Skip to main content

टप टप टप...

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 06/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला घराचे छत अजूनही गळतेय टप टप टप... --------------- तुला निरोप देऊन परतलो तसाचं बसून आहे बराच वेळ चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली टिपूर चांदणे पसरत गेले ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक पण एक आवाज कानात घुमतोय टप टप टप... -------------- बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस.. खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस.. टप टप टप... -------------- तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा जाणवतोय.. पण हातात सापडत नाहीये तेवढ्यात तुझ्या आवाजाला छेद देऊन खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस.. टप टप टप... -------------- हे वेदनेचे सत्र थांबवायला हवं अनाहूतपणे कानावर हात ठेवले एवढ्यात त्या मफलरचा स्पर्श किती प्रेमाने विणले होतेस तू.. कितीही अडवलं तरी काही थेंब पडलेच गहिर्याण डोहातल्या पाण्यावर टप टप टप... -------------- आजकाल आकाशात चंद्र अवतरला तरच हे घर उजेडाचे अस्तर पांघरतं नाहीतर आहेच.. खिडकीच्या काचेवर तोच पाऊस.. टप टप टप... -------------- खुप सन्नाट्टा होता त्या रात्री ना कुठेही आवाज, ना कुणाची चाहूल खुप शांत वाटत होते त्या रात्री कुठून तरी एक टिटवी त्या शांततेला एक मोठ्ठी भेग पाडून गेली संवेदनेला जाग आली चंद्र खाडीच्या पाण्याला ओढतो तसा परत तुझ्या खोलीकडे ओढला गेलो पावले त्या खिडकीकडे वळली किती रात्री त्याच चंद्राला न्याहाळत गेल्या अनवधानाने खिडकी उघडली तर बाहेरच्या टाकीवर परत एकदा तोच पाऊस टप टप टप... -------------- घराचे गळकं छत आकाशातला चंद्र डोळ्यातले चांदणे खिडकीच्या काचेवरचा पाऊस अन् तुझे डोळे.. सग्गळं सग्गळं ... टप टप टप... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०६\०७\२०१२)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2884
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

कविता आवडली :) "हातातला तुझ्झा चिमुकला हात तुझ्यासारखाच अवखळ पाउस रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात तु मुद्दामुन मारलेली उडी तुझ्या गालावरचे निखळ न खोड्कर हास्य सावरता तुला , हुलकावणारी छत्री तुझ्या न माझ्या डोकयावर पडणारे.. थेंब टपोरे टप..टप...टप " :)

टिपूर चांदणे पसरत गेले ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक पण एक आवाज कानात घुमतोय टप टप टप... बाकीच्या कडव्यात पावसाची उपस्थिती( विरहाची ) या ना त्या स्वरूपात आहे.या कडव्यात चांदणे आहे. हा टप टप आवाज कशाचा ??? बाकी काव्य उत्तम !

छान लिहिली आहे कविता..:) हि कवीता वाचुन एक जुने गाणे आठवले ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..

अवडला

अरे व्वा मिका!! बरेच दिवसांनी लिहते झालात. मलाही आधी बालकविताच वाटली. :)