Skip to main content

करुण

घर

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 07/02/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
या घराला विचारले मी एकदा असा रिकामा रिकामा असतोस वाईट नाही वाटत? क्षणभर विचार करून घर म्हणाले, नाही, म्हणजे नेहमीच नाही . . म्हणाले या भिंती पाहिल्यास किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत इकडे ये, या खिडक्या पहा आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत . . अन् ते दार बघितलेस सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे . . हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास ते कां? . . म्हणाले जरा वर पहा ते झगमगणारे आक
काव्यरस

वेडी आशा अनुदानाची -

लेखक विदेश यांनी रविवार, 03/02/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
आशा मोठी वाईट असते कुणालाच ती सोडत नसते - पाऊसधार भुलवुन जाते धरा कोरडी पहात असते... गोठ्यामधली वैरण संपुन गुरेढोरे विकून झाली - डोळ्यामधल्या पाण्यामध्ये शिळीच भाकर भिजून गेली... दुष्काळाचे पडता सावट शासन सारे झोपी जाते - बळीराजाची वेडी आशा अनुदानाची वाट पहाते ! .
काव्यरस

ती खोली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 29/01/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढ
काव्यरस

नशिबाचे भोग -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/01/2013 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
" फुलू दया ना मला जरा , बघू दया ना जग जरा - तुम्ही सजीव, मीही सजीव कळून घ्या भावना जरा -" एक कळी स्फुंदत होती , वेलीजवळ मी असताना - मन आपले उलगडत होती हितगुज माझ्याशी करताना ! " काही करू शकत नाही जगाविरुद्ध जाता येत नाही - मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग -" ...केविलवाणे होत म्हणालो , दु:ख जाणूनही कळीचे . खिन्न हसून ती वदली .. " नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! " .
काव्यरस

उरली फक्त आठवण ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 26/01/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो , एकदा मी छानसा - गळुन गेली फूल पाने.. एकटा मी हा असा ! नाचती पक्षी कसे बघुनिया खांद्यावरी.. खेळताना, होइ मजला हर्ष माझ्या अंतरी - फूल फळ हुंगावया जमति जेव्हां पाखरे - हृदय माझे भरुनिया जातसे तेव्हां खरे ! सावली शोधावया पांथस्थ ते येती कुणी - बाहु पसरुन स्वागताला धन्यता वाटे मनीं ! आज काही नाही उरले भोवती माझे इथे - एकटा मी दु:ख माझे सांगतो मजला इथे ! .
काव्यरस

स्त्रीस श्रद्धांजली

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 16/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..
काव्यरस

मी बिभीषण एकटा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/01/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
काव्यरस

येशील?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/01/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या
काव्यरस

वेदना

लेखक kanchanbari यांनी रविवार, 06/01/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
इवलस तूझ बाळ वेदनांनी झाल लाचार म्हणे काय केल त्याने पाप सर्वांना सांग तु आज मखमलीची असतात स्वप्नांची पिसं अत्याचारी या दुनियेत हिरमुसली तुझी कुस ओढवली आहे सर्वांनी अंधाराची चादर तुझ्या या संसाराला लागली कुणाची नजर डोळ्यांच्या या पापण्या बघतांनाही लुकलुकतात अश्रुंच्या या सागरात थेंब रक्ताचे मिसळ्तात अरे जगाच्या माय बापा तुच आहेस ना सर्वांचा भाग्य विधाता मग दुर कर नशिबातला काटा तेव्हा करेल वंदन तुला दाता
काव्यरस

शांती नवं वर्षातली

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 03/01/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...
काव्यरस