आत्मनिवेदन

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
4 Dec 2015 - 4:01 pm

संमोहित मनाच्या दुख-या
गाभा-याला स्पर्श
करून सांगतो
हे आत्मनिवेदन सत्य
आहे !

पहाटे उमलुन
पहिल्या प्रकाश किरणात
कोमेजणा-या बकुळफुलांच्या
संचिताच्या शापासारखं
हे जगणं
अन् क्लेश
नवसाचं रूपं
देवीच्या उंबरठ्यावर
ठोकावं असं
पूर्व परंपरेने चालत आलेलं !

संध्याकाळी मी जेव्हा
डोळ्यावाटे रक्त वाहतो
तेव्हा
तुझे परसदार
लालभडक होते,
पसरलेले लाल
अन्
येणारे कृष्णमय
ह्याच्या संगमाने जे काही
क्षिताजावर उमटते
त्याला शब्द नसतात
त्याच अवस्थेत
मी असतो
ह्यासाठी पाहिजेतर
मी माझ्या पहिल्या
कवितेच्या गर्भपाताची
शपथ घेतो !

शेवरीच्या कापसात
विधवेची रात्र गुंडाळून
विरह आग आग
होऊन
रात्र जाळतो
मग झोप परागंदा
होते
अन्
मी नागव्याने
पिंपळपाराकडे
वळतो
पूर्वजन्मीच्या पापापासून
मुक्त होण्यासाठी
अनंत प्रदक्षिणेच्या शोधात !

विजयकुमार.......................

23 / 02 / 2009

कविता

प्रतिक्रिया

निनाव's picture

4 Dec 2015 - 4:30 pm | निनाव

वाह. सुन्दर . शब्द वेचक.

पालीचा खंडोबा १'s picture

8 Dec 2015 - 10:09 pm | पालीचा खंडोबा १

हि को णा लाच आवडलि नहि का कवि ता

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2015 - 10:16 pm | प्रसाद गोडबोले

किमान मला तरी आवडली नाही .

या कवितेवर विडंबन पाडले होते, पण त्यात ज्या आयडी चे नाव अपरिहार्य होते, त्यांनी ते reject केले.:)