मिसळ पाव : एक दुथडी भरून अखंड वाहणारी, मराठी भाषेची नदी , एक मराठी भाषेचं ज्वलंत व्यासपीठ .. तिला मानाचा मुजरा

खिलजि's picture
खिलजि in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 11:48 am

नमस्कार वाचक मंडळी ...

आज मराठी भाषेच्या दिनानिमित्ताने सर्व वाचक बंधू आणि भगिनींना , प्रियजनांना , गुरुजनांना आणि साहित्य संपादक मंडळातील आजी आणि माजी सभासदांना लाख लाख शुभेच्छा ....

सर्व प्रथम आभार त्यांचे मानतो ,, ज्यांनी हे ज्वलंत व्यासपीठ निर्माण केले .. मनापासून आभार ...

आज या प्राणप्रिय भाषादिनानिमित्ताने , मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत ... मी दुखी असताना ज्याप्रमाणे मला माझ्या मुलांनी त्या दुःखातून बाहेर काढलं तसाच काहीसा हातभार तेव्हा या व्यासपीठानेही दिला .. मी माफीनामा जाहीर केला आणि तुम्हा सर्वांचे अभिप्राय वाचून काहीसा हलका झालो ... विरक्त राहण्याचा प्रयत्न जरी चालू असला तरी भाषेवरचे प्रेम मी तसूभरही कमी होऊन देणार नाही ... भाषेवरच्या प्रेमाला जागृत ठेवण्यासाठी , या आपल्या लाडक्या व्यासपीठाशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी नजरेत नाही ...
आणि इतक्या लवकर अस्तित्वात येईल याची शक्यताही नाही ... हा किल्ला दिवसागणिक अभेद्य होत चालला आहे आणि त्याचे श्रेय या किल्ल्याच्या शिलेदारांना/किल्लेदारांना ( आजी / माजी सा. सं. मं. आणि सर्व वाचक ) जाते ..
मी जरी तुमच्या पासून लांब असलो , काहींच्या काही लिहीत आणि बोलत असलो तरी मला मात्र तुम्ही सर्व माझ्या जवळचे वाटता ...
हे व्यासपीठ , हि मराठी भाषेची .. आपुल्या लाडक्या भाषेची निर्मळ नदी अशीच लेखनाने दुथडी भरून अखंड वाहात राहावी .. हीच त्या भोळ्या शिवचरणी प्रार्थना

माझे लाडके आणि आदरणीय शिलेदार ( ज्यांना मी वाचलंय ) त्यांच्याबद्दल मला विशेष ममत्व आहे ... जसे कि .. बिरुटे सर , म्हात्रे सर , यनावाला सर , बीटा काका, अनिल जोशी , घाटपांडे साहेब , खरे साहेब , अवलिया , विशाल कुलकर्णी , पैजार काका , पैसा ताई , सँडी भाई आणि सर्वात लाडका अभ्या शेठ आणि जेनी ताई ... या सर्वाना लाख लाख प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2018 - 1:04 pm | चौथा कोनाडा

खजीलजी साहेब, सुंदर लिहिलेय.
मला देखिल हेच्च म्हणावेसे वाटते.
मी सुद्धा गेली काही वर्षे मिपाच्या कुरणात चरत असतो आपण म्हणता त्या प्रमाणे समृद्ध होत असतो.
तुम्हाला, मिपा संम आणि सर्व मिपापरांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मिपाची घौडदौड अशीच सरु राहो !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2018 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

मराठी भाषादिनानिमित्त
सर्व मालक-पालक-बालक-वाचक-लेखक भूतपूर्व-सद्य-भावी सुहृद मिपाकरांना

अनेकानेक हार्दीक शुभेच्छा !

अनेक वर्षे कामाच्या स्वरूपा-स्थानामुळे मराठी बोलणे विरळा झाले होते, लिहिणे तर विसरून जावे इतके ! मिपाला चिकटल्यापासून रोज मराठीत वाचणे-लिहिणे होते, मराठी मंडळींशी मराठीत संवाद होतो. हा सगळा सुखद सोहळा आहे... मराठी भाषा दिन हे केवळ त्याची आठवण काढण्याचे निमित्त ! असेच भेटत रहा, मराठीत संवाद करत रहा, दररोजचा आभासी कट्टा चालू ठेवा !

ज्योति अळवणी's picture

27 Feb 2018 - 5:34 pm | ज्योति अळवणी

मिपामुळे स्वतःचीच एक वेगळी ओळख झाली. त्यासाठी मिपा निर्माण करणाऱ्या आणि ते सतत वृंद्गींगत करणाऱ्या सर्व मिपाकरांचे आभार

असेच भेटत रहा, मराठीत संवाद करत रहा, दररोजचा आभासी कट्टा चालू ठेवा ! >>>>> सहमत !
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गामा पैलवान's picture

27 Feb 2018 - 7:36 pm | गामा पैलवान

मराठीचा विजय असो. मिपा चिरायु होवो.

-गा.पै.

पैसा's picture

27 Feb 2018 - 10:41 pm | पैसा

तुम्हालाही मराठी दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!