Skip to main content

कातरवेळ..

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 23/08/2012 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः आठवांचे सूर, अश्रूंचे पूर, लागे हूरहूर, जीवालागी.. नि:शब्द बोलणे, हळूच ते स्मरणे, अव्यक्त भावना, हृदयात... मनात तू, स्पंदनात तू, जीवघेण्या श्वासात तू, ध्यानीमनी... दिशा सांजावल्या, गोकुळे बहरली, परि एकलेपण, कातरवेळी...!! - सुधीर बागुल, मस्त कलंदर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2735
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

प्राची आणि गच्ची दोन्ही आवडल्या. मनीच्या बाता: गण्या विडंबकांसाठी चांगला कच्चा माल पुरवलांन की मकीने.

पण हा सुधीर बागुल काय प्रकार आहे? त्यांनी मदत केलीय का?

असे वाचलेय, म्हणे की जुन्या काळी काही प्रसिद्ध कवि लोक आपल्या माहेरी गेलेल्या बायकोला असे पत्र पाठवायचे मग लगेच त्या वहिनी परत यायच्या. वर अहो हे आमचे "प्राध्यापक" कवि इतके धांदरट (की व्यवहारी) की, पोस्ट कार्डवर कविता लिहून पाठवायचे मग वहिनींच्या माहेरचे सगळे त्यांची थट्टा करायचे. असो कविता लिहीलीय म्हणजे काका एव्हाना परतले असतीलच :-)

६ ६ ६ ४ नीट संभाळले असते तर कविता अजून सुंदर झाली असती.

काल मी आणि सुधीर सहज* गप्पा मारत असताना पहिल्या चार ओळी सुचल्या. दुसरं कडवं सुधीरने सुचवलं. नंतर याला मग फक्त स्मरणरंजन असं न ठेवता काही कारणाने कधीही न परतून येणार्‍या जोडीदाराची वाट पाहात असलेल्या व्यक्तीचं 'गर्दीतलं एकटेपण' करावं असं ठरलं. त्यातून शेवटचं कडवं आलं. माझ्या मते कविता तिथेच पूर्ण झाली होती. पण एवढ्यातून एकलेपण अधिक प्रकर्षाने जाणवत नाही असं सुधीरला वाटलं, आणि म्हणून मग ते मीटरमध्ये न बसणारं पण आमच्यामते भावनेला पूरक असं ते तिसरं कडवं लिहिलं.. * हे सहज आणि 'सहज' यांचा काहीही संबंध नाही.. @सहजरावपणजोबा, अशा कविता प्रत्यक्ष जीवनात लिहिण्याइतका विरह नसतो हो आमच्याकडे...