✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ख्वाडा.....रामराम देवा!! ताणुन मारीन..!!

ज
जव्हेरगंज यांनी
Sat, 11/21/2015 - 21:45  ·  लेख
लेख
गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो. मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो. म्हातारा असे बरेच खाचखळगे कोळुन प्यायलाय. त्याची 'डंगरी' पण त्याला नीर्भीडपणे साथ देतेय. थोरला पांडा त्याचं अस्तित्व पुसटसं दाखवुन देतो. त्याची बायको आणि पोरं काळजीपुर्वक शोधत बसावी लागतात. धाकटा बाळू दंडबैठका, जोर काढत शरीर कमावतोय. पण तो एवढा लाजुळा का? हे काही केल्या समजत नाही. खाटी मेंढ आणि तान्या मेंढ्या हाकण्याच्या या रहाटगाड्यात 'आलतो फिरायला' म्हणत सरपंच दाखल होतो. आणि चाललेल्या मऊशार कथेला जोरदार तडका मारतो. अर्ध्याहुन कमी किंमतीत कोकरु नेणारा सरपंच पुढे फुकटात नेऊन आपला अस्सल माजुरडेपणा दाखवतो आणि उत्तरार्धातला सामना एकट्याच्या जिवावर गाजवतो. हा सरपंच भलताच ताकदीचा आहे. थोडक्या प्रसंगात जबराट भाव खाऊन जातो. म्हाताऱ्याचं पात्रं अस्सल आहे. तोंडची भाषा अतिशय भडक. पण ती फक्त कुटुंबासाठी. आल्यागेल्यांना 'रामराम देवा' घालत पाघळवायला बघतो. पण 'ताणुन मारीन' म्हणणाऱ्या सरपंचापुढे सपशेल शरणागती 'यशस्वीरीत्या' पत्करतो. "तुझ्या रुपाचं, तुझ्या रुपाचं चांदणं पडलय ना मला भिजु द्या" गात धमाल ऊडवणारा लग्नाळु बाळू मात्रं या संघर्षात मुकाट राहतो. एवढ्या सुंदर कथेत हे पात्र चक्कं फसलय. त्याचा लाजुळा चेहरा कथेत वारंवार बाधा आणतो. अभिनय, संवाद सगळच जेमतेम. दुर्दैवाने हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे.पण इतर ताकदीच्या कलाकारांत तो खपुन जातो. चित्रीकरण अव्वल दर्जाचं झालयं. साऊंड ईफेक्टलातर पैकीच्या पैकी गुण. एकंदर सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास 'फँड्री' मधला जब्याचा दगड जसा पडदा फाडत बाहेर येऊन टाळक्यात बसतो त्यामानाने बाळूची कुऱ्हाड जरा बोथटच वाटली. एकदा जरुर पहावा असा नक्कीच आहे!!!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
8602 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

जव्हेरभाऊ, थोडक्यात आटपलंत.

आदूबाळ
Sat, 11/21/2015 - 21:49 नवीन
जव्हेरभाऊ, थोडक्यात आटपलंत. आणखी डिट्टेल लिहा. ख्वाडा बद्दल खूप उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

काय खतरा लिवतोस रे जवेरगंजा!

मांत्रिक
Sat, 11/21/2015 - 21:52 नवीन
काय खतरा लिवतोस रे जवेरगंजा! साला कुठल्या गावचं पाणी पिलायंस? क्लासच्च!!! आवडलं!!!
  • Log in or register to post comments

सरपंच भिक्कारडा आहे. साला

मांत्रिक
Sat, 11/21/2015 - 21:55 नवीन
सरपंच भिक्कारडा आहे. साला सडून सडून पाय झाडत झाडत मरो..
  • Log in or register to post comments

हा हा!

जव्हेरगंज
Sun, 11/22/2015 - 12:28 नवीन
ही तर सरपंचाच्या अभिनयाला दिलेली पावतीच आहे! बाकी धन्यवाद हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

ह्म्म्म्म

एक एकटा एकटाच
Sun, 11/22/2015 - 07:59 नवीन
बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

जव्हेर भौ

बाबा योगिराज
Sun, 11/22/2015 - 08:16 नवीन
जरूर बघेण्....
  • Log in or register to post comments

सौ सोनार की, एक जव्हेर की.

अभिजीत अवलिया
Sun, 11/22/2015 - 08:24 नवीन
सौ सोनार की, एक जव्हेर की. उत्तम परीक्षण
  • Log in or register to post comments

सौ सोनार की, एक जव्हेर की.

भाऊंचे भाऊ
Mon, 11/23/2015 - 13:30 नवीन
सौ सोनार की, एक जव्हेर की. उत्तम परीक्षण
जरा अर्थ व्यवस्थीत सामजावता भाउ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

बाळूचं पात्र तसंच आहे लाजाळू,

अनुप ढेरे
Sun, 11/22/2015 - 08:35 नवीन
बाळूचं पात्र तसंच आहे लाजाळू, स्वप्नाळू. मला आवडलं ते पात्र. त्याची स्वप्न मर्यादित आहेत. त्याचा व्यायाम, होणारी बायको यापलिकडे त्याला फार इट्रेस्ट नाही कशात. तो रिलक्टंटली या सगळ्यात ओढला जातो. त्याचे वडील, तो आणि सरपंच हे सोडले तर इतर कलाकारांचं काम दुबळं वाटलं. लो-बजेट मुळे जास्तं चांगले कलाकार घेता आले नसतील. पण तुम्ही म्हणालात तसं, फँड्रीचा इंपॅक्ट याच्या तूलनेत जास्तं होता.
  • Log in or register to post comments

व्वा!

आनंद कांबीकर
Sun, 11/22/2015 - 08:41 नवीन
वव! जव्हेरभौ, सिनमा बघतल्या सारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

नक्की कोणता पिक्चर म्हणायचा?

रातराणी
Sun, 11/22/2015 - 09:58 नवीन
नक्की कोणता पिक्चर म्हणायचा? जव्हेरभाऊ खास लिहलय पण नाव उलगडून सांगा.
  • Log in or register to post comments

ख्वाडा हे शिणुमाचं नाव हाये

आनन्दा
Sun, 11/22/2015 - 10:12 नवीन
ख्वाडा हे शिणुमाचं नाव हाये वो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

ओह ते लक्षातच नाही आलं.

रातराणी
Sun, 11/22/2015 - 10:33 नवीन
ओह ते लक्षातच नाही आलं. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ओक्के!

परिकथेतील राजकुमार
Sun, 11/22/2015 - 10:54 नवीन
'समाजाला आरसा दाखवणार्‍या' चित्रपटांचा कंटाळा आला आहे, त्यामुळे बहूदा बघणार नाही. परिक्षणाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

बघितला पाहिजे असा चिञपट आहे.

shvinayakruti
Sun, 11/22/2015 - 11:53 नवीन
बघितला पाहिजे असा चिञपट आहे. पाहताना आपण हरवून जातो त्यात. म्हातार्याचा अभिनय तर जबरीच आहे त्याचबरोबर डंगरीचा आहे. सरपंचाने खलनायक एकदम राग येण्यासारखा साकारलेला आहे. बाकी जब्याच्या दगडा एवढा परिणाम नाही यात.
  • Log in or register to post comments

सहजासहजी मिळाल्यास पाहीन .

उगा काहितरीच
Sun, 11/22/2015 - 13:13 नवीन
सहजासहजी मिळाल्यास पाहीन .
  • Log in or register to post comments

कलाकार?

चाणक्य
Sun, 11/22/2015 - 14:11 नवीन
कलाकार कोण कोण आहेत? सरपंचाचं काम कुणी केलंय ?
  • Log in or register to post comments

त्याबद्दल मुद्दामच लिहीलं

जव्हेरगंज
Sun, 11/22/2015 - 14:19 नवीन
त्याबद्दल मुद्दामच लिहीलं नाही! उगाच क्लिष्टपणा वाढतो. https://en.m.wikipedia.org/wiki/Khwada
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

ओक्के

चाणक्य
Sun, 11/22/2015 - 15:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

सहज मिळतो का बघू

पैसा
Sun, 11/22/2015 - 16:14 नवीन
सहज मिळतो का बघू. पण परा म्हणतो तसे डोक्याला ताप देणारे सिनेमे आता नको वाटतात बघायला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!!!

जव्हेरगंज
Mon, 11/23/2015 - 10:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम सिनेमा, ग्रामीण बाज

सतिश पाटील
Mon, 11/23/2015 - 14:45 नवीन
अप्रतिम सिनेमा, ग्रामीण बाज आणि धनगरी जीवन अचूक टिपलेय..
  • Log in or register to post comments

आणि ते " तुझ्या रूपाच चांदणं

सतिश पाटील
Mon, 11/23/2015 - 14:46 नवीन
आणि ते " तुझ्या रूपाच चांदणं पडलंय न मला भिजू द्या..." लई झकास ...
  • Log in or register to post comments

छान सिनेमा. थिएटर मधे पाहिला

टुकुल
Mon, 11/23/2015 - 14:53 नवीन
छान सिनेमा. थिएटर मधे पाहिला आणी आवडला.
  • Log in or register to post comments

चित्रपटाची ओळख करुन देताना

गणपा
Mon, 11/23/2015 - 15:27 नवीन
चित्रपटाची ओळख करुन देताना आखडता हात घेतल्यासारखा वाटतोय. ज्यांनी हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे त्यांना कदचीत काही लिंक लागत असल्याने परिक्षण आवडले आसावे. पण माझ्या अल्पमतीला मात्र कसलाही बोध झाला नाही. -_-
  • Log in or register to post comments

कथा जास्त उलगडू नये म्हणुन

जव्हेरगंज
Mon, 11/23/2015 - 19:27 नवीन
कथा जास्त उलगडू नये म्हणुन आवरतं घेतलं!! अजुनही लिहीण्यासारखं बरच काही होतं!! सिनेमा ज्यांनी पाहीला नाही त्यांना बहुदा लिंक लागत नाही. त्याबद्दल क्षमस्व!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आच्छा असा डाव होता होय तुमचा.

गणपा
Mon, 11/23/2015 - 19:44 नवीन
आच्छा असा डाव होता होय तुमचा. म्हटलंना आमचीच अल्पमती :P तरी म्हणतो (म्हणायला आमचं काय जातय? ;) ) अजुन लेखन खुलवलं असतत तरी आवडलं असतं. जिथं कुठं कथा जास्त उलगडतेय असं वाटलं तर डिस्क्लेमर टकुन तो भाग सफेद अक्षररंगात टंकायचा. मागे मिपावरच कुणी तरी असा प्रयोग केलेल्याचं स्मरत. असो, एक धागाकर्ता म्हणुन तुम्हाला तुमचे लेखन स्वातंत्र्य आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

ग्गंपा - आय अग्री

वपाडाव
गुरुवार, 11/26/2015 - 12:30 नवीन
चित्रपट सुन्दर... परीक्षण थोडं गंडेश... हात भर्पुर आखडता घेतलाय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चला हवा येऊ द्या मध्ये

सूड
Mon, 11/23/2015 - 19:29 नवीन
चला हवा येऊ द्या मध्ये मुलाखती पाह्यल्या होत्या, त्यामुळे थोडी लिंक लागली. अजून विस्ताराने लिहीलं असतंत तर बरं झालं असतं.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा