नाखु यांनी बुधवार, 18/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !! निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!! कर्म अंधारी, वासना विखारी !! (अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!! टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!! आपलेच दात आपलेच ओठ !!! जालपिपाणी टिवटिव गाणी !! विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!! भुक्कड दक्षक भणंग रक्षक !! दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!! विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !! गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!! आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 18/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं

दंतकथा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 07/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
गचपानात दडलेल्या फुटक्या बुरुजाखाली पोटार्थी गाईड सांगतोय : ही तेजतर्रार नावाची तोफ वापरून अमुक सैन्याने तमुक सैन्याच्या अमुक इतक्या सैनिकांना एका क्षणात घातले कंठस्नान वर्तमानाच्या विवंचना विसरून डोळे विस्फारलेल्या गर्दीला दिसू लागतंय गाईडने न गायलेल्या पवाड्यातल्या दंतकथेचं सोनेरी पान : (रण स्थंडिल हे धगधगते रणचंडी तांडव करिते उकळते रक्त जणू लाव्हा कळिकाळा घाम फुटावा टापांची उडते धूळ रणभेरी करी कल्लोळ तळपती वीज - समशेर गनिमाची नाही खैर विजयाचा अविरत डंका कानावर येतो, ऐका मृत्यूही थिजूनी जावा वीरांनो मुजरा घ्यावा धड धडाड गर्जे तोफ युद्धाचा चढता कैफ धड
काव्यरस

गणपत वाणी, सतत मागणी

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 02/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

एक गाणे दूरवरुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 19/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते रोमरोमातून काही तरल मग ओसंडते मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी
काव्यरस