लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही.
माझ कांडी संपवण कस वाटतय ते नक्की सांगा. ह्याला चित्रप्रकाराला नक्की कुठला प्रकार म्हणायचे किंवा ह्याचे काय करता येईल असे काहीच माहीत नसल्यामुळे मिपावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
सर्व काही पेनानेच रेखाटले आहे फक्त चांगले दिसावे म्हणून फोटोशॉपमधून मागे चित्र, कलरिंग वगैरे नट्टापट्टा इ. प्रकार केले आहेत.
डिजाईन १)
डिजाईन २)
धन्यवाद,
Sandy
प्रतिक्रिया
3 May 2016 - 4:43 pm | सस्नेह
हीपण कला आहे का तुमच्याकडे !
4 May 2016 - 5:30 am | यशोधरा
मस्त! दुसरे डिझाईन अधिक आवडले.
4 May 2016 - 6:51 am | शाम भागवत
साधारणतः १ ते ४ स्क्वेअर इंचात निरनिरा ळे डिझाईन काढून त्याचा अल्बम करा. टेक्स्टाईल डिझायनर ओळखीचा असेल तर त्याला दाखवा. साड्या व ड्रेस मटेरिअल वरील डिझाईन कसे असते ते अभ्यासले तर फायदा होऊ शकेल. या डिझाईनची बॉर्डर केली तर कसे दिसेल इकडे ही लक्ष असू द्या.
हात चांगला वळतोय. कला आहे ही. सिमेट्रीची नजर पण आहे. हे काम फार किचकट व वेळकाठू असते. पण ही तुम्हाला आनंदाची गोष्ट वाटतीये हेच कौतुक आहे.
तुम्हाला शुभेच्छा.
4 May 2016 - 10:30 am | चांदणे संदीप
हे ही करून पाहतो!
Sandy