दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
8 May 2018 - 8:22 pm

ब-याच प्रयत्यानंतर मला उठून बसता आले. माझे डोके मागच्या बाजूने भयंकर दुखत होते. कोणीतरी सतत डोक्यावर हातोड्यानी मारत आहे असा भास होत होता. त्यात हा आजूबाजूचा कल्लोळ. हे काय..आता तर चक्क रडणाच्या आवाज येतोय.

मला पूर्ण भानावर यायला मिनीटभराचा अवधी तरी लागला असेल. समोर कोण रडतयं हे पाहिल तर चक्क माझीच आई रडत होती.

"काय झाल आई ..आणि एवढी लोक का जमली आहेत घरात ?" मी प्रश्न केला. आईने उत्तर न देता रडणे चालुच ठेवले. आजूबाजुचे लोक कुजबुज करत थांबले होते. मला ते अगदी पाहवेना. मी आईला शांत करण्यासाठी पुढे चाललो. चालताना पाय कशात तरी अडकला. मी खाली बघितले आणि मी थक्क झालो.

मी ज्या वस्तूला ठेचकाळलो ते माझेच शरीर होते. डोक्याला पट्टी बांधलेली होती. त्यावरचे रक्तही आता वाळून गेले होते.मी अगदी नकळत माझ्या डोक्याला हात लावला. डोक्याला त्याच मागच्या बाजूला एक घाव होता.अजूनही तो घाव वेदना देतच होता.

म्हणजे ..?? मी मेलोय ? कधी ? कसा? आणि मला त्याबद्दल आठवत कसे नाही ? नेमके झाले आहे तरी काय ?

मी समोर आईकडे बघितलं. ती माऊली धाय मोकलून रडत होती. तिला सावरायला माझा लहान भाऊ संदीप जवळ आला. ती ऐकण्याच्या वा समजण्याच्या स्थितीत नव्हती. माझी तरी काय निराळी अवस्था होती!

मी आधीचा दिवस आठवू लागलो. मी काल प्रथमेश आणि मोहित सोबत प्रशमेशच्याच घरी होतो एवढे मला आठवले. पुढे कितीही ताण दिला तरी नेमके काय झाल हे काही केल्या आठवेना.

"त्या चांडाळाला देव कधीही माफ करणार नाही. माझ्या पोराचा खून करून सूटणार नाहीत ते. .." पुढे तिला अगदी बोलवेना.

मी स्तब्ध होऊन हे ऐकत राहलो. डोक्यावर वार करुन माझा खून कोणी केला असावा ? आणि हे सगळ होईपर्यंत प्रथमेश आणि मोहित कुठे गेले होते अश्या प्रश्नांनी माझे डोके भंजाळून गेले.

तेवढ्यात पोलिस आले , पोलिस आले अशी कुजबूज चालू झाली. मी बाहेरच्या खोलीकडे निघालो. बाहेर पोलिस आणि बाबा बोलत बसले होते.

"सर काही तपास लागला का हो? " माझ्या बाबांनी व्याकूळ होऊन विचारले. "देशमुख साहेब मला तुमच्या दुखाःची पुर्ण कल्पना आहे. तपास पुढे सरकावा म्हणून चौकशी करणे कर्मप्राप्त आहे. त्यासाठीच आलो आहे. "

"ह्या केसचा आपण पहिल्यापासुन विचार करू. आम्हाला काल संद्ध्याकाळी आपण स्वताः फोन करून जोशी यांच्या घरी बोलावले की आपला मुलगा प्रवीण याचा जोशींच्या घरी खून झाला आहे.प्रथमेश जोशी याने सर्वप्रथम आपल्याला फोन करून बोलावले होते. प्रथमेशच्या जबाबीनुसार आपला मुलगा काल सकाळी त्याच्याकडे आला होता. सोबत मोहित नावाचा अजून एक मित्र होता. प्रथमेशच्या घरचे बाहेरगावी गेलेले असल्याने घरात इनमिन तीनच मुले होती. दुपारी एकच्या सुमारास प्रथमेश आणि मोहित जेवायचे पार्सल आणण्यासाठी बाहेर गेले. ते येईपर्यंत अडीच वाचले होते. त्यांनी घरात प्रवेश केला तेंव्हा त्यांना आपला मुलगा .."

"हे पहा सावंत साहेब ही सगळी माहिती मीच तुम्हाला काल दिली आहे. तुमचा तपास पुढे कुठवर आला हे सांगा"

"देशमुख साहेब त्यासाठी तर मी आलो आहे. हे बघा प्रथमेश आणि मोहित यांचा जबाब ग्राह्य धरला तर दोन शक्यता पुढे येतात. एक तर या तिघांवर कोणीतरी आधीच वॉच ठेऊन असल पाहिजे. ती दोन पोरे बाहेर गेलेली पाहून तुमच्या मुलावर त्याने घरात घुसून वार केला. पण ही मुले न ठरवता अचानक बाहेर गेली होती. बरोबर त्याच वेळेत हा हल्ला झाला आहे. घरात कोणी लपून बसले असेल हा जरी तर्क आपण पकडला तरी ती दोन्ही मुले बाहेर जातील आणि तुमचा मुलगा प्रविण हाच घरात राहिल याची खात्री खुन्याकडे कशी आली हे न उमजण्यासारखं आहे."

यावर बाबा उद्गारले की ," म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की प्रथमेश आणि मोहितने मिळून...?"

हे ऐकताच माझ्या पायाखालची वाळूच सरकली. प्रथमेश तर माझा लंगोटीयार..त्याने माझा खुन करावा ? नाही..हे शक्य नाही.

इन्स्पेक्टर सावंत म्हणाले ," हे बघा देशमुख साहेब सद्ध्या तरी ते केवळ संशयित आहे. त्या बाजुने आम्ही विचार करत आहोतच. बाकीच्या अॅंगलनेही विचार करायला हवा ना ? तुमचे नाव या शहरात अौद्योगीक क्षेत्रात मानाने घेतले जाते.."

स्वताःचे कौतूक ऐकून या प्रसंगातही बाबांच्या चेह-यावर हलकेसे हसु फूटले. माणूस क्षणार्धात कसा बदलू शकतो हे मी पहात होतो

सावंत पुढे बोलू लागले. ," आपल्याला कधी धमकीचा फोन चिठ्ठी वगैरे कधी आली आहे का ? कोणी असे करू शकेल असा एखादा संशयित ?

बाबा उठले आणि त्यांनी खिशातून एक चावी काढली. बाजुच्याच कप्प्यातून त्यांनी काही चिठ्या काढल्या आणि इस्पेक्टरसमोर ठेवल्या.

"प्रवीण अगदी दोन तीन वर्षाचा असल्यापासूनच मला असल्या चिठ्या येत आहे. अहो सावंत बिझनेसमद्दे नाव होत असल्यापासूनचा हा त्रास आहे. मला एक प्रकारची सवयच झाली होती त्याची. पण प्रकरण ह्या थरापर्यंत पोहचेल याची कल्पनाच कधी केली नव्हती.

इस्पेक्टर सावंतनी त्या सगळ्या चिठ्या वाचून काढल्या. माझ्यासाठीही ही गोष्ट नवीनच होती. मी सावंतांच्या बाजूला उभा राहून त्या चिठ्या वाचू लागलो. माझ्या खुन्याच्या शोधात मी स्वताःच सामिल झालो होतो. चिठ्ठीत परिवासास धोका असेल असे मोघम लिहिले होते. सावंतांनी त्या चिठ्या खिशात टाकल्या.

"देशमुख साहेब आजपर्यंत तुम्ही गप्प का राहिलात ? एकदा तरी पोलिसांना कल्पना तरी देऊन यायची. " उत्तरादाखल बाबांनी नुसतेच खाली फरशीकडे डोळे लावले.

"बर मला एक सांगा प्रवीण हा प्रथमेशकडे कोणत्या कामासाठी गेला होता याची काही कल्पना ? " बाबांनी नकारार्थी मान हलवली. सावंतांनी मग माझ्या आईला बोलावणे पाठवले.

आपले डोळे पुसत पुसत आई आत आली. सावंतांनी तोच प्रश्न आईला विचारला. आई म्हणली ," अहो आमचा मुलगा दी टायगर्स असोसिएशन याचा अध्यक्ष होता. कसकसली सामाजिक काम करत फिरायची ही पोर. त्या बोधले सरांनी हे खूळ ह्या पोरांच्या डोक्यात घातलं होतं. त्याचच काय तर पुढच्या कार्यक्रमाचा बेत चालला होता. त्यासाठीच तो गेला होता."

"बोधले..बोधले.."सावंत पुटपुटले. सावंतांनी मग आईला माझा मोबाईल मागितला.आईने तो दिला. पोलिसांच्या हातात माझा मोबाईल दिलेला पाहून मला जरा अोशाळल्यासारखेच झाले.

माझ्या व्हाट्स अपला एका दुस-या अॅपद्वारे लॉक लावले होते. सावंतांनी ते अॅपच उडवून टाकले आणि व्हाटस अप उघडण्यात आले.

त्यात पहिलेच नाव आदितीचे होते. सावंत ते चॅट वाचू लागले. मी मान खाली घालून उभा राहिलो. थोड्यावेळाने सावंतांनी फोन खाली ठेवून टाकला.

"देखमुख साहेब , तुम्हाला आदितीबद्दल माहिती नसणारच. " बाबांनी आईकडे पाहिले दोघांनीही नकारार्थी मान हलवली. " दोघेही ब-याच दिवसांपासून बोलत आहेत. आणि बोलणे मैत्रीपुरते मर्यादित नाही. सावंतांनी आता टायगर्स असोसिएश ग्रुप उघडला आणि वाचायला चालू केले. तेवढ्यात आई उद्गारली," अहो आपल्या प्रवीणला ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे हे सांगितले का ?

मी हा प्रश्न ऐकून पुन्हा एकदा हादरलो. मला कधीच याची कल्पना नव्हती.

बाबांनी आईला दटावले ," अग त्याचा काय संबंध इथे ?" सावंतांनी केवळ प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे पाहिले बाबांना तो इशारा समजला आणि ते बोलू लागले , " मागच्या दीड वर्षापासुन प्रवीणला हा त्रास होत होता. मद्धेच तो अर्थहीन बडबड करायचा. आदळाआपट करायचा. आणि नंतर काही झालेच नाही असा वागायचा. आणि आपल्या वागण्याबद्दल त्याला काही आठवायचेही नाही.जेव्हा आम्ही डॉक्टरच मत घेतल तेंव्हा त्यांनी सांगितलं ह्याबाबत प्रवीणशी आत्ताच बोलू नका. अन्यथा हा आजार वाढण्याची शक्यता आहे. आम्ही त्याच्याही नकळत आम्ही जेवणातून त्याचे अौषध देत राहिलो. "

मला एकानंतर एक मी धक्के पचवतच जावे लागले.

सावंतांनी पुन्हा मोबाईल उघडला आणि टायगर्स असोसिएशनचा लोगो बघून मला आमच्या ग्रुपचे सुरवातीचे दिवस आठवू लागले..

क्रमशः

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

8 May 2018 - 9:08 pm | पद्मावति

रोचक. वाचतेय.

प्रचेतस's picture

9 May 2018 - 9:37 am | प्रचेतस

मस्त सुरुवात.
पुभाप्र

अभ्या..'s picture

9 May 2018 - 9:47 am | अभ्या..

इंटरेस्टिंग वाटतेय.
येऊ द्या पटापटा.

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 10:39 am | जेम्स वांड
जेम्स वांड's picture

9 May 2018 - 10:39 am | जेम्स वांड

काहीतरी भारीच असणारे!

सिरुसेरि's picture

9 May 2018 - 10:48 am | सिरुसेरि

रोचक . पुभाप्र .

सस्नेह's picture

9 May 2018 - 12:25 pm | सस्नेह

वाचतेय..

पुंबा's picture

9 May 2018 - 1:09 pm | पुंबा

मस्त.
पुभालटा..

शित्रेउमेश's picture

9 May 2018 - 1:55 pm | शित्रेउमेश

धडाकेबाज सुरुवात....

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 2:00 pm | श्वेता२४

प.भा.प्र.

कपिलमुनी's picture

9 May 2018 - 2:13 pm | कपिलमुनी

रोचक सुरुवात !
चांगली पकड घेतली आहे

छान आहे पण छोटे आहे . पु भा ल टा

अर्धवटराव's picture

10 May 2018 - 8:31 am | अर्धवटराव

पुभाप्र

वीणा३'s picture

10 May 2018 - 8:35 pm | वीणा३

मस्त सुरवात. पु भा प्र

उत्सुकता ताणून धरायला लावण्यात हा भाग यशस्वी ठरला आहे. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

11 May 2018 - 6:27 pm | मराठी कथालेखक

विनोदाच्या अंगानं जाणारी रहस्यकथा दिसतेय :)

सोमनाथ खांदवे's picture

14 May 2018 - 5:47 pm | सोमनाथ खांदवे

दूरदर्शन ची आठवण झाली , ते पण आठ दिवस वाट बघायला लावायचे .

कपिलमुनी's picture

14 May 2018 - 6:11 pm | कपिलमुनी

पुढचा भाग लौकर येउ द्या

मस्त आहे पहिला भाग!

पुभाप्र.

सोमनाथ खांदवे's picture

18 May 2018 - 1:06 pm | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

18 May 2018 - 1:06 pm | सोमनाथ खांदवे

कुठं ग्येल्यात ष्टोरी रायटर ? 4 / 5 मानस पाठवून शोधा त्यांना . येवढा येळ दुसरा पार्ट टाकायला ? तो परस्तू लोक पायला पार्ट ईसरली अस्तिल बगा आणि ष्टोरीतला इंटरेष्ट पण कमी व्हईल लोकांचा .

मराठी कथालेखक's picture

18 May 2018 - 3:32 pm | मराठी कथालेखक

कथानायकाच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली दिसतेय :)

सोमनाथ खांदवे's picture

20 May 2018 - 2:17 pm | सोमनाथ खांदवे

आठ दिवसांत पुढचा भाग नै टाकला तर कथा बाद असा नियम च बनवा राव !! पोटऱ्या दाखवून लिफ्ट मागणाऱ्या हिरोईन सारख सगळी वाचक मंडळी हायजॅक क्येली या कथा ल्येखकान . बऱ्याच दिवसान म्येनंदू जरा काम भेटल्या सारख वाटलं

अमरप्रेम's picture

5 Jun 2018 - 8:01 pm | अमरप्रेम

ते नव्ह ..... पुढचा भाग येणार हाय का नाय?