कोल्हापुरी भेळ

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in पाककृती
5 May 2018 - 2:59 pm

परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी


भडंग


फोडणी

भडंग

तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे.

आता चिंचेचा कोळ बनवू -
1 वाटी चिंच
1 वाटी गुळ
3 चमचे साखर
1 चमचा तिखटपुड
1 चमचा पाणीपुरी मसाला
मीठ

चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे.
थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला


साहित्य


चिंचेचा कोळ

चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे


वाफवलेल्या मिरच्या

भेळ

1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून
फारसाण(यात गाठी व पापडी जास्त)
कोथिंबीर भरपूर बारीक कापून
कोळ
वाफावलेली मिरची व कैरी
1 बाउल भडंग

कृती-
भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव


भेळ


भेळ


भेळ

मराठी पाककृती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 May 2018 - 12:19 pm | प्रचेतस

ख्या ख्या ख्या.

आपणांस पुण्यनगरीच्या खाद्यसंस्कृतीची चांगलीच ओळख दिसत्येय. कसं काय बरं?

कुठाय ती? म्हणजे आहे का तसं काही?
कोल्हापुरची मिसळ, भिलवडीच्या चितळेची बाकरवडी, खानदेशी शेवभाजी म्हणजे पुण्यनगरीची खाद्यसंस्कृती होय?
चिकन मंचुरिअन, मोमो,अजुन काही?

प्रचेतस's picture

8 May 2018 - 5:25 pm | प्रचेतस

भिलवडीला फक्त दूध होतं, बाकरवडी निघाली ती पुण्यातच.

नेवाळे मिसळ, पाताळेश्वरासमोरचा हिंदवी स्वराज्य साबुदाणा वडा, गार्डनचा वडापाव, नाझचे सामोसे, अप्पाची खिचडी, बिपीनची खिचडी, गेल्या दोन वर्षापासून पुण्यातच शोधून काढला गेलेला शेवपाव, व्यासांची भेळ, सुकांता, दुर्वांकूर अशा अनेक थाळ्या.

बाकी मिसळ शोधून काढल्या गेली ती पुण्यातच बरं का. १८ व्या शतकापासून पुण्यात मिसळीची दुकाने आहेत. आजदेखील मिसळीचे जे सर्वात जुने दुकान म्हणून समजले जाते ते देखील पुण्यातच सुरु आहे. वैद्य मिसळ, १०७ वर्ष सुरु असलेले दुकान. मिसळ देखील आले घालून केलेल्या रश्श्याची.

अनुप ढेरे's picture

10 May 2018 - 10:05 am | अनुप ढेरे

पाताळेश्वरासमोरचा हिंदवी स्वराज्य साबुदाणा वडा,

या गाडीवर गर्दी पाहिली आहे अनेकदा. पण काही खाल्लं नाही त्या गाडीवर. आता खाईन.

ते सगळं ठीके.. पण अप्पाची खिचडी फार फार गोड करतात ब्वॉ... बिपिनची आवडतेच खिचडी.. पण केळकर रस्त्त्यावर एक छोटेखानी रेस्टॉरंट आहे.. बहुतेक सुगरण असं नाव आहे.. तिथली खिचडी बेश्ट..! :-)

अनुप ढेरे's picture

16 May 2018 - 2:37 pm | अनुप ढेरे

प्रभा विश्रांती समोर राईट? पहिलं आहे ते हाटेल पण गेलो नाही अजुन कधी.

पुण्यात बेडेकरांची मिसळ खाल्ली आणि जिवंतपणी मरण काय असते ह्याचा अनुभव घेतला.....

सस्नेह's picture

8 May 2018 - 5:29 pm | सस्नेह

आपणांस पुण्यनगरीच्या खाद्यसंस्कृतीची चांगलीच ओळख दिसत्येय. कसं काय बरं?

घ्या ! म्हणजे काय ?
...कोल्हापुरी जगात भारी कशी ते सांगायचं तर पुण्याचं उणं काढता आलं पाहिजे ना ? आणि खाऊन बघितल्याशिवाय उणं कसं काढणार ?
:D ( सध्या स्मायल्या गायबल्यामुळे या एकीवरच भागवावे लागतेय )

वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी लेणी बिणी सर करा.
ते अरिहंतवरुन अंदाज आला आम्हाला तुमच्या सरपणाचा. ;)

प्रचेतस's picture

8 May 2018 - 12:54 pm | प्रचेतस

अरिहंत बोगस आहे.
या तुम्ही, तुम्हाला मयुर खिलवतो.

पिलीयन रायडर's picture

8 May 2018 - 7:45 pm | पिलीयन रायडर

मयूर कुठाय?

चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या अलीकडच्या गल्लीत, आयडीबीआय बँकेशेजारी.

पिलीयन रायडर's picture

9 May 2018 - 1:07 am | पिलीयन रायडर

ओक्के! धन्यवाद!

सस्नेह's picture

9 May 2018 - 7:19 am | सस्नेह

मा. पिराताई,
कट्ट्यास येऊन, भेळ खाऊन मग धन्यवाद देणे.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 1:09 pm | जेम्स वांड

आता तुम्ही भांडा आम्ही बसलोय किनाऱ्यावर कपडे सांभाळत (तुमचे) :D

सस्नेह's picture

9 May 2018 - 11:21 am | सस्नेह

मी आज ९ मे ला सकाळी ७-१९ ला दिलेल्या कमेंटवर तुम्ही ८ मे ला रात्री १-०९ ला कसा काय रिप्लाय दिला हो ?
मिपाला याड लागलंय वाट्टं !

त्यांचा प्रतिसाद आधी डावीकडे होता. तो सरकत सरकत उजवीकडे आलाय.

सोर्री सोर्री ठेंगील आणि नसले ची चटणीचा म्हणायचे होते.
===
बाकी लांबोटीचा मकेच चिवडा परवाच आफिसात खाल्ला.

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 11:37 am | श्वेता२४

स्वतःच्या जवळ काही वस्तू लागतात. नुसतंच पळण्याचं स्किल असून चालत नाही

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 1:11 pm | जेम्स वांड

असलं तर स्वतःची अस्मिता हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवायला लागत नाही :D :D

टर्मीनेटर's picture

8 May 2018 - 12:27 pm | टर्मीनेटर

रेसिपी आकर्षक वाटत्ये...पण भेळेला खरा खमंगपणा आला तो प्रतिसादांमुळे... :-)

फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस प्रतिसादपण पडले नसते. कोल्हापुरी शब्द लिहून तुम्ही पहिल्याच लेखात मिपाची नस/नाडी/नाळ पकडली आहे. जे कित्येकांना दहा वर्षांत जमलं नाहीये.
तैमुर /चेंगिजखान घोड्यावर बसल्याबसल्याच चिवडा/भेळ खायचे त्यामुळेच दरारा होता. घोड्यावरून उतरून नाळ आहेत का बघायलासुद्धा वेळ नसायचा त्यांना. ज्यांना ते नाळ मिळत तेपण जग जिंकत पुढे जायचे.
तुम्ही भेळेच्या निमित्ताने कोल्हापुर पुणे सातारा सोलापूर असे उन्हाळी सामने तसेच नाळेवरून साहित्य संमेलनही भरवलंत. पुढच्या कट्ट्याचे अध्यक्षपद तुम्हालाच.

सस्नेह's picture

8 May 2018 - 1:31 pm | सस्नेह

=)) =))

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 4:29 pm | श्वेता२४

धन्यवाद कंजूस साहेब

लई भारी's picture

8 May 2018 - 1:51 pm | लई भारी

स्नेहांकिता आणि श्वेता२४ यांनी वरती नीट सांगितलंच आहे, पण थोडीशी भर घालावी म्हणतो.
'कोल्हापूरी' म्हणजे तिखट हा मार्केटिंग चा भाग आहे पण तो कोल्हापूर मधल्या मार्केटिंगचा नाही असं माझं मत आहे. जिथे जिथे भारतीय पद्धतीचे जेवण मिळते त्या बहुतांश ठिकाणी 'व्हेज/चिकन/मटण कोल्हापूरी' नावाची एक डिश 'spiciest डिश' च्या नावाखाली विकली जाते.
पुण्यातला नळ स्टॉप जवळच्या एका मोट्ठया हाटिलात विचारलं(पुण्यात नवीन होतो त्यावेळी) की बाबा व्हेज-कोल्हापूरी म्हणजे काय देतो? तो म्हटला, कुठली पण मिक्स व्हेज घेतो आणि त्यात डबल मिरची पावडर टाकतो! आता बोला.
म्हणून माझी लै दिसांची इच्छा आहे की 'व्हेज-कोल्हापूरी' या नावाने विकणाऱ्या सगळ्यांवर केस टाकून द्यावी :)
किमान पुण्यात आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर 'कोल्हापूरी' चे एवढे फ्याड निघाले आहे की कोल्हापुरात नसतील एवढी हाटेलं आणि डिशेस मिळतात. हा सगळं मार्केंटींग चा भाग आहे असे मला वाटते.
मी गाव/कोल्हापूर बाहेर येई पर्यंत स्वयंपाकात चटणी म्हणजे कांदा-लसूण मसाला वापरतात एवढेच माहीत होते. त्याला कांदा-लसूण म्हणायचं हे पण नंतरच पुस्तकी ज्ञान :) आमच्या घरात नुसती मिरची पावडर(बुक्की) कधी वापरल्याचं मला तरी आठवत नाही. आणि गरम मसाला किंवा इतर कुठला मसाला क्वचितच वापरला जातो.
त्यामुळे कोल्हापूर च्या लोकांना मराठवाडा/सोलापूर/खान्देश/विदर्भ इथलं तिखटजाळ आवडणार नाही आणि बहुतांश लोकांना झेपणार पण नाही.
काही गंमतीतले प्रतिसाद असतील मान्य आहे, पण बऱ्याच लोकांना थोडा गैरसमज आहे असं वाटत(मिपा बाहेर सुद्धा खूपदा अनुभव घेतलाय) त्यामुळे थोडं जास्त टंकलंय :)
बाकी आपली आपली चव असते, ज्या भागात वाढलो ती चव आवडते. आता माझी सासुरवाडी पण कोल्हापूर जिल्ह्यातलीच आहे पण तिकडच्या आणि आमच्या चवीत पण थोडा फरक आहेच. ट्राय करून बघावं, आवडलं तर आहेच नाही तर नवीन ठिकाण :)

रच्याकने, पिंपरी-चिंचवड कट्टा होऊन जाऊ दे लवकर!

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 3:41 pm | जेम्स वांड

प्रतिसाद खूप आवडला, असं नीट संयतपणे मांडलं की काहीही समजून घेण्यात अडचण येत नाही, उगाच मेरी कमीज उसके कमीज से सफेत म्हणलं की अरे ला का रे होणारच!

बाकी सिरियसली म्हणालात तर.

म्हणून माझी लै दिसांची इच्छा आहे की 'व्हेज-कोल्हापूरी' या नावाने विकणाऱ्या सगळ्यांवर केस टाकून द्यावी :)

कोल्हापुरी स्पेशल (नेमकं तिखट नसलेलं पण नीट मसालेदार असलेलं वगैरे वगैरे) खाद्यसंस्कृतीसाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम ने घेतलंय तसं ज्योग्राफीकल इंडेक्स (जीआयेस) घेता येईल का?

लई भारी's picture

9 May 2018 - 10:34 am | लई भारी

अगदी सहमत आहे.
जी.आय. च्या बाबतीत नीट माहिती नाही आहे. पण आपली सूचना निश्चित स्वागतार्ह आहे. बघतो त्या दृष्टीने थोडा अभ्यास करून.

घ्या हो श्वेताताई, शंभरी करून दिली !! :)

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 6:15 pm | श्वेता२४

या धाग्यावर व्यक्त होणाऱ्या सर्वांचे आभार. कोल्हापुरी हा शब्द जरा मुद्दामच टाकला होता. परंतु त्यामागे कैरी आणि वाफावलेली मिरची हे कारण होते. बाकी मी कोल्हापुरी, पुणेरी, आणि मुंबई या तिन्ही भागातील खाद्यसंस्कृतीची चाहती आहे. जिथे जो चां गला पदार्थ मिळेल त्याचा आस्वाद घ्यायचा हि वृत्ती. एकदा सोलापूरला जेवायचा योग आला होता. तिथे शेंग भाजी भाकरी असा अप्रतिम मेनू मिळाला होता. असो.
मिपावर या निमित्ताने वादप्रतिवाद भरपूर झाले. सर्वांचे आभार

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 6:23 pm | जेम्स वांड

गमतीत बोलताना काही जरी उणे अधिक लागले असेल तर आम्हाला बारका भाऊ म्हणून माफी देऊन टाकावी ही आमची समारोपाची विनंती

मिपा 'आपलं सगळ्यांचं आहे अन ते तसंच राहणार ह्याकरता आपण सगळे कटिबद्ध राहुयात'

जय हिंद
जय महाराष्ट्र
जय मिपा

विशुमित's picture

8 May 2018 - 6:28 pm | विशुमित

जय (कोल्हापूर)

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 6:47 pm | श्वेता२४

मिपा 'आपलं सगळ्यांचं आहे अन ते तसंच राहणार ह्याकरता आपण सगळे कटिबद्ध राहुयात'

एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर प्रतिसाद देखील !
१} भेळेची चव त्यात असलेल्या कुरमुर्‍यांवर अवलंबुन असते हे बर्‍याच जणांच्या लक्षातच येत नाही !
२} कोल्हापुरी भेळेचे वेगळेपण या भडंगमुळेच आहे.
३] तिखटजाळपणा आणि चविष्ठपणा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
४} या भेळवाल्या गाड्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवण्या सारखी असतात, अगदी दुसरीकडे कुठे गेलात तरी याच नावाची भेळेची गाडी दिसु शकते... उदा. "राजकमल"
५ } रंकाळ्यावर भेळ घेउन बागेत बसुन, शालिनी पॅलेस वरचं घड्याळ पहात खाणे हा एक रोचक अनुभव आहे ! :)
६} पुणेकर पुण्यात भेळेला भेळचं म्हणतात हे कळल्यावर भडभडुन आले ! भेळेला मिक्श्चर किंवा तत्सम पांचट नाव देउन त्याचे अजुन बारसे केलेले दिसत नाही ! :)))

अवांतर :- बिग बॉस मराठी मध्ये "कोल्हापुरी" चपलांचे सुंदर वॉल डिझाइन केलेले पहायला मिळेल. ज्यांची ही कल्पना सुचली आणि ज्यांनी ती अमलात आणली त्यांना हॅट्स ऑफ !
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :- सई लोकुर एकदम खरवस माल आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikari

सई लोकुर एकदम खरवस माल आहे !

अलबत..
बेळगावी कुंदा किंवा पेढा म्हटलं तरी चालेल..

सिरुसेरि's picture

9 May 2018 - 10:43 am | सिरुसेरि

सांबाची भेळ राहिली की .

संजय पाटिल's picture

10 May 2018 - 10:33 am | संजय पाटिल

संभा... सांगली!

जागु's picture

9 May 2018 - 1:18 pm | जागु

जबरदस्त. तोपसु.

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 1:46 pm | श्वेता२४

जागुताई

टवाळ कार्टा's picture

10 May 2018 - 8:17 pm | टवाळ कार्टा

झाले का भांडून आणि मुंबईला नावे ठेउन? मुंबईत उत्तम चवीची भेळ सापडत नसेल तर भेळ कशाशी खातात हे माहीत नाही तुम्हाला :)

श्वेता२४'s picture

11 May 2018 - 1:24 pm | श्वेता२४

मुंबईचे चुरमुरे (?) अत्यंत फोपसे असतात. त्यात घाललेल्या चटणीला उग्र वास येत असतो. त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालतात. आणि हि भेळ मिक्स करुन आपल्या हातात येईतोवर त्यातल्या पाचकट चिरमुऱ्यांचा लगदा झालेला असतो. मला तर हा अनुभव पुण्यातही कधी आला नाही. पुण्यातली भेळ पण बऱ्याच ठिकाणी चांगली मिळते. मटकी भेळ ही तर माझी आवडीची आहे. यावरुन मी माझी चव फीक्स करुन घेतलीय हे म्हणण्यालाही काही दम उरत नाही. मला आजवर मुंबईत आवडण्याजोगी भेळ खायला मिळालेली नाही हे मात्र खरे. तशी भेळ खायला मिळाली तर मात्र कदाचित मत बदलू ही शकेल. मुंबईला नावे ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. मी मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची चाहती असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.काय आहे ना, की आमच्या अस्मितेला लोकांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असलं तरी ती दुसऱ्यांचं कवतीक करण्याइतकी दिलदारही आहे. बाकी तुम्ही भेळ कशाशी खाता हे कळाले नसले तरी मी भेळ कशाशी खाते हे पाककृतीत स्पष्ट केले आहे(उकडलेली मिरची व कैरी).

सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत बोगस असते.

आर्द्रता कुरमोऱ्यांची शत्रू दिसतेय.

-गा.पै.

विशुमित's picture

11 May 2018 - 2:34 pm | विशुमित

सहमत..
कुस्करलेला बटाटा नकोच वाटतो. गिळगिळीत लागते भेळ.

सरनौबत's picture

14 May 2018 - 3:59 pm | सरनौबत

सहमत!!!

सरनौबत's picture

14 May 2018 - 3:56 pm | सरनौबत

पाककृती मस्त. मिपावरील काही सदस्य 'कोल्हापूरची भडंग भेळ छान असते' ह्याचा अर्थ 'बाकी सर्व गांवातील भिकार' असा काढून भांडणास सज्ज होतात. त्यामुळे त्यांच्या नादी न लागलेलेच बरे. तरी बरंय तुम्ही कोल्हापूरबद्दल लिहिलंय...चुकून जर का पुण्याचं कौतुक आलं असतं तर काही खरं नव्हतं.

रातराणी's picture

15 May 2018 - 11:36 pm | रातराणी

भारी!!!!! आणा ती प्लेट इकडे!

श्वेता२४'s picture

16 May 2018 - 10:34 am | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

पैसा's picture

16 May 2018 - 12:42 pm | पैसा

तयार भडंग सांगलीहून आला आहे. त्याचीच करून बघते.

तयार भडंग सांगलीहून आला आहे.
शनिवारीच कोल्हापूरला जाउन आलो... अंबा भडंग नावची रेडिमेड भडंग घेतली आहे.

अवांतर :- प्रियदर्शनीची बस थांबते त्या रस्त्याला [ जिथे बाकीच्या भेळेच्या गाड्या असतात ]डीमार्ट आलयं ! :( कोल्हापूरच पार शहरीकरण झालय... उसाच्या शेतात आता डीमार्ट सारख्या इमारती आणि सोसायट्या बघायची मला आता सवय लावुन घ्यावी लागणार आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |