सुका मेवा चपाती

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in पाककृती
7 Jun 2018 - 2:17 pm

मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती

कृती-१

प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या.

सुकामेवा

सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा . यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका आणि खारका मधील बिया काढून घ्या.

खारीक

कृती-२

यानंतर यात चांगल्या प्रकारचा गुळ (प्रमाण-आवडीनुसार ) टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या

मिक्सर मधून फिरवल्या नंतर

कृती-३

हे मिक्सर मधील वाटण मळलेल्या कणिक मध्ये पुरण भरतात तसे भरावे

भरलेले वाटण

कृती-४

शेवटी वाटण भरलेल्या काणिकाच्या गोळ्याची चपाती लाटावी

सुका मेवा चपाती

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

7 Jun 2018 - 2:36 pm | किसन शिंदे

सुक्या मेव्याचा हा पराठा चांगलाच चविष्ट लागत असेल.

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 2:48 pm | manguu@mail.com

छान

पद्मावति's picture

7 Jun 2018 - 3:10 pm | पद्मावति

मस्तच!

विजुभाऊ's picture

7 Jun 2018 - 3:26 pm | विजुभाऊ

फोटो आल्यावर एकदम मजा आली

वरुण मोहिते's picture

7 Jun 2018 - 3:31 pm | वरुण मोहिते

करून बघेन कधीतरी

कंजूस's picture

7 Jun 2018 - 3:33 pm | कंजूस

चविष्ट!

हि पाकृ वाचून मला माझी आई आणि शाळेतला शनिवारचा डब्बा आठवला . एकदम टचकन डोळ्यात अश्रू तरळले . शनिवारी सकाळची शाळा असायची . खाऊची एकच सुट्टी व्हायची, तेव्हा असे चविष्ट डब्बे घेऊन जाणे असायचे .
आता शाळाही राहिली नाही आणि आईपण नाही .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

म्हटलं आता तुम्ही काही फोटो टाकत नाही. मस्तच लागेल. खिलजि म्हणाले तसं खरच शाळा आठवली. आई कसले कसले रोल करून द्यायची. साधेच असायचे पण भारी. रविवारीसुध्दा शाळा असावी असं वाचायचं.

डिट्टेलवार पाकृ आणि उत्तम फोटो !
नक्की टेस्टी होत असणार.

रमेश आठवले's picture

8 Jun 2018 - 8:10 pm | रमेश आठवले

कणिक ज्या पाण्यात सुके मेवे उकळवले त्याच पाण्याने मळावी का ?

दीपक११७७'s picture

11 Jun 2018 - 10:40 am | दीपक११७७

मुळात सुकमेवा हा उकळुन घेतलेला नाही.

उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका.

असे आहे. याचे उद्देष्ट सुकामेवा स्वच्छ धुने हा आहे. खारीक बाबत सुध्दा हाच उद्देश आहे.

मुक्तांगण's picture

11 Jun 2018 - 9:06 am | मुक्तांगण

सुका मेवा आधी धुवून घेतला असेल तर त्याच पाण्याने मळून घेतली कणिक तर हरकत नाही अन्यथा नको असे वाटते.
बाकी रेसिपी चविष्ट वाटत आहे. खारका नसल्याने खजूर घालून आणि त्याप्रमाणात गुळाचे प्रमाण कमी करून बघावे.

दीपक११७७'s picture

11 Jun 2018 - 10:46 am | दीपक११७७

खजुर वगळले, वटवाघुळा मुळे.

अन्यथा चालेल.

दीपक११७७'s picture

11 Jun 2018 - 10:44 am | दीपक११७७

सगळ्यांचे आभार,

यात विलायची पण टाकता येईल, स्वाद वाढविण्यासाठी.

मदनबाण's picture

12 Jun 2018 - 11:23 pm | मदनबाण

पौष्टिक पाकॄ ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी