नमनाला घडाभर
भारतातलीच एक पुरेशी जुनी (स्थापना १९३५) शाळा, पण ब्रिटीश वळणावरची, इथे प्रवेश केवळ स्पर्धा परिक्षेने मेरीटवरच मिळतात - असं वाचल की कित्ती छान वाटत नाही ? पण थांबा या शाळेची सध्याची वार्षीक फीस वर्षा काठी केवळ ९ लाख ७० हजार एवढी किरकोळ आहे. वर्षा काठी ५० मुले भरली की टार्गेट संपले, दहा वर्षातील सर्व मुले मिळून अदमासे ५०० फक्त. एवढी फिस भरण्याची तयारी सहसा भारतातील केवळ सरंजामदारांकडेच असेल हे सांगण्यासाठी वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज असण्याचे कारण नाही. आता पर्यंत भारतातले एक पंतप्रधान, ९ कॅबीनेट मंत्री, दोन मुख्यमंत्री , दोनडझन उच्च लष्करी अधिकारी, दोन डझन राजदूत या एकट्या शाळेने दिले आहेत म्हणे. (संदर्भ) या मुलांवर राष्ट्रप्रेमासोबत कट्टर धर्मनिरपेक्षतेचे पाठ गिरवून घेण्यासाठी मुख्याध्यापक ब्रिटीश असतात वंदे मातरम सोबत मंहमद इकबालची कवनेही म्हणवून घेतली जातात. (संदर्भ)
एवढ्या वर्णनावरून या महान शाळेचे नाव तुम्ही ओळखलेच असेल. अशा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याच्या कौशल्यात कुणाशी कसे बोलायचे या कौशल्याचा समावेश आहे म्हणे आणि याच शाळेतील एका -आता ७६ वर्षीय- विद्यार्थ्याचे नाव मणि शंकर अय्यर ! बोलता बोलता मुक्ताफळे उधळण्याची मोठी परंपरा असणार्या मणिशंकर यांनी त्यांची कारकीर्द भारताच्या परराष्ट्र खात्यात राजनैतिक अधिकारी म्हणून घडवली आहे, कराची दुतावासात तब्बल चार वर्षे भारताचे राजनैतीक अधिकारी पदावर काम करण्याचा अनुभव आहे. निवडणूका तामिळनाडूतून लढवल्या पण आडनावा पलिकडे तामीळनाडू आणि केरळचा संबंध काय ते माहित नाही, वस्तुतः बालपणी फाळणीच्या वेळेस लाहोरातून निर्वासीत शिक्षण डून स्कुल मध्ये, काम कराचीत (यांचे हिंदी किती कच्चे असेल कल्पना करा ) समाजवादाचे नाव घेणार्या नेहरूंनीच सरंजामशाही दिल्ली गोल्फ क्लबलाही आशीर्वाद दिला ! , तसे काहीसे मणि शंकर अय्यरांचेही आहे, तारुण्यात मार्क्सवादाची भलावण केलेल्या मणिशंकरांना मार्क्सवाद केवळ पुस्तकात भावतो. एक चहा वाला पंतप्रधानपदी बसणे खपत नाही. बाकी अनेक तथाकथित सेक्युलर लोकांची नीच कृत्ये दिसली तरी तोंड उघडत नाही पण मोदींबाबत त्यांच्या कृतींची समीक्षा करण्या एवजी व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाचे सज्जड उदाहरण देत व्यक्तीलाच नीच ठरवता येते तेही चक्क महात्मा गांधीच्या नावाची आळवणी करून , कमाल आहे ! आणि म्हणे त्या डून स्कूल मध्ये तर्कशुद्ध विचार शिकवण्याचे ध्येय आहे !
एका निवृत्तीच्याआसमपास असलेल्या राजकारणी व्यक्तीच्या जाणता अजाणता झालेल्या टिपण्यांकडे आणि भान सुटणार्या व्यक्ती कडे किती लक्ष द्यायचे ? पण महाशयांनी अलिकडे दिलेल्या एका रात्र भोजनास माजी उपराष्ट्रपती माजी पंत प्रधान ते काही माजी राजनैतिक अधिकारी आणि माजी लष्करी अधिकारी मंडळींनी हजेरी लावली आणि सोबतीला अतिथी पाकिस्तानातील होते हे वाचल्यावर हे मणिशंकर अय्यर कोण ? अशी थोडी उत्सुकता जागृत होणे सहाजिक नाही का ?
मुख्य विषय
तर अशा या मणि शंकर अय्यर यांचा Confessions of a Secular Fundamentalist नावाचा एक ग्रंथ गूगल बुक्सवर preview उपलब्ध आहे. केवळ preview असल्यामुळे पुस्तकातील सारीच पाने चकटफू वाचता येत नाहीत. जेवढी वाचता येतात त्यातून सध्याच्या तथाकथित कट्टर सेक्यूलरवादाचा जरासा मागोवा घेता येतो.
'निरपेक्ष' शब्दात एक प्रकारची निष्पक्षततेआणि तटस्थता अभिप्रेत असावयास हवी. मणि शंकर अय्यर त्यांच्या या पुस्तकात एके ठिकाणी निष्पक्षतेच्या गरजेशी सहमत होताना दिसतात. निष्पक्षतेते समर्थन आणि टिका करताना सर्व बाजूंवर सारख्याच पद्धतीने करणे अभिप्रेत असावे. हे करताना तटस्थता
अथवा सर्वांभूती समानता न राखली गेल्यास निरपेक्षतेचा आधारच ढासळतो आणि धर्म निरपेक्षता लूळी पडून 'तथाकथित हे विशेषण लागून हास्यास्पद ठरावयास लागणारी अंमळ उदाहरणे नजरेला पडू लागतात आणि धर्मनिरपेक्षता शब्दाची भूमिकेची विश्वासार्हता ढासळते धर्मनिरपेक्षता भूमिकांच्या आदरास धक्का पोहोचवयास लागतो. आणि म्हणून धर्म निरपेक्षते बाबतची भूमिका घेणार्यांनी कट्टर असावे धर्म निरपेक्षतेत कट्टर असावे तडजोड करू नये हे तटस्थता पाळली गेल्यास अगदी धर्मनिरपेक्ष नसलेल्या व्यक्तीस सुद्धा तेवढे खुपणार नाही पण वास्तवात तसे होताना दिसत नाही.
मणि शंकर अय्यर स्वतःस पाश्चात्य धाटणीचे कट्टर धर्म निरपेक्षतावादी म्हणवून घेऊ इच्छितात ज्यात सार्वजनिक जिवनात धार्मिकते पासून अंतर राखणे अभिप्रेत असते, पण भारतीयांची धार्मिकता लक्षात घेता सर्वधर्मसमभावाची भूमिका त्यांना स्विकार्य वाटते. धर्मनिरपेक्षतावादी भूमिका मवाळ करू नयेत ती निसरडी घसरगुंडी आहे असे त्यांना वाटते, इथ पर्यंत ठिक. पण बहुसंख्यांच्या प्रति त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची कठोरता दाखवू लागणारे मणि शंकर अल्पसंख्यांकाच्या बाबतीत केवळ सोईची तथ्ये तेवढीच विचारात घेताना दिसतात गैरसोईची तथ्ये अनुल्लेखीत ठेवण्या कडे कल दिसतो. कदाचित राजनैतिक मुत्सद्देगिरी करताना स्वतःचा प्रभाव पाडण्या एवजी विरोधी बाजूचा प्रभावही पडत असावा असे काही मणिशंकर यांच्या बाबतीत झाले आहे का ? अशी शंका वाटते. बहुतेक सर्वच धर्मीयात एक उदार उदात्त भूमिका ठेऊन असलेला गट असतो आणि आपल्या भूमिकांचि उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणारा मोठा वर्गही असतो, मणि शंकरांची नेमकी अडचण नेमकी येथे होते , बहुसंख्यांकांच्या उदार उदात्त भूमिका असलेल्या गटाचे क्रेडीट ते वळते करत नाहीत केवळ उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणार्यांकडे अंगुली निर्देश करतात पण अल्पसंख्यांकांकडे बघताना त्यांच्यातील केवळ उदार उदात्त भूमिकांची दखल घेताना , उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणार्यांकडे डोळेझाक करताना दिसतात. वस्तुतः एकाच्या चुकीने दुसर्याच्या चुकीचे समर्थन होत नाही चुकणार्या सर्वांनाच एकाच रांगेत उभे करून चूक निदर्शनास आणून देऊन चूका करण्यापासून परावृत्त करणे आणि त्यांच्यात आपाप्सात विश्वास निर्माण करणे वेगळे आणि केवळ त्यातील एकाच गटाला लक्ष करणे वेगळे हे मणि शंकर अय्यर आणि त्यांच्या विचारसरणीतील असंख्यांच्या लक्षात येताना दिसत नाही.
मतांच्या बेरजेसाठी मी जातींचे राजकारण करतो एका गटातील धर्मांधांना पाठीशी घालतो आणि एकाच बाजूच्या लोकांना तुम्ही चूक म्हणत लक्ष करतो आणि वरून स्वतःस स्वतःच्या निरपेक्षतेची शाबासकी घेतो हे विश्वास निर्माण करणारे होत नाही हि कठोर नव्हे लूळी पडलेली धर्मनिरपेक्षता आहे.
मणि शंकर अय्यर धर्मवादी लोकांसारखीच मोठी गफलत करतात ते राष्ट्र आणि धर्म या संकल्पनांची गल्लत करण्याची , धर्म निरपेक्षता जपता न आल्यास भारताने राष्ट्र म्हणून शिल्लक राहू नये अशी स्पष्ट मांडणी करताना मणि शंकर अय्यर दिसतात . धर्म निरपेक्ष असो अथवा नसो राष्ट्र हे राष्ट्र असते. सौदी अरेबीया धर्म निरपेक्ष नाही अथवा इराण धर्म निरपेक्ष नाही पण ती राष्ट्रे आहेत सौदी अरेबीयाचा अथवा इराणचा एखादा धर्मनिरपेक्ष नागरीक माझा देश धर्म निरपेक्ष नाही मी त्याचे विभाजन करतो अथ्वा राष्ट्र द्रोह करतो म्हणाला तर ते समर्थनीय ठरत नाही तसे भारताच्या बाबत भारत बहुसंख्यांच्या स्वेच्छेने धर्म निरपेक्ष आहे हे चांगलेच पण काही कारणाने तो धर्म निरपेक्ष नसता तर निरपेक्षतेसाठी विचारांचा प्रसार करणे वेगळे आणि राष्ट्राच्या नष्ट होण्याची भाषा करणे वेगळे हे मणि शंकर अय्यरांनी लक्षात घेतले असेल का ? आणि तरीही त्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम रहावयाचे असेल पाकीस्तान आणि बांग्लादेश यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तीत्वाचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका मणि शंकर अय्यर यांनी आणि त्यांच्या पठडीतील मॅकॉले विचारसरणीच्या लोकांनी लक्षात घ्यावतास हवी.
इथे मणि शंकर अय्यर पाकीस्तानची पाठराखणच करत नाहीत तर हे मणि शंकर अय्यर आमच्या देशातले सरकार बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे पाकीस्तानात जाऊन म्हणतात तेव्हा त्याचे अर्थ बदलत असतात, हे लक्षात येण्या पलिकडे मणि शंकर अय्यर गेले असतील पण त्यांच्या सोबत पाकीस्तानी लोकांना सोबत घेऊन रात्री भोज घेणार्या माजी पंतप्रधान माजी उपराष्ट्रपती आणि माजी राजनैतिक मुत्सद्द्यांनी देश गहाण टाकणे त्यांच्या क्षमतेतील गोष्ट नाही पण अक्कल गहाण टाकणे तथाकथित अनुभवी लोकांना शोभणारे ठरते किंवा कसे. (संदर्भ) भाजपा आणि मोदींकडून एक नाही लाख चूका झाल्या असतील- नसतील त्याची शहा निशा स्वतंत्रपणे नक्कीच करावी पण त्यांच्या चुकांनी तुमच्या राजनैक्तीक चुकांवर पांघरूण घालता येते नव्हे. पाकीस्तानी लोकांसोबत रात्री भोजाचे आयोजन गैर कायदेशीर नाही माउपराष्त्र्ट्रपतींना त्यांच्या स्वतःच्या घरीही करता आले असते. मणि शंकर अय्यर मोदींचे किती कौतुकास्पद विरोधक असले तरी त्यांच्या घरी तथाकथीत ज्ञानी लोकांनी जेवण घेऊन मुत्सद्देगिरीचा जो काही उजेड पाडला त्याने भारत पाक संबंधात काही सुधारणा होईला का माहीत नाही राजनैतिक औचित्याचा मुद्याची काळजी न घेणारे कथित प्रयत्न मोदी विरोधाची भूक भागवण्या पलिकनाह, हसी शिवाय काही हशील करत नसावेत किंवा कसे.
धागा लेखाचा मुख्य उद्देश मणि शंकर अय्यर यांच्या पुस्तकांची चर्चा करणे हाच आहे. मला एकट्यास त्यांच्या पुस्तकाचा पूर्ण उहप्पोह सदर लेखात समावेश करणे शक्यही नाही आणि प्रिव्ह्यू प्रत्येक वेळी मर्यादीत दिसतो त्याही मर्यादेमुळे माझी मांडणी परीपूर्ण असल्याचा दावा नाही उलट पक्षी काही राहून गेले असल्यास अवश्य निदर्शनास आणावे. चुभूदेघे.
संदर्भ
* मणि शंकर अय्यर (इंग्रजी विकिपीडिया लेख)
* डून स्कूल
* Confessions of a Secular Fundamentalist By Mani Shankar Aiyar
गूगल बुक्सवर
प्रतिक्रिया
18 Dec 2017 - 11:15 pm | कपिलमुनी
19 Dec 2017 - 9:16 am | माहितगार
मला असे चित्र वापरण्याच्या आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्या बद्दल आक्षेप नसला तरी लेख वाचक आणि चर्चा सहभागाचा हिरमोड होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे या चित्रास ठेवायचे का याचा संपादक मंडळाने विचार करावा हि नम्र विनंती.
19 Dec 2017 - 5:04 pm | arunjoshi123
अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही एक पोकळ कल्पना आहे. तिचा प्रत्येक ठिकाणी एक योग्य संकोच अभिप्रेत आहे. कसलाही मूर्खपणा अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून खपवून घ्यायला हा काय लोकशाही लोकशाही खेळायचा प्रकार आहे?
19 Dec 2017 - 5:43 pm | कपिलमुनी
तुमचे प्रतिसाद खपतातच की !!
19 Dec 2017 - 4:55 pm | arunjoshi123
पोवट्याची उपतुक्तता काँग्रेसपेक्षा जास्त आहे.
19 Dec 2017 - 4:45 am | कंजूस
यांच्या वचनांचा संग्रह उपलब्ध करून द्या हो.
19 Dec 2017 - 9:18 am | माहितगार
इंरजी विकिपीडिया लेखात उपलब्ध दिसते. दुवा दिलेला आहे.
19 Dec 2017 - 9:17 am | रंगीला रतन
ह्या माणसाला त्याचि लायकी अमर सिंगांनी २००० सालिच दाखवुन दिली आहे. दारु पिऊन भर मेजवानी मध्ये तमाशा केल्यावर मार खाऊन सुद्दा ह्याची मस्ती कमी झाली नाहि.
`Don't invite the likes of Mani. If you must, limit them to two pegs'
कपिलमुनींची वरिल प्रतिक्रिया समर्पक आहे.
19 Dec 2017 - 10:54 am | पुंबा
छ्या! काय घाणेरडा माणूस(?) आहे हा. हे असले वेडपट लोक पाळत आल्यानेच काँग्रेसची ही अवस्था झालीये.
19 Dec 2017 - 12:43 pm | रामदास२९
घाणेरड्या मानसिकतेचा माणूस आहे हा .. मुलायम सिन्ग ना आई वरून घाण शिव्या दिल्या.. ही कसली उच्च मुल्य देणारी शाळा..
हा माणूस गान्धी घराण्याच्या फार जवळचा आहे..
19 Dec 2017 - 5:01 pm | arunjoshi123
प्रत्येक ग्रुप डिस्कशनच्या वेळी हा उजव्या विचारांच्या सर्वात प्रसिद्ध माणसाला "मला आपला परिचय नाही" असे म्हणतो. यात अनुपम खेर, स्मृती इराणी, परेश रावळ या लोकांचे नाव बहाद्दराने २०१६ पर्यंत ऐकले नव्हते.
===================================
याने सावरकरांना टेररिस्ट म्हटले तेव्हा कोणत्या तरी साठे नावाच्या काँग्रेसच्या खासदाराने राजीनामा दिला होता. हा खासदार काँग्रेसच्या १००-१२५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात महान मनुष्य मी मानतो.
19 Dec 2017 - 9:52 pm | रामदास२९
कोण ?? वसन्त साठे? ते तर २००४ साली खासदार नव्हते जेव्हा तो तसा म्हणाला होता..
वास्तविक पाहता ह्याची मता आणि नेहरू गान्धीन्ची मता फार काही वेगळी नाहीत.. या लोकान्नी ल्यूटेन्स दिल्ली बाहेरचा जग पाहिलच नाही..
19 Dec 2017 - 9:41 am | पगला गजोधर
यावेळी कदाचित केंद्राकडून त्यांना एखादा पद्मभुषण तरी मिळेलच....
असो मा. सर तुम्ही खूप मेहनत घेऊन लेख लिहिता खरंतर....
पण लहानपणी आम्ही अंघोळीला टंगळमंगळ करतोय, असे आमच्या आईला वाटले तर ती आमच्या डोक्यावर आधी थंड पाण्याची बादली उपडी करायची...
त्याप्रमाणे तुम्ही शब्दांची संबंध बादली उपडी केली डोक्यावर,
पण डोकं बधिर झालं, आणि कळलं नाही बरंच काही मला...मी कोरडा ठक्क....
19 Dec 2017 - 9:52 am | माहितगार
मणि शंकर अय्यरांच्या विशीष्ट पुस्तकाचा संदर्भ आहे, ते चाळावे लागेल कदाचित.
19 Dec 2017 - 11:55 am | आनन्दा
यावरून आत्ताच वाचलेला एक जोक आठवला
राहुलकडे जाऊन त्याचा असिस्टंट घाबरत घाबरत म्हणतो, साहेब तुम्ही शंकराच्या देवळात गेलेला ना, आता शंकराने....
राहुल घाबरत घाबरत विचारतो, तिसरा डोळा उघडला?
असिस्टंट : नाही हो, मणी शंकराने तोंड उघडलंय
19 Dec 2017 - 9:38 pm | रंगीला रतन
लई भारी...
19 Dec 2017 - 1:06 pm | गामा पैलवान
अतिशय चपखल चित्रभाष्य :
संदर्भ : http://jagatapahara.blogspot.co.uk/2017/12/blog-post_67.html
-गा.पै.
19 Dec 2017 - 2:01 pm | माहितगार
चित्र चपखल असू द्यात पण बघण्यास छान नाहीत. वरच्या कपिल मुनिंच्या चित्रा बाबतही तेच मत. फार तर लिंक द्यावी चित्र जसेच्या तसे दिल्याने चर्चेत व्यत्यय येतो असे वाटते.
19 Dec 2017 - 6:06 pm | अभ्या..
तुमच्या त्या "संदर्भ द्या, संदर्भ द्या" च्या गिरगिट्यापेक्षा हि चित्रे लाख पटीने भारी आहेत.
20 Dec 2017 - 11:15 am | माहितगार
चित्र काढण्याच्या कौशल्य आणि सरसते बद्दल ना नाही , पण गंभीर चर्चेत सहभाग घेऊ इच्छिणार्यांना किळ्सवाणे पदार्थ प्रत्येक वेळी धागा उघडताना पुन्हा पुन्हा पहावे वाटतील का या बाबत साशंक होतोआण/ आहे.
आनंन्दा यांनी नोंदवलेला व्यंग विनोद म्हणून अधिक सरस वाटते किंवा कसे.
धर्म निरपेक्षता विषयक धागा सावकाश पुन्हा केव्हा तरी काढावा लागेल असे दिसते. असो.
19 Dec 2017 - 4:53 pm | arunjoshi123
असल्या तथाकथित महान शाळांची फळं स्वतःला लै शहाणी समजत असतात. आम्ही झेड पी शाळेत शिकून, गावाकडून आलो असल्याने असल्या मानसिकतेचा माज अधिकच जाणवला. ही मंडळी टोटल पोकळ असतात. इंग्रजीत मूर्खपणा करत असतात.
19 Dec 2017 - 5:19 pm | arunjoshi123
१. यांचं जीवन बंदिस्त प्रकारचं असतं.
२. यांच्यावर काही तत्त्वांचा प्रचंड प्रभाव असतो.
३. यांच्या काही प्रभूतिंचा प्रचंड प्रभाव असतो.
४. सहसा पूर्वेकडचे, मंजे भारतातले, लोक पाश्चात्यांच्या मानानं मूर्ख असतात असं हे मानतात.
५. भारत सर्व दृश्ट्या मागासलेला आहे, होता असं मानतात.
६. किती पैसे वा कोणती पदकं मिळवायची आहेत याचे कंसेप्ट क्लिअर असतात.
७. भयंकर कामसू, अभ्यासू (म्हणजे वाचन करणारे फक्त) असतात.
८. इतर क्लासेसला समावून घेतात. पण त्यांचा कोर क्लब असतोच असतो.
९. प्रत्येक गोष्टीचा हिशेब करतात.
१०. एखाद्या प्रोजेक्टची असावीत तशी यांच्या जीवनाची उद्दिष्टं असतात.
११. हे लिमिटेड विषयांवर विचार करतात.
१२. सदा सर्वदा बिझी असतात.
१३. स्वतःमधे फार एक मोठी क्षमता आहे असं समजतात.
१४. आयसोलेटेड राहतात.
१५. यांचे काही स्टँडर्ड बेंचमार्क असतात.
१६. आर्ग्युमेंटेशन स्वतः करत नाहीत. इतर महान लोकांनी काय केले तेच सांगत असतात.
19 Dec 2017 - 6:10 pm | कंजूस
यापेक्षा एक - मोठे होता नाही आले तरी मोठ्यांचे धोतर घट्ट पकडून ठेवायचे. फरपटत जाण्याचा त्रास सहन केला तर योग्यवेळी लिफ्ट करा दे होते हाच मंत्र अशा शाळेत मिळतो. चांगले पोस्टिंग धोतरवाला देतो. नशिबाचा भाग.
19 Dec 2017 - 6:55 pm | माहितगार
मणि शंकरांच्या बोलण्यातील तारतम्या बद्दलच्या मर्यादा सर्वश्रूत आहेत. त्या बद्दलच चर्चा करण्या पेक्षा त्त्यांच्या पठडीतील धर्म निरपेक्षतेचा विचाराचे प्रतिनिधीत्व करणार्या त्यांच्या पुस्तकातील मांडणीचा उहापोह धर्म निरपेक्षता मानणार्यांना आणि कथित धर्मनिरपेक्षतेच्या काही पैलुं बाबत आक्षेप असणार्या दोन्ही गटांना होईल असे वाटते. एखादी व्यक्ति बोलताना आणि लिहिताना मध्ये काही अंतर असू शकते पण विचारधारा लक्षात येण्यासाठी लेखन अभ्यासणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल या दृष्टीने गूगल बुक्स वर Confessions of a Secular Fundamentalist
वाचून चर्चेत सहभाग घेतल्यास चर्चेस एक चांगली दिशा मिळेल असे वाटते
20 Dec 2017 - 9:36 am | lakhu risbud
तुम्हीच तिथे दिलेला,ऐसी वरील पुरोगामित्वाच्या चर्चे संबंधीचा हा धागा वाचनीय.
http://aisiakshare.com/node/4379?page=1
19 Dec 2017 - 8:21 pm | रमेश आठवले
मणि यांच्यामुळे भाजपाचा २०१४ च्या लोकसभेच्या आणि २०१७ च्या गुजरातच्या निवडणुकीत फायदा झाला आहे. १४ साली ते मोदींना 'चायवाला' म्हणाले तर ते उदगार वापरून मोदींनी त्यावेळी लोकप्रिय झालेला ' चाय पे चर्चा ' हा कर्यक्रम सुरु केला. १७ साली त्यांनी मोदींना 'नीच किसम ' का आदमी म्हटले आणि त्याचा फायदा मोदींनी त्यांच्या जातीविषयी मणि तिरस्काराने बोलले असा प्रचार करुन घेतला. या कामगिरी मुळे घाबरून जाऊन राहुल यांनी उपद्रवी मणि यांना काँग्रेस मधून निष्कासित केले आहे.
19 Dec 2017 - 8:36 pm | माहितगार
राजकीय पक्ष कोणताही असो, सहसा असली निष्कासने तात्पुरती दिखाऊ असतात. मुख्य रोलवर पुन्हा घेतले जाणे टाळले तरी दरबारातील दुसरी छोटी मोठी जबाबदारी (पारितोषिक) देऊन सामावून घेतले जाते.
20 Dec 2017 - 12:36 pm | माहितगार
मणि शंकरांच्या घरी झालेल्या मनमोहन्सिंगांच्या विवाद्य उपस्थिती बद्दल औचित्याचा मुद्दा असलेल्या पाक-मैत्रि रात्रीभोज कारणावर
भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिबल यांचा इकॉनॉमीक्स टाईम्स मध्ये निसटत्या बाजूंवर नेमके बोट ठेवणारा लेख आला आहे.
View: Former Pak minister Kasuri’s dinner raised a din that served no interest
20 Dec 2017 - 1:40 pm | गामा पैलवान
माहितगार,
लेखाबद्दल धन्यवाद. लेख वाचला, छोटासाच आहे. पण भाषा इतकी बोजड आहे की परत एकदा वाचून काढावा लागला. नोकरशहांना सरळ भाषेत लिहायची बंदी आहे बहुतेक.
आ.न.,
-गा.पै.
20 Dec 2017 - 11:02 pm | माहितगार
वस्तुतः आंतरराष्ट्रीय राजनैतिक मुत्सद्दांची भाषा अशीच असते. प्रत्येक शब्द मोजून मापून वापरणे अपेक्षीत असते. दोन ओळीतील अर्थ समजून घेण्यासाठी बरीच कसरत अपेक्षीत असते. त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी संबंधीत विवीध काँटेक्स्ट माहिती असावे लागतात. ज्यांना ते जमत नाही त्यांचे मणिशंकर अय्यर होतात.
20 Dec 2017 - 6:59 pm | सुबोध खरे
लेख औचित्यपूर्ण आहे.
पाकिस्तानशी असलेले आपले शत्रुत्व लक्षात घेता डॉ मनमोहन सिंह आणि इतर याना हीच वेळ कशी सापडली ? आणि कसुरी यांच्या ऐवजी श्रीलंका किंवा भूतानचे राजदूत( माजी) आले असते तर असे वाद निर्माण झाले नसते. सुरुवातीला आम्ही गेलोच नाही असे सांगितले आणि नंतर गुजरातबद्दल बोललोच नाही अशी सारवासारव करण्यापेक्षा स्वच्छपणे परराष्ट्र पमंत्रालयाला याची माहिती दिली असती तर अशा कोलांटया मारण्याची गरज पडली नसती.( डॉकलामच्या वेळेस राहुल गांधी असेच चिनी राजदूताने भेटले होते आणि पहले इन्कार बादमे इकरार झालं होतं).
डॉ मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानबरोबर साटे लोटे केले असतील असे कोणीही म्हणणार नाही. अर्थात अशी परिस्थिती श्री मणिशंकर अय्यर यांची नक्कीच नाही. पण यावेळी असे लपून छपून करणे हे नक्कीच संशयाला जागा देणारे ठरते
20 Dec 2017 - 10:56 pm | माहितगार
.
वेळच नाही तारीखही ६ डिसेंबर निवडली, इतरांचे ठिक आहे, राजनैतिक मुत्सद्द्यांकडून असा वेडपट पणा अपेक्षीत नसावा. किंबहुना औचित्य आणि प्रोटोकॉल न उमजणारी मंडळी भारताचे केव्हा तरी प्रतिनिधीत्व करत होति ह्याचे सखेद आश्चर्य वाटते
20 Dec 2017 - 9:19 pm | रमेश आठवले
कंवल सिबल हे कपिल सिबलचे भाऊ आहेत. या ३ तास चाललेल्या भोजन मिटिंग चे वर्णन आलेल्या १६ अतिथींपैकी एकाने केले आहे. त्या प्रमाणे प्रत्येक पाहुण्याने भारत पाक संबंधाविषयी ५ मिनिटे आपले विचार मांडले. फक्त मौनमोहनसिंग त्यांच्या कीर्ती प्रमाणे काही बोलले नाहीत. ते स्वतः, उपराष्ट्रपती, सैन्याचे प्रमुख आणि इतर काही उपस्थित मंडळी यांना ते अधिकारावर असताना सरकारची बरेच गुप्त माहिती विगत झालेली असणार. अशा उच्चभ्रु मंडळींनी या मिटिंग ची पूर्व सूचना सध्याच्या सरकारला देणे योग्य होते. तशी सूचना दिली गेली नाही. भोजनाच्या दुसर्याच दिवशी त्यांच्या यजमानाने प्रधान मंत्र्याविरुद्ध अनुचित भाषा वापरली आणि त्यानन्तर काँग्रेस प्रवक्त्याने अशी मिटिंग झालीच नव्हती असे खोटे विधान केले आणि संशयाला जागा निर्माण केली. त्यामुळे हे प्रकरण पेटले.
20 Dec 2017 - 9:56 pm | रामदास२९
कंवल सिबल हे कपिल सिबलच्या भाऊ या नात्यापेक्षा भारतीय विदेश सेवेतील माजी अधिकारी आहेत. वाजपेयी सरकार च्या काळात त्यान्च्यावर मोठी जबाबदारी होती.
24 Dec 2017 - 11:45 am | मदनबाण
मण्या वाय झेड आहे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
27 Dec 2017 - 4:34 pm | तुडतुडी
छान परखड लेख