गाभा:
कॅशलेस इंडिया - रोकडविरहित व्यवहारांची सध्या खूप चर्चा चालू आहे. वेगवेगळी मोबईल वॉलेट्स प्रचलित होत आहेत. त्यापैकी थेट बॅंकांशी जोडलेला, शासकीय मान्यता असलेला पर्याय म्हणजे यूपिआय (UPI).
यूपिआय अॅप हे वापरायला अतिशय सोपं आहे. जेव्हा याची सुलभता लक्षात येईल तेव्हा याचा वापर खूप वाढेल. पण यूपिआय कसं वापरायचं या बद्दल कमी माहिती आहे; विशेषतः मराठीत.
म्हणून मी माझ्या ब्लॉगवर यूपिआय अॅप कसे वापरावे याबाबत सोप्या शब्दात सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपणही ही सोपी कृती वापरून हे अॅप वापरायला सुरुवात करू शकाल. तरी ब्लॉगला नक्की भेट द्या. तुम्हाला ही ब्लॉगपोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा आहे तेही जरूर सांगा.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-to-use-upi-app.html
प्रतिक्रिया
11 Dec 2016 - 6:05 pm | कंजूस
माहितीसाठी धन्यवाद.
१ )android फोन ब्यान्किंगसाठी सुरक्षित नाहीत ही ओरड आहे.
२) पेमेंट अॅपमध्ये पैसे रिचार्ज करण्यासाठी कंप्यूटर लागेल ना?
३ ) दहापैकी सहा दुकानदारांकडे पैसेखाऊडबडी लागली रे लागली की आम्ही आमचे याप उघडणार आहोत.यापमध्ये पैसे टाकणण्यासाठी रेग्युलर नेटब्यान्किंगही रेडी आहे. यापनेच पैसे द्यायचे असा काही चंग बांधलेला नाही. आजची बातमी - दहा रुपयांची बंडले देऊन कार खरेदी केली एकाने.
तसं पाहिलं तर क्याशलेस डबडी नाहीत म्हणून काहीच अडलेले नाहीत व्यवहार. फक्त पाचशेच्या नोटा लवकर न आल्याने पाकिट जाड होतय शंभरच्या नोटांनी हीच अडचण आहे.
11 Dec 2016 - 6:41 pm | कौशिक लेले
या app मध्ये पैसे भरावे लागत नाहीत. कारण थेट बँकेतूनच पैसे जातात. आणि तुम्हाला आलेले पैसे थेट तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात. त्यामुळेच इतर मोबाईल wallet पेक्षा हे सोपं आहे
11 Dec 2016 - 8:00 pm | कंजूस
नेट बँकिंगच झालं.
बँक अकाउंटशी थेट जोडणारे अॅप शेवटी धोकादायकच ठरेल.त्यापेक्षा बँक>नेट बँकिंग>अॅप रिचार्ज पर्याय चार्जेस लागले तरी सुरक्षित नाही का? उडाले पैसे तरी अॅपमध्ये ठेवलेलेच उडतील.
12 Dec 2016 - 12:13 am | संजय क्षीरसागर
पण MPIN आणि VPA मुळे सिक्युरिटी वाटते
12 Dec 2016 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
"फिंगर प्रिंट + पिन / आधार कार्ड नंबर" या ऑथेंटिकेशनसह नेट बँकिंग, हे सर्वात सोपे व सुरक्षित होईल. असे एक अॅप्स टीव्हीवर पाहिले आहे आणि अजून काही येऊ घातली आहेत.
12 Dec 2016 - 2:21 pm | संजय क्षीरसागर
आधार कार्ड उपयोगी होईल असं नंदन निलकेणींचं मत आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत.
12 Dec 2016 - 3:03 pm | संदीप डांगे
मी जिओ कार्ड घेतलं तेव्हा विक्रेत्याने फक्त फिन्गर प्रिन्ट स्कॅन आणि आधारकार्ड वरुन क्यु आर कोड स्कॅन केला होता. कोणतेही कागदपत्र, फोटो, झेरॉक्स न मागता पाच मिनिटात काम झाले.
बोटाचे ठसे हाच सर्व व्यवहारांचा (पैशाच्याच नव्हे तर सर्व प्रकारच्या शासकिय-खाजगी व्यवहारांचा जिथे ओळख सिद्ध करावी लागते) कणा व्हावा अशी फार पूर्वीपासून म्हणजे आधार आल्यापासूनची इच्छा आहे.
१. पेमेंट करतांना बायोमेट्रीक स्कॅन सारखं एकाच प्रकारचे उपकरण सर्व विक्रेत्यांकडे कम्पलसरी असावे. ज्यात बिल झाले की ठसा देऊन ग्राहकानेच रक्कम टाकायची, परत ठसा देऊन कन्फर्म करुन पे करायची इतकी सिम्पल टू-स्टेप टेक्नॉलॉजी असेल तर सर्व तंत्रसाक्षर-निरक्षरांना सोयीचे जाईल. कार्ड्स, चेक, इत्यादी वापरायची, पासवर्ड-पिन लक्षात ठेवायची गरज पडणार नाही.
२. घरी बसून केल्या जाणार्या ऑनलाईन खरेदीसाठी असे बायोमॅट्रीक स्कॅनर स्वस्तात किंवा फुकटात उपलब्ध झाले पाहिजे. माझ्या फोन (किंमत १० हजार) मधे फिन्गरप्रिन्ट स्कॅनर आहे व त्यात माझ्या बोटांचे ठसे ओळखण्याची सोय आहे. त्या द्वारे मी ऑनलाईन खरेदी करु शकलो तर खूपच सोयीचे होऊ शकते. त्यामुळे खरेदीसाठी कराव्या लागणार्या द्रविडी प्राणायमाची गरज पडणार नाही. पासवर्ड-पिन-ओटीपी लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, ओटीपी जनरेट होईपर्यंतचा वेळ जाणार नाही.
बॅन्किण्ग तंत्रज्ञानाने आता फार वेगाने प्रचंड पुढच्या जनरेशनच्या झेपा घेणे अतिआवश्यक आहे. तसेच हे तंत्रज्ञान सुटसुटीत (सिम्प्लिस्टीक) व वेगाने प्रचार होऊ शकणारे असे असले पाहिजे.
12 Dec 2016 - 5:12 pm | कंजूस
कार्डातला नंबर RFID असला पाहिजे. एटिमकार्डात असतो तसा.
11 Dec 2016 - 6:53 pm | संजय क्षीरसागर
कालच BOM UPI अॅक्टीवेट केलं.
या IMPS ला इंटरनेटशिवाय काहीही खर्च येणार नाहीये का?
11 Dec 2016 - 7:12 pm | कौशिक लेले
धन्यवाद. जमलं तर तुमच्या मित्रनातेवाईकांशी शेअर करा ब्लॉगपोस्ट.
चार्जेस सध्या तरी काही दिसत नाहीयेत.
11 Dec 2016 - 10:41 pm | लालगरूड
bank of maharashtra चं mahamobile upi app आहे का?
12 Dec 2016 - 12:14 am | संजय क्षीरसागर
सोपंय . बघा करून.
11 Dec 2016 - 7:12 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे आहे ना? ज्याला पैसे पाठवायचे आहेत व जो पाठवणार आहे त्यांच्याकडे.
आजच माझ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून ११५ रु डिडक्ट झाल्याचा मेसेज आला.मि कोणतेही ट्रॅनझॅक्शन नकरता,काय करावे? कस्टमर केअरला फोन लावावल्यास ,ते काय मदत देऊ शकतील?
11 Dec 2016 - 7:37 pm | कौशिक लेले
हो, दोघांकडेही app हवं.app शिवाय व्हर्च्युअल ऍड्रेस तयार करायचा दुसरा मार्ग असू शकतो, पण अजून मला दिसला नाही.
तुमच्या समस्येसाठी बँकेशी नक्की संपर्क साधा.
12 Dec 2016 - 2:50 pm | स्वीट टॉकर
ट. फि.
तुम्ही खात्यात भरलेला एखादा चेक जर बाउन्स झाला असेल तर त्याचा चार्ज साधारण एवढा असतो. अर्थात त्याच्याआधी तुम्हाला एस एम एस ने ही बातमी कळवणे बंँकेचे कर्तव्य आहे.
12 Dec 2016 - 11:23 pm | कुंदन
लवकर च १५ लाख जमा झाल्याचाही मेसेज येवो तुम्हाला.
13 Dec 2016 - 11:47 am | मोग्याम्बो
दोघांकडे UPI App असणे गरजेचे नाही.
तुम्ही आधार कार्ड किंवा खाते नंबर आणि IFSC कोड वापरून सुद्धा UPI द्वारे पैसे पाठवू शकता. दुसऱ्याच्या खात्यात काही मिनिटांमध्ये पैसे जमा होतात.
13 Dec 2016 - 11:49 am | मोग्याम्बो
११५ रु हा मेन्टेनन्स चार्ज आहे.
11 Dec 2016 - 7:40 pm | अभिजित - १
दर वेळेला लॉगिन करताना SMS चार्जे पडणार ? प्रत्येक पेमेंट ला पण SMS चार्जे ?
11 Dec 2016 - 8:04 pm | कौशिक लेले
फक्त सुरुवातीला. पेमेंट च्या वेळी नाही.
11 Dec 2016 - 7:40 pm | अभिजित - १
दर वेळेला लॉगिन करताना SMS चार्जे पडणार ? प्रत्येक पेमेंट ला पण SMS चार्जे ?
11 Dec 2016 - 8:08 pm | कौशिक लेले
अकाउंट सेटअप ही एकदाच करायची स्टेप आहे. तेव्हाच एसेमेस चार्ज.
नंतर पटापट पेमेंट अगदी सोप्या रीतीने
11 Dec 2016 - 9:07 pm | सुखीमाणूस
छान समजावले आहे
11 Dec 2016 - 10:16 pm | कौशिक लेले
धन्यवाद. जमलं तर तुमच्या मित्र-नातेवाईकांशी शेअर करा ही ब्लॉगपोस्ट.
-कौशिक
12 Dec 2016 - 9:16 am | सुखीमाणूस
खूप सोपे आहे
27 Dec 2016 - 3:09 pm | कौशिक लेले
धन्यवाद.
12 Dec 2016 - 8:25 am | लालगरूड
BOM चे UPI घेतले.mobile banking पेक्षा खूप सुटसुटीत आहे. user interface मस्त आहे
12 Dec 2016 - 8:46 am | संजय क्षीरसागर
असा तौलनिक प्रकाश इथले कुणी जाणकार पाडू शकतील काय ?
12 Dec 2016 - 10:33 am | सुबोध खरे
माझ्याकडे UPI आहे त्याचा VPA पण आहे पण देणाऱ्या माणसाकडे UPI असणे आवश्यक आहे. पण त्यासाठी कोणताच आकार अजून तरी लागलेला/लावलेला नाही.
मी मोबाईल बँकिंग करतो, payTM ,chillr पण आहे.
नेट बँकिंग आहे, तीन डेबिट कार्डे आणि एक क्रेडिट कार्ड आहे.
गडबड अशी आहे कि प्रत्येक प्रणालीचा पासवर्ड एक ठेवला तरीही प्रत्येक पासवर्डची वैधता वेगवेगळ्या कालावधीची आहे. यामुळे ते बदलल्यावर लक्षात कसे ठेवावे हे समजत नाही. याला कोणी उत्तर देऊ शकेल काय? पासवर्ड कुठेही लिखित स्वरूपात किंवा मोबाईल वर ठेवणे मला धोक्याचे वाटत आहे.
एन के जि एस बी बँकेचा पासवर्ड विसरला आहे तर त्यांच्या ग्राहक सेवा प्रणालीत बँकेत जाऊन अर्ज करा ७ दिवसांनी तुमचा पासवर्ड बँकेत पाठवला जाईल हे उत्तर आले. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला कि अहो तुमचे कर्मचारी अगोदरच कामाच्या ओझ्याने डबघाईला आलेले आहेत त्यांना अजून कामाला लावण्यापेक्षा तुम्हीच माझ्या मेल किंवा मोबाईल वर तो पाठवला तर बरे होईल पण ती मुलगी बहुधा कर्णबधिर किंवा नुसतीच बधिर असावी . तिच्या डोक्यात काही शिरेना. शेवटी मी नाद सोडला.
12 Dec 2016 - 11:45 am | माहितगार
कुणिही पासवर्ड मागवून गैर उपयोग होऊ नये म्हणून, कस्टमर रिक्वेस्ट आली पाहीजे हे बरोबर आहे. अर्थात ग्राहकाने अशी रिक्वेस्ट करणे आणि पासवर्ड उपलब्धतेचे अधिक वेगवान मार्ग आजच्या काळात उपलब्ध असू शकतात. अशा विषयांवर ब्रँच लेव्हलला काही बोलून उपयोग होत नाही त्यांच्या अधिकारांना मर्यादा असतात.
मोबाईल बँकींग अडचणी बाबत मलाही एका नॅशनलाइज्ड बँकेच्या शाखेत मला अडचण आली म्हणून क्षेत्रीय कार्यालच्या आयटी अधिकार्यांना भेट दिली त्यांची माहिती घेऊन पुन्हा मूळ ब्रँच कडे जाणे आले आणि मूळ ब्रँचच्या लोकांना माझी अडचण आणि क्षेत्रिय कार्यालयाने केलेली सुचवणी असे सारेच डोक्यावरून गेले. असो.
12 Dec 2016 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक पासवर्डची वैधता वेगवेगळ्या कालावधीची आहे. यामुळे ते बदलल्यावर लक्षात कसे ठेवावे हे समजत नाही. याला कोणी उत्तर देऊ शकेल काय?सर्वात कमी मुदतीचा पासवर्ड बदलताना, त्याचवेळी सगळेच पासवर्ड बदला.
12 Dec 2016 - 4:23 pm | अप्पा जोगळेकर
पासवर्ड म्हणजे सहसा एखाद्या वाक्याची इनिशिअल्स असावीत असा संकेत आहे.
उदा.
I will not watch movies more than 3 times @xxx theater. या वाक्याच्या इनिशिअल्स पासून
हा Iwnwmmt3t@xt पासवर्ड बनेल. आता हा ३ क्रमाक्र्माने ४,५,६ असा कितीही वेळा बदला वाक्य तसेच ठेवून.
हे केवळ एक उदाहरण झाले.
पासवर्ड विसरायला होते. वाक्य सहसा विसरत नाही.
12 Dec 2016 - 4:29 pm | संदीप डांगे
थोडं स्पष्टीकरणः काही ठिकाणी आधीच्या इमिजिएट पासवर्डशी साधर्म्य साधणारा नवीन पासवर्ड स्विकारला जात नाही.
12 Dec 2016 - 4:32 pm | अप्पा जोगळेकर
हो. म्हणून ३-४ वेगवेगळे पासवर्ड कायम तयार ठेवावेत. वेळ पडल्यास एखादे स्पेशल कॅरेक्टर वगैरे चेंज करावे.
पासवर्ड लक्षात ठेवणे हे सरावाचे काम आहे. घराचा पत्ता लक्षात राहतो तसेच.
यापलीकडे काही नाही.
12 Dec 2016 - 4:52 pm | संदीप डांगे
तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाच पासवर्ड्स चा एक कायम्स्वरुपी सेट ठेवावा असे मत मी आधीच कुठेतरी दिले आहे.
काही लोकांची समस्या अशी असते की वरचेवर वापरात नसल्याने (सरावाचा अभाव) एखादा पासवर्ड विसरायला होतो. अमुक अकाउंटला नेमका कोणता पासवर्ड आहे हे लक्षात राहत नाही. तो कुठे लिहूनही ठेवलेला नसतो, त्यामुळे नवीन पासवर्ड जनरेट करावा लागतो. जनरेट करण्याची पद्धत किचकट असेल, वेळखाऊ असेल तर त्रासदायक ठरते, बहुतेक खरेसाहेबांचा हाच मुद्दा असावा. पटकन पासवर्ड जनरेट करण्याची सोय बॅन्कांनी उपलब्ध करुन दिली पाहिजे. मला माझ्या बॅन्केतर्फे अशी सुविधा आहे, अवघा पाच मिनिटात नवा पासवर्ड तयार होऊन अॅक्सेस मिळतं. छोट्या बॅन्कांना इतकं पुढारलेलं तंत्रज्ञान परवडत नसावं.
त्यापेक्षा कोणत्याही एटीएम केंद्रावर विसरलेला पासवर्ड बदलण्याची सुविधा बायोमेट्रीक स्कॅनरद्वारे होऊ शकते. ज्यात बोटाचे ठसे आधारकार्डाशी जुळवून अकाउंट पासवर्ड बदलता येतील.
12 Dec 2016 - 12:27 pm | कंजूस
ब्लॅागवर कॅामेंट दिली आहे.
27 Dec 2016 - 3:10 pm | कौशिक लेले
धन्यवाद.
12 Dec 2016 - 2:42 pm | स्वीट टॉकर
स्क्रीनशॉट्समुळे समजायला अतिशय सोपं झालं आहे.
मात्र समोरच्याकडे देखील यू पी आय पाहिजेच. प्रॅक्टिकली आता असं झालं आहे की प्रत्येकाने चार ऍप्स ठेवायला हवेत म्हणजे एक तरी कॉमन फॅक्टर मिळेल. हळुहळु survival of the fittest या नियमानुसार थोडेसेच लोकप्रिय होतील आणि स्थिती सुधारेल. तोपर्यंत खरेसाहेब म्हणतात त्याप्रमाणे कित्येक पासवर्ड्स चा हिशोब कसा ठेवायचा हा एक प्रश्नच आहे.
12 Dec 2016 - 3:29 pm | पैसा
मग साधे मोबाईल बँकिंग अॅप बरे ना! त्यात फक्त समोरच्याचे IFSC आणि MMID/Account number पुरेसे असते. फ्लिपकार्ट्/अमेझॉनसारख्या साईटवरील ऑनलाईन खरेदी वगळता इतर सर्व कामे या साध्या मोबाईल अॅपमधेही होतात. शिवाय IMPS enabled banks ची संख्या यू पी आय enabled पेक्षा बरीच जास्त आहे.
12 Dec 2016 - 5:21 pm | संजय क्षीरसागर
मात्र समोरच्याकडे देखील यू पी आय पाहिजेच
बरोबरे ! पण पेमंट करतांना IFSC + A/C No. हा पर्याये आणि मुख्य म्हणजे फ्री आहे !
12 Dec 2016 - 4:05 pm | नागेश कुलकर्णी
SBI Pay मध्ये VPA आणी अकाउंट नो. + IFSC असे दोन्ही ऑप्सन आहेत.
12 Dec 2016 - 10:13 pm | बोका-ए-आझम
Phone Pe असं अजून एक चांगलं app आहे. पण UPI द्वारे पैसे पाठवताना समोरच्याकडे UPI हवं अशी अजिबात गरज नाही. तुम्ही जर VPA वापरत असाल तर ठीक आहे, नाहीतर आधार कार्ड जर account ला link केलं असेल तर आधार नंबर वापरूनही पैसे transfer करता येतात. IFSC आणि Bank account वापरून तर हे होतंच. Phone Pe मध्ये तुम्ही ज्यांना नेहमी पैसे पाठवणार असाल अशा लोकांची यादी बनवता येते. म्हणजे दर वेळी account number आणि IFSC बघावा लागत नाही. स्वतःच्याच दुस-या अकाउंटमध्येही पैसे असेच पाठवू शकता.
27 Dec 2016 - 3:21 pm | पुंबा
बोकाभौ, माझ्या मते फोनपे वगैरे अॅप्स वापरण्यापेक्षा कुठल्याही बँकेचे अधिकॄत अॅप वापरावे. कारण एच डी एफ सी सारख्या बँकेचे security infrastructure अतिशय robust आहे.
27 Dec 2016 - 3:37 pm | पैसा
कोणत्याही बँकेचे अधिकृत अॅप वापरणे उत्तम. आपल्या खात्याची माहिती थर्ड पार्टीकडे जाण्याची शक्यता नाहिशी होते. जिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल या मोबाईल कंपन्यांची ई वॉलेट्स आहेत तसेच फोन पे बहुतेक फ्लिपकार्टचे आणि फ्रीचार्ज हे स्नॅपडीलचे ई-वॉलेट आहे. पण यातले कोणतेही अॅप किंवा पेटीएम सुद्धा वापरण्याच्या बाबतीत मी कन्व्हिन्स्ड नाही.
29 Dec 2016 - 3:24 pm | रॉजरमूर
फोन पे yes बँकेचे आहे .
29 Dec 2016 - 3:59 pm | पैसा
https://www.phonepe.com/en/about_us.html इथे बघा. मालक फ्लिपकार्टचेच लोक आहेत. येस बँकेने त्याना सर्व्हिस पुरवली आहे. तशीच फ्री चार्ज वाल्याना पण दिली आहे.
29 Dec 2016 - 5:30 pm | हतोळकरांचा प्रसाद
यावर थोडा प्रकाश टाकाल का (म्हणजे तुमच्या मते काय पोटेन्शिअल प्रॉब्लेम्स आहेत असं)?
29 Dec 2016 - 6:16 pm | पैसा
खरे म्हणजे घाबरायचे कारण नाही कारण आता प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनला ओटीपी असतोच. त्यामुळे सहजासहजी पासवर्ड चोरणे वगैरे प्रकार शक्य नाहीत. पण काही कारणे आहेत.
१) पेटीएम मुख्यतः चिनी मालकीचे आहे. आणि त्यातून जमा होणारे उत्पन्न शेवट चीनमधे जाणार आहे
२) आपल्या बँक खात्याची माहिती थर्ड पार्टीकडे जाणे मला सुरक्षित वाटत नाही. काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय, स्टेट बँक वगैरेंचा मोठा डेटा चोरीला गेला होता.
३) आपल्या बँकेचे अधिकृत अॅप पुरेसे असताना इतर खाजगी प्रोव्हायडर्सकडे जाऊ नये असे वाटते. याला अर्थातच मी एक बँकर असणेही कारण आहे. या अॅपमधले टॉप अप केलेले फंड्स पेटीएमकडे वापर होईपर्यंत विनाकारण आणि विनाव्याज पडून राहतील. बँकेचे अधिकृत अॅप वापरले तर ही शक्यता रहाणार नाही.
आताच फोन पे चे अॅप पाहिले. ते युपीआय आधारित आहे आणि त्यात टॉप अप फंड्स ठेवावे लागत नाहीत. असे एखादे अॅप असेल तर एक वेळ चालू शकेल. मात्र ते जर मी अॅक्टिव्हेट केले तर त्याला जोडलेल्या बँक खात्यात ४/५ हजारावर बॅलन्स रहाणार नाही याची मी काळजी घेईन.
29 Dec 2016 - 9:15 pm | हतोळकरांचा प्रसाद
पेटीएम चिनी मालकीची आहे असं म्हणणं शेखर शर्मांवर अन्याय ठरेल, अलिबाबाची ४० टक्के गुंतवणूक आहे. पण तरीही चीनच्या सगळ्याच गोष्टींना सरसकट विरोध असेल तर तुमचे म्हणणे योग्य आहे (तोच न्याय स्नॅपडीलला पण लागू होतो). तुम्ही रिचार्ज डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून पेटीएम रिचार्ज करता का? म्हणजे आपली बँक खात्याची कोणती माहिती थर्ड पार्टीकडे जाईल हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी रिचार्जसाठी इंटरनेट बँकिंग वापरतो त्यामुळे पेटीएमकडे माझा कुठलाही बँकिंग डेटा जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्या बँकेचे युपीआय वापरावे असे माझेही मत आहे पण दुर्दैवाने मर्चन्ट्सपर्यंत युपीआय अजून जास्त पोहोचलेलं नाही त्यामुळे मर्यादा येतात. कमी बॅलन्स ठेवण्याचा प्रकार मलाही योग्य वाटतो, तो मी सतत वापरायच्या डेबिट कार्डबाबत करतो.
29 Dec 2016 - 9:47 pm | पैसा
मी पेटीएम वापरत नाही, mobile recharge वा अ न्य payments करता साधं mobile banking app पुरं आहे. upi पण गरज नाही.
13 Dec 2016 - 12:31 pm | प्रकाश घाटपांडे
जुन्या अँड्रॉईड व्हरजन वर युपीआय अॅप चालत नाहीत.my android version is 4.0.4 ice cream sandwich.
27 Dec 2016 - 3:17 pm | पुंबा
यूएसएसडी वापरून देखील यू पी आय द्वारे पैसे पाठवणे शक्य आहे, दुर्दैवाने, कॅशलेस, ई-बँकींग वगैरे म्हटलं की लोक ९५ करोड लोक इंटरनेट वापरत नाहीत वगैरे गोष्टी सुरू करतात. साध्या मोबाइलवरूनदेखील पैसे पाठवता येऊ शकतात ही माहिती सामान्य लोकांपर्यंत (ज्यांना नेटचा अॅक्सेस अजून नाही) पोचवणे हे मात्र करत नाहीत. अजून एक अपडेट म्हणजे, केवळ आधार कार्डावर आधारीत बँकींग अॅप्स बनवायला सरकारने परवानगी दिली आहे.
27 Dec 2016 - 3:26 pm | वरुण मोहिते
कोटक महिंद्रा बँक आघाडीवर आहे . कोना कोना कॅश फ्री अँप्लिकेशन द्व्यारे सुविधा वापरून पहा .
27 Dec 2016 - 4:09 pm | संदीप डांगे
सहमत. कोटकने बण्डल दिलंय भरपूर सेवांचं. पाहिजे त्या माध्यमातून पैसे द्या किंवा घ्या. तेही सुटसुटीत.
6 Jan 2017 - 11:22 am | पुंबा
धारावीतून थेट रिपोर्ताज
6 Jan 2017 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा !
स्वार्थी हितसंबंधांचे स्वमतांधतेने रक्षण करत काही नेते विरोधाच्या बोंबा मारत राहतील आणि त्यांनी गवार, अनपढ, टेक्नॉलॉजी शिकायला नालायक, इत्यादी विशेषणांनी नावाजलेले लोक शिकून शहाणे होऊन पुढे गेलेले त्यांना समजेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल !
6 Jan 2017 - 4:13 pm | संदीप डांगे
भीम अॅप वापरण्यापूर्वी हे जरूर वाचा.
मोबाईल अॅप डेवलपमेंट टेक्नॉलॉजीमधे काम करणार्या मिपासदस्यांनी कृपया सदर माहितीची खातरजमा करावी.
समीप अगरवाल नामक डेवलपरने खालील माहिती त्याच्या फेसबुकपोस्टवर शेअर केली आहे.
https://www.facebook.com/sameep.agarwal/posts/10210545277282445
The following post is not to malign or shame the Government or any agency, but to make them aware of the risks in the cyber security domain.
I decided to install BHIM app for online transactions on my android device, but as my nature is to test the things for safety before I deploy them or recommend others.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp&hl=en
Here are the facts and findings that I came across:
1. The App is not written in Native code, not much of an issue if the code is generated by any of the popular RAD IDE and tweaked for security.
2. Crypto is False infact non-existent.
3. Obfuscation of the code is not present, ideally it should have been done using something like ProGuard.
4. A hell lot of commented code is still lying unattended inside the files; bloating the size and also increasing risks.
5. Broadcast receiver is not protected and shared with other Apps, could lead to data leak.
Some interesting finding:
Email address found: kananiparth592@gmail.com
The person is asking for donations and has embedded the Paypal donation link.
Same person has been selling Internet plans on his Google+ page: https://plus.google.com/104133339266698489804
Will reveal more as I explorer in depth.