रुई माछ भापे - (वाफवलेला रोहु मासा)

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
4 Jan 2009 - 12:51 am

साहित्यः

* कोणत्याहि मोठ्या माशाचे ६-८ तुकडे (रोहु, कतला, सुरमई...मी रोहु आणि हलवा वापरला आहे)
* ४ मोठे चमचे पिवळी मोहरी
* ८-१० हिरव्या मिरच्या
* ४ मोठे चमचे मोहरीचे तेल
* मीठ
* केळिची पाने

कृती:

१. मोहरी आणि मिरचीचे बारिक वाटण करुन घ्यावे
२. वाटणामधे मोहरीचे तेल घालुन हलवुन घ्यावे

३. हे मिश्रण आणि मीठ माश्याच्या तुकड्यांना लावुन अर्धा तास मुरत ठेवावे

४. एकेक तुकडा केळिच्या कापुन घेतलेल्या पानात गुंडाळुन लवंग लावुन बंद करावा

५. हे तुकडे स्टीमर मधे साधारणपणे २० मिनीटांकरता वाफवुन घ्यावेत

६. गरमागरम भाताबरोबर वाढावेत.

---

ताटात वाढलेला एकेक तुकडा हलकेच उघडावा. मनभरुन हुंगुन घ्यावा. मोहोरीच्या विशीष्ट वासात मिसळलेला केळिच्या पानाचा वास ह्यातुन एक अफलातुन सुगंध निर्माण होतो. त्याच नशेमधे एक तुकडा तोडुन वाफाळणार्‍या भाताबरोबर तोंडात टाकावा आणि मगाशी हुंगलेल्या सुगंधाची जादु जिभेवर अनुभवावी. अहाहा.

तर मंडळी, ताजा ताजा बाजार घेउन या आणि 'अपना हाथ जगन्नाथ' ह्या नियमाने लागा कामाला. मात्र तुमचे अनुभव कळविण्यास विसरु नका.

(बंगाली मासे आणि मत्स्यकन्या यांचा चाहता) पांथस्थ...

प्रतिक्रिया

लवंगी's picture

4 Jan 2009 - 1:24 am | लवंगी

काय सुरेख फोटो आलेत.. येथे केळीचे पान मिळत नाहि, नाहितर आत्ता करुन पहिले असते

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 1:22 am | कोलबेर

सर्व फोटोंमधील रंगसंगती क्लास!

धनंजय's picture

4 Jan 2009 - 2:04 am | धनंजय

योगायोग म्हणजे आज माझ्या फ्रीजमध्ये केळीची पाने आहेत (साधारणपणे नसतात). सरसोंचे तेल आहे (साधारणपणे नसते!)

हा प्रकार करूनच बघायला हवा. रोहूसारखे घट्ट मांस असलेला दुसरा मासा वापरावा लागणार, मात्र :-(

सहज's picture

4 Jan 2009 - 10:19 am | सहज

ही पिवळी मोहरी कुठून पैदा करायची :?

पाकृ, फोटो सहीच!

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 12:47 am | पांथस्थ

नेहेमीची मोहरीपण चालते.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धनंजय's picture

5 Jan 2009 - 6:05 am | धनंजय

आणि "ओशन-गोइंग-पर्च" मासा वापरला. (मोहरी वाटण्यासाठी पाणी न वापरता थोडेसे ताक वापरले - अर्थात चव तशी बदलली.) बाजूला पाचफोडण-बटाटे.

(फोटो काढताना मात्र प्रकाशयोजना, फ्लॅश भलताच चुकला...)

(टीप १ : केळीची पाने मेक्सिकन खाद्यपदार्थांच्या दुकानात मिळतात.)
(टीप २ :एकटा जेवतो तेव्हा काटा वापरत नाही, हातानेच खातो...)

नंदन's picture

5 Jan 2009 - 2:17 pm | नंदन

बटाटे, हे नाव झकास आहे. आलू पोश्तोच ना हे? (पंचफोरनमुळे तसे वाटले) बंगाली माशाबरोबर बंगाली सुकी भाजी ही जोडी मस्त आहे. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

5 Jan 2009 - 9:16 pm | धनंजय

आपले पटकन सुचले म्हणून...

बटाट्याच्या फोडी अर्धवट शिजवल्या. पांचफोडन (मोहरी-जिरे-कलोंजी-मेथी-बडीशेप ची फोडणी) मध्ये मिरच्यांचे तुकडे, मग अर्धवट-शिजलेले बटाटे परतले. मीठ आणि आमचूर घातले. चिरलेली कोथिंबीर भुरभुरली.

कोणी बंगाली मित्र असता तर "हे बंगाली नाही!" म्हणाला असता :-) पण भाता-माशाच्या जोडीला हे पटकन १५ मिनिटांत, मासे वाफत असताना जमले.

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 3:24 pm | पांथस्थ

हे आपल्याला आवडलं. जे हवे ते लगेच करुन बघावं.

आलु पोश्तो मधे - खसखस, कलोंजी आणि हिरव्या मिरची वर भर असतो...हाहि छान पदार्थ आहे!

- पांथस्थ

माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मीनल's picture

4 Jan 2009 - 3:55 am | मीनल

हे पांथस्थ साहेब काय मस्त मस्त रेसिपीज करत आणि मिपावर टाकत असतात. ते ही फोटी सहित. अगदी आखो देखाहाल !
काही व्हेज डिशेस ही टाका की !
करून पाहता येतील घरी.आणि खाता ही येतील.
मीनल.

प्राजु's picture

4 Jan 2009 - 5:14 am | प्राजु

समस्त मिपाकरांतर्फे मी पांथस्थ यांचा निषेध करते.
शिक्षा म्हणून यांनी आतापर्यंत केलेले सर्व पदार्थ करून .. मिपा परिवाराला जेवायला बोलवावे.. :)
ख ल्ला....................स! पाकृ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कवटी's picture

4 Jan 2009 - 11:01 am | कवटी

प्राजुला पाठिंबा....
छान छान पाकृ फोटूसहित येथे टाकून आमच्या पोटात सतत खड्डे पाडणार्‍या पांथस्थाचा निषेध!!!
कवटी

http://www.misalpav.com/user/765

सुक्या's picture

4 Jan 2009 - 11:28 am | सुक्या

आमच्या जिभेला चटक लाउन, आमचे वजन वाढवणार्‍या पांथस्थाचा जाहिर निषेध !! नाय चोलबे नाय चोलबे !!
प्राजु ने सांगीतलेल्या शिक्षेव्यतिरिक्त आमच्या जिम चे बिल् भरण्यास सांगावे.

खुद के साथ बाता: लै वंटास रेशिपि दिसत्येय. पांथस्थभौ .. थांकु.

सुक्या (बोंबील)
( वजन वाढ्णार आता :S )

रेवती's picture

4 Jan 2009 - 6:33 am | रेवती

पांथस्थ साहेब,
आपल्या पाकृ मी नियमीत वाचते व बघते.
शुद्ध शाकाहारी असल्याने करून बघत नाही व प्रतिक्रिया देत नाही.
आता मात्र मला मस्याहारी तरी व्हावसं वाटायला लागलय इतके छान फोटू असतात.

रेवती

चतुरंग's picture

4 Jan 2009 - 6:55 am | चतुरंग

किमान मासे तरी खायला लागावे असे वाटायला लागले आहे.
(संपूर्ण पाकृच्या सर्व पायर्‍या फोटूत असल्याने करायला पण सहज सोपे वाटायला लागते!)

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2009 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो.
२ मांसाहारी पा.कृ. नंतर एक शाकाहारी पा.कृ. टाकलीच पाहिजे असा नियम करा स्वतःसाठी .

अंडे खाणारा शाकाहारी
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 12:46 am | पांथस्थ

मान्य आहे :)

लवकरच "लाईट अँड क्रंची व्हेजीटेबल सॅलड सँडविच"ची पाकृ टाकणार आहे. तुर्तास इथे फोटू बघा.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

रेवती's picture

5 Jan 2009 - 3:38 am | रेवती

भारी फोटू आहेत सँडविचेसचे.
हे एकप्रकारे पाककृतींच्या विभागामधले क्रमशः झाले आहे.;)
जसे टि.व्ही.वर आकर्षक जाहीराती करतात तसे वाटतेय.
मी ही युक्ती वापरावी म्हणतेय.

रेवती

वर्षा's picture

5 Jan 2009 - 10:05 pm | वर्षा

खरोखर! तुमच्याकडील शाकाहारी रेसिपीजही खासच असणार!
स्टेप बाय स्टेप फोटोंमुळे पदार्थ करण्याची सबंध कृती खूप रंजक होते!

नंदन's picture

4 Jan 2009 - 6:50 am | नंदन

पाकृ नि फोटो नेहमीप्रमाणेच उत्तम. आता अशाच पात्रानी मच्छीच्या सचित्र पा़कृची वाट पाहतो :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील's picture

4 Jan 2009 - 8:26 am | सुनील

पाकृ नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ठ!!

काही विशिष्ठ खाद्यपदार्थ पानात शिजवले जातात. कोंकणात पातोळ्या म्हणून एक पदार्थ बनवतात, तो हळदीच्या पानांत तर पारशांची पात्रा-नी-मच्छी ही ह्यासारखीच केळीच्या पानात. पानांचा एक वेगळाच सुगंध पदार्थात उतरतो!

(बंगाली मासे आणि मत्स्यकन्या यांचा चाहता) पांथस्थ...
तसे मलाही बंगाली मासे आवडतात पण प्रथम पसंती खार्‍या पाण्यातील माशांना! आणि वंग मस्त्यकन्या? बोलणेच खुंटले!!

धनंजयराव, रोहू नसेल तर तिलापिया वापरून पहा.

सुनीलदा

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

4 Jan 2009 - 8:58 am | विसोबा खेचर

तसे मलाही बंगाली मासे आवडतात पण प्रथम पसंती खार्‍या पाण्यातील माशांना!

आम्हाला गोड्या पाण्यातील मासे विशेष पसंत नाहीत. आमचीही पसंती दर्यातल्या माश्यांना!

अर्थात, पांथस्थ साहेबांची सचित्र पाकृ उत्तमच..

तात्या.

वल्लरी's picture

4 Jan 2009 - 10:18 am | वल्लरी

नेहमी प्रमाणे मस्तचं....
:)

---वल्लरी

अभिरत भिरभि-या's picture

5 Jan 2009 - 9:14 am | अभिरत भिरभि-या

भा~~~~~~~रीये मालक !!

बोका's picture

4 Jan 2009 - 1:12 pm | बोका

कलकत्त्यात एका बंगाली मित्राच्या घरी जेवायला गेलो होतो, तेव्हा हा प्रकार चाखलेला आहे.
अप्रतिम चव !

जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल पांथस्थ यांना धन्यवाद.

-- बंगाली सुगरणीच्या हातचा 'हिलसा' चापलेला बोका !

कपिल काळे's picture

4 Jan 2009 - 1:47 pm | कपिल काळे

आमी निषेध करबो. मला घरी असलं काही खाता येत नाही. त्यामुळे अश्या पा़कृ फक्त दाखवून, धूर केल्याबद्दल निषेध.
जरा आपल्या आवडत्या मत्स्य्कन्यांबद्दलही काही येउदेत
बंगरुळात येउन ताव मारला जाइल. ( पाकृंवर!!)

बाकी पा़कृ भालो. शोंदेश ची पाकृ टाक अशीच.

पांथस्था , आता एक पुस्तक लिव. इतका मसाला नक्कीच जमला असेल.

ऋषिकेश's picture

4 Jan 2009 - 4:51 pm | ऋषिकेश

कधी बोलावताय जेवायला?... :)
लै लै लै भारी!!!!

-ऋषिकेश

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 12:03 am | पांथस्थ

दरवाजे सदैव उघडे आहेत!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

गोगोल's picture

4 Jan 2009 - 5:39 pm | गोगोल

अमेरिकेत केळीची पाने कुठे मिळतात हो?
आणी रोहू ला इथे काय पर्याय?

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 12:02 am | पांथस्थ

* ग्रेप लिव्ह'ज वापरुन बघा (मात्र यामुळे चव बदलेल)
* रोहु ला पर्याय - तुम्हाला आवडतो असा कोणताहि मासा :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

गोगोल's picture

5 Jan 2009 - 6:23 am | गोगोल

आभारी आहे.

हरकाम्या's picture

4 Jan 2009 - 6:09 pm | हरकाम्या

मला बाहेर भेट गड्या ,

पांथस्थ's picture

4 Jan 2009 - 11:58 pm | पांथस्थ

कुठे आणि कशासाठी बुवा?

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

पक्या's picture

5 Jan 2009 - 12:15 am | पक्या

जबरा पांथस्था. फोटो सर्व जीवघेणे. मासा म्हणजे आमचा वीक पॉईंट.
पाकॄ साठी मनापासून आभार. आता एखादी रश्श्याची पण टाक पाकृ. (फिश करी)

धम्मकलाडू's picture

6 Jan 2009 - 1:28 am | धम्मकलाडू

सुरेख रंग आला आहे हं माश्याला. पांथस्था, एकंदरच दैवी! (विष्णूने मत्स्यावतार घेतला तेव्हा तो रोहू मासाच झाला होता म्हणे.) इलिश मासा मिळतो का तुमच्याकडे?

(गोडमासा) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पांथस्थ's picture

6 Jan 2009 - 8:50 am | पांथस्थ

इलिश/हिलसा मिळतो पण खुप महाग असतो आणि आख्खा घ्यावा लागतो. घरी मी एकटाच खाणार त्यामुळे तो योग अजुन आला नाहि.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

ललिता's picture

6 Jan 2009 - 2:34 am | ललिता

पांथस्थ, अहो किती जळवाल? मस्त रेसिपी देताय.... फोटो तर अफलातून!
मला इथे केळीचं पान, पिवळी मोहरी पैदा करणे अशक्य! आता मी बंगळूरला येतेच पहा तुमच्याकडे! :)

खादाड's picture

12 Jan 2009 - 11:00 am | खादाड

फारच सोप्पी दिसतेय करुन पाहिन उद्या !
फोटो नेहेमिप्रमाणे झकास!
तुम्ही उत्तम कुकर बरोबर उत्तम फोटोग्राफर पण आहात! ;)