मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सबूर

धनंजय · · जे न देखे रवी...
सबूर --- अवचित वाटेवर जुडलेले साथीदार-- काय त्यांच्या गाठोड्यांत? काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात चिघळले काळ फार? . चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ सारे उघड उघड… तरी लपलेले जणू गोंधळात गडबड! शोधू काळजीने वाट... . आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत भांबावून खूप वेळ... बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ, सबूरीची आहे बात. --- --- Slow Going --- What all is crammed in sailors' chests Of bunkmates met by chance? What wounds we bear within our breasts What abscesses to lance? . Undress the wound, unlock the lid, And all is there, laid bare. But jumbled, tumbled, open's hid: Unless we sort with care. . We look within, with fear and hope - But long we'll take to know... We'll hurt, we'll heal, we'll feel, we'll grope: And trust will come; but slow. ---

वाचने 2358 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by चित्रा

दोन्ही कविता आवड्ल्या. फक्त ''अवचित वाटेवर जुडलेले साथीदार'' या ओळीतले हा जो 'जुडलेले' शब्द आहे ना तो तितका सहजपणे येत नाही राव. 'अवचित वाटेवर भेटलेले' म्हणा किंवा 'अवचित वाटेवर जोडले गेलेले' असं काही तरी पाहिजे होतं असं वाटलं. -दिलीप बिरुटे

धनंजय Mon, 08/13/2012 - 22:08
सर्वांचे आभार. बिरुटेसर - होय "जुडणे" शब्दाचा अर्थ "जोडले जाणे" असा जवळजवळ आहे. "जुडणे" तसा कमी वापरातला शब्द आहे, पण अर्थछटा जरा वेगळी येते. ... म्हणजे "तुटलेले संबंध/तोडले गेलेले संबंध" दोहोंचा अर्थ तसा जवळजवळ सारखाच आहे. पण "तोडले" म्हटले की "कोणी तोडले" असा विचार अस्पष्टपणे मनात येतो. "तुटले" म्हटले की "कोणी?" असा प्रश्न मनात थेट येत नाही. त्याच्याच सारखे (पण संबंध सुरू होतानाच्या वेळी) "जुडलेले/जोडले गेलेले" यांच्यात अर्थछटेचा फरक येतो.

पैसा Mon, 08/13/2012 - 22:42
बरेच दिवस चाललेला मिपावरचा चांगल्या कवितांचा दुष्काळ संपला म्हणायचा!