Skip to main content

मुक्त कविता

आणखी अपहरणे

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'ती'ही त्याचा फुटबॉल करते कधी कधी किंवा बर्‍ञाचदाही, पण अपहरणांना, 'ती'च्या तर्‍हा अधिक कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले 'ती' चे अपहरण करण्याची सवय आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही काही अपहरणांची सोय 'ती'च्या रूप रंगाने करुन ठेवली असते 'ती'ने आधी निवडलेल्या गुणसूत्रांमुळे 'ती'च्यातील 'ती'ला 'ती'च्याशी स्पर्धा करण्याच्या इच्छेमुळे 'ती'ने बाळगलेल्या न्युनगंडामूळे आणि त्यांच्या अंहगंडामुळे 'ती'च्यातील मालमत्तेच्या लालसेने कि कथित ममतेच्या स्वार्थाने, कि.. त्यांच्यातील मार्केटच्या लालसेने कधी त्यांच्यातील असुरक्षीततेने शुचिते

अपहरण

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय . अपहरणकर्ते फक्त बदलत जातात अनेकदा अनुमती शिवाय , अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने अपहरणांच्या घटनांचे हे आत्मचरीत्र अद्याप बाकी आहे, वाढवेन म्हणतोय उसंत मिळेल तसे तसे नव नव्या अपहरणकर्त्यांची तेवढीच सोय जुन्या अपहरणकर्त्यांना जरासा दिलासा प्रेर्ना

तहान..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/03/2018 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
"हे राम शिव शंकरा..Sssss" होय मी धार्मिकच आहे. रोज निद्राधीन होताना मनाची कवाडं बंद करण्याआधी ही शब्दफुलं अंतरात्म्याला वहावीच लागतात मला. त्याशिवाय ह्या देव्हाऱ्यात रात्रीचा निरव येत देखील नाही. त्याचे कर्तव्य करायला. देहाची कुडी जन्माला आलो तेंव्हा अमुक एका धर्माचा ठसा घेऊन आली नव्हती.तो धर्मच नव्हे तिचा! हां., पण आधाराची गरज हा मात्र तिचा मूलभूत स्थायीभाव! ती तहान मात्र अत्यन्त नैसर्गिक,शाश्वत, अविनाशी!

मी तृषार्त भटकत असता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी तृषार्त भटकत असता मृगजळास भरते आले मी मला गवसण्या आधी वैफल्य विकटसे हसले शब्दांच्या इमल्यापाशी सावली शोधण्या गेलो पण शब्दांचे केव्हाचे धगधगते पलिते झाले क्षण क्षणास जोडित जाता वाटले काळ संपेल पण वितान हे काळाचे दशदिशा व्यापुनी उरले
काव्यरस

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 28/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास!
काव्यरस

मातृभाषा

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 22/02/2018 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 17/02/2018 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

काही त्रिवेणी रचना...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..
काव्यरस

चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 28/01/2018 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
( सुरेश भट _/\_ ) चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली उघडले कधीचे गुत्त्यांचे द्वार बंद अन्‌ चोरपावलांनी आला देशीचा गंध गल्ल्यावरी गुत्त्याच्या आंटी येऊन बसली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली चल लवकरी आता पहिल्या धारेचा सहारा मोसंबी नारंगी ठर्रा करती तुझा पुकारा सज्ज साथ देण्या पापड अंडी चकली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली तव याद करिती सारी बेवड्यांची मांदियाळी घे एक घोट नवटाक चिंता सर्व जाळी तुज शोधण्यास वेडी बायको पुन्हा निघाली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली