द शो मस्ट गो ऑन... - विशेषांक

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in लेखमाला
25 Jan 2017 - 12:24 pm

*/

नमस्कार मंडळी!

गेले काही दिवस तुमच्या समोर मांडलेल्या गोष्टीच्या ह्या खेळाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.. प्रेम दिलंत..! गोष्टची संपूर्ण टीम ह्या कौतुकाने भरवून गेलेली आहे. "गोष्ट.." करायची ठरली तेव्हा हा प्रयोग इतका रंगेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. सुरवात झाली तेव्हा ह्या उपक्रमाचे स्वरूप लेखमालेचे, पण आवाका एका अंकाचा असावा असा आमचा विचार होता. कारण एकाच दिवशी २५-३० लेख आणल्याने वाचकांना वेळ आणि लेखकांना न्याय मिळत नाही. शिवाय मिसळपाव यूट्यूब चॅनलसुद्धा ह्या निमित्ताने आणून, ह्या साहित्यप्रवासाला अजून एक मिती मिळावी अशी मनापासून इच्छा होती.

पडद्यावर गोष्ट सादर होताना अनेक दिग्गजांच्या हात त्यांवरून फिरत असतो. ह्यातल्या कुणाची एखादी तरी मुलाखत मिळावी अशी आमची इच्छा होती. पण लाखोंच्या गर्दीसमोर कार्यक्रम करणारे कलाकार, मिसळपावसारख्या डिजीटल फोरमला प्रतिसाद देतील का अशी शंकाही मनात होती. ही धाकधूक मनात घेऊनच आम्ही सेलेब्रेटींना संपर्क करायला सुरुवात केली. पण आता "गोष्ट.."चा समारोप करताना हे लक्षात येतंय की आपण डिजीटल फोरम आहोत हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. इथे आलेले साहित्य कायमस्वरूपी, कुणालाही, कुठेही उपलब्ध आहे. आंतरजालावर शोध घेऊन सहज कुणीही आपल्या मिसळपावपर्यंत पोहचू शकतो. पर्यायाने हे कलाकारही आपल्यापर्यंत येऊ शकतात.

आम्हाला इतके चांगले कलाकार लाभतील हे ही आम्हाला कधीच वाटलं नाही. मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या अभिनेत्री पासून ते वेबसिरीजवर काम करणार्‍या नव्या पिढीपर्यंत बदलत गेलेले प्रश्न, बदलत गेलेले संघर्ष, बदलेल्या यशाच्या व्याख्या आपसूक समोर येत गेल्या. "शो बिझ" मध्ये गेल्या दोन पिढ्यांची बदलत गेलेली मानसिकता ह्या मुळे आम्हाला "गोष्ट.." च्या निमित्ताने तुमच्या समोर मांडता आली.

ह्या निमित्ताने अजून एक प्रकर्षाने समोर आलेला मुद्दा म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या साधनांमधून व्यक्त होण्याचा मिपाकरांचा उत्साह! आयफोन, टॅबलेट, डीएसएलआर पासून ते व्यावसायिक कॅमेरापर्यंत सर्व साधनांचा वापर करून मिपाकरांनी मुलाखती, चित्रफिती यूट्यूबसाठी दिल्या. आयमुव्ही, पॉवर पॉइंट, मूव्ही मेकर अशा किती तरी वेगवेगळ्या मार्गांनी आपण ह्या उपक्रमात व्यक्त झालो आहोत.

ह्या मायानगरीत मूळ कथेच्या दर्जा इतकंच तिच्या सादरीकरणालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच "गोष्ट.."ची अनुक्रमणिका सुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरूपात यावी असा आमचा प्रयत्न होता. तो मिपाकरांना आवडला ह्याचा आनंद आहे.

हे सगळं करताना आमची मैत्री सुद्धा अगदी तावून सुलाखून निघाली. प्रेमाचं भरतं येण्यापासून ते कडांकडं भांडणापर्यंत सर्व काही हिंदोळ्यावर आमची मैत्री झुलली! अर्थात ह्या प्रवासात आमच्या सोबत अनेक जण लाभले ज्यांचे आभार मानले तर खाजगीत जोडे पडतील पण तरीही त्यांचा उल्लेख आवश्यक आहे. रेवाक्का आणि चतुरंगदा ह्यांच्या मदतीशिवाय अनेक गोष्टी शक्यच नव्हत्या. ह्यांच्या एका हाकेवर जुने मिपाकर ह्या उपक्रमात लिहायला आले. खरं तर ह्या दोघांच्या भरवशावरच आम्ही जुन्या मिपाकरांना आणण्याचा घाट घातला. नव्या जुन्या मिपाकर लेखकांचे आभार मानू तितके कमी आहेत. त्यांच्याशिवाय उपक्रमाला यश मिळालं नसतं. सुधांशुनूलकर काकांना आम्ही हक्काने हाक मारायचो आणि अंकचावडीतच काय अगदी ईमेल वर पण त्यांनी मुशो करुन दिलं लेखांचं. ते असले की कसं आम्ही रिलॅक्स !

एस भाऊंचे तर आभारही कसे मानावेत हा प्रश्नच आहे. आमच्या उपक्रमाला आवाहनाच्याही आधीपासून त्यांनी भक्कम साथ दिली आहे. त्यांच्या लेखाच्या शुभशकुनानेच उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्या कौटुंबिक कामात व्यस्त असूनही त्यांनी अक्षरशः एका दिवसात हे सुंदर स्केच मुखपृष्ठासाठी तयार करून दिले.

वेल्ला तर आम्ही नेहमी म्हणतो त्याप्रमाणे देवाची देणगी आहे. हा मनुष्य विचारू त्याच्या दुप्पट काम करून देतो, मागू त्याच्या अर्ध्या वेळेत! तो आमच्या टीमचा इतका मोठा भाग आहे की त्याच्या शिवाय हा उपक्रम होऊच शकला नसता.

आणि अर्थातच नीलकांत-प्रशांत आणि म्हात्रे काका! तुमचे मिपावय किती, मिपाच्या अधिकारांच्या उतरंडीत तुम्ही कुठे येता ह्यावर काही अवलंबून नाही. तुमची काही करण्याची इच्छा असेल तर हे लोक भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील हे नक्की. आम्ही अक्षरशः हजारो प्रश्नांचा भडिमार ह्यांच्यावर केला आणि त्यांनी आमचे सर्व प्रश्न सोडवले, नव्हे त्यातले अनेक पडू दिलेच नाहीत हे आवर्जून सांगावे वाटते.

कशासाठी करायचा हा उपक्रम हे वाटण्याचे अनेक क्षण आले. स्वान्त सुखाय असं उत्तर आम्ही एकमेकींना द्यायचो. आणि ते खरंही होतं. पण त्याचा खरा अर्थ आमच्या उपक्रमाला मूर्त स्वरूप यायला लागलं तसा जाणवायला लागला. आमच्या लेखकांनी, आम्हाला मिळालेल्या मुलाखतींनी आमचं अनुभवविश्व समृद्ध केलं. अनुभवाला कसलीही तोड नाही. त्यामुळे आम्हाला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. रोजच्या साचलेल्या रूटिनमधून निखळ आनंद देणारा बदल मिळाला. स्वान्त सुखायचा हा खरा अर्थ!

अडचणी आल्याच नाहीत असं नाही. वैताग आला नाही असंही नाही. पण त्या प्रत्येक कटु आठवणीला एक सोनेरी किनार देण्याची ताकद आमच्या बरोबर आलेल्यांमध्ये होती. आणि त्यासाठी आम्ही खरोखर कृतज्ञ आहोत.

काही उत्तम लेखक त्यांच्या इतर कामापायी, त्यांच्या मनात असूनही "गोष्ट.." मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. आमचा त्यांना आग्रह आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ठरवलेल्या विषयांवर नक्की लिहा. तुमच्याकडून त्या विषयावर आम्हालाच नाही तर इतर मिपाकरांनाही वाचायला नक्की आवडेल. शेवटी उपक्रम हे एक निमित्त आहे, लिखाणाचा आनंद ही त्यामागची खरी प्रेरणा!

मिपाकरांनी उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. तुमच्या प्रतिसादाशिवाय, आमच्या बरोबर आलेल्या सगळ्यांशिवाय आजचं स्वरूप मिळूच शकलं नसतं. सुरुवात आम्ही दोघींनी केली होती.. लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया...!

या उपक्रमाला आज इथे स्वल्पविराम देऊन, स्टेजवर पडदा पाडण्याची वेळ आली आहे.. मात्र या उपक्रमानिमित्त सुरू झालेलं यू ट्यूब चॅनल, मुलाखतींचं सत्र, तंत्रज्ञान वापरून केलेल्या चित्रफिती हे इथेच थांबू नये अशी आमची इच्छा आहे. इथून पुढे मिपा यूट्यूब चॅनलचा उपयोग अभिवचन, व्हिडिओ आर्टिकल्स, भटकंती अशा अनेक कारणांसाठी व्यक्त होण्यासाठी व्हावा.

द शो मस्ट गो ऑन...

जायच्या आधी , आमच्या "मेकिंग ऑफ गोष्ट..." चा हा छोटासा व्हिडीओ :)

प्रतिक्रिया

घरुन पाहते हा व्हिडिओ. सुरेख उपक्रम झाला!
भाग घेण्याची संधी मिळाली. स्रुजाने लिहिण्यासाठी विषय सुचवला आणि मागे लागून लागून करुन घेतलं त्यासाठी तिचे आभार!

आता पुढला उपक्रम कोणता?

गोष्ट तशी.. टीमचे हार्दिक अभिनंदन.

"गोष्ट तशी छोटी" हा उपक्रम मिपाच्या वाटचालीत एक मैलाचा आणि मानाचा दगड आहे असे आवर्जुन नोंदवतो.

(बाकीचे सगळे मानाचे दगड आणि दिवाळी अंक 'मिपा विशेषांक' या टॅबखाली लवकरच दिसतील अशी आशा व्यक्त करतो.)

पैसा's picture

25 Jan 2017 - 6:20 pm | पैसा

मिपा आणि मिपाकरांसाठी एका चांगल्या मालिकेकरता स्रुजा आणि पिरा यांचे हार्दिक अभिनंदन!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jan 2017 - 7:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

@स्रुजा आणि पिराताई

एवढ्या उत्तम उपक्रमाने नव्या वर्षाची सुरुवात झाली ह्याबद्दल खुप छान वाटलं. हा उपक्रम दरवर्षी व्हायला हवा. अनेक अडथळे आले पण त्यावर तुम्ही उत्तमपणे मात केलीत हे अतिशय कौतुकास्पद आहे. पुढील वर्षी असाचं उत्तम आणि ह्याहुन सरस उपक्रम तुम्ही कराल ह्याची मला खात्री आहे. यंदाच्या गणेशलेखमालेमधे किंवा अजुन उपक्रमांमधेही ह्या नव्या मिपास्वरुपाचा समावेश असेल अशी आशा करतो.

आ.न.
कॅजॅस्पॅ.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 7:49 pm | संदीप डांगे

आता राग आला तरी चालेल पण माझं खरंखुरं मत देतो, तुम्ही लोकांनी हा जो काय प्रकार केलाय ना अजिबात आवडलेला नाही. मी ह्याचा तीव्र निषेध करतो. एवढ्या लवकर का संपवलं...?

मोदक's picture

25 Jan 2017 - 7:55 pm | मोदक

डांगेण्णांशी सहमत.

तुम्ही पेप्सी विरूद्ध कोक किंवा मर्सीडीज विरूद्ध ऑडी अशा जाहिरात युद्धावर एखादी मालिका लिहा. मराठीमध्ये या विषयावर कुठेही काहीही लिहिलेले नाही आणि मी लिहिण्याचा विचार केला होता पण मला त्या क्षेत्राचा थेट अनुभव नाही त्यामुळे पुरेशा अभ्यासाअभावी या जाहिरातयुद्धाची तीव्रता नीट उतरवता येईल का ही शंका आहेच.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 8:21 pm | संदीप डांगे

नक्की प्रयत्न करतो, धन्यवाद!

धर्मराजमुटके's picture

25 Jan 2017 - 8:14 pm | धर्मराजमुटके

अतिशय सुंदर उपक्रम ! आवर्जुन दाद देण्यासारखा आणि दखल घेण्यासारख्या ! पडद्यापुढील आणि खास करुन पडद्यामागील कलाकारांचे विशेष अभिनंदन !
एरवी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विभागलेले सगळे मिपाकर या उपक्रमाबद्दल मात्र एकाच बाजुने असतील अशी खात्री आहे ! जियो ! लगे रहो ! और आने दो !!

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2017 - 8:17 pm | संजय क्षीरसागर

इतका चांगला उपक्रम समर्थपणे राबवल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार्स !

विशाखा राऊत's picture

25 Jan 2017 - 8:40 pm | विशाखा राऊत

@स्रुजा, पिरा आणि समस्त गोष्टची टिम :

तुम्हां सर्वांचे खुप खुप खुप कौतुक.. ह्या उपक्रमामुळे इतक्या मस्त लेखांचा आम्हांला खजिना वाचायला मिळाला. रोज आज कोणती गोष्ट येणार ह्याची वाट बघत असायचे सगळेच.
ह्या उपक्रमाच्या सुरवातीपासुन आलेल्या अनंत अडचणींना तुम्ही दोघींनी खुप पॉसिटिव्हली दुर केले आणि निंदकाचे घर असावे शेजारी म्हणत इतका अप्रतिम उपक्रम साकारलात. आजवर मिपावर आलेल्या विविध लेखमाला, अंक ह्यामध्ये गोष्ट अग्रेसर ठरली हे नक्कीच. लेखांसोबत आलेले व्हिडिओस तर एकदम भन्नाट आयडिया. मिपासाठी खरच ही गोष्ट माईलस्टोन ठरली हेच म्हणावे लागेल आणि ह्यापुढे येणारे उपक्रम हे अशाच माध्यमांचा योग्य वापर करतील. तुम्हां दोघींचे खुप सारे कौतुक..

जा बाई पिरा आता अमेरिकेमध्ये रमशील तरी ;) आणि स्रुजाला उपदेश कमी करावे लागतील.

जबरदस्त उपक्रमाचा तेव्ह्डाच दणदणीत समारोप.
सृुजा, पिरा आणि वेल्लाभट- ऑडियो/ वीडियो खूप खूप आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2017 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम उपक्रम ! मिपाचालीतला केवळ किलोमीटरचा दगड !!

"मेकिंग ऑफ गोष्ट..." चा छोटासा व्हिडीओ पण लै भारी !

रातराणी's picture

26 Jan 2017 - 12:25 am | रातराणी

मस्त मस्त मस्त !!!

उल्का's picture

26 Jan 2017 - 12:27 am | उल्का

ही छोटी गोष्ट मोठी भावली.
मस्तच!
संपूर्ण टीमचे अभिनंदन!

प्रचेतस's picture

26 Jan 2017 - 6:25 pm | प्रचेतस

उत्कृष्ट उपक्रम.
हॅट्स ऑफ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2017 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिरा आणि स्रुजाचं मनापासून अभिनंदन. व्हिडियोतला आवाज बिवाज, गोड बीड, सुंदर बिंदर वाटला. ;)
मिपाकरांनी आपल्या आवाहानाला प्रतिसाद दिला आणि एक उत्तम उपक्रम यशस्वी झाला.

लेख आले का गं ? आले का लेख..., नवीन लेख वरती आणता येईना... हे ऐकतांना हहपुवा आणि भारी वाटलं.
असो, लै कौतुक करायचं नै असं माझं ठरलं आहे. विशेषतः पिराचं तर नैच.

पुन्हा एकदा तहेदिलसे अभिनंदन.....!!!

-दिलीप बिरुटे

इशा१२३'s picture

27 Jan 2017 - 9:18 am | इशा१२३

छान लेखमाला!पुर्ण टिमचे अभिनंदन.

विभावरी's picture

27 Jan 2017 - 9:47 am | विभावरी

छान उपक्रम ,अभिनंदन सगळया टीमचे !!

राही's picture

27 Jan 2017 - 10:40 am | राही

हा उपक्रम सुंदर होता....

उपक्रम अगदी सुंदर पार पडला. मलापण थोडंफार काही करता आलं याचं बरं वाटलं. पुढील उपक्रमांसाठी देखील माझं नाव यादीत असू दे. :)

हा उपक्रम खुप छान होता, अजुन थोडे दिवस चालू राहीला असता तर छान वाटल असतं. खुप काहि नवीन गोष्टी यातुन कळाल्या. ज्ञानात भर घालणारे असे उपक्रम सतत मिपा वर चालु रहावेत ....
तसेच शशक चा येणारा उपक्रम पण अशीच मजा आणेल यात वाद नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2017 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

घरचंच काम होतं, त्यामुळे आभार मानण्याची आवश्यकता नाही.

एनिग्मा's picture

28 Jan 2017 - 4:02 am | एनिग्मा

उपक्रम खुप छान होता. संपूर्ण टिमचे अभिनंदन.

नि३सोलपुरकर's picture

28 Jan 2017 - 10:49 am | नि३सोलपुरकर

छान उपक्रम होता ,
अभिनंदन सगळया टीमचे !!

'गोष्ट.....' उपक्रम अप्रतिम झाला. सुरवातीपासूनच सगळे लेख वाचत होते आणि विडियो बघत होते. त्यामुळे सतिशजींची मुलाखत देखील यात यावी असं खूप वाटत होतं. एस् जीना व्यनि केला आणि स्रुजा ताईने लगेच उत्तर दिलं. अक्षरश: 2 दिवसात सगळं काम झालं. अर्थात सतिशजींनी खूप वेळ आणि presence दिला म्हणून. पण त्यानिमित्ताने जुन्या मिपाकरांची ओळख झाली. या मुलाखतीच्या अनुभवातुन मी देखील खूप शिकले. त्यामुळे हा उपक्रम परत एकदा राबवावा असं मला वाटत. अजून अनेक असे अभिनेते, लेखक, दिगदर्शक आणि असे अनेक कलाकार अनेक क्षेत्रात आहेत; त्यांच्या मुलाखती देखील आपल्याला घेता येतील. अनेक मिपाकर उत्तम लेखक/लेखिका आहेत. हा वेगळा उपक्रम स्वतंत्र पणे follow केल्याने त्यांचं लिखाणही वाचता आलं याचा आनंद आहे.

असेच नवनवीन उपक्रम मिपावर येऊदेत आणि त्यात भाग घेण्याचे भाग्य मिळूदे ही इच्छा.

वेल्लाभट's picture

30 Jan 2017 - 5:26 pm | वेल्लाभट

गोष्ट.... चा प्रवास हा माझ्यासाठी प्रचंड आल्हाददायक प्रवास होता. भरपूर गोष्टी केल्या, भरपूर मजा केली आणि मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याची लज्जत अजूनच वाढली. अर्थात, माझा वाटा खारीचा होता, मुख्य काम तर स्रुजा आणि पिरा करत होत्या. पण अखेर हा संबंधित प्रत्येकाच्या हातभारामुळे यशस्वी झालेला उपक्रम आहे, त्यामुळे मुलाखत घेणार्‍यापासून ते प्रतिसाद देणार्‍यापर्यंत प्रत्येकाला मनापासून धन्यवाद.

आता शतशब्दकथा स्पर्धेचा दणका सुरू झालेला आहेच! मिपा नेहमीप्रमाणेच गजबजतंय, फीलिंग #चर्चातरहोणारच!

सपे-पुणे-३०'s picture

31 Jan 2017 - 4:33 pm | सपे-पुणे-३०

'गोष्ट... ' चा उपक्रम अतिशय छान झाला.
संपूर्ण टीमचे अभिनंदन!!!

खूप मस्त झाला हा उपक्रम..संपूर्ण टीमचे अभिनंदन..रोज वाट बघत होतो नवीन लेखाची..

इडली डोसा's picture

2 Feb 2017 - 4:54 am | इडली डोसा

मस्त झाला आहे उपक्रम... या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी कळत आहेत... व्हिडिओ मुलखती बघायला अजुन वेळ नाही झाला पण लेखांच वाचन सुरु केलं आहे.

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 6:42 pm | अभिजीत अवलिया

उत्तम उपक्रम होता.