✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे रिकामे उद्योग!

च
चांदणे संदीप यांनी
Mon, 05/02/2016 - 16:50  ·  लेख
लेख
लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही. माझ कांडी संपवण कस वाटतय ते नक्की सांगा. ह्याला चित्रप्रकाराला नक्की कुठला प्रकार म्हणायचे किंवा ह्याचे काय करता येईल असे काहीच माहीत नसल्यामुळे मिपावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती! सर्व काही पेनानेच रेखाटले आहे फक्त चांगले दिसावे म्हणून फोटोशॉपमधून मागे चित्र, कलरिंग वगैरे नट्टापट्टा इ. प्रकार केले आहेत. डिजाईन १) D1 डिजाईन २) D2 धन्यवाद, Sandy
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6610 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

वा वा वा सॅन्डीबाबा. एक लंबर

अभ्या..
Mon, 05/02/2016 - 17:41 नवीन
वा वा वा सॅन्डीबाबा. एक लंबर छंद लावून घेतलाय. आवडले. पहिल्या चित्रातली खालची बाजू बघून तर आपल्या नंदीध्वजाची आठवण आली. (आता थॉडे टेक्निकलः साह्यबा जरा रेझोल्युशन कमी करावे लागतेय. फाइल रेन्डर व्हायला टाइम घेतीय. अगदी फोरके औटपुट झेपत नाहीत राव)
  • Log in or register to post comments

आर्र्र.... :/

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 18:08 नवीन
(आता थॉडे टेक्निकलः साह्यबा जरा रेझोल्युशन कमी करावे लागतेय. फाइल रेन्डर व्हायला टाइम घेतीय. अगदी फोरके औटपुट झेपत नाहीत राव)
ये तो सोचाही नै था! आय माय स्वारी! :/ जसे आऊटपूट मिळाले फोटोशॉप मधून तसेच चिकटवले इथे. रेझोल्यूशन कमी करण्यासाठी खात्रीशीर, स्वस्त आणि मस्त सॉफ़्टवेअर कुठले आहे? ॲचकुली हे फोटोशॉपमधून केलेले नसून ऑनलाईन ॲटोडेस्क वाल्यांच्या "पिक्सलर" या साईटवर केलेले आहे. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रेझोल्यूशन कमी करण्यासाठी

अभ्या..
Mon, 05/02/2016 - 18:11 नवीन
रेझोल्यूशन कमी करण्यासाठी खात्रीशीर, स्वस्त आणि मस्त सॉफ़्टवेअर कुठले आहे? . फोटूशापच. नन अदर होतय आता. कॅशेला झाले सेव्ह. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

Microsoft Office Picture Manager

तुषार काळभोर
Tue, 05/03/2016 - 16:51 नवीन
जर तुमच्याकडे मासॉ ऑफिस २००७ असेल तर तुमच्याकडे हे पण असेल बहुतेक. नसेल तर कसं मिळवायचं ते इथं दिलंय फोटोशॉपच्या तुलनेत किती दर्जा खालावेल माहिती नाही. पण मासॉचं अधिकृत फुकट टूल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कहर आहे हा

स्पा
Mon, 05/02/2016 - 17:45 नवीन
कहर आहे हा
  • Log in or register to post comments

हाडाचा कलाकार आहेस.

प्रचेतस
Mon, 05/02/2016 - 17:50 नवीन
हाडाचा कलाकार आहेस.
  • Log in or register to post comments

कांडीचित्रे ?

जव्हेरगंज
Mon, 05/02/2016 - 18:01 नवीन
अफलातून सिमेट्री !!! लयभारी !!
  • Log in or register to post comments

भारी कांडी वापरलेली आहे.

पिंगू
Mon, 05/02/2016 - 18:21 नवीन
भारी कांडी वापरलेली आहे.
  • Log in or register to post comments

लय भारी.

बबन ताम्बे
Mon, 05/02/2016 - 18:22 नवीन
अजून येउदया कांडी करामती.
  • Log in or register to post comments

सॅण्डी बाबा

बाबा योगीराज
Mon, 05/02/2016 - 19:04 नवीन
हि कला पण आहे का अंगात? मस्त आवड्यास.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

सत्याचे प्रयोग
Mon, 05/02/2016 - 19:09 नवीन
मस्त आहे गोंदण कलाकारांना दाखवा उपयोग होईल त्यांना
  • Log in or register to post comments

यू मीन टू से ट्याटू?

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 19:14 नवीन
यू मीन टू से ट्याटू? यो ब्रो! कूल! ठ्यांक्स! लेट्स सी हाव इट गोज! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

खूप मोठ्या फायली आहेत असे

एस
Mon, 05/02/2016 - 19:13 नवीन
खूप मोठ्या फायली आहेत असे दिसतेय. लोड होत नाहीयेत माझ्या स्लो मोबाईल कनेक्शनवर. कृपय सासं मार्फत कमी रिझोल्यूशनच्या प्रतिमा टाकाल का?
  • Log in or register to post comments

कॉलिंग सासं....

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 19:15 नवीन
कॉलिंग सासं.... कृपया मदत करा! :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आज फोटो दिसले. फारच छान आहे.

एस
Sat, 05/07/2016 - 20:11 नवीन
आज फोटो दिसले. फारच छान आहे. दुसरे चित्र खासच! माझ्या ओळखीच्या एकाची आठवण आली. तो असेच, पण विषममितीत करत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कांडी... बरेच दिवसांनी ऐकला

उगा काहितरीच
Mon, 05/02/2016 - 19:25 नवीन
कांडी... बरेच दिवसांनी ऐकला शब्द. आम्हीही कांडीच म्हणत होतो लहानपणी . कला छानच आहे. (हुच्चभ्रूंच्या भाषेत रिकामपणाचे उद्योग ! ) आमची मजल म्हणजे मोठ्या फॉन्टमधे नाव लिहून त्यामधे रंगकाम करणे , पानाखाली कॉइन ठेवून पेन्सीलीने गिरवणे यापुरतेच मर्यादित होते.
  • Log in or register to post comments

आणि हो इमेज साईज छोटी करायला

उगा काहितरीच
Mon, 05/02/2016 - 19:26 नवीन
आणि हो इमेज साईज छोटी करायला MS paint हमखास उपयोगी पडतं. आणि सर्वात सोप्प आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

आयला...काखेत कळसा..

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 20:24 नवीन
आणि हो इमेज साईज छोटी करायला MS paint हमखास उपयोगी पडतं. आणि सर्वात सोप्प आहे.
जरा डिट्टेलवार सांगता का प्लीज? :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

१) कोणतीही इमेज पेंट मधे ओपन

उगा काहितरीच
Mon, 05/02/2016 - 21:44 नवीन
१) कोणतीही इमेज पेंट मधे ओपन करा. / राइट क्लिक करून edit करा. २)resize या पर्यायावर क्लिक करा / ctrl + w प्रेस करा. ३) Resize by percentage किंवा pixels select करा. ४) Horizontal च्या समोर textfield मधे value टाका vertical ची value आपोआप भरल्या जाईल . (शक्यतोवर एक value [horizontal/vertical] भरल्यानंतर दुसरी value बदलवू नका इमेज खराब होते. ५) OK वर क्लिक करा तुमची इमेज लहान झालेली असेल. ६) परत लहान करायची असेल तर नवीन इमेजला १००% कंसीडर करून value टाका. ७) alt+f --> save as .jpg करा. ८) काही मदत लागली तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

Tag मधे काही माहिती लिहीली

उगा काहितरीच
Mon, 05/02/2016 - 21:46 नवीन
Tag मधे काही माहिती लिहीली होती. ती दिसत नाहीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

कँडी आवडली.

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 19:49 नवीन
कँडी आवडली.
  • Log in or register to post comments

भन्नाट डिझाईन्स आहेत.

कानडाऊ योगेशु
Mon, 05/02/2016 - 19:51 नवीन
भन्नाट डिझाईन्स आहेत. पण ती सीमेट्री कशी काय सांभाळायचा? एलिमेन्ट्री इंटरमिजिएटच्या क्लासला जाम वाट लागायची. आणि ही डिझाईन्स अशीच मनात आली तशी रेखाटली आहेत कि कुठल्या छापील डिझाईन्सवरुन बघत बनवली आहेत. अर्थात दोन्ही केसमध्ये जबरा टॅलेन्ट असणे गरजेचे आहे ह्याबाबत नो दुमत!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 20:27 नवीन
आणि ही डिझाईन्स अशीच मनात आली तशी रेखाटली आहेत कि कुठल्या छापील डिझाईन्सवरुन बघत बनवली आहेत.
हात वळेल तिकड पेन वळवायचा एवढच काम आहे याच्यात...ते सिमेट्री वगैरे शब्द आता माहीत पडलेत. सिमेट्री मध्ये कुठ जरा चुकल की तिथेच जरास खेळून दुसर्या बाजुलाही सेम तस्सच चुकायच, की झाल! हाकानाका! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सिमेट्री मध्ये कुठ जरा चुकल

सतिश गावडे
Mon, 05/02/2016 - 20:37 नवीन
सिमेट्री मध्ये कुठ जरा चुकल की तिथेच जरास खेळून दुसर्या बाजुलाही सेम तस्सच चुकायच, की झाल! हाकानाका! ;)
कसला जीनियस आहेस तू. =)) बाकी रिकामे उद्योग भारी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

+1

जव्हेरगंज
Mon, 05/02/2016 - 20:41 नवीन
+1 हे लक्षातच आलं नाही ! भारीच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद सगासर!

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 20:43 नवीन
कसला जीनियस आहेस तू
काहीही हां सगासर! =)) निव्वळ टीपी आहे हे! तरीही, इथे कौतुकाचे दोन बोल बोलल्याबद्दल तुम्हासह सर्वांचे आभार! __/\__ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सगा सरांनी चक्क कौतुक केलंय

स्पा
Mon, 05/02/2016 - 22:21 नवीन
सगा सरांनी चक्क कौतुक केलंय बापरे खरच धन्य आहेस बाबा नाहीतर आस्तिक नास्तिक असल्याशिवाय ते कुठेही फिरकत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

व्हयं व्हयं

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 22:59 नवीन
आत्ताच आईला सांगितल मी... लिंबू, मीठ-मिरची ओवाळून टाकते म्हण्ली! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

संदीप छानच आहेत डिझाईन्स.

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 20:47 नवीन
संदीप छानच आहेत डिझाईन्स. अतिशय आवडला उपक्रम. अजून डिझाईन्स पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

थोडी तिबेटी बौद्धिझमची छाप

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 20:49 नवीन
थोडी तिबेटी बौद्धिझमची छाप वाटते तुझ्या कलेमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

चांगली आहेत डिझाईन्स...

मोहनराव
Mon, 05/02/2016 - 20:52 नवीन
चांगली आहेत डिझाईन्स...
  • Log in or register to post comments

भारी

टवाळ कार्टा
Mon, 05/02/2016 - 21:00 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

क्या बात, संदीपराव! ही

आदूबाळ
Mon, 05/02/2016 - 21:35 नवीन
क्या बात, संदीपराव! ही (सुद्धा) कला तुमच्याकडे आहे हे लई भारी आहे.
  • Log in or register to post comments

वा! सुंदरच काढली आहेत चित्र.

अजया
Mon, 05/02/2016 - 21:36 नवीन
वा! सुंदरच काढली आहेत चित्र.
  • Log in or register to post comments

वा. मस्तं संदिपभाउ. कांडीत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/02/2016 - 22:03 नवीन
वा. मस्तं संदिपभाउ. कांडीत मज्जा आहे बॉ तुमच्या. अजुन फोटु येउंद्यात.
  • Log in or register to post comments

सुरेख

पैसा
Mon, 05/02/2016 - 22:27 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

मस्तय की...

मुक्तछन्द
Mon, 05/02/2016 - 22:37 नवीन
मस्तच आहे रिकामा उद्योग... आवडलय
  • Log in or register to post comments

symmetric doodles?

सुंड्या
Mon, 05/02/2016 - 22:44 नवीन
symmetric doodles?
  • Log in or register to post comments

सुरेख ! :)

मदनबाण
Mon, 05/02/2016 - 23:42 नवीन
सुरेख ! :) रिझोल्युशन सकट फाईल साईझ कमी करण्याची पद्धत :- ज्या फोटोची साईझ कमी करायची असेल त्या फाईलवर राइट क्लिक करा => ओपन विथ => मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर वर क्लिक करा { म्हणजे यात तो फोटो उघडेल } या सॉफ्टवेअरच्या वरच्या टुलबार मध्ये डाविकडुन दुसरा ऑप्शन आहे एडिट पिक्चर्स. या पर्यायवर क्लिक करा.क्लिककेल्यावर उजवीकडे एक एडिट पिक्चर्स असा उभा बॉक्स उघडेल त्यात चेंज पिक्चर साईझ या पर्यायाखाली रिसाईझ आणि कंप्रेस पिक्चर असे २ पर्याय दिसतील. यातला दुसरा पर्याय म्हणजे कंप्रेस पिक्चरवर क्लीक करा. यात १} डोंन्ट कंप्रेस २} डॉक्युमेंट ३} वेबपेज ४} इ-मेल मेसेजेस असे पर्याय दिसतील. यातला २} डॉक्युमेंट हा पर्यात क्लिक करुन निवडा,तसेच खाली फोटोची मूळ साईझ आणि कंप्रेस झाल्या नंतरची साईझ काय असेल त्याची माहिती दिसेल. समजा १.३९ एमबीचा फोटो असेल तर कंप्रेस होउन याच फोटोची साईझ १३१ केबी पर्यंत कमी होते. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/
  • Log in or register to post comments

डाविकडुन दुसरा ऑप्शन

मदनबाण
Mon, 05/02/2016 - 23:44 नवीन
डाविकडुन दुसरा ऑप्शन एक दुरुस्ती हे अजवीकडुन दुसरा असे हवे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सहिए

एक एकटा एकटाच
Tue, 05/03/2016 - 00:10 नवीन
सहिए
  • Log in or register to post comments

डिझाईन छानच आहेत . कांडीबरोबर

नुस्त्या उचापती
Tue, 05/03/2016 - 00:31 नवीन
डिझाईन छानच आहेत . कांडीबरोबर शाईचा पेन वापरल्यास ती आणखी सुंदर होतील . म्हणजे आऊटलाईन कांडी ने काढायची आणि आतील भाग शाईच्या पेनने रंगवायचा . कांडी ने रंगवताना ओरखडे उटल्यासारखे दिसते . शाई मात्र एक सारखी सगळीकडे पसरते .एकदा अवश्य करून पाहा .
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर!

चांदणे संदीप
Tue, 05/03/2016 - 07:34 नवीन
हेही करून पाहीन कधीतरी. पण, शाळा संपल्यानंतर शाईचा पेनच पाहिला नाही. माझ्या भाच्यांकडे असतो आता. पण त्यांचा घेतला की दंगाच होणार, "ए आज्जी, हा मामा, आमच्या शाईपेनाची शाई संपवतो!" असं कोकलले की वाजलाच आमचा बोऱ्या! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती

आता मुलगी मोठी झाली की तिच्या

रेवती
Tue, 05/03/2016 - 06:16 नवीन
आता मुलगी मोठी झाली की तिच्या हातावर मेंदी काढून देताना हे रिकामपणाचे उद्योग कामाला येतील व भरून पावल्यासारखे वाटेल. नक्षीकाम आवडले. अजून काहीवर्षे तरी आता रिकामा वेळ घावायचा नाही.
  • Log in or register to post comments

हा..हा..

चांदणे संदीप
Tue, 05/03/2016 - 07:46 नवीन
रेवतीतै, आमच्या घरात सारे म्हणतात की माझी मुलगी तिच्या आज्जीवर गेली आहे! ;) त्यामुळे ती मोठी झाल्यावर माझ्याकडून काहीही काढून घेईन याची शंकाच वाटते! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हं तर एकुणच तुम्हाला

सनईचौघडा
Tue, 05/03/2016 - 08:21 नवीन
हं तर एकुणच तुम्हाला पहिल्यापासुनच अशा कांड्या करता येताहेत. हॅ हॅ हॅ आम्हाला वाटलं मिपावर.... जावु दे बाकी अंगी कला आंहे हों तुंमच्या.
  • Log in or register to post comments

कँण्डी

नाखु
Tue, 05/03/2016 - 08:32 नवीन
क्रॅशपेक्षा ही कॅण्डी भारी है! नो मोबाइल नो की पॅड.
"संदीपा बर्याच कला आहेत हो तुझ्या अंगात, छोटी काय म्हणते,पन्हे आणि कैरीच्या डाळीसाठी सूनबाईला पाठव घरी,सोबत तुलाही यायला सांगीतल्यं यांनी"

सार्वकालीन माई.

  • Log in or register to post comments

वरडा!

चांदणे संदीप
Tue, 05/03/2016 - 10:00 नवीन
येतो नाखुकाका... नक्की येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

चांदणे संदीप
Tue, 05/03/2016 - 10:12 नवीन
काही सूचना असल्यास जरूर सांगाव्यात... मी त्याचीच वाट पाहत आहे! ट्याटू आर्टिस्टना उपयोगी पडेल याव्यतिरिक्त आणखी काय करता येऊ शकते या चित्रांचे हे मला जाणून घ्यायचे आहे. मी याच्या स्क्वेअर कॅनव्हासवर पेंटीन्ग्ज करायचा विचार करत होतो. लहान, मिडियम, मोठ्या अशा कुठल्याही साईजमध्ये...ज्यात योग्य दिसेल त्यामध्ये. धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रं आहेत.

उल्का
Tue, 05/03/2016 - 15:03 नवीन
प्रिन्टर असेल तर ग्रीटिन्ग कार्ड्स करु शकता. ब्लॉक प्रिंटिंग साठी पण खूप छान आहेत ही चित्रं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा