पाककृती

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
20 Jul 2014 - 16:02

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)

तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात.

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
19 Jul 2014 - 16:43

मावा केक

साहित्य- १५० ग्राम मैदा
१५० ग्राम मावा/खवा (मावा उपलब्ध नसल्यास रिकोटाचीज चा मावा बनवावा.)
१२५ ग्राम तूप/लोणी
२०० ग्राम साखर
४ अंडी
१ चहाचा चमचा वॅनिला इसेन्स
१ चहाचा चमचा बेकिंग पावडर
पाव कप दूध
१चिमूट मीठ

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
19 Jul 2014 - 05:53

खारवलेले शेँगदाणे

खारवलेले शेंगदाणे

साहित्य:
शेंगदाणे ,मीठ (+अर्धीवाटी भाजण्यासाठी) .स्टीलची चाळण ,जुनी अॅल्यु०ची कढई इ०

कृती :
(१)वाटीभर दाणे बोलमध्ये घेऊन एक छोटा चमचाभर पाणी टाका .मिसळून अर्धाएक तास ठेवल्यावर सर्व पाणी शोषले जाईल .ओलसरपणा गेला पाहिजे .

(२)दोन चमचे पाण्यात चमचाभर मीठ टाकून विरघळवा .थोडे तसेच राहील .हे एक चमचा पाणी एका मोठ्या थाळ्यात टाकून बाजूला ठेवा .

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
18 Jul 2014 - 21:50

गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....

आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्‍याच पा.क्रु. आल्या.

काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे.

कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु. पण येत असतात.त्यातलीच हे एक वेगळी पा.क्रु.

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
18 Jul 2014 - 16:09

कोबीची खीर

कोबीची खीर
साहित्य ---------
किसलेला कोबी १ वाटी
दुध अर्धा लिटर
साखर पाउण वाटी
सोललेले वेलची दाणे ४
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तूप २ चमचे
बदाम पिस्ते बारीक चिरलेले दोन लहान चमचे.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
17 Jul 2014 - 16:29

दुधीचे मुटकुळे (मुटके)

Dudhi Mutkule-web

साहित्यः

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
16 Jul 2014 - 18:14

कलिया बदाम

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
16 Jul 2014 - 01:45

बाउमकुखन (ट्री केक)

"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
14 Jul 2014 - 22:51

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या .

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
13 Jul 2014 - 21:25

फ्राईड मटण चॉप्स

फ्राईड मटण चॉप्स
साहित्य----------
मटण चॉप्स---६
आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे.
१० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट
३ अंडी फोडून चांगली फेटलेली
मीठ
रवा किंवा ब्रेड क्रम्स
तळण्यासाठी तेल.
कृती-----

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
13 Jul 2014 - 19:34

शाही अंडा मसाला

साहित्य- ४/५ अंडी उकडून,
२/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे,
२/३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,
१ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान
७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,
१ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर,
मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर

मितान's picture
मितान in पाककृती
13 Jul 2014 - 17:18

पाकपुर्‍या (पाकातले चिरोटे)

पावसाळा सुरू झाला की आईचा स्वयंपाक बदलायचा. पक्वान्न पण बदलायची. आंबे संपलेत, श्रीखंड खाण्यासारखे हवामान नाही, श्रावणातला पुरणाचा रतीब सुरू व्हायचा आहे, खिरींचा खुराक सुरू व्हायला हिवाळा अजून यायचाय, बाहेर भुरभुर पावसामुळे चमचमीत नि गोड खायचा आमचा हट्ट पुरवायचा आहे.... असं सगळं असायचं. मग काय सुरू व्हायचे एकेक पदार्थ..

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
7 Jul 2014 - 16:50

ऑरेंज चीली आईसक्रिम

Final 1

प्यारे१'s picture
प्यारे१ in पाककृती
6 Jul 2014 - 22:09

<<< कथामोजी >>>

साहित्यः
१. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा.
२. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द.
३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे.
४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय.
५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा.

कृती:

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
5 Jul 2014 - 20:56

जांभळांचा सॉस

काल जांभळांचा सॉस केला होता .तो ब्रेड टोस्टवर लावून चांगला लागतो .

काही फोटो इथे आहेत .

http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/c1

पाहिजेत
जांभळे ,साखर ,टोस्ट .
(जांभळांचा हंगाम संपत आलाय माफ करा .त्याला पर्याय लवकरच बाजारात येईल .आलुबुखार .याचाही सॉस चांगला होतो .)

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
5 Jul 2014 - 16:22

कारलं फ्राय

कारलं फ्राय
साहित्य...........
कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत)
अर्धा नारळ खवलेला.
५/६ हिरव्या तिखट मिरच्या.
कोथिंबीर
तांदळाची पिठी.
मीठ (चवी अनुसार)
तळण्यासाठी तेल.
कोकम
कढीपत्ता (४/५ पाने)
कृती---

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
5 Jul 2014 - 15:15

झट्पट दहीवडे

झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
4 Jul 2014 - 20:57

झटपट चकली(ब्रेडची)

साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी
बेसन पीठ २ चमचे
तंदूळ पिठ २ चमचे
ओवा १ चमचा
धने पुड १/२ चमचा
जिरे पुड १/२ चमचा
आमचुर पावडर १ छोटा चमचा
तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे)
तीळ १/४ वाटी
मीठ चवीनुसार

जागु's picture
जागु in पाककृती
4 Jul 2014 - 13:05

भरले खेकडे

पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
30 Jun 2014 - 21:44

चिकन सुवालाकी

सध्या ग्रीसवारी करुन आल्यामुळे आणि तिकडचे खाद्य पदार्थ आवडल्यामुळे ते घरी बनवून बघीतल्याशिवाय राहवेना ;) ग्रीक चिकन सुवालाकी म्हणजे ग्रीक पिटा ब्रेडमध्ये स्क्युअरवर ग्रील केलेले मीट / मांसाचे तुकडे, सॅलॅड्स, सॉस घालून रोल सर्व्ह करतात.

ग्रीक पिटा ब्रेड अतिशय छान, मऊ असतो. त्याचा वापर सुवालाकी, यीरोस, फलाफल मध्ये करतात. हुम्मुस, त्झात्झिकी बरोबर ही खाल्ला जातो.