आधीचा चर्चा धागाविषय मणि शंकरांच्या पठडीतील धर्म निरपेक्षता ; या चर्चा धाग्याचा विषय कसुरी प्रस्तुत पाकिस्तानची परराष्ट्र निती
नमनाला घडाभर
जेवणाच्या काही पंक्ती त्यातील रुचकर पदार्थांमुळे जिभेवर रेंगाळतात. काही उपस्थितां सोबतच्या गप्पांमुळे तर काही त्याच्या आगे मागे झालेल्या कवित्वामुळे.
अलिकडे म्हणजे ६ डिसेंबर २०१७ ला मणि शंकरांनी आयोजीत मीया खुर्शीदांच्या सन्मानार्थ आयोजीत केलेला रात्री भोज मिलनाचा पंक्तीतले पिण्याच्या ग्लासातील वादळ लवकरच विस्मरणातही जाईल आणि कधी मधी राजनैतिक किश्शांच्या आठवणी निघताना उगाळला जाईल. या वाक्यातील 'पिण्याच्या ग्लासातील ' हे दोन माझ्या पदरचे घुसवलेले फुल टॉस शब्द आहेत. फुल टॉस एवढ्यासाठी मी पिण्याच्या ग्लासांचा उल्लेख केलाय उपस्थितांपैकी काही जण नक्किच म्हणू शकतील की तिथे पिण्याचा कार्यक्रम नव्हताच मुळी तेव्हा आम्ही काहीही पिण्याचा संबंध उरतच नाही. पण तुम्ही जेवढ्या वेळेला हे सांगाल तेवढ्या वेळेला तुम्ही तिथे गेला होता हे अप्रत्यक्ष पणे कबूल करत असाल.-पिण्याचा उल्लेख आम्ही तर पिण्याच्या पाण्या बाबतच केला होता तुमच्या मनात चांदणे का ?- तिथे जाणे गुन्हा नसला तरी नेमके काय काय झाले आणि नाही झाले हे पुन्हा पुन्हा तुम्हालाच सांगावे लागेल ; दुसर्या बाजूने पाण्याच्या ग्लासचा उल्लेखही काही गुन्हा नाही
आहे की नाही गंमत. :) गुन्हा तर दोघांनी केला नाही तरी वाद झाला , फुल टॉसची आहे की नाही धमाल :)
अशा पार्ट्यां देणे आणि वर्णी लावून घेण्याचे स्वतःचे फायदे असतात. या फायद्यांचे वर्णन आधिच्या चर्चा धागा प्रतिसाद मिपा सदस्य कंजूस यांनी अत्यंत मार्मिक पणे केले आहे.
ते म्हणतात
यापेक्षा एक - मोठे होता नाही आले तरी मोठ्यांचे धोतर घट्ट पकडून ठेवायचे. फरपटत जाण्याचा त्रास सहन केला तर योग्यवेळी लिफ्ट करा दे होते हाच मंत्र अशा शाळेत मिळतो. चांगले पोस्टिंग धोतरवाला देतो. नशिबाचा भाग.
मणि शंकरांच्या जेवणावळीस उपस्थित कुणाचाही मोठा जनाधार नाही केवळ आयत्या संधींचे उपभोगते एवढाच काय तो उपस्थित राजकारणी आणि राजनैतिक मुत्सद्द्यांचा परिचय. सध्याचे सरकार उभे करणार नाही तेव्हा त्यांच्या विरोधकाच्या पंक्तीस उपस्थिती लावली म्हणजे दुसरे सरकार जेव्हा केव्हा येईल तेव्हा कुठे ना कुठे काही ना काही वर्णी लागण्या ची तेवढीच शक्यता सोबतीला शांततेच्या प्रचारार्थ सक्रीयतेचे प्रमाणपत्र कोणत्या आंतरराष्त्रीट्रीय एनजीओ मंचावर परिचयास पात्र ठरवते हा अधिकचा बोनस. हे आपल्या भारतिय उपस्थितांचे पुराण.
तर दुसर्या बाजूस सन्माननीय अतिथी पाकीस्तान नामे स्वतंत्र राष्ट्राचे माजी परराष्ट्र मंत्री मीया श्रीमान खुर्शीद कसुरी. यांचा परिचय केवळ
पाकीस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री एवढा पुरेसा नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वातंत्र्य पुर्व पंजाब विभागाच्या प्रमुखाचे नातू. श्रीमान मीयांचे आजोबा खिलाफतमुळे गांधीजींसोबत जोडले गेले लाला लजपत रायां नंतर कॉम्ग्रेसच्या पंजाब विभागाचे प्रमुख पद सांभाळले.
अशा माजी काँग्रेस विभाग प्रमुखाचा नातू स्वतःस मी जहाल पण नाही आणि मवाळ पण नाही म्हणतो तेव्हा काँग्रेसी प्रभृतींना तो जहाल नाही म्हणतो तेवढेच ऐकु येते आणि पाकीस्तानात जाऊन मी तर मणि शंकर सोबत भेट केली म्हणजे मी मवाळ नाही म्हणता येते. भाराताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्ब्लांनी म्हटल्या प्रमाणे मोदी विरोधकाच्या घरी केलेल्या शांतता चर्च ने काय साध्य होणार वस्तुतः काहिच नाही
कसूरींच्या दृष्टीने मणि शंकर सारख्या मोदी विरोधक व्यक्ती सोबत भेट घेतल्याने आपण मवाळ नाही हा संदेश पाकिस्तानी जनते पर्यंत पोहोचवता येतो. मोहम्मद अलि जीना महात्मा गांधींना तुम्ही हिंदूंचे नेते म्हणून वाटा घाटीस या म्हणून सांगून सांगून थकले पण म. गांधींनी आपण फक्त हिंदूंचे नेते नसल्या बद्दलचा आग्रह सोडला नाही . आता ७० वर्षांनी का होईना पाकीस्तानी राष्ट्रास भारतात त्यांच्या मना जोगता हिंदू नेता चर्चेसाठी उपलब्ध झाला आहे तेव्हा मात्र ह्यांना महात्मा गांधींच्या पक्षाची आठवण होते आहे.
अशा या मीया कसूरींच्या पाकी परराष्ट्र निती संबंधी पुस्तकाचे नाव आहे Neither a Hawk nor a Dove: An Insider's Account of Pakistan's Foreign Policy यात त्यांनी स्वतःच्या कुटूंबा सोबत विवीध पाकिस्तानी राजकीय नेत्यांचा करून दिलेला परिचय रोचकच आहे. मला तर माझ्या घरी हिंदू - मुस्लीम शीख इसाई भाई भाई असे लहान पणी सांह्गितले होते असे सांगून ते भारतीय काँग्रेसींची सहानुभूती शोधतात तर दुसरीकडे हिंदू - मुस्लीम शीख इसाई भाई भाई ही जमिनीवरची वस्तुस्थिती नव्हती अशी बाजू रंगवत पाकीस्तानी आणि जगातील इतर देशातील सहानुभूती शोधण्याचा प्रयत्न करतात .
त्यांच्या लेखनातला सगळ्यात मोठा विरोधाभास फाळणीचे वर्णन करताना ते म्हणतात महमद अलि जिनांनी पंजाब आणि बंगालची फाळणी करू नका असे सुचवले. या दोन प्रदेशांची फाळणी झाली नसती तर हिंसा आणि तदनंतरचे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले नसते. वर वर ऐकताना जीना किती भला माणूस होता असे चित्र रंगवले जाते. या वाक्याचा अर्थ अख्खा पं णि अख्ख बंगाल पाकीस्तानात हवा होत असा होतो या कडे ते दुर्लक्ष करतात. समजा अल्पसंख्यांक त्या त्या विभागात व्यवस्थीत राहू शकतात तर काश्मिर भारता पासून वेगळा करण्याची शक्यता रहात नाही या कडे सोईस्कर दुर्लक्ष करतात. दुसरीकडे जीनांना भारत पाकीस्तन संबं आमेरीका कॅनडा सारखे अभिप्रेत होते असे सांगत जगभराची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण तसे असेल तर ते विना अट असावयास हवे. पण इथे दावूद सापुस्ळायचा असतो सईद सांभाळायचा असतो आणि भारतातून मणि शंकरांकडेच रात्री भोज उरकून पाकीस्तानात पाऊल टाकल्या नंतर सपुसतःच वाढवलेल्या अतिरेकींचे खापर भारताच्या माथ्यावर फोडण्याचे प्रयत्न करावयाचे असतात. त्यांच्या प
अशी फॅक्टस कल्टी / ट्वीस्ट करून सादर करण्यात चिन्यांप्रमाणे पाकीस्तानीही अत्यंत वाकबदार असतात. त्यांच्या या कौशल्याचा त्यांना आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्यासाठी वेळो वेळी मोठा फायदा होतो. भारतीयांना यातले ट्वीस्ट सहज लक्षात येत नाहीत त्यांना काऊंटर करण्या एवजी स्वतःच त्या जाळ्यात ओढले जात रहातात
बेसिकली राष्ट्र निर्मिती संकल्पना भौगोलीक असू शकते , भाषा धर्म हे घटक उपराष्ट्र वादाचे असू शकतात पण ती राष्ट्र निर्मितीची तत्वे असू नयेत या बद्द्ल आपण भारतीय कचखाऊ भूमिका घेतो आणि मग भारताची फाळणी धर्माधारित झाली तर अजून चार वेळा चार कारणांनी भारताचे विभाजन झाले तर बिघडले कुठे असे विचार करणाऱ्या परकीयांचे फावते आणि स्वकीय सुद्धा फुटतात . असो. कसुरी पाकिस्तानी परराष्ट्र नीतीचे चित्रण कसे दुटप्पी पणे समर्थन करतात त्यांचे सर्व लष्करी अधिकारी आणि गुप्तचर संस्था भारता सोबत शांततेसाठी किती आतुर झाल्या आहेत असे वाटावे. पण मांजरीने डोळे मिटून दूध पिले तरी इतरांच्या नजरेतून सुटत नाही . सर्वाना सर्व काळ फसवता येत नाही अशी म्हण आहे.
वसुधैव कुटुंबकं हे तत्व भारतासाठी नवे नाही पण त्या साठी भारतीयांच्या हिताची बोळवण अथवा भारताचे विभाजन हि अट असू शकत नसावी . असो . शत्रू पक्षावर वैचारिक मात करावयाची असेल तर त्यांच्या विचारांचा आपला तोल ना जाऊ देता अभ्यास करावयास हवा. आणि त्या दृष्टीने खुर्शीद कसुरींचे
Neither a Hawk nor a Dove: An Insider's Account of Pakistan's Foreign Policy By Khurshid Mahmud Kasuri
हे पुस्तक एका उत्तम संधी आहे . त्या बद्दल वाचन करून कुणी अधिक चर्चा केल्यास स्वागत आहे
माझ्या संगणक कळ फलकास फ्लायिंग कर्सर समस्या आहे . त्यामुळे त्रुटींबद्दल क्षमस्व
* कसुरी भारतातून वापस गेल्या वर लाहोरात काय बोलले बरे ?
प्रतिक्रिया
21 Dec 2017 - 9:23 pm | गामा पैलवान
कसुरी महाशय म्हणजे नायदर अ हॉक नॉर अ डव्ह ! ओन्ली काँव काँव !!
-गा.पै.
मूळ कल्पना : इतरत्र
22 Dec 2017 - 5:16 pm | माहितगार
मणि शंकर अय्यरांचा ndtv वर आधी आलेला लेख Modi-ji, Thank You For Ending My Has-Been Status
पाकीस्तानी वृत्तपत्र डॉनच्या आजच्या आवृत्तीत पुर्नप्रकाशीत झालेला दिसतो आहे.