एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
31 May 2018 - 3:40 pm

का म्हणून दिवसेंदिवस प्रौढच बनत जावे ?

का म्हणून आपणच सारं खांद्यावर वाहावे ?

थोडं मागं वळून बघा , कोरी पाटी नि पेन्सिलचा तुकडा दिसेल

ती हातात घेऊन बसलेला एक छोटा बाबू दिसेल

एक दिवस तरी लहान बाबू बनून बघावे

दुद्धु दुद्धु म्हणून ओरडावे

वाटेल तिथे फतकल मारून बसावे

दिसेल त्याचे केस उपटावे

आडवंतिडवं पडून त्रागा करावे

बाबू जे जे करतो ते ते मनापासून करावे

हमसून हमसून रडावे

घरातल्यानी पण तोंडात बोट घालावे

इतके साऱ्या घरभर लोळावे

रांगत रांगत चड्डीवर फिरावे

मम् मम्, यम यम करत मिचक्या मारावे

एखादा कोपरा बघून हळूच मोकळे व्हावे

का फक्त प्रौढवानी संडासातच करावे

बाबू बनावे अन खुशाल मोकळे व्हावे

मोकळे व्हावे

सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजी उवाचबालगीतविनोद

प्रतिक्रिया

खिलजि's picture

31 May 2018 - 3:41 pm | खिलजि

आता जास्त आवरू शकत नाही स्वतःला . पटली तर वाचा म्हणतोय नाहीतर सोडून द्या गंगेला ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2018 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>आता जास्त आवरू शकत नाही स्वतःला .
=))

काय करता येईल ते करा. पण आवरा. स्वत:ला जपा.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

1 Jun 2018 - 10:11 am | सतिश गावडे

काही वर्षांपूर्वी बाबूला शेजारीण बाईंचा टीव्ही पाहू देण्याविषयी एक गाणे फेमस झाले होते ते आठवले तुमची ही कविता वाचून.

खिलजि's picture

1 Jun 2018 - 1:17 pm | खिलजि

धन्यवाद गावडे साहेब

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2018 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेमकं आमचं काय चूकलं म्हणून आपण आमचा छळ करत आहात ?

काही दिवस उत्तम कविता वाचा. समजून घ्या. मग एखादा उत्तम अनुभव शब्दबद्ध करा.

प्रतिसाद लिहिणार नव्हतो, पण राहवले नाही. आपल्या प्रतिभेला आवरा इतकेच म्हणतो. विश्रांती घ्या.

-दिलीप बिरुटे
(आपला एक वाचक )

खिलजि's picture

1 Jun 2018 - 2:53 pm | खिलजि

आपक हुकूम सर आँखोंपर

जशी आपली आज्ञा सरजी

आजपासून म्यान करत आहोत ह्या कल्पना

फैरी झडतील, अवश्य झडतील पण आतल्याआत

काही त्रास झाला असेल तर माफी असावी

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आपला सदैव विश्वासू आणि नम्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2018 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचा एक कवी मित्र म्हणतो, कविता म्हणजे असते अस्तित्वाचे गाणे. आपली कविता एक सुंदर गाणं असलं पाहिजे. कल्पना म्यान करू नका. कल्पनेला उत्तम आकार द्या. गद्य-पद्य यातला फरक समजावून लिहा. आपल्या आत ज्या फैरी झडत आहेत त्यांना सुबक रांगोळी प्रमाणे येऊ द्या. व्यक्त होण्याने आतल्या वादळाचा निचरा होतो तेव्हा लिहित राहा.

आपण दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

खिलजि's picture

2 Jun 2018 - 12:35 pm | खिलजि

सर , डोळे उघडणारे फार कमी असतात आणि मला वाटत ते नेहेमी जवळचे समजावे . आपणास मी माझ्या जवळचेच समजतो . त्यामुळे वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाही . आपण असेच दिलखुलासपणे व्यक्त होत राहा , मी नेहेमी ते सकारात्मक घेत जाईन .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आपला सदैव विश्वासू आणि नम्र

यशोधरा's picture

1 Jun 2018 - 2:56 pm | यशोधरा

कविता वाचली.

दिसेल त्याचे केस उपटावे

कधी कधी खूप राग आला की मलाही असेच करावेसे वाटते
कधी करायला मिळत नाही मात्र!!

का? त्यावेळी नेमके समोर सगळे टकले येतात का?

यशोधरा's picture

1 Jun 2018 - 4:03 pm | यशोधरा

नाही, हिंमत झालेली नाही आजतागायत.

दुर्गविहारी's picture

2 Jun 2018 - 1:43 pm | दुर्गविहारी

तुमच्या काही कविता खुपच उत्कृष्ट आहेत, पण त्यामुळे दर्जा नसलेल्या कवितेचे समर्थन होउ शकणार नाही. दर्जा सांभाळा ईतकेच सुचवेन.
बाकी गंमत म्हणून वरची कविता ठिक आहे.

खिलजि's picture

2 Jun 2018 - 2:18 pm | खिलजि

प्रयत्न नक्की करेन आणि धन्यवाद प्रोत्साहनाबद्दल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जेम्स वांड's picture

2 Jun 2018 - 2:54 pm | जेम्स वांड

तुम्ही समोर असते तर कव घातली असती, तुमची 'आवरा' म्हणायची हिम्मत पाहून मला भरून आले आहे

(आलोच रिते करून) वांडो

खिलजि's picture

2 Jun 2018 - 3:18 pm | खिलजि

वांड भाऊ , तुम्ही पण असं वाटून र्ह्यायलासा .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2018 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा

का म्हणून दिवसेंदिवस जिल्ब्याच टाकत जावे ?

का म्हणून आपणच सारखे तांब्यात वाकून पहावे ?

थोड मागे वळून बघा,तांबेवाल्यांची रांग दिसेल

तीच्या मधून डो-कावणारा एक छोटा बांबू दिसेल

एक दिवस तरी लहान बांबू स्वतःहून घ्यावे

आगंग..आगंग म्हणून तेल लाऊन ओरडावे

फाटेल तिथे गाठ मारून बसावे

दिसेल त्याचे ड्ब्डे हिस्कावे

आडवंतिडवं पडून उंब उंब करीत लोळावे.

बांबू जे जे देतो ते ते मनापासून घ्यावे

उहूहू उहूहू क्रून ओरडावे

घरातल्यानी पण तोंडात बोट लावावे.. (त्ळी भरताना लावत्यात्,तशे!)

इतके साऱ्या घरभर लोळावे

रंगीत रंगीत चड्डीवर फिरावे

पुक पुक ,पाक पाक्क करत *स सोडावे

एखादा कोपरा बघून हळूच मोकळे व्हावे

का फक्त प्रौढवानी संडासातच करावे
(वरील दोन्ही ओळी मूळ पीठाच्याच आहेत्,हे पाहूनही खरं वाटं ना ग्येलय! =)) )

बांबू काढून खुशाल मोकळे व्हावे

मोकळे व्हावे

तांबेश्वर खलास मोकळेकर!

प्रचेतस's picture

3 Jun 2018 - 5:29 pm | प्रचेतस

बऱ्याच महिन्यांनी तुमचे शौचविडंबन आल्याने भरून पावल्या गेले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2018 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

@भरून http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif पावल्या गेले आहे. >>> आत बसला आहात का? http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

गुर्जींच्या शाैचप्रतिभेचे नेहमीच काैतुक वाटत आलेले आहे, मराठी साहित्यात तेही शाैच विषयावर पिएचडी करणारी वल्ली ( आगोबा हत्ती नव्हे) तशी विरळाच

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2018 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा

पांडूच्या मिपा पुनरा~गमनाचे नेहमीच काैतुक वाटत आलेले आहे, आमच्या लिखित मिपा साहित्यात तेही शाैच विषयावर लिहिल्यानन्तर हल्ली ते तेव्हढ्यापुरतेच तांब्या घेऊन येऊन जातात,एरवी त्यांचे (म्हणजे पां डुब्बा चे! =)) ) येणे विरळाच!!!

ये रेग्युलर पांडू,नै तर तुला हणीन दांडू! =))

प्रचेतस's picture

4 Jun 2018 - 5:39 am | प्रचेतस

=))

टवाळ कार्टा's picture

3 Jun 2018 - 5:36 pm | टवाळ कार्टा

गुर्जींची प्रतिभा आटलेली नै :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2018 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

सांसारिक उन्हाळा लाग्ल्यामुळे कधी कधी आटते , हे माट्र खर खर आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

गवि's picture

3 Jun 2018 - 7:57 pm | गवि

डलकोलॅक्स हा अशावर उत्तम उपाय..

ह्यापेक्षा गुर्जिंचे भावविश्व भाग ५२ आणि मग पुढचे भाग येतील तर?

खिलजि's picture

4 Jun 2018 - 12:36 pm | खिलजि

( डोंगराला आग लागली पळापळा )

बाबूने तांब्या घेतला पळा पळा

गुरुजींनी जिलबी टाकली चळाचळा

बाबूने घातले होते डायपर

गुरुजींच्या हातात वायपर

खिलजि's picture

4 Jun 2018 - 12:38 pm | खिलजि

शोल्लीड झाले आहे .. मित्रा . पहिल्या भेटीनंतर तू आज असा भेटतो आहेस . भरून पावलोय मी . धम्माल येईल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 5:24 pm | श्वेता२४

प्रत्यक्षाहून विडंबन उत्कट!

वेनेझूएलात सुप्त ज्वालामुखी जागृत. पळापळ.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Jun 2018 - 9:01 pm | अविनाशकुलकर्णी

एक तर पाऊस पडत नाही ---उकाड्याने जीव हैराण --त्यात वर अश्या कविता

सतिश गावडे's picture

3 Jun 2018 - 9:13 pm | सतिश गावडे

तुम्ही अशा कवींना तुम्ही तुमच्या प्रणालीज किचन मधील वालाची उसळ खायला घाला. कविता विसरुन जातील.

नाखु's picture

3 Jun 2018 - 11:07 pm | नाखु

या धाग्यावर " दरवाजा बंद तर प्रकार बंद" लागेल मागे टाकले आणि त्यायोगे बुवा सन्मित्र धाग्यावर मोकळेढाकळे झाले

वाचकांची पत्रेवाला नाखु

सर , बघा प्रतिभा किती आणि कुठे कुठे ओसंडून वाहिली आहे . प्रतिभांचा महापूर आला आहे, सर. आता तरी आज्ञा असावी . खदखदत आहेत कल्पना आतमध्ये .
आई सरस्वती कलश घेऊन उभी आहे . डोळे वटारते आहे सर . होऊ का सुरु ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आपला सदैव नम्र आणि विश्वासू