Skip to main content

धत् तेरे की...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 13/09/2021 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

(कळेना मला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 16/08/2021 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 10/08/2021 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपळाने सोडले गावाच्या पाऱ्याला. फ्लैट मध्ये आला मनी प्लांट झाला. (२) वाळूचे मनोरे वार्यात उडाले. भग्न स्वप्नाची अधुरी कहाणी. (३) कल्पनेला मिळेना साथ शब्दांची. कोरीच राहिली वही कवितेची. (४) पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काटा रुते कुणाला हा दैव योग आहे. भाला रुते कितींना हा मोदी योग आहे.

# तुम्ही(च) म्हणालात

लेखक सुरिया यांनी शुक्रवार, 21/05/2021 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

डेस्टिनेशन ∞

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 06/03/2021 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताच्या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे चांदणचुर्‍याचे भूकलाडू हिमनगांचे तहानलाडू (तहानभूक हरपू दे पण) रसद टकाटक तयार आहे प्रकाशवर्षी मोजपट्टी डार्कमॅटरचा भव्य फळा धूमकेतूचा खडूतुकडा होल्डाॅलमध्ये भरला आहे दिशा कोन ढळून जातील घड्याळ काटे उलटे फिरतील उद्याच्या बातम्या काल कळतील याची तयारी ठेवली आहे मुक्कामाला पोचलो तर दृृृष्ट तिथे काढतील माझी त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप काजळडब्बी घेतली आहे आता फक्त यान कुठचे इंधन साठवायला कॅन कुठचे उकडले तर फॅन कुठचे ह्या प्रश्नांशी लढतो आहे अनंताच्या यात्रेसाठी फक्त निघायचं बाकी आहे

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

शब्द

लेखक पाटिल यांनी बुधवार, 24/06/2020 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणं जे जिवंत कागदावर त्याचं प्रेत बोलणं जे भाबडं मुक्त कागदावर तेच अडचणीचं बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर बोलणं गरमागरम लालबुंद कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत बोलणं, वार्‍यावर विरून जाणारं कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर. कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं. बोलताना जे गाणं, त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण. एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं. त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं. बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं. कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं. बोलणं, माझ्यासारखं, आधी. लिहिणं

(वळण)

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?