Skip to main content

करुण

सीमारेषा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/03/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...
काव्यरस

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

काव्यरस

अळी मिळी गुपचिळी

लेखक जयवी यांनी शनिवार, 09/03/2013 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
pain “सगळं होतंय ना मनासारखं मग झालंय काय चेहेरा पाडायला ?” प्रश्न तेच पुन्हा पुन्हा... “सुख बोचतंय..... दुसरं काय...” उत्तरंही तीच.... त्यांचीच पण बोलणार नाही मी...!! का सगळं बोलून दाखवायचं... का सगळं उघडून दाखवायचं... मीच माझं कुलूप उघडायचं, आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं. मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार मीच ती गोळा करायची माझ्यासाठी.......
काव्यरस

-पाऊस -

लेखक फिझा यांनी गुरुवार, 07/03/2013 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
-पाऊस - हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत आता फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! गावात खांब आलाय विजेचा अजून काम राहिलंय थोडं , लावेन मग दिवा शंभर चा लकाकेल मस्त माझं झोपडं , देव आहे माझ्या पाठीशी कसं होईल काही वेडंवाकडं, ....तोरण म्हणून बांधीन ऊस .....उद्या पडेलच की पाऊस !!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून
काव्यरस

एक भिंत येथे होती

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 06/03/2013 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१|| एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ || काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३|| एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४|| ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५|| - संध्या ०६ मार्च २०१३
काव्यरस

माय

लेखक पंचम यांनी सोमवार, 04/03/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
माय.... मला सुटता सुटेना माझ्या लेकराची माडी .. जोडले घरटे कधी रे वळखीची काडी काडी.. माझ्या पंखातला चिमणा नवं घरटं बांधतो .. वेळ नाही माझ्यासाठी मला दबकत सांगतो .. नव्या घरट्यात असल नव्या चिमणीचे राज्य बघ माऊलीचे पंख कसे घायाळ रे आज .. आज माझच लेकरु दावी आश्रमाचा रस्ता कशी आली पहा येळ आज मावळतीले झुकता पिल्लाची नवी कोठी किती मोठी रं असावी? पण माझ्या अडगळीस तिथे जागा का नसावी? प्रभु एकच मागणे पिल्ला दु:ख न मिळु दे जरी मिटले डोळे माझे तरी त्याला न कळु दे .. सरणाच्या चितेवर जेव्हा बाळ माझं रे रडेल. तेव्हा चितेतल्या आगीत रे माझा देह कळवळेल .. – कवी पंचम (निशांत तेंडोलकर)
काव्यरस

पावसाला बोलवायला हवे आता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/02/2013 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला बोलवायला हवे आता ------- तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर कोरली होतीस त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या चक्रव्युहात अभिमन्यु झाला होता माझा... ------- अंगणातला पारिजातकही आता फारच काकुळतीला आला आहे तुला आठवतं? पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे . . खरचं पावसाला बोलवायला हवे आता ------- कोसळणाऱ्या धारांमध्ये खिडकीतुन हात बाहेर काढून ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात --------- कुठे दडलाय तो कुणास ठाऊक? --------- नखशिखांत भिजल्
काव्यरस

निघाली खाशी हो स्वारी ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
निघाली खाशी हो स्वारी दुष्काळी त्या दौऱ्यावरी संगे घेउनिया लवाजमा फौजफाटाही तो भारी तिकडे नाही की पाणी कोरड्याच साऱ्या विहिरी संगे घेउनिया बिस्लेरी ट्रकमधे भारी भारी खाण्याला नाही बाजरी ना दाणा ना भाकरी संगे घेउनिया कारभारी कुशल सैपाकी आचारी डोईवर छत्री ती धरी सोबतचा चमचा कुणीतरी संगे घेउनिया गालीचा पायघडी ती कुणी अंथरी निघाली खाशी ती स्वारी पहा हो विमाने ती वरी संगे घेउनिया सामग्री दुष्काळी त्या दौऱ्यावरी ! .
काव्यरस

बघत राहिलो धूळ

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/02/2013 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
कवि गोपालदास 'नीरज' यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न.
काव्यरस

दारवा....

लेखक पक पक पक यांनी शनिवार, 16/02/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय , तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही, तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो.
काव्यरस