मिपावर चित्रे टाकण्याची कृती

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 12:14 am

मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच.

खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील.

१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा.

२. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे.

असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील.

३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे.

हे चूक आहे...

.
हे बरोबर आहे...

आता मिपावर या आणि...

४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.)

.

.

५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:

......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)

......आ) Width X Height: कोरे ठेवा.

......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.

६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.

७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा:

......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे.

......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते)

......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.)

८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा.

९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही.

१०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा.
.

खास सूचना :

मिपात टाकलेले फोटो
(अ) साठवण केलेल्या जागी एडीट केले
आणि / किंवा
(आ) त्यांना दुसर्‍या अल्बममध्ये हलविले
तर त्यांच्या दुव्यांच्या मजकूरात (लिंक्स) बदल होतो व त्यामुळे ते फोटो मिपातिल लेखात दिसणे बंद होते.
असे फोटो लेखात परत दिसण्यासाठी त्यांचे बदलेले नवे दुवे मिपात टाकणे जरूर असते.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 2:26 am | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 2:27 am | अमरेंद्र बाहुबली

.

Sanjay Uwach's picture

18 Oct 2020 - 10:22 am | Sanjay Uwach

Kesher flower

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2020 - 8:29 pm | चौथा कोनाडा

कंजूस साहेबांनी सुचवलेले करावे.
आणि ट्रायल घेताना आणखी एक महत्वाचे :
१. "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून लिंक सेव्ह (नोटपॅड वर वै). करुन ठेवावी
२. गुगल / गुगल फोटोज / गुगल ड्राइव्ह वरून लॉग ऑऊट करावे
३. मग, ती मिपावर टाकून पुर्वपरिक्षणात दिसते का याची ट्रायल घ्यावी
४. इमेज पुर्वपरिक्षणात दिसत नसेल तर शेअर झालेली नाही हे समजते.
५. परत "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून पुन्हा वरील प्रमाणे ट्रायल घ्यावी

मी शेअर टू ऑल हा स्टेटस सेटिंग मधून काढतो. तिथले वरडीग माझ्या ल्यापटोप वर कांहीं वेगळेच आहे तर हा स्टेटस कुठून काढायचा.

चित्र लॅपटॉप वर दिसते मात्र फोन वर नाही

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2020 - 10:06 pm | चौथा कोनाडा

लिन्क व्यनि करा (किंवा इथे चिटकवा ) मोबाईलवर आणि लॅपटॉप वर तपासतो.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2020 - 10:12 am | चौथा कोनाडा

हे लॅपटॉप वर दिसत नाहीय.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2020 - 12:23 pm | चौथा कोनाडा

आणि मोबाईल वर देखील दिसत नाहिय.

कंजूस's picture

18 Oct 2020 - 11:12 am | कंजूस

शेअरिंग लिंक काढून ती प्रथम
https://photos.app.goo.gl/..........
अशी दिसेल. ती
https://app.bytenbit.com/

इथे बॉक्समध्ये टाकून वेगळी इमेजसाठी लिंक मिळते ती वापरायची. जर लिंक आलीच नाही तर शेअरिंग झालेलं नाही.

Sanjay Uwach's picture

18 Oct 2020 - 7:50 pm | Sanjay Uwach

Mira Car

Sanjay Uwach's picture

18 Oct 2020 - 10:42 pm | Sanjay Uwach

kashmi

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2020 - 10:47 pm | चौथा कोनाडा

हे पण दिसत नाहीय !

कंजूस's picture

19 Oct 2020 - 5:08 am | कंजूस

शेअर टू ऑल हा स्टेटस सेटिंग मधून काढतो. तिथले वरडीग माझ्या ल्यापटोप वर कांहीं वेगळेच आहे तर हा स्टेटस कुठून काढायचा

"Share with the people"
हे दिसेल.
त्याच्या खाली Change दिसेल त्यावर क्लिक केल्यावर
"Share this photo with anyone with the link"
Yes करा.

---------------------

Sanjay Uwach's picture

19 Oct 2020 - 8:21 am | Sanjay Uwach

kashmir

कंजूस's picture

19 Oct 2020 - 8:44 am | कंजूस

तुमचं काही तरी चुकतंय.
शेअरिंग लिंक
https://app.bytenbit.com/
मधून घ्या

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:51 pm | सुजित जाधव

a

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:55 pm | सुजित जाधव

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:55 pm | सुजित जाधव

जमलं बुवा एकदाचं

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 7:03 pm | सुजित जाधव

ms dhoni with trophy

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2021 - 8:02 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन !
:-)