चिकन सुवालाकी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
30 Jun 2014 - 9:44 pm

सध्या ग्रीसवारी करुन आल्यामुळे आणि तिकडचे खाद्य पदार्थ आवडल्यामुळे ते घरी बनवून बघीतल्याशिवाय राहवेना ;) ग्रीक चिकन सुवालाकी म्हणजे ग्रीक पिटा ब्रेडमध्ये स्क्युअरवर ग्रील केलेले मीट / मांसाचे तुकडे, सॅलॅड्स, सॉस घालून रोल सर्व्ह करतात.

ग्रीक पिटा ब्रेड अतिशय छान, मऊ असतो. त्याचा वापर सुवालाकी, यीरोस, फलाफल मध्ये करतात. हुम्मुस, त्झात्झिकी बरोबर ही खाल्ला जातो.

चला तर मग सुवालाकीची पाककृती बघुया :)

पिटा ब्रेड तुम्ही बाजारतून विकत आणू शकता पण मी घरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

साहित्य ग्रीक पिटा ब्रेडः

१ वाटी मैदा
१ टेस्पून ड्राय यीस्ट
१ टेस्पून साखर
किंचित मीठ
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल

.

पाकृ:

एका भांड्यात यीस्ट व साखर एकत्र करा व त्यात १/२ वाटी हलके कोमट पाणी घालून, झाकून ५ मिनिटे बाजूला ठेवा.
भांड्यात मैदा व मीठ मिक्स करुन घ्या.
पाच मिनिटांनंतर यीस्ट फुलून पाण्याला फेस आला असेल, ते यीस्ट + साखर मिश्रीत पाणी मैद्यात थोडे थोडे घालून मिक्स करावे.
त्यात आणखीन १/२ वाटी पाणी घालून सैलसर मैदा भिजवून घ्यावा.
आता ह्या मैद्याच्या गोळयाला चांगले १०-१५ मिनिटे मळावे.
त्यावर ऑलिव्ह ऑईल घालून मळून घ्यावे व एका भांड्यात ठेवावे.
भांड्याला क्लिंग फिल्म लावून भांडे उबदार जागी २ तास ठेवावे.

.

दोन तासानंतर पीठ छान फुगुन वर आले असेल.
हातांना थोडा मैदा लावून पीठ पुन्हा पाच मिनिटे मळावे व त्याचे सारखे गोळे करावे.
ओव्हन १८० डीग्रीवर प्री-हीट करायला ठेवा.
गोळ्याला कोरड्या मैद्यात घोळवून त्याची पोळी लाटावी. (पिटा-ब्रेड किती लहान-मोठ हवे त्याप्रमाणे लाटावे)
बेकिंग ट्रे किंवा बेकिंग स्टोनवर ठेवून १८० डीग्रीवर ४ मिनिटे बेक करावे, मग उलटवून पुन्हा ४ मिनिटे बेक करावे.
पिटा मऊ हवे असल्यास हे तापमान बरोबर आहे पण जर का डीप्, सॉसबरोबर सर्व्ह करायचे असल्यास थोडा कुरकुरीत करायचा असेल तर २-३ मिनिटे आणखीन ठेवा.
अश्या प्रकारे सर्व्ह पिटा ब्रेड बनवून घ्यावे.

.

साहित्य चिकन सुवालाकी:

१/२ किलो चिकन ब्रेस्ट फिले
३ टेस्पून सुवालाकी मसाला
१ टेस्पून तेल

.

नोटः

मी सुवालाकी मसाला ग्रीसवरून आणला आहे पण तो घरी ही बनवता येतो. त्यासाठी स्वीट पॅपरीका, ड्राईड थाईम, ड्राईड अनियन पावडर, ड्राईड गार्लिक पावडर, ओरेगॅनो, हॉट पॅपरीका, मीठ व मिरपूड एकत्र करावे व हा मसाला वापरावा.(हे साहित्य मी आणलेल्या मसाल्यावर लिहिले होते)

कृती:

चिकनच्या तुकड्यांना वरील मसाला व तेल लावून अर्धा तास मॅरीनेट करावे.
लाकडी स्क्युअर्स वापरणार असाल तर दोन तास आधी त्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात म्हणजे त्या शिजवताना जळणार नाही.
स्क्युअर्स वर चिकनचे पीसेस लावून ग्रील पॅनवर किंचित तेल ब्रश करुन दोन्ही बाजूंनी चिकन ग्रील करुन घ्यावे. तुम्ही हे बार्बेक्यु ही करु शकता किंवा ओव्हनमध्ये ही ग्रील करु शकता.

.

त्झात्झिकी आणि सर्व्हिंगः

१ वाटी ग्रीक योगर्ट (रोजचे, घरचे घट्ट दही वापरले तरी चालेल)
१/२ वाटी किसलेली काकडी
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून मिरपूड
मीठ चवीनुसार

कृती:

दह्यात काकडी, लसूण, मीठ, मिरपूड व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.

सॅलॅड्सः

चिरलेली भोपळी मिरची , टोमॅटो, कांदा, लेट्युस, काकडी घेतले आहे.

.

पिटा ब्रेडवर त्झात्झिकी सॉस लावावा, त्यावर सॅलॅड घालावे, ग्रील केलेले चिकनचे पीसेस ठेवावे.
आवडत असल्यास वरुन थोडा त्झात्झिकी सॉस घालावा व रोल करुन गरम-गरम खावे :)

.

नोटः

१. पिटा ब्रेड ओव्हनमधून बेक केल्यावर, पूर्ण गार झाल्यावर प्रत्येक पिटामध्ये बटर पेपर ठेवून तुम्ही झिप-लॉक बॅगमध्ये ठेवून हे ब्रेड फ्रीज करु शकता. २ महिने सहज टिकतात.
पिटा ब्रेड तुम्ही तव्यावरही भाजू शकता.

२. पिट्याला पर्याय म्हणून तुम्ही तोर्तिया, डेली रॅपचा वापर करु शकता पण खरी मजा ग्रीक पिट्यात आहे :)
३. सॅलॅड तुमच्या आवडीचे वापरु शकता, त्यात ऑलिव्ह्ज, हॅलेपिनोज, ग्रील्ड व्हेजिटेब्ल्स घालून व्हेज सुवालाकी बनवता येईल.
४. मेयोनीज, फ्रेंच फ्राईज, बीबीक्यु सॉस, फेटा चीज ही घालता येईल.
५. त्झात्झिकी सॉस / डिपवर तुम्ही थोडे ऑलिव्ह ऑईल ड्रिझल करुन सर्व्ह करु शकता. आवडत असल्यास त्यात बारीक चिरलेले डिल, मिंट ही घालू शकता.

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

30 Jun 2014 - 10:41 pm | आयुर्हित

सुभान अल्लाह!
मी विचार करत होतो कि पवित्र रमझान साठी काय करावे, तेव्ह्ढ्यात आपली हि ग्रिक पाक्रु डोळ्यासमोर आली.
जुग जुग जियो!

दिपक.कुवेत's picture

30 Jun 2014 - 10:49 pm | दिपक.कुवेत

आवड्ल

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2014 - 10:55 pm | मधुरा देशपांडे

झाली का सुरुवात...
चिकन ला पास पण त्झात्झिकी अतिशय आवडता प्रकार. फोटो आणि सादरीकरण नेहमीप्रमाणेच छान.

नॉन्व्हेजाहारींना पर्वणीच म्हणायची! सुरेख फोटू आणि घरी पिट्याला बेक करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक करते. छान भाजला गेलाय.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2014 - 2:54 am | प्रभाकर पेठकर

व्वा! आधी अधाशा सारखं शेवटचं छायाचित्रं पाहिलं... खल्लास.
मस्त पदार्थ. आता सावकाशीने पाककृती पाहीन आणि जमल्यास करेनही.

अजया's picture

1 Jul 2014 - 8:22 am | अजया

काय सुंदर फोटो आहेत! आयता ब्रेड मिळवुन व्हेज पाकृ ट्राय केल्या जाईल!!

पैसा's picture

1 Jul 2014 - 9:27 am | पैसा

दुष्ट, दुष्ट, दुष्ट. "शाखाहारी" लोकांनी काय घालायचं ते पण सांग. आणि अंडे घालून वगैरे नेहमीचंच..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना...! शाकाहारी काय सांगा ना असं खमंग. आणि नै केलं तर ब्यान करा हो यांना लै छळतात ही मंडळी.

-दिलीप बिरुटे

एस's picture

1 Jul 2014 - 10:33 am | एस

"शाखाहार" सोडून द्या. हाकानाका.

पैसा's picture

1 Jul 2014 - 11:49 am | पैसा

प्रा.डॉ. तुम्ही कधीपासून?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2014 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

@दुष्ट, दुष्ट, दुष्ट. " *ROFL* .. *ROFL* .. *ROFL*

यम्म्म्म्म्म्म्म... खुप म्स्त दिसतय सुवलाकी.

ग्रीस मधे ह्यात ते लोक आपले नेहमीचे बटट्याचे फिंगर चिप्स सुद्धा add करतात. तसेच चिकन सारखाच मटण सुवलाकी पण खाल्ला होता मी. मस्त लागतो एकदम.

पिलीयन रायडर's picture

1 Jul 2014 - 12:52 pm | पिलीयन रायडर

आता चिकनचा अन आपला काही संबंध आहे का? पण सानिकानी काही टाकलं की फोटो साठी चक्कर मारयची.. मग तिच्या नवर्‍याचा प्रचंड हेवा..असुया वगैरे करायचं.. तोवर भुक खवळते.. मग जाउन काही तरी पोटात ढकलायचं..
भोग..भोग असणार मागल्या जन्मीचे...

प्यारे१'s picture

1 Jul 2014 - 1:39 pm | प्यारे१

असेच म्हणतो....

हाहाहा अगदी अगदी +१००००१

मनिष's picture

2 Jul 2014 - 11:40 pm | मनिष

फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटते! आणि मग 'पिरा' म्हणतात तस...

Maharani's picture

1 Jul 2014 - 2:41 pm | Maharani

aha...mastach ekadum.. *ok*

सस्नेह's picture

1 Jul 2014 - 3:12 pm | सस्नेह

अन फोटो. नेहमीप्रमाणे..

सविता००१'s picture

1 Jul 2014 - 3:38 pm | सविता००१

याच व्हेज व्हर्जन टाक आत्ताच्या आत्ता!

समीरसूर's picture

1 Jul 2014 - 3:59 pm | समीरसूर

वर्णन, फोटो, आणि पाककृती लाजवाब! शेवटच्या फोटोमधला रोल क्रूर आहे. नुसता फोटोमध्येच राहतो; बाहेर येत नाही. खिजवतो. ही क्रौर्याची परिसीमा आहे.

बाकी तुमच्या पेशंसला सलाम! तो ब्रेड तुम्ही घरी बनवलात हे विशेष. आजकाल शक्य तितकं रेडीमेड आणलं जातं घराघरात. पाणीपुरीची पुरी आयती, गुलाबजाम, ढोकळा, जिलेबीचे मिक्स आयते, डोसा, इडलीचं पीठ आयतं, पिझ्झ्याचा बेस आयता...चटण्या, लोणची, पापड, कुरडया हे पण आयतं, चिरलेल्या भाज्या आयत्या, एवढंच कशाला, बाकीचं खाणं म्हणजे चिप्स, ब्रेड, समोसे, बटाटेवडे, पॅटीस, बर्गर, रोल्स हे ही सगळं आयतंच. या पार्श्वभूमीवर तुमचा हा उत्साह अतुलनीयच म्हणायला हवा. पाककृतीसोबतच हा उत्साहदेखील थोडा देता आला मला तर बघा जरा. ;-)

पिलीयन रायडर's picture

1 Jul 2014 - 4:07 pm | पिलीयन रायडर

हेच्च म्ह्णायचय मला.. किती तो उत्साह!!!!

सुहास झेले's picture

4 Jul 2014 - 3:11 pm | सुहास झेले

खल्लास !!!

बॅटमॅन's picture

1 Jul 2014 - 7:05 pm | बॅटमॅन

पॉली काला!!! पॉली काला!!! किरिया सानिका, एफ्खारिस्तो पॉल्ला!!

(ऑ एरास्तीऽस तॉन प्राग्मातॉन हेलिनिका) बातमानॉस.

ओह्ह ओक्के!! कधीपासून होतंय हे असं. ;)

सानिकास्वप्निल's picture

5 Jul 2014 - 12:03 pm | सानिकास्वप्निल

=))

मस्त पाकृ व सादरीकरण...शेवटचा फोटो तर एकदम कातील. *good*

ब़जरबट्टू's picture

2 Jul 2014 - 8:30 am | ब़जरबट्टू

मस्त पाकृ व सादरीकरण.. खरं सांगतो सानिकाताई, केवळ हाटेलात भेटणारे कुणीतरी हे घरी करून बघितलेय दिसल्यावर पाकृ करायचा जोश येतो.. पुढील पाकृ येऊ द्या...

ढेबु (बजरु)

एस's picture

2 Jul 2014 - 11:27 am | एस

चिकन सुवालाकी बघून घसा सुकलाकी. कुठे गेले ते सोत्रि? एक काकट्याल येऊ द्या आता.

स्वाती दिनेश's picture

2 Jul 2014 - 1:32 pm | स्वाती दिनेश

मस्त पाकृ...
स्वाती

यशोधरा's picture

3 Jul 2014 - 10:23 am | यशोधरा

तू एक हाटेलच सुरु कर आता!

मस्त पाककृती.पण आमच्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी काय बदल करता येतील.ते सांग ना...

जागु's picture

4 Jul 2014 - 1:27 pm | जागु

तो पा सु एकदम.

लव उ's picture

4 Jul 2014 - 5:29 pm | लव उ

सानिकातै छान पाककृती

कवितानागेश's picture

5 Jul 2014 - 9:54 pm | कवितानागेश

ए, व्हेज व्हर्जन दे की. :)

काय आपण इंग्रजी सुलभतेनं बोलू शकता?
म्हणा!
A my.
A my, they my.
A my they they my.

(सौजन्यः 'नसतीउठाठेव अर्थात व्हॉट्सॅप्प)

सानिकास्वप्निल's picture

6 Jul 2014 - 2:59 pm | सानिकास्वप्निल

व्हेज व्हर्जन काय देऊ आणखीन , ग्रील्ड व्हेजीटेबल्सचा (वांगी, झुक्किनी, शिमला मिरची) वापर करता येईल, ग्रील्ड पनीर, मश्रुम ही वापरता येतील.

तुमचा अभिषेक's picture

6 Jul 2014 - 7:20 pm | तुमचा अभिषेक

क्लास जमलंय
आवडीच्या पदार्थांपैकी ..

लालगरूड's picture

17 Sep 2015 - 9:44 pm | लालगरूड

आपला पंखा.......

सुचिकांत's picture

18 Sep 2015 - 2:13 pm | सुचिकांत

भारी वाटलं पाहून. सादरीकरण खूप मस्त.