गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो.
मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो.
म्हातारा असे बरेच खाचखळगे कोळुन प्यायलाय. त्याची 'डंगरी' पण त्याला नीर्भीडपणे साथ देतेय. थोरला पांडा त्याचं अस्तित्व पुसटसं दाखवुन देतो. त्याची बायको आणि पोरं काळजीपुर्वक शोधत बसावी लागतात. धाकटा बाळू दंडबैठका, जोर काढत शरीर कमावतोय. पण तो एवढा लाजुळा का? हे काही केल्या समजत नाही.
खाटी मेंढ आणि तान्या मेंढ्या हाकण्याच्या या रहाटगाड्यात 'आलतो फिरायला' म्हणत सरपंच दाखल होतो. आणि चाललेल्या मऊशार कथेला जोरदार तडका मारतो. अर्ध्याहुन कमी किंमतीत कोकरु नेणारा सरपंच पुढे फुकटात नेऊन आपला अस्सल माजुरडेपणा दाखवतो आणि उत्तरार्धातला सामना एकट्याच्या जिवावर गाजवतो. हा सरपंच भलताच ताकदीचा आहे. थोडक्या प्रसंगात जबराट भाव खाऊन जातो.
म्हाताऱ्याचं पात्रं अस्सल आहे. तोंडची भाषा अतिशय भडक. पण ती फक्त कुटुंबासाठी. आल्यागेल्यांना 'रामराम देवा' घालत पाघळवायला बघतो. पण 'ताणुन मारीन' म्हणणाऱ्या सरपंचापुढे सपशेल शरणागती 'यशस्वीरीत्या' पत्करतो.
"तुझ्या रुपाचं, तुझ्या रुपाचं चांदणं पडलय ना मला भिजु द्या" गात धमाल ऊडवणारा लग्नाळु बाळू मात्रं या संघर्षात मुकाट राहतो. एवढ्या सुंदर कथेत हे पात्र चक्कं फसलय. त्याचा लाजुळा चेहरा कथेत वारंवार बाधा आणतो. अभिनय, संवाद सगळच जेमतेम. दुर्दैवाने हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे.पण इतर ताकदीच्या कलाकारांत तो खपुन जातो.
चित्रीकरण अव्वल दर्जाचं झालयं. साऊंड ईफेक्टलातर पैकीच्या पैकी गुण. एकंदर सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास 'फँड्री' मधला जब्याचा दगड जसा पडदा फाडत बाहेर येऊन टाळक्यात बसतो त्यामानाने बाळूची कुऱ्हाड जरा बोथटच वाटली.
एकदा जरुर पहावा असा नक्कीच आहे!!!!!
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 9:49 pm | आदूबाळ
जव्हेरभाऊ, थोडक्यात आटपलंत. आणखी डिट्टेल लिहा. ख्वाडा बद्दल खूप उत्सुकता आहे.
21 Nov 2015 - 9:52 pm | मांत्रिक
काय खतरा लिवतोस रे जवेरगंजा! साला कुठल्या गावचं पाणी पिलायंस? क्लासच्च!!! आवडलं!!!
21 Nov 2015 - 9:55 pm | मांत्रिक
सरपंच भिक्कारडा आहे. साला सडून सडून पाय झाडत झाडत मरो..
22 Nov 2015 - 12:28 pm | जव्हेरगंज
ही तर सरपंचाच्या अभिनयाला दिलेली पावतीच आहे!
बाकी धन्यवाद हो!!
22 Nov 2015 - 7:59 am | एक एकटा एकटाच
बघायला पाहिजे.
22 Nov 2015 - 8:16 am | बाबा योगिराज
जरूर बघेण्....
22 Nov 2015 - 8:24 am | अभिजीत अवलिया
सौ सोनार की, एक जव्हेर की. उत्तम परीक्षण
23 Nov 2015 - 1:30 pm | भाऊंचे भाऊ
जरा अर्थ व्यवस्थीत सामजावता भाउ ?
22 Nov 2015 - 8:35 am | अनुप ढेरे
बाळूचं पात्र तसंच आहे लाजाळू, स्वप्नाळू. मला आवडलं ते पात्र. त्याची स्वप्न मर्यादित आहेत. त्याचा व्यायाम, होणारी बायको यापलिकडे त्याला फार इट्रेस्ट नाही कशात. तो रिलक्टंटली या सगळ्यात ओढला जातो. त्याचे वडील, तो आणि सरपंच हे सोडले तर इतर कलाकारांचं काम दुबळं वाटलं. लो-बजेट मुळे जास्तं चांगले कलाकार घेता आले नसतील.
पण तुम्ही म्हणालात तसं, फँड्रीचा इंपॅक्ट याच्या तूलनेत जास्तं होता.
22 Nov 2015 - 8:41 am | आनंद कांबीकर
वव! जव्हेरभौ, सिनमा बघतल्या सारखं वाटलं.
22 Nov 2015 - 9:58 am | रातराणी
नक्की कोणता पिक्चर म्हणायचा? जव्हेरभाऊ खास लिहलय पण नाव उलगडून सांगा.
22 Nov 2015 - 10:12 am | आनन्दा
ख्वाडा हे शिणुमाचं नाव हाये वो,
22 Nov 2015 - 10:33 am | रातराणी
ओह ते लक्षातच नाही आलं. धन्यवाद. :)
22 Nov 2015 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार
'समाजाला आरसा दाखवणार्या' चित्रपटांचा कंटाळा आला आहे, त्यामुळे बहूदा बघणार नाही.
परिक्षणाबद्दल धन्यवाद.
22 Nov 2015 - 11:53 am | shvinayakruti
बघितला पाहिजे असा चिञपट आहे. पाहताना आपण हरवून जातो त्यात. म्हातार्याचा अभिनय तर जबरीच आहे त्याचबरोबर डंगरीचा आहे. सरपंचाने खलनायक एकदम राग येण्यासारखा साकारलेला आहे. बाकी जब्याच्या दगडा एवढा परिणाम नाही यात.
22 Nov 2015 - 1:13 pm | उगा काहितरीच
सहजासहजी मिळाल्यास पाहीन .
22 Nov 2015 - 2:11 pm | चाणक्य
कलाकार कोण कोण आहेत? सरपंचाचं काम कुणी केलंय ?
22 Nov 2015 - 2:19 pm | जव्हेरगंज
त्याबद्दल मुद्दामच लिहीलं नाही! उगाच क्लिष्टपणा वाढतो.
https://en.m.wikipedia.org/wiki/Khwada
22 Nov 2015 - 3:22 pm | चाणक्य
.
22 Nov 2015 - 4:14 pm | पैसा
सहज मिळतो का बघू. पण परा म्हणतो तसे डोक्याला ताप देणारे सिनेमे आता नको वाटतात बघायला.
23 Nov 2015 - 10:06 am | जव्हेरगंज
23 Nov 2015 - 2:45 pm | सतिश पाटील
अप्रतिम सिनेमा, ग्रामीण बाज आणि धनगरी जीवन अचूक टिपलेय..
23 Nov 2015 - 2:46 pm | सतिश पाटील
आणि ते " तुझ्या रूपाच चांदणं पडलंय न मला भिजू द्या..."
लई झकास ...
23 Nov 2015 - 2:53 pm | टुकुल
छान सिनेमा. थिएटर मधे पाहिला आणी आवडला.
23 Nov 2015 - 3:27 pm | गणपा
चित्रपटाची ओळख करुन देताना आखडता हात घेतल्यासारखा वाटतोय. ज्यांनी हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे त्यांना कदचीत काही लिंक लागत असल्याने परिक्षण आवडले आसावे.
पण माझ्या अल्पमतीला मात्र कसलाही बोध झाला नाही. -_-
23 Nov 2015 - 7:27 pm | जव्हेरगंज
कथा जास्त उलगडू नये म्हणुन आवरतं घेतलं!!
अजुनही लिहीण्यासारखं बरच काही होतं!!
सिनेमा ज्यांनी पाहीला नाही त्यांना बहुदा लिंक लागत नाही. त्याबद्दल क्षमस्व!!
23 Nov 2015 - 7:44 pm | गणपा
आच्छा असा डाव होता होय तुमचा. म्हटलंना आमचीच अल्पमती :P
तरी म्हणतो (म्हणायला आमचं काय जातय? ;) ) अजुन लेखन खुलवलं असतत तरी आवडलं असतं.
जिथं कुठं कथा जास्त उलगडतेय असं वाटलं तर डिस्क्लेमर टकुन तो भाग सफेद अक्षररंगात टंकायचा. मागे मिपावरच कुणी तरी असा प्रयोग केलेल्याचं स्मरत.
असो, एक धागाकर्ता म्हणुन तुम्हाला तुमचे लेखन स्वातंत्र्य आहेच. :)
26 Nov 2015 - 12:30 pm | वपाडाव
चित्रपट सुन्दर...
परीक्षण थोडं गंडेश...
हात भर्पुर आखडता घेतलाय !!!
23 Nov 2015 - 7:29 pm | सूड
चला हवा येऊ द्या मध्ये मुलाखती पाह्यल्या होत्या, त्यामुळे थोडी लिंक लागली. अजून विस्ताराने लिहीलं असतंत तर बरं झालं असतं.