लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही.
माझ कांडी संपवण कस वाटतय ते नक्की सांगा. ह्याला चित्रप्रकाराला नक्की कुठला प्रकार म्हणायचे किंवा ह्याचे काय करता येईल असे काहीच माहीत नसल्यामुळे मिपावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
सर्व काही पेनानेच रेखाटले आहे फक्त चांगले दिसावे म्हणून फोटोशॉपमधून मागे चित्र, कलरिंग वगैरे नट्टापट्टा इ. प्रकार केले आहेत.
डिजाईन १)
डिजाईन २)
धन्यवाद,
Sandy
प्रतिक्रिया
2 May 2016 - 5:41 pm | अभ्या..
वा वा वा सॅन्डीबाबा. एक लंबर छंद लावून घेतलाय. आवडले. पहिल्या चित्रातली खालची बाजू बघून तर आपल्या नंदीध्वजाची आठवण आली.
(आता थॉडे टेक्निकलः साह्यबा जरा रेझोल्युशन कमी करावे लागतेय. फाइल रेन्डर व्हायला टाइम घेतीय. अगदी फोरके औटपुट झेपत नाहीत राव)
2 May 2016 - 6:08 pm | चांदणे संदीप
ये तो सोचाही नै था! आय माय स्वारी! :/
जसे आऊटपूट मिळाले फोटोशॉप मधून तसेच चिकटवले इथे. रेझोल्यूशन कमी करण्यासाठी खात्रीशीर, स्वस्त आणि मस्त सॉफ़्टवेअर कुठले आहे? ॲचकुली हे फोटोशॉपमधून केलेले नसून ऑनलाईन ॲटोडेस्क वाल्यांच्या "पिक्सलर" या साईटवर केलेले आहे.
Sandy
2 May 2016 - 6:11 pm | अभ्या..
रेझोल्यूशन कमी करण्यासाठी खात्रीशीर, स्वस्त आणि मस्त सॉफ़्टवेअर कुठले आहे?
.
फोटूशापच. नन अदर
होतय आता. कॅशेला झाले सेव्ह. ;)
3 May 2016 - 4:51 pm | तुषार काळभोर
जर तुमच्याकडे मासॉ ऑफिस २००७ असेल तर तुमच्याकडे हे पण असेल बहुतेक.
नसेल तर कसं मिळवायचं ते इथं दिलंय
फोटोशॉपच्या तुलनेत किती दर्जा खालावेल माहिती नाही. पण मासॉचं अधिकृत फुकट टूल आहे.
2 May 2016 - 5:45 pm | स्पा
कहर आहे हा
2 May 2016 - 5:50 pm | प्रचेतस
हाडाचा कलाकार आहेस.
2 May 2016 - 6:01 pm | जव्हेरगंज
अफलातून सिमेट्री !!!
लयभारी !!
2 May 2016 - 6:21 pm | पिंगू
भारी कांडी वापरलेली आहे.
2 May 2016 - 6:22 pm | बबन ताम्बे
अजून येउदया कांडी करामती.
2 May 2016 - 7:04 pm | बाबा योगीराज
हि कला पण आहे का अंगात?
मस्त आवड्यास.
2 May 2016 - 7:09 pm | सत्याचे प्रयोग
मस्त आहे गोंदण कलाकारांना दाखवा उपयोग होईल त्यांना
2 May 2016 - 7:14 pm | चांदणे संदीप
यू मीन टू से ट्याटू?
यो ब्रो! कूल!
ठ्यांक्स! लेट्स सी हाव इट गोज! ;)
Sandy
2 May 2016 - 7:13 pm | एस
खूप मोठ्या फायली आहेत असे दिसतेय. लोड होत नाहीयेत माझ्या स्लो मोबाईल कनेक्शनवर. कृपय सासं मार्फत कमी रिझोल्यूशनच्या प्रतिमा टाकाल का?
2 May 2016 - 7:15 pm | चांदणे संदीप
कॉलिंग सासं....
कृपया मदत करा! :/
7 May 2016 - 8:11 pm | एस
आज फोटो दिसले. फारच छान आहे. दुसरे चित्र खासच! माझ्या ओळखीच्या एकाची आठवण आली. तो असेच, पण विषममितीत करत असे.
2 May 2016 - 7:25 pm | उगा काहितरीच
कांडी... बरेच दिवसांनी ऐकला शब्द. आम्हीही कांडीच म्हणत होतो लहानपणी . कला छानच आहे. (हुच्चभ्रूंच्या भाषेत रिकामपणाचे उद्योग ! ) आमची मजल म्हणजे मोठ्या फॉन्टमधे नाव लिहून त्यामधे रंगकाम करणे , पानाखाली कॉइन ठेवून पेन्सीलीने गिरवणे यापुरतेच मर्यादित होते.
2 May 2016 - 7:26 pm | उगा काहितरीच
आणि हो इमेज साईज छोटी करायला MS paint हमखास उपयोगी पडतं. आणि सर्वात सोप्प आहे.
2 May 2016 - 8:24 pm | चांदणे संदीप
जरा डिट्टेलवार सांगता का प्लीज? :)
Sandy
2 May 2016 - 9:44 pm | उगा काहितरीच
१) कोणतीही इमेज पेंट मधे ओपन करा. / राइट क्लिक करून edit करा.
२)resize या पर्यायावर क्लिक करा / ctrl + w प्रेस करा.
३) Resize by percentage किंवा pixels select करा.
४) Horizontal च्या समोर textfield मधे value टाका vertical ची value आपोआप भरल्या जाईल .
(शक्यतोवर एक value [horizontal/vertical] भरल्यानंतर दुसरी value बदलवू नका इमेज खराब होते.
५) OK वर क्लिक करा तुमची इमेज लहान झालेली असेल.
६) परत लहान करायची असेल तर नवीन इमेजला १००% कंसीडर करून value टाका.
७) alt+f --> save as .jpg करा.
८) काही मदत लागली तर सांगा.
2 May 2016 - 9:46 pm | उगा काहितरीच
Tag मधे काही माहिती लिहीली होती. ती दिसत नाहीये .
2 May 2016 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा
कँडी आवडली.
2 May 2016 - 7:51 pm | कानडाऊ योगेशु
भन्नाट डिझाईन्स आहेत.
पण ती सीमेट्री कशी काय सांभाळायचा? एलिमेन्ट्री इंटरमिजिएटच्या क्लासला जाम वाट लागायची. आणि ही डिझाईन्स अशीच मनात आली तशी रेखाटली आहेत कि कुठल्या छापील डिझाईन्सवरुन बघत बनवली आहेत. अर्थात दोन्ही केसमध्ये जबरा टॅलेन्ट असणे गरजेचे आहे ह्याबाबत नो दुमत!
2 May 2016 - 8:27 pm | चांदणे संदीप
हात वळेल तिकड पेन वळवायचा एवढच काम आहे याच्यात...ते सिमेट्री वगैरे शब्द आता माहीत पडलेत. सिमेट्री मध्ये कुठ जरा चुकल की तिथेच जरास खेळून दुसर्या बाजुलाही सेम तस्सच चुकायच, की झाल! हाकानाका! ;)
Sandy
2 May 2016 - 8:37 pm | सतिश गावडे
कसला जीनियस आहेस तू. =))
बाकी रिकामे उद्योग भारी आहेत.
2 May 2016 - 8:41 pm | जव्हेरगंज
+1
हे लक्षातच आलं नाही !
भारीच !
2 May 2016 - 8:43 pm | चांदणे संदीप
काहीही हां सगासर! =))
निव्वळ टीपी आहे हे! तरीही, इथे कौतुकाचे दोन बोल बोलल्याबद्दल तुम्हासह सर्वांचे आभार! __/\__
Sandy
2 May 2016 - 10:21 pm | स्पा
सगा सरांनी चक्क कौतुक केलंय
बापरे
खरच धन्य आहेस बाबा
नाहीतर आस्तिक नास्तिक असल्याशिवाय ते कुठेही फिरकत नाहीत
2 May 2016 - 10:59 pm | चांदणे संदीप
आत्ताच आईला सांगितल मी... लिंबू, मीठ-मिरची ओवाळून टाकते म्हण्ली! ;)
2 May 2016 - 8:47 pm | विजय पुरोहित
संदीप छानच आहेत डिझाईन्स.
अतिशय आवडला उपक्रम. अजून डिझाईन्स पहायला आवडतील.
2 May 2016 - 8:49 pm | विजय पुरोहित
थोडी तिबेटी बौद्धिझमची छाप वाटते तुझ्या कलेमध्ये.
2 May 2016 - 8:52 pm | मोहनराव
चांगली आहेत डिझाईन्स...
2 May 2016 - 9:00 pm | टवाळ कार्टा
भारी
2 May 2016 - 9:35 pm | आदूबाळ
क्या बात, संदीपराव! ही (सुद्धा) कला तुमच्याकडे आहे हे लई भारी आहे.
2 May 2016 - 9:36 pm | अजया
वा! सुंदरच काढली आहेत चित्र.
2 May 2016 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वा. मस्तं संदिपभाउ. कांडीत मज्जा आहे बॉ तुमच्या. अजुन फोटु येउंद्यात.
2 May 2016 - 10:27 pm | पैसा
सुरेख
2 May 2016 - 10:37 pm | मुक्तछन्द
मस्तच आहे रिकामा उद्योग... आवडलय
2 May 2016 - 10:44 pm | सुंड्या
symmetric doodles?
2 May 2016 - 11:42 pm | मदनबाण
सुरेख ! :)
रिझोल्युशन सकट फाईल साईझ कमी करण्याची पद्धत :-
ज्या फोटोची साईझ कमी करायची असेल त्या फाईलवर राइट क्लिक करा => ओपन विथ => मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर वर क्लिक करा { म्हणजे यात तो फोटो उघडेल }
या सॉफ्टवेअरच्या वरच्या टुलबार मध्ये डाविकडुन दुसरा ऑप्शन आहे एडिट पिक्चर्स. या पर्यायवर क्लिक करा.क्लिककेल्यावर उजवीकडे एक एडिट पिक्चर्स असा उभा बॉक्स उघडेल त्यात चेंज पिक्चर साईझ या पर्यायाखाली रिसाईझ आणि कंप्रेस पिक्चर असे २ पर्याय दिसतील. यातला दुसरा पर्याय म्हणजे कंप्रेस पिक्चरवर क्लीक करा.
यात
१} डोंन्ट कंप्रेस
२} डॉक्युमेंट
३} वेबपेज
४} इ-मेल मेसेजेस
असे पर्याय दिसतील. यातला २} डॉक्युमेंट हा पर्यात क्लिक करुन निवडा,तसेच खाली फोटोची मूळ साईझ आणि कंप्रेस झाल्या नंतरची साईझ काय असेल त्याची माहिती दिसेल.
समजा १.३९ एमबीचा फोटो असेल तर कंप्रेस होउन याच फोटोची साईझ १३१ केबी पर्यंत कमी होते. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/
2 May 2016 - 11:44 pm | मदनबाण
डाविकडुन दुसरा ऑप्शन
एक दुरुस्ती हे अजवीकडुन दुसरा असे हवे आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/
3 May 2016 - 12:10 am | एक एकटा एकटाच
सहिए
3 May 2016 - 12:31 am | नुस्त्या उचापती
डिझाईन छानच आहेत . कांडीबरोबर शाईचा पेन वापरल्यास ती आणखी सुंदर होतील . म्हणजे आऊटलाईन कांडी ने काढायची आणि आतील भाग शाईच्या पेनने रंगवायचा . कांडी ने रंगवताना ओरखडे उटल्यासारखे दिसते . शाई मात्र एक
सारखी सगळीकडे पसरते .एकदा अवश्य करून पाहा .
3 May 2016 - 7:34 am | चांदणे संदीप
हेही करून पाहीन कधीतरी. पण, शाळा संपल्यानंतर शाईचा पेनच पाहिला नाही. माझ्या भाच्यांकडे असतो आता. पण त्यांचा घेतला की दंगाच होणार, "ए आज्जी, हा मामा, आमच्या शाईपेनाची शाई संपवतो!" असं कोकलले की वाजलाच आमचा बोऱ्या! ;)
Sandy
3 May 2016 - 6:16 am | रेवती
आता मुलगी मोठी झाली की तिच्या हातावर मेंदी काढून देताना हे रिकामपणाचे उद्योग कामाला येतील व भरून पावल्यासारखे वाटेल. नक्षीकाम आवडले. अजून काहीवर्षे तरी आता रिकामा वेळ घावायचा नाही.
3 May 2016 - 7:46 am | चांदणे संदीप
रेवतीतै, आमच्या घरात सारे म्हणतात की माझी मुलगी तिच्या आज्जीवर गेली आहे! ;) त्यामुळे ती मोठी झाल्यावर माझ्याकडून काहीही काढून घेईन याची शंकाच वाटते! ;)
Sandy
3 May 2016 - 8:21 am | सनईचौघडा
हं तर एकुणच तुम्हाला पहिल्यापासुनच अशा कांड्या करता येताहेत. हॅ हॅ हॅ आम्हाला वाटलं मिपावर.... जावु दे
बाकी अंगी कला आंहे हों तुंमच्या.
3 May 2016 - 8:32 am | नाखु
क्रॅशपेक्षा ही कॅण्डी भारी है! नो मोबाइल नो की पॅड.
सार्वकालीन माई.
3 May 2016 - 10:00 am | चांदणे संदीप
येतो नाखुकाका... नक्की येतो!
3 May 2016 - 10:12 am | चांदणे संदीप
काही सूचना असल्यास जरूर सांगाव्यात... मी त्याचीच वाट पाहत आहे!
ट्याटू आर्टिस्टना उपयोगी पडेल याव्यतिरिक्त आणखी काय करता येऊ शकते या चित्रांचे हे मला जाणून घ्यायचे आहे. मी याच्या स्क्वेअर कॅनव्हासवर पेंटीन्ग्ज करायचा विचार करत होतो. लहान, मिडियम, मोठ्या अशा कुठल्याही साईजमध्ये...ज्यात योग्य दिसेल त्यामध्ये.
धन्यवाद,
Sandy
3 May 2016 - 3:03 pm | उल्का
प्रिन्टर असेल तर ग्रीटिन्ग कार्ड्स करु शकता.
ब्लॉक प्रिंटिंग साठी पण खूप छान आहेत ही चित्रं.