मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालमित्रांची सुट्टी....

bhagwatblog · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी करू थोडा खेळ, बसला आता मेळ करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी

वाचने 3079 वाचनखूण प्रतिक्रिया 4