रायगडची प्रसिद्ध पोपटी
कुकरमध्ये १ किलो वालाच्या गावठी शेंगा + मीठ + मसाला + ओवा + अंडी + बटाटा + रताळी + चिकन + कांदे मिक्स करणे.
यामध्ये पाणी मुळीच टाकू नये, सगळे पदार्थ वाफेवर शिजतात.
गॅसवर ३ शिट्ट्या द्याव्या.
हा पदार्थ गरम गरम खायचा. सॉलीड, जबरदस्त टेस्टी लागतो. तुम्हाला नक्की आवडेल.
मला तुमचे अनुभव जरूर सांगा. माझ्या तोंडाला लिहितानाच पाणी सुटले आहे.
हा पदार्थ गावामध्ये मडक्यामध्ये शिजवतात. शहरामध्ये मडके मिळणार नाही म्हणून कुकर वापरावा.
AJIT THAKUR
a1april@rediffmail.com
प्रतिक्रिया
22 Jan 2009 - 5:46 pm | ब्रिटिश
बाला,
http://www.misalpav.com/node/1312
ह्याच्यावर जा,सोप हाय.
परत टाक मराटीत.
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
22 Jan 2009 - 6:06 pm | A1April
aagarya me pan aagari aahe........jara madat kar na.......
22 Jan 2009 - 7:52 pm | ब्रिटिश
आनकी मदत कोडची करु, जल्ला हात धरुन शीकवू ?
सांगतय तीत जा न बग
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
2 Feb 2009 - 10:00 pm | नरेश_
नसन झाल॑ तर बरा हाय, आमाला हालदीला यवालाच लागल, वडे-मटान [ न वालाच्या उकरलेल्या शे॑गा ] खावाला.
मी उम्बयशि येताना यक कार्टर पन आणतय. त आम॑त्रनाची वाट बघतय.
-- बाला [ dr.soshte@gmail.com ]
2 Feb 2009 - 7:11 pm | नरेश_
मिथुन दादुस, तू कुठूनशी बोलतस र॑?
जल्ला तू बोलवतस माला, क मी येव ते पन सा॑ग.
आमच्याकर॑ पन [ ना॑गोठन्या ] वालाच्या शे॑गा चिक्कार आल्यान.
तू क॑दी येतस त लिवून कलव. आपन मस्त पोपटी करू न॑ मज्या करू.
येताना पे॑ढा बूच पन आन. आनशीन न॑ ?
उत्तर देने.
तुजा मित्र बाला
< dr.soshte@gmail.com >
22 Jan 2009 - 6:09 pm | दशानन
जबरदस्त !!!
काय भाषा आहे.. काय अलंकार आहेत !!
बाय द वे ही भाषा कुठली ??
संस्कृत तर नाही आहे... पाली अथवा मैथली आहे का ?
की एखादी प्राचीन गुप्त झालेली भाषा आहे ??
;)
* आम्हाला मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाय... जेव्हा आम्ही मराठी संकेतस्थळावर असतो !
22 Jan 2009 - 7:56 pm | अवलिया
की एखादी प्राचीन गुप्त झालेली भाषा आहे ??
नाही ही अजुन ५-२५ वर्षांनी निदान महाराष्ट्रातुन लुप्त होणा-या भाषेची लिपी वापरलेली मराठी आहे
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 8:29 am | शाहरुख
माफ करा जैन भाऊ, पण मराठीचा अभिमान म्हणजे इतर भाषेची अनाठायी अवहेलना नव्हे असे आपणास वाटत नाही काय ??
अवांतर :- इथे मराठीतच लिहीले पाहिजे यावर दुमत नाही
22 Jan 2009 - 8:01 pm | सुनील
रायगडची प्रसिद्ध पोपटी
कुकरमध्ये १ किलो वालाच्या गावठी शेंगा + मीठ + मसाला + ओवा + अंडी + बटाटा + रताळी + चिकन + कांदे मिक्स करणे.
यामध्ये पाणी मुळीच टाकू नये, सगळे पदार्थ वाफेवर शिजतात.
गॅसवर ३ शिट्ट्या द्याव्या.
हा पदार्थ गरम गरम खायचा. सॉलीड, जबरदस्त टेस्टी लागतो. तुम्हाला नक्की आवडेल.
मला तुमचे अनुभव जरूर सांगा. माझ्या तोंडाला लिहितानाच पाणी सुटले आहे.
हा पदार्थ गावामध्ये मडक्यामध्ये शिजवतात. शहरामध्ये मडके मिळणार नाही म्हणून कुकर वापरावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 8:08 pm | ब्रिटिश टिंग्या
परंतु, काही ठिकाणी केवळ लिप्यंतर न होता भाषांतर अन् अवांतरही झाले आहे. (ह. घेणे)
- टिंग्या ;)
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
22 Jan 2009 - 8:11 pm | सुनील
त्याचं काय आहे, आयटम शब्द ऐकला की मला भलतेच काही तरी आठवते, म्हणून साधा सोपा "पदार्थ" हा शब्द वापरला!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 8:13 pm | दशानन
=))
23 Jan 2009 - 9:37 am | A1April
SUNILBHAU .......thank u very much..........tumhi perfect marathimadhe lihile aahe.......ajit
22 Jan 2009 - 10:56 pm | विसोबा खेचर
कृपया मराठीत लिहा..
तात्या.
23 Jan 2009 - 11:03 am | शाहरुख
एक शंका - जर फक्त मराठीमधेच लिहायचे असेल तर "लिहिण्याची पध्दत - इंग्रजी" हा पर्याय काढुन टाकावा का ?
23 Jan 2009 - 10:41 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो अभ्यासपूर्ण प्रतिसादांमधे कधी कधी इंग्रजी शब्द लिहावे लागतात ना! नाहीतर ते लेखन अभ्यासपूर्ण वाटत नाही ना.
उदा. ' *** अशा प्रकारचे निरीक्षण जगप्रसिद्ध quantum physics (मराठी शब्द??) वैज्ञानिक श्री. क्ष यानी नोंदवलेलं आहे'
आता पहा इंग्रजी लिपी लिहायची सोय नसती तर असे अभ्यासपूर्ण मत नोंदवता येईल का?
पुण्याचे पेशवे
Since 1984
24 Jan 2009 - 9:35 am | शाहरुख
मी इंग्रजी लिपीची (माझ्यामते इंग्रजी ही लिपी नाही..इंग्रजी भाषा लॅटिन ही लिपी वापरते) सोय का काढत नाही असे विचारले..नाईलाज झाल्यास देवनागरी लिपीत "क्वांटम फिजिक्स" लिहुन अभ्यासपूर्ण मत नोंदवता येईल की :-)
बाकी नवीन असल्याने ही अवांतरे माफ कराल अशी आशा आहे. ;-)
अति अवांतर :- तुमचे "सिन्स १९८४" आवडले..अफलातुन कल्पना आहे.
25 Jan 2009 - 1:36 am | घाटावरचे भट
>>quantum physics (मराठी शब्द??)
पुंजभौतिकी किंवा पुंजभौतिकशास्त्र.
25 Jan 2009 - 1:41 am | llपुण्याचे पेशवेll
ते माहीती आहे रे भटा. मी पण अधून मधून उपक्रमावर जातो.
ती वाक्ये मी अभ्यासपूर्ण प्रतिसादाचे उदाहरण म्हणून वापरली रे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
23 Jan 2009 - 11:16 am | सहज
काही प्रमाण सांगा की राव. कुठला खास मसाला?
चिकन मॅरीनेशन का तसेच? चिकनशिवाय देखील करता येत असेल ना?
कुकर कितपत भरायचा? ३ शिट्यात हे जमेल असे वाटत नाही.
23 Jan 2009 - 4:50 pm | A1April
items tumchya potachya aani cookerchya size pramane ghene........cooker 3/4 bharala tari chalel....3 shitya puret...nahitar sagalya padarthancha bhuga hoto.........
23 Jan 2009 - 11:22 am | केवळ_विशेष
हा एक पावरबाझ प्रकार आहे...
माझ्या माहीतीप्रमाणे जमिनीत छोटा खड्डा करून वर दिलेले पदार्थ एका मडक्यात खाली आणि वर पाला भरून तोंड उपडे करून (मडक्याचे) त्या खड्ड्यात ठेवतात आणि बाजूनी पाला वगैरेनी आग लावून त्या धगीवर उकडतात... फारच उच्च लागते!!!
कूकरमधली वगैरे कशी लागेल हा विचारच करवत नाही :(
माझं असं मत आहे... जिथवर शक्य आहे तो पर्यंत पदार्थ ओरिजिनल बनवण्याच्या पद्धतीनेच प्रथम टेस्ट करावा... अगदीच खायचा आहे तर मग अशी ऍडजस्टमेंट ठीक आहे...
(खाण्याचा षौकीन) केवळ_विशेष
अवांतरः-जनरली होळीला पोपटी लावतात... माझ्या सासरी नागांव ला मी खाल्ली आहे... :)
23 Jan 2009 - 2:48 pm | शंकरराव
जनरली होळीला पोपटी लावतात...
फारच जबरदस्त प्रकार दिसतो हा..
नयगाव ऍकून आहे हे नागांव कुठेशी आले ??
23 Jan 2009 - 2:55 pm | सुनील
हे नागांव कुठेशी आले ??
अलिबागजवळ
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Jan 2009 - 3:03 pm | केवळ_विशेष
हे अलिबाग पासून मुरुडला जाताना ८-९ कि मी वर आहे...जर रोहा किंवा मुरुड बाजूनी आलात तर साळाव नावाचं एक गाव लागतं (तिथलं बिर्ला मंदिर छान आहे) तिथे कुंडलीका नदीवरचा पूल पार करून आलं की रेवदंडा, चौल बागमळा...या मार्गाने पण नागांवला येता येतं...मस्त गाव आहे...बीच तर लै भारी...खूप सेफ आहे "जलक्रीडे"साठी :)
23 Jan 2009 - 11:23 pm | भाग्यश्री
बीच अप्रतिम आहे नागावचा!!
http://bhagyashreee.blogspot.com/
23 Jan 2009 - 4:53 pm | A1April
cooker madhe sudhdha chan shijate.........fakta 3 shitya dyavya.........nahitar padarthancha bhuga hoto
23 Jan 2009 - 1:45 pm | खादाड
गुजराथ मध्ये याला उंधीव म्हणतात ! पण त्यात अंडी , चिकन नसतं! ! :)
23 Jan 2009 - 3:13 pm | झेल्या
'रायगडची प्रसिद्ध पोपटी' हा लेख म्हणजे एका शिवकालीन पोपटीणीची कथा असेल असे वाटून वाचायला आलो पण.....
'पोपट' झाला राव... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
25 Jan 2009 - 1:40 am | आचरट कार्टा
=)) =)) =)) =))
आयला... या स्मायलीला काय धाड भरली? जाम हसायला मागत नाही! नुसते कंस दाखवत्ये. कंसासारख्या दुष्टपणे!!!
असो...
ह.ह.पु.वा.
हं... हे ठीक आहे.
23 Jan 2009 - 7:14 pm | अनामिका
कोकणात पोपटी लावणे हा एक वेगळा अनुभव असतो निदान माझ्यासाठी तरी.
साधारणपणे पौष ,माघ व फाल्गुन महिन्यात पोपटी लावण्याचा प्रघात असतो.
कारण या काळात वालाच्या शेंगा तयार झालेल्या असतात...........
वर सांगितलेल्या सगळ्या जिन्नसांचे व्यवस्थित थर एका मातीच्या मडक्यात लावुन निखार्यावर हे मडके आतील पदार्थ शिजवण्यासाठी ठेवतात .या मधे वापरण्यात येणारा पाला हा भांबुर्डिचा पाला म्हणुन ओळखला जातो तसेच ओव्याची पाने देखिल वापरली जातात.............
तयार झालेली पोपटी खाताना उगिच फालतु हायजिन वगैरेची चर्चा न करत खाणे हाच उत्तम पर्याय.
अवर्णनिय असा आनंद चवीने खाणार्याच्या चेहर्यावर बघायची संधी उपलब्ध करुन देणारा एक अस्सल मराठमोळा पदार्थ..............
"अनामिका"
23 Jan 2009 - 11:46 pm | प्राजु
पोपटीची यथासांग पाकृ दिली आहे.. येथे पहा
बाय द वे.. अंडी फोडून घालायची का? चिकन मॅरीनेट करून घालायचे का?
सविस्तर लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jan 2009 - 3:15 pm | केशवराव
या सर्व चर्चे पेक्षा एकदा 'पोपटी कट्टा ' जमवा की. अलिबागला यायला लागेल. आम्ही सर्व तयारी करु. गेल्या वर्षी पण मी हे सुचवीले होते. पहा कसे जमते ते.
निमंत्रक - - - - - केशवराव.
25 Jan 2009 - 1:25 am | लवंगी
याला उकडीया म्हणतात.. सही मजा येते थंडीच्या रात्री खायला..