Skip to main content

मुक्त कविता

पापणी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 19/08/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा *पापणी* लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली ...थरथरती पापणी झरझरती पापणी... अविश्रांत असा, झरा वाहता झाली,  पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली ...झरझरती पापणी - संदीप चांदणे

निर्णय

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 15/08/2017 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
मान्य आहे ते सत्तेत होते मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते त्यांच्यातले बरेच जण खरे असतील हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या विरोधातही असतील पण कदाचित निर्णायक क्षणी समोर आलेली त्यांची काही अपरिहार्यता असेल किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना घाईसुद्धा झाली असू शकते... ईतकी वर्षं लढा दिल्यावर समोर विजय दिसत असतानाची घाई सगळं सगळं मान्य आहे पण तरीही , ते मूठभरच होते तुम्ही तर करोडोंच्या संख्येने होता ना का नाही सांगितलंत मग ...की आम्हाला नकोय फाळणी
काव्यरस

~~~मैत्री~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 12/08/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
~~~मैत्री~~~ आपसुक ओळख सगळ्यात निखळ, आपुलकीचं नातं सर्व सामावून घेतं, जीवनाच्या मेळाव्यात भेटतात अनेक, मनाच्या कोपऱ्यात मैत्रीचं विशेष, रक्ताच्या नात्या पलिकडचं सर्वात अधिकतमच, एका हाकेत निस्वार्थ सोबत, जणु ओंजळीत मैत्रीची गाठ, सुख शांती ची शिदोरी दुख जाई दूर कोसवरी, हक्काचं रागावणे क्षणांत माफ करणे, हातात हात कायमची साथ, अलगद प्रवास सुखाचा सहवास, डोळ्यांत आठवणी अन,निःशब्द मैत्री.... कवी- स्वप्ना..
काव्यरस

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

पुढील पाच मिनिटात

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 08/08/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील पाच मिनिटात, हे मानवते "अ" अतिरेकी काळिमा फासतील तुझ्या तोंडाला "ब" बलात्कारी झुकवतील तुझी मान शरमेने खाली "क" कोवळी बालपणं विकली जातील बाजारात "ड" डोकी फुटतील धर्ममार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने तुझ्या डोळ्यादेखत ई-पेपर्स सांगून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती रोम-रोम जळताना तुझ्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ हे उत्सवी फिड्ल कोण वाजवतंय न थांबता?
काव्यरस

जेथे जातो तेथे....

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 04/08/2017 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालतो तयाला हाती धरुनिया गेलो कोठेही तरी देतो आधार दाखवितो मार्ग सदैव मजला सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा तयासी मी सदा खेळतो कौतूके नेट वरी सुखे संचार अंतर्बाही बॅटरी होता डाऊन जीव कासावीस धाव घेतो सत्वर चार्जर कडे इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा जगात नेटवर्क्स विविध अनेक ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी बॅलन्स तो संपतो असा भरभर रि-फिलचे बळ अंगी देई देवा रात्री साथ देई माझिया उशाशी प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या नानाविध रिंग-टोन भुलवी मजला फोटो, चलतचित्रे ठेवीतो
काव्यरस

दिंडी

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/07/2017 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या तिथे सुदूर चंद्रभागेकाठी काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत कल्पांतापर्यंत अकिम्बो
काव्यरस

उगवता सूर्य आणि तो

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/07/2017 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
उगवत्या सूर्याला पाहून तो छद्मीपणानं म्हणाला तुझं उगवतं रूप फार फसवं आहे मित्रा सकाळच्या किरणांना कोवळं म्हणण्यापेक्षा दुबळं म्हटलं पाहिजे कारण मी तुझं हे शतकानुशतकाचं राहाट गाडगं पाहून कंटाळलोय संध्याकाळी मावळताना हसलेलं आणि उगवताना वैतागलेलं पाहिलंय तरीही तुझा उदयच लोकांना का आवडतो अस्त का नाही? उगवत्याला दंडवत मावळत्याला का नाही? सूर्य म्हणाला ज्याच्याकडं काम असतं त्यालाच जग हात जोडते काम संपत आलं की लगेच त्यालाच रद्दीत काढते मग रक्त आटवलं तरी जग दखल घेत नाही तुम्ही नष्ट झालात तरी जगाचं आडत नाही कामाचा सूर्य थकल्यावर लोक पाठ फिरवतात कामचुकारपणा जपण्यासाठी नव्या सूर्याला कवटाळतात
काव्यरस

भूमिपुत्र आणि काळी आई

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/07/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या सुकल्या डोळ्यांनाही भिजवेल एवढं पाणी त्याला द्यायला सरकार तयार नव्हतं त्याला दिलेल्या अश्रूंचाही कोटा त्यानं खर्च केला होता कधी मरणारं जित्राब पाहून कधी सावकाराला जमीन विकून तर कधी हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसानं झोडपलेलं पाहून अपयशाच्या पहिल्या पायरीवरच जगत त्याच्या अनेक पिढ्या काळ्या मातीत मिसळल्या पण त्या समिधांनीही भूदेवता प्रसन्न झाली नाही की लक्ष्मी देवतेने भरभरूनवआशीर्वाद दिला नाही सावकार रूपी लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला मात्र त्याचं नशीब बांधलं गेलं ते कायमचंच अंधार्या भविष्याच्या सात-बार्यावर मात्र त्याच्या आर्त वेदनांचं गोंदण झालं कधी भूमिही
काव्यरस