मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या विना

आनंद भातखंडे · · जे न देखे रवी...
काव्यरस
तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी || तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही || तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही || तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग || तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा || तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||

वाचने 1873 वाचनखूण प्रतिक्रिया 2

संजय क्षीरसागर 23/07/2012 - 11:51
पहिली ओळ तुझ्या विना ही रात्रनं सरते माझी काळी काळी अशी हवं हो, आणि तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी|| अशी चालू संसारची होळी लावली तर रोजच्या पोळी-भाजीचे वांदे होतात... असं मी नाही, अनुभवी लोक सांगतात!

मंदार दिलीप जोशी 24/07/2012 - 10:00
विरहभावना छान उमटल्या आहेत.