Skip to main content

मुक्त कविता

अ क्लोथलाईन.

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 01/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर.. निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा.. नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट.. आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट, भोकाभोकाचं बनियन.. टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट.. कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट.. चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक.. काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे, त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे दोरीवर वाळत घातलेले कपडे खूप काही सांगून जातात, घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस

( पुन्हा नोटा )

लेखक गबाळ्या यांनी मंगळवार, 19/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नोटा (चाल : गे मायभू तुझे मी) नोटा अनेक असती येती तुझ्याकडे त्या मी नोट शोधतो माझी परक्याच भासती साऱ्या दूरस्थ योजना* त्या खुणवी सदा मनाला मी गुंतवित जाता बुडतात घेऊनि मजला मागावयास जाता देती कुणी न काही नोटांनी भरले पाकिट मी स्वप्नी रोज ते पाही * योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

लेखक गबाळ्या यांनी शनिवार, 09/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

|| गुरु महिमा ||

लेखक गबाळ्या यांनी शुक्रवार, 08/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

कविराज

लेखक गबाळ्या यांनी रविवार, 03/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

नजरेतच सारे..

लेखक समयांत यांनी शुक्रवार, 01/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही. तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो. तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही. कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत. तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते. माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग

उठ मावळ्या ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात. उठ मावळ्या फोडू चल नळ्या कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या चल मदिरालयी तु घुस ये सोडूनि घास फूस कोंबड्यासम केस रंगविसी कोंबडीस मग का तू वर्जिशी ६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस ये सोडूनि घास फूस वय का आपुले असे मोजिले चार पेग जर रिते तू केले यौवन भासेल तूस ये सोडूनि घास फूस