मिपावर चित्रे टाकण्याची कृती

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 12:14 am

मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच.

खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील.

१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा.

२. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे.

असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील.

३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे.

हे चूक आहे...

.
हे बरोबर आहे...

आता मिपावर या आणि...

४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.)

.

.

५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:

......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)

......आ) Width X Height: कोरे ठेवा.

......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.

६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.

७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा:

......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे.

......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते)

......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.)

८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा.

९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही.

१०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा.
.

खास सूचना :

मिपात टाकलेले फोटो
(अ) साठवण केलेल्या जागी एडीट केले
आणि / किंवा
(आ) त्यांना दुसर्‍या अल्बममध्ये हलविले
तर त्यांच्या दुव्यांच्या मजकूरात (लिंक्स) बदल होतो व त्यामुळे ते फोटो मिपातिल लेखात दिसणे बंद होते.
असे फोटो लेखात परत दिसण्यासाठी त्यांचे बदलेले नवे दुवे मिपात टाकणे जरूर असते.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2016 - 12:29 am | श्रीरंग_जोशी

मिपावर प्रथमच फोटो प्रकाशित करताना ज्या समस्या येतात त्यांच्यासाठी हा धागा मदत पानाची भूमिका पार पाडणार याबद्दल विश्वास वाटतो.

एक माहिती जोडतो.

~ फोटो पब्लिकली शेअर झाला आहे की नाही याची चाचणी ~

समजा क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही तो गुगल फोटोज, फ्लिकर किंवा तत्सम साइट्सवर तुमच्या लॉगिनने अपलोड केला व शेअर केला तर त्याचा दुवा धाग्यात दिला आहे त्या पद्धतीने मिळवून दुसर्‍या ब्राउझरमध्ये जिथे तुमचे त्या साइटवर लॉगिन नाही आहे तेथे उघडून बघा. पब्लिकली शेअर झाला नसेल तर तो तुम्हालाही दिसणार नाही.

दोन ब्राउझर्स वापरत नसल्यास एकच ब्राउझर वापरूनही ही चाचणी करता येईल. फक्त फोटोचा दुवा मिळवल्यावर त्या साइटमधून लॉग आउट करायचे अन मग त्याच ब्राउझरमध्ये तो दुवा उघडावा.

मितभाषी's picture

14 Apr 2016 - 12:57 am | मितभाषी

a

मितभाषी's picture

14 Apr 2016 - 1:14 am | मितभाषी

a

खटपट्या's picture

14 Apr 2016 - 1:37 am | खटपट्या

माहीती चांगली आहे पण चार क्रमांकाच्या पायरीमधील चित्र गंडले आहे.
किमान मला तरी दीसत नाही. वर्तूळात आडवी रेघ येतेय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्र दिसत आहे. रिफ्रेश करून पहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2016 - 9:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

जमलं ! चित्र दिसत आहे.

नाना स्कॉच's picture

14 Apr 2016 - 8:29 am | नाना स्कॉच

.

जमतंय नीट! आभार!!!

अत्रे's picture

14 Apr 2016 - 8:49 am | अत्रे

T

हे दिसत नाही. height कॉलम रिकामा सोडला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान दिसतेय की !

Height रिकामी ठेवल्याने हे चित्र मूळ चित्राच्या उंची-रुंदीचे प्रमाण राखून आहे (डिस्टॉर्शन झालेले नाही).

ओह , मोबाईल वर दिसत नव्हते! laptop वर दिसतंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 2:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोबाईलच्या कॉनफिगरेशनवर अवलंबून असल्याने हाय रेझॉल्युअशन चित्रे लोड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

Rahul Sable's picture

14 Apr 2016 - 1:33 pm | Rahul Sable

indian spot billed duck

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

या ठिकाणी टाकलेले चित्र "पब्लिकली शेअर्ड" नाही त्यामुळे ते दिसत नाहीय.

"पब्लिकली शेअर्ड" केल्यास ते असे दिसेल...

"इंडियन स्पॉट बिल्ड डक"चा सुंदर फोटो !

Rahul Sable's picture

14 Apr 2016 - 1:37 pm | Rahul Sable

चित्र दिसत नाहि

Rahul Sable's picture

14 Apr 2016 - 1:41 pm | Rahul Sable

indian spot billed duck

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर पहा.

कंजूस's picture

14 Apr 2016 - 8:24 pm | कंजूस

डॅाक, एक साइट शोधलीय https jumpshare dot com यातून चित्र चढवता येतं का ते सांगा.पिडीएफसाठीही आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो शक्य आहे.

१. आताच ही ग्राफिक फाईल तिथे अपलोड करून इथे टाकली आहे...

२. टेक्स्ट फाईल असल्यास ती त्या संस्थळावर टाकून...

अ) मिपावर तिचा दुवा असा देता येईल : https://jumpshare.com/v/9ZjYHACZ21RMOqeabLyH

किंवा

आ) तिच्या दुव्याला नाव देऊन मिपावर अशी टाकता येईल.

सावधगिरीची सूचना :

मिपावर (किंवा इतर कोठेही दुवे देऊन) टाकलेल्या फाईल्स भविष्यातही खात्रीने चालू राहतील अश्याच संस्थळांवर टाकाव्यात. अन्यथा फाईल्स असलेले संस्थळ बंद पडल्यास / समस्या देऊ लागल्यास / फी आकारणी करू लागल्याने तुम्ही त्याचा वापर बंद केल्यास; त्यावर असलेल्या फाईल्स मिपावर दिसणे बंद होईल.

वडापाव's picture

14 Apr 2016 - 11:45 pm | वडापाव

तात्काळगावातले (instagram) फोटू चढवता येतील का? मी अॅपव्यतिरिक्त instagram वर गेलो नाही पण क्रोमवरून जाता येऊ शकतं म्हणून विचारतोय

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2016 - 12:33 am | डॉ सुहास म्हात्रे

मला इन्स्टाग्रामचा अनुभव नाही. इथे प्रयत्न करून पहा. त्या माहितीचा सगळ्यांनाच फायदा होईल.

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2016 - 12:38 am | श्रीरंग_जोशी

हो, इंस्टाग्रामच काय कुठलीही साइट जिथे फोटो पब्लिकली शेअर करता येतात अन प्रत्यक्ष फोटोच्या फाइलचा दुवा मिळवता येतो त्या प्रत्येक साइटचा वापर मिपावर फोटोज प्रकाशित करताना येईल.

हा एक फोटो इंस्टाग्रामवरून साभार.

कंजूस's picture

15 Apr 2016 - 5:41 am | कंजूस

धन्यवाद डॅाक.मी हे करून पाहिले परंतू चित्र उमटत नव्हते image tag वापरून म्हणून विचारले.तुमचेही चित्र,फाइलमाझ्या IE11मध्ये उघडत नाहीये आणि खात्री झाली की ही साइट नाही वापरता येणार."https" असल्याने त्या सिइट वापरण्याविषयी उत्सुक होतो.
पिकासा,फ्लिकर वगैरे साइट्स चांगल्या असल्या तरी मोबाइल आणि स्लो नेटस्पीडला काही उपयोगाच्या नाहीत.एक चित्र अपलोड करून इकडे टाकायला १०एमबी डेटा सहज खातो.श्रीरंगचे इन्स्टाग्राम करून नाही पाहिले.
फ्लिकर अथवा तत्सम साइटवरती तीन वेगळ्या लिंक्स मिळतात शिवाय पब्लिक अकसेसही न विसरता ठेवावे लागते.
अजूनएक keepandshare dot com try करत आहे.

पैसा's picture

15 Apr 2016 - 8:15 pm | पैसा

मोबाईलसाठी तुम्ही छान धागा काढला होता! तो मदतपानात आहेच.

कंजूस's picture

15 Apr 2016 - 10:07 pm | कंजूस

tinypic dot com साइट बरोबर चालते,त्यातले फोटो सर्वांना दिसतात. "https" secure site शोधत असतो परंतू त्या साइट मोबल्यात चालत नाहीत अथवा डेटा प्रचंड खातात.संगणकातली 8+gb RAM, ब्राडबँडचे ग्लुकोज सलाइनमुळे भारी साइट्स सहज चालतात पण मोबल्याचा घामटा निघतो.

छोट्या कंपन्या कधीही बंद पडतील आणि फ्री चालवण्यासाठी जाहिराती मारतात हा त्रास असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2016 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्र कोठूनही टाकले तरी त्या साईट्वर ते "पब्लिक शेअर्ड" असावेच लागेल, नाहीतर ती साईट त्या चित्राचा डेटा पाठवत नाही.

गुगलफोटो वापरून पहा. या संस्थळाचा माझा अनुभव चांगला आहे. मला अजूनतरी मोठी समस्या आलेली नाही. फोटो "ओरिजिनल रिझॉल्युशन" ऐवजी "हाय रिझॉल्युशन" मधे ठेवले तर फारसा रिझॉल्युशन लॉस न होता चित्रांची बाईटसाईझ खूपच कमी होते.

Rahul Sable's picture

15 Apr 2016 - 6:33 pm | Rahul Sable

Flower

कंजूस's picture

15 Apr 2016 - 7:35 pm | कंजूस

rahul,18:33चे चित्र आणि डॅाकचे ""पब्लिकली शेअर्ड" केल्यास ते असे दिसेल..वाले स्पॅाटबिल्ड दोन्ही न दिसण्याचे कारण काय असेल? instagram चे फार लहान टाकले आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2016 - 7:59 pm | श्रीरंग_जोशी

हो, १०० रुंदी वापरली. चाचणी म्हणून टाकले होते. त्यावर क्लिक केल्यास नव्या टॅबमध्ये मूळ आकारमानात उघडेल.

शिव कन्या's picture

15 Apr 2016 - 8:22 pm | शिव कन्या

mountain

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2016 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी

तुम्हाला दिसतोय का फोटू?

वडापाव's picture

15 Apr 2016 - 8:31 pm | वडापाव

धन्यवाद _/\_

शिव कन्या's picture

15 Apr 2016 - 8:26 pm | शिव कन्या

तासभर प्रयत्न केले, सगळ्या पायऱ्या पार केल्या , पण गंडलं .....जौ दे....मिपा आपण काढलेल्या छायाचित्रासाठी नसावेच! :(

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2016 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी

सर्वात महत्वाची पायरी - इमेज फाइलचा दुवा फोटोवर राइट क्लिक करून मिळवणे अन तो मिपावर वापरणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2016 - 9:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखातल्या सगळ्या पायर्‍या तंतोतंत वापरल्या तर समस्या येऊ नये.

विषेशतः ठळक केलेल्या पायर्‍या काळजीपूर्वक वापरा. बहुतेक समस्या तेथेच तयार होतात.

वरवर जरी कठीण/लांबलचक प्रोसिजर वाटले तरी एकदा सवय झाली आणि चित्रे नीट दिसू लागली ते हातचा मळ वाटेल.

गोरगावलेकर's picture

5 Mar 2019 - 6:58 am | गोरगावलेकर

अगदी खरं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे कृती करून कालच एका भटकंती धाग्याच्या प्रतिक्रियेत फोटो चढवून पहिला. सहज जमतंय. कृती सचित्र व सोपी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

हो.. बघा ना मी पण केव्हाची ट्राय करतेय पण जमतच नाही आहे.

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2016 - 8:51 pm | श्रीरंग_जोशी

फोटो खास आहे.

वडापाव's picture

15 Apr 2016 - 8:52 pm | वडापाव

धन्स _/\_
सगळ्यासाठीच :-)

वडापाव's picture

15 Apr 2016 - 8:49 pm | वडापाव

हुश्श... झालं

चांदणे संदीप's picture

2 May 2016 - 8:47 pm | चांदणे संदीप

सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही

असामान्य लेखक होण्यासाठी काय करावे लागेल? ;)

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे

गुगली आवडला ! ;)

तुम्ही सामान्य नसून सन्माननिय असामान्य लेखक आहात हे अगोदरच सिद्ध झाले आहे आणि त्याचा आम्हा सर्व मिपाकरांना सार्थ अभिमान आहे ! तेव्हा असामान्यत्वाचे गुपित तुम्हीच उलगडू शकाल :) ;)

वरच्या प्रतिसादात, "सर्वसामान्य (मिपाकर) लेखक" आणि "विशेषाधिकार असलेले (मिपाकर) लेखक (पक्षी : पदाधिकारी)" अशी विभागणी होती. :)

चांदणे संदीप's picture

6 May 2016 - 1:33 pm | चांदणे संदीप

म्हात्रेकाका!! :O
माझी साधीच गुगली होती की ओ! पण, तुम्ही असा टोलवला चेंडू की तो शोधूनही सापडेना! :(

वरच्या प्रतिसादात, "सर्वसामान्य (मिपाकर) लेखक" आणि "विशेषाधिकार असलेले (मिपाकर) लेखक (पक्षी : पदाधिकारी)" अशी विभागणी होती. :)

हे अर्थातच माहिती आहे! :)

Sandy

""पब्लिकली शेअर्ड" ऑप्शन कुठे आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2016 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

हा ऑप्शन तुम्ही ज्या वेबसाईटवर चित्रे साठवता, तिच्यावर असतो.

गौतमी's picture

5 May 2016 - 2:30 pm | गौतमी

फायनली जमलं मला.......... (४ तासांच्या अथक परिश्रमानंतर)

मेघना मन्दार's picture

6 May 2016 - 10:49 am | मेघना मन्दार

या माहिती साठी अनेक धन्यवाद. मला फोटो टाकता आले.

पाटीलभाऊ's picture

25 Aug 2016 - 6:08 pm | पाटीलभाऊ

रायगडावरील सूर्योदय

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2016 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

जमले !

चित्र अप्रतिम आहे !

पाटीलभाऊ's picture

26 Aug 2016 - 12:29 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद..!

महासंग्राम's picture

5 Sep 2016 - 11:55 am | महासंग्राम

फ्लिकर वर राईट क्लिक केलं तर 'कॉपी इमेज ऍड्रेस' ऑप्शनच येत नाही.
आणि मिपावर फोटो अपलोड करण्यासाठी .jpg असलेली लिंक पाहिजे असते ती मिळवायची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2016 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोणतेही चित्र दुसरीकडे प्रसिद्ध करण्यासाठी ते चित्र पूर्ण आकारात पाहून मगच त्याचा "इमेज अ‍ॅड्रेस" मिळविणे जरूर असते... आल्बममधिल थंबनेल आकाराने कितीही मोठे दिसले तरी त्याचा इमेज अ‍ॅड्रेस या कामी येत नाही.

अश्या योग्य इमेज अ‍ॅड्रेसचे एक्सटेन्शन कोणते आहे हे महत्वाचे नाही. इमेज स्टोअर करणारे संस्थळ मुळ इमेजचेच एक्सटेन्शन वापरतेच असे नाही. उदा : मूळ इमेजचे एक्सटेन्शन काहीही असले तरी हल्ली गुगल फोटो .no हे स्वतःचे एक्सटेन्शन वापरते.

महासंग्राम's picture

12 Sep 2016 - 12:50 pm | महासंग्राम

ओके.. धन्यवाद डॉक. काका :) ट्राय करतो आता.

सपे-पुणे-३०'s picture

6 Sep 2016 - 11:58 am | सपे-पुणे-३०

नेहमी फोटो चढवतानाच माशी शिंकते. परत वर सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून पाहते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोणतीही पायरी न वगळता सर्व पायर्‍या योग्य क्रमाने पार केल्या तर समस्या येऊ नये.

ही प्रक्रिया सुरुवातीच्या एकदोन प्रयत्नांत जरा कठीण वाटते, पण सवय झाली की सहजपणे होते.

सपे-पुणे-३०'s picture

6 Sep 2016 - 12:27 pm | सपे-पुणे-३०

flemingoes

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्र दिसत नाही. चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस दिला आहे का ?

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 12:38 pm | सपे-पुणे-३०

flemingoes

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2016 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

जमलं की ! सुंदर चित्र !

फक्त एक छोटी सूचना. चित्र टाकताना फक्त width टाका, height रिकामी ठेवा. असे केल्याने मिपा तुम्ही दिलेल्या width ला योग्य ती height निवडून (आस्पेट रेशो कायम राहिल्याने) चित्र उभे किंवा आडवे ताणल्यासारखे/चेपल्यासारखे डिस्टॉर्टेड) न दिसता मूळ चित्रासारखे वास्तविक दिसेल.

तुमचेच चित्र वरच्याप्रमाणे टाकल्यावर दिसणारा फरक पहा :

सपे-पुणे-३०'s picture

13 Sep 2016 - 8:20 am | सपे-पुणे-३०

हो, फरक स्पष्टपणे दिसतोय. आता ही height ची टिप नक्की लक्षात ठेवीन. थँक्यू काका.

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:52 pm | सपे-पुणे-३०

बहुदा चित्र टाकायला जमलं... तिकडे पैसाताईंचा उकडीच्या मोदकाच्या फोटोवर प्रतिसाद आलाय.
तसं असेल तर उकडीच्या मोदकांपेक्षा जास्त आनन्द झालाय.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 8:40 pm | फेदरवेट साहेब

.

(आमचा एका मित्रानं हौसेनं काढल्याला फटू)

सिरुसेरि's picture

2 Nov 2016 - 3:59 pm | सिरुसेरि

उपयुक्त माहिती . कॄपया , व्हिडीओ अपलोड कसा करावा त्याचीही माहिती द्यावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2018 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हिडिओ टाकण्यासाठी खालील कृती करा :

चालू व्हिडिओवर राईट क्लिक करा व "copy embed code" निवडा आणि तो कोड मिपात चिकटवा (पेस्ट करा)... बस झाले काम !

उदा:

वर टाकलेला कोड असा आहे (कोड एक्झेक्युट होऊ नये यासाठी कोडाच्या दोन्ही टॉकाच्या सगळ्यात बाहेर अँग्ल्ड ब्रॅकेट्सच्या ऐवजी गोल ब्रॅकेट्स वापरल्या आहेत)...

(iframe width="854" height="480" src="https://www.youtube.com/embed/OoI57NeMwCc" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen>

अरविंद कोल्हटकर's picture

13 Jan 2018 - 4:54 am | अरविंद कोल्हटकर

हा धागा वर काढण्याचे कारण असे की मी जे करतो ते सर्वांना सांगावे. ज्यांना तसे करावेसे वाटेल त्यांना लाभ होईल कारण मी करतो ते अत्यंत सोपे आहे. मी स्वतः अगदीच टेक्नोमंद आहे म्हणून ही automated पद्धत वापरतो.

प्रथम गूगलमध्ये स्वतःचा एक ब्लॉग सुरू करा आणि एक New Post सुरू करा. मिपाकडे पाठवायचे चित्र तेथे आणा, ज्यासाठी तेथेच लिंक आहे. पान सेव करून राइट क्लिकने Copy image address निवडा. आता चित्राचा URL तुमच्या क्लिपबोर्डावर येऊन बसला आहे.

पुढील HTML Code मी आपल्यापाशी तयार ठेवलेले आहे.


तयार कोड

ह्या कोडिंगमध्ये चित्राची रुंदी ५०० पिक्सेल्स, चित्र आणि आणि शीर्षक मध्यावर येणे आणि इटॅलिक्समध्ये येणे हे घातलेले आहे. २ अथवा अधिक चित्रे घालायची असल्यास पहिले चित्र घालून त्याचे पूर्ण कोडिंग कॉपी करून खाली चिकटवा आणि केवळ URL बदला आणि वर्णन बदला.

ह्या ब्लॉगवर कितीहि चित्रे चढविता येतील. पुढेमागे एखादे चित्र कोठे आहे हे शोधायची वेळ आली तर सोपे जावे म्हणून मी प्रत्येक महिन्यासाठी वेगळी New Post उघडून तिला त्या महिन्याचे नाव देतो.

सवय झाली की ह्या मार्गाने कितीहि चित्रे वेगाने लेखामध्ये घालता येतात. पानाच्या डाव्या/उजव्या बाजूस चित्र चिकटविणे, टेबलमार्गे अनेक चित्रे चिकटवणे असले प्रकार मी टेक्नोमंद असल्यामुळे सहसा टाळतोच पण त्याचेहि असे कोडिंग एकदाच करून जवळ ठेवून देता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2018 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम कल्पना !

पण, खास यासाठीच ब्लॉग बनवायची गरज नाही. (अ) मी वारंवार वापरत असलेल्या चित्रांच्या आकारमानांची आणि (आ) फॉर्मॅट्सची (उदा, सेंटरिंग, एकाच ओळीत अनेक चित्रे... त्यातही ती चित्रे एकाच उंचीची / रूंदीची असलेले, इ) कोड टेम्प्लेट्स (इमेज अ‍ॅड्रेसची जागा रिकामी ठेवून) मी वर्ड फाईलमध्ये ठेवले आहेत.

मिपावरचे लेखन करताना ती वर्ड फाईल उघडी ठेवतो आणि तिच्यातून जरूर ती टेंप्लेट लेखात कॉपी करतो. आता त्या टेंप्लेटमध्ये हव्या त्या चित्राचा/चे इमेज अ‍ॅड्रेस टाकला की चित्र हवे त्या आकारात, पानावर हवे तेथे चपखल बसते !

एक विनंती हा धागा फार लांबला आहे आणि फोटोंमुळे जड झाला आहे - दुसरा भाग काढावा.

# अरविंदरावांची आइडिया बरोबर आहे कारण १) ब्लॅागरपोस्ट पब्लिकच असतात, २) ब्लॅागरच्या लिंकस गुगलवाले बदली करत नाहीत, ३) गुगलमध्ये पिकासो, सर्कल,प्लस, फोटो असे नवनवे प्रकार बदलत राहिल्याने त्यातल्या लिंकस गंडलेल्या आहेत पण ब्लॅागरच्या तशाच आहेत.

प्राब्लेम फक्त विंडोज मोबाइलवाल्यांचा झाला. अगोदर सपोर्ट होता तो गुगलने काढून घेतल्याने ब्लॅागर बंद पडले. पुर्वी वेबसाइट वापरायचो पण नंतर ते अॅप डाउनलोड करा सांगतात आणि ते अँड्राइड नसल्याने चालत नाही. फेसबुक हा सर्वोत्तम उपाय आहे.

साबु's picture

26 Jun 2018 - 7:17 pm | साबु

Test

टर्मीनेटर's picture

26 Jun 2018 - 7:26 pm | टर्मीनेटर

iframe insert करू शकतो का मिपावर ? जर करता येत असेल तर खूपच सोपं पडेल image Gallery टाकायला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2018 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्याच्या व्यवस्थेत मिपावर प्रत्येक चित्र स्वतंत्रपणे टाकावे लागते. गॅलरीचा फक्त दुवा देता येईल, पण तिच्यातील फोटो वाचकांना मूळ संस्थळावर पहावे लागतील.

निशाचर's picture

27 Jun 2018 - 3:40 am | निशाचर

हो, iframe वापरून मी लेखांत गुगल मॅप जोडले आहेत. पण इमेज गॅलरीसाठी iframe वापरलेली नाही; बहुतेक गुगल फोटो सपोर्ट करत नाही. तुम्ही प्रयत्न केलात तर जमतंय का ते अवश्य सांगा.

चामुंडराय's picture

27 Jun 2018 - 6:37 am | चामुंडराय

.

कंजूस's picture

27 Jun 2018 - 6:44 am | कंजूस

हे चालेल का टर्मिनेटर?

तुमच्याच आताच्या धाग्यातले सहा फोटोंचा स्लाइडशो करून विडिओ प्लेअर केला आहे.
फोटोंचे स्क्रिनशॅाट्स घेतल्याने कमी रेझलुशन/साइजचे झाले आहेत आणि विडिओची साइजही लहान राहिली.

प्लेअर न देता फक्त युट्युब विडिओची लिंक देण्याचा पर्याय आहेच.

समुद्र, सेरापियम, किल्ला, काटकोंब यांचा एकेक फोटो लेखात देऊन एकेका जागेचे अधिक फोटोंचे विडिओ प्लेअर/ लिंक देऊ शकता.

प्रत्येक भागात नकाशा हवा आहे.

कंजूस's picture

2 Jul 2018 - 10:28 am | कंजूस

मोबाइल फोनमधून (Android) गुगल फोटो फेल्डरमध्ये असलेल्या फोटोची मिपासाठी इमेज लिंक काढणे -

तयारी - जो फोटो लेखासाठी घ्यायचा आहे तो प्रथम फोन मेमरीमधून इंटरनेटवर - google photos वर अपलोड करण्याचे गरजेचे आहे. फोटो उघडल्यावर वरती वर दिशेकडे दाखवणारा बाण /किंवा छोट्याशा ढगात वर जाणारा बाणाचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यावर फोटो अपलोड होणे सुरू होईल. नंतर - - -

१) गुगल फोटो app उघडा,
२) हवा असलेल्या फोटोवर क्लिक केल्यावर फोटो मोठा दिसेल. वरच्या बाजूस शेअरिंगची खूण दिसेल त्यावर क्लिक करा. एका चौकोनात एक छोटीशी लिंक येईल ती "कॅापी लिंक" करून घ्या. आणि "share with anyone/ public " ok करा.
३) ctrlq dot org/google/photos

( CTRLQ dot org )

ही साइट उघडा,
एका चौकोनात "paste link here" दिसेल तिथे वरची लिंक पेस्ट करून पुढच्या चौकोनातल्या " generate code" buttonवर टिचकी मारा.
आता पेजच्या खाली दोन चौकोनात दोन लिंक्स येतात --
पहिला -direct link - ही कॅापी करून मिपा लेखाच्या फोटोसाठी वापरा.
दुसरी लिंक - embed code असते.

( या साइटमधून लिंक्स निघाल्या नाहीत तर तुमचा फोटो पब्लिक शेअरिंगसाठी रेडी नाही हे आपोआपच कळते हा एक फायदा आहे. )

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2019 - 12:45 pm | चौथा कोनाडा

ट्रायल म्हणून प्रिन्टेड रेन्बो ही एक अप्रतिम शॉर्ट फिल्म एम्बेड करून बघितलीय....... जरूर पहा खुप सुंदर अहीआहे.

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 6:52 pm | धर्मराजमुटके

जम्पशेअर वर प्रयत्न केला, जमतेय बहुतेक. धन्यवाद !

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 6:56 pm | धर्मराजमुटके

चित्र लहान करुन बघितले.

बादवे, हे कोणतं ठिकाण आहे?

धन्यवाद..

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 8:18 pm | धर्मराजमुटके

भटकंती विभागात प्लिटविस -क्रोएशिया वर चा लेख पाहिला. तिथे चित्रे डकविण्याची समस्या होती लेखिकेला. मलाही चित्र डकवून पाहायचे होते एकदा म्हणून गुगलवर शोध घेऊन ह्या ठिकाणाचा फोटो टाकला. बहुधा तिथलं नॅशनल पार्क आहे.

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 7:01 pm | धर्मराजमुटके

ये दिल और उन की निगाहों के साये !

अजुन एक प्रयत्न करुन पाहतो चलचित्र टाकण्याचा उजळणी म्हणून

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2019 - 2:24 pm | चौथा कोनाडा

धर्मराजमुटके, छान सराव केलाय ! फिल्म्स देखिल सुरेख आहेत !

धर्मराजमुटके's picture

17 Jul 2019 - 8:27 pm | धर्मराजमुटके

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद !
मी मिपावर तब्बल १० वर्षे इतका काळ आहे. खरं तर हे अगोदरच शिकायला पाहिजे होतं. मी तंत्रमंद आहे असे ही नाही. पण कंटाळा !
खरं तर जास्त काही लिखाण / प्रतिसाद दिलेले नाहित मिपायुष्यात. पण दिवसातून २-४ वेळा तरी इथें आल्याशिवाय राहवत नाही.

नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते.
याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू !

माझा पुर्वीचा बॉस मला नेहमी म्हणायचा, " कमॉन धर्मराज, यु कॅन डू इट, बट यु शुड हॅव दॅट फायर इन द बेली !" पण आता फायर बेलीच्या बराच खाली, बुडा खाली सरकलाय :)
असो ! भटा ला दिली ओसरी, भट हातपाय पसरी असा झाला हा प्रतिसाद !

यशोधरा's picture

17 Jul 2019 - 9:13 pm | यशोधरा

नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते.
याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू !

मस्त लिहिलं आहेत. आवडलं.

कंजूस's picture

17 Jul 2019 - 10:25 pm | कंजूस

तुमच्या कोडमध्ये width ="80%" केली आणि height काढून टाकल्यावर आटोपशिर झालं

धर्मराजमुटके's picture

17 Jul 2019 - 10:32 pm | धर्मराजमुटके

आपण गायकीचे मर्म अचूक पकडले आहे.
प्रसिद्धीसाठी गाणार्‍याचे मुख दिसणे उचित.
पोटासाठी गाणार्‍याचे पोट दिसणे उचित.
तद्वतच मनापासून गाणार्‍याचे केवळ ह्रदय आणि गळा दिसणे उचित होय.
आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगले शिकू शकतो .
धन्यवाद !

अभिरुप's picture

8 Jan 2020 - 8:18 pm | अभिरुप

Golden Temple