बास्स्स !! आता लैच झालं !!
मी खरं तर ह्या असल्या विषयावर लिहिणारच नव्हतो , त्यात मला काही गती नाही आणि रसही.
पण च्यायला जो तो उठतो सुटतो आणि हे करा न ते करा ... म्हणजे आतंकवादी(पाकिस्तान) सुधारेल असे सांगत सुटतो.आता यातही मालिका सुरू झाल्यात ... आतंकवाद नष्ट करण्याचे उपाय - भाग १ ,... पाकिस्तान कसे सुधरवाल - भाग २५ ... अर्रे छोडो यार .. कोणी गांधीवाद करा म्हणतो, कोणी म्हणतो समजावून सांगा... कोणी म्हणतो आपण चर्चा करू .. कोणी नुसताच निषेध करतोय ...
अरे इतर वेळी त्या अमेरिकेला शिव्या देता ... काही चांगलं घ्या की त्यांच्या कडून .. ९/११ च्या हल्यानंतर काय पेटून उठला तो देश. अफगाणिस्तान, इराक अजून कोण शेंबडा-कोंबडा असेल तो ... पुर्ण सपाट करून टाकला.. आज त्यांची मान ताठ आहे, कोणी हल्ला करताना विचार करेल. अमेरिका पुर्ण अलर्ट आहेत.
डोक्यात जायचा अजुन एक मुद्दा, ते ह्युमन राईट्स वाले. आई शप्पथ हातात असता ना त्यांचा राईट हँड त्यांच्या **त घालून ठेवला असता,,, या आता राईट मागायला म्हणाव. ... च्यायला आणि आपलं पब्लिक ऐकतं तरी कसं ? मला जास्त सांख्यिकी नाही माहित पण संसद हल्ल्यातल्या आरोपी च्या बाजूने हे राईट वाले लढले, त्याची फाशी वाचवली. अरे लाज आहे का रे ? लाज ? ल ला काना 'ला' , 'ज' ... मला आज्जिबात शंका नाही, भारतावर जेवढे आतंकवादी हल्ले झालेत तेवढेच काय त्याच्या १०% पण अजुन कुठे झाले असतीत .. आणि याचं रुट फक्त आणि फक्त पाकिस्तानात आहे हे चड्डीत कार्यक्रम करणारं शेंबडं पोरगं पण सांगेल.
आपण नेहमी असा सोयिस्कर (आपण म्हणण्यापेक्षा 'मी' म्हणतो) विचार करतो , मी एका सेफ जागेत रहातो, माझा ना कोणी पॉलिटिक्स मधे , ना पोलिसात , ना सैन्यात ... आपला तर या गोष्टीशी काहीही संबंध नाही... मी कशाला माझी लाल करून घेऊ ? हे तर रोजचंच झालंय .. माझ्या हातात काय आहे? मी काय करू शकतो ? असली धृतराष्ट्र छाप सोयिस्कर समजूत आपण करून घेतो.. आणि गप्पगार होतो. हा मोठाल्या चर्चा करायला मात्र आपण सर्वांत पुढे. आपण युं केलं पाहिजे , त्यूं केलं पाहिजे. म्हणजे असं होईल तसं होईल .. पण फक्त एक विचार मनात येतो, आज जर माझा कोणी त्या हल्ल्यात गेला असता तर ? ( आणि हल्ले थांबलेत असं नाही.. होतीलच .... त्यामुळे आपला धोका टळलेला नाहीये) तर मग आपण लग्गेच काठ्या घेउन जागे झालो असतो. मग त्या अपराध्यांना सोडवणार्या ह्युमन राईटस वाल्यांचा आपल्याला राग आला असता ... मग आपण सरकारचा निष्क्रियते विषयी आवाज उठवला असता.. तर मग आपण जागे झालो असतो.. पण हे आपण आपल्या कोणाला तरी काही होई पर्यंत वाट पहावी का ? मी गेल्य वर्षी जेंव्हा हैदराबाद मधे होतो, तेंव्हाची गोष्ट, मी रहात असलेल्या हॉटेल पासून मोजून ५ मिनीटांच्या अंतरावर स्फोट झाले होते. आणि स्फोटांच्या वेळेस मी कामावरून घरी येउन थोडा फिरायला बाहेर पडत असे. आणि बाँबस्फोट झाले त्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने मी घरी आलेलो. त्या दिवशी फोन अक्षरशः कानालाच होता. मग याला मी माझे सुदैव म्हणून टाळून देउ का ? मी सुटलो ना .. चला आपण मोकळे आपलं गुलछबू लाईफ जगायला ... आपलीच चिड येते . आपल्याला काही सॉलिड करता येत नाही याचा खेद होतो.
आज तो गांधीवादाचा आणि अतिरेक्यांना समजवण्याचा मुद्दा वाचला आणि डोक्यात शॉटच गेला.( त्या गांधींबद्दलचा रोष जरा बाजूलाच ठेऊ, ते बिचारे तर सुटले, पण आपले बीज रोऊन गेले) युद्ध गांधीवादाने टळू शकतं का ? शकतं तर आपण इतके दिवस **त घालून शांत बसलेलो, निसते निषेध केले , अमेरिकेकडे रडलो .. ( हे सेम टू सेम माझ्या लहानपणची आठवण करून देणार, मी माझ्या छोट्या भावाची काही वस्तू घेतली तो भोकाड पसरायचा , आणि आइला नाव सांगायचा. हल्ली आपण अमेरिकेकडे जायचो.) चर्चा केल्या , आग्र्याला त्या हरामखोर मुशर्रफ ला बोलावला, इतकच काय दोन देशांतल्या येण्याजाण्याचं सोयिस्कर व्हावं म्हणून बस सुविधा सुरू केलेली ती आपणच... त्याला आपण गांधीवाद म्हणू की नाही ? काय *ट झालं त्यामुळे ? आणि आता नाकावर टिच्चून मुंबईवर हल्ले झाले तरी आपण त्याच पोकळ चर्चा करतो ? अरे आपण एवढे आंधळे गांधीवादी झालोय का ? नुसता गांधीवाद ?
जे औषध तापावर चालते तेच्च आपण जुलाबावर पण घेतो का ? मग नको तिथे गांधीवाद का मधे आणतो ? का आपल्या मानसिकतेला फिव्हिकॉल सारखा चिकटपणा आला आहे ?
तो आबा पाटील (आता आदरणिय नाही राहिला, सॉरी) ... तो रडकुंडीला आला होता... मुलाखत देताना... मागे फेयर अँड लव्हलीची ऍड करणारे छगन भुजबळ (तिर्थरुपांनी अगदी चपलख नाव ठेवलंय) ... अरे ज्याच्या कडे निर्णय घेण्याची जबाबदाती आहे, ज्याच्या कडे पॉवर्स आहेत ... तो शेंबड्यासारखा हातपाय गाळून रडायला लागला (आता ते अश्रू तरी ओरिजिनल होते का ? ) तर बाकी जनतेने काय करायचं ? निवडणूकांच्या वेळी हेच नेते "आपल्या वार्डाचे खंबीर आणि धडाडीचे नेतृत्व" असते. मला इथं राजकारणाविषयी बोलायची इच्छा बिलकूल नाही.. खरं तर हा लेखही लिहायची इच्छा नव्हती... पण रहावलं गेलं नाही...
आता कोणी गांधीवादाचं नाव काढेल तर त्यानेच अतिरेक्यांसमोर खादी घालून जावं ... आणि जाउनच दाखवावं इथं निसत्या चर्चा करू नयेत. तर मग त्यांच्यात खरोखर गट्स आहेत असं मान्य करायला हरकत नाही.
एक पुर्णपणे वैयक्तिक विचार : कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. माहित आहे ह्यात आपलं पण नुकसान आहे. परंतू जर हे एकदाच केलं तर पुढचा त्रास टळेल.आर्थिक फटका बसेल पण भारत त्यातूनही सावरेल. नाही तरी ह्या आतंकवादी कारवायांमुळे किती नुकसान होतंय याचा ठोकताळाच नाहीये.
रोज मरण्यापेक्षा एकदाच राजासारखे जगून मरावे
ता.क. कोणी ही पर्सनली घेउ नये. कारण घेतलं तरी मला फरक पडत नाही.
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 1:39 am | आपलाच गम्पु
आगदि मनातल बोललात भाऊ!!!!
1 Dec 2008 - 2:06 am | शितल
कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. माहित आहे ह्यात आपलं पण नुकसान आहे. परंतू जर हे एकदाच केलं तर पुढचा त्रास टळेल.आर्थिक फटका बसेल पण भारत त्यातूनही सावरेल. नाही तरी ह्या आतंकवादी कारवायांमुळे किती नुकसान होतंय याचा ठोकताळाच नाहीये.
रोज मरण्यापेक्षा एकदाच राजासारखे जगून मरावे
अगदी बरोबर आहे टार्या तु़झे.
1 Dec 2008 - 2:15 am | कपिल काळे
हो आता थोडाफार आवाज करण्याची गरज आहे. संसदेवरील हल्ल्यानंतर जसे सैन्य जमवले होते तेव्हा अमेरिकेसकट सगळ्यांची फाटली होती. पण आता हवामान लक्षात घेता हे शक्य नाही. कडाक्याच्या हिवाळा, बर्फ पडतोय पश्चिम सीमेवर.
मग काय करता येइल? अतिरेकी समुद्रातून आले. मग आपण समुद्रातच कराचीपासून १२ मैल दूर ( तिथे पाकड्यांची हद्द संपते) दादागिरी करु शकतो. पश्चिम सीमेवर हवामान साथ देत नसेल तर हा पर्याय आहेच की. नेव्ही आपली तेवढी सक्षम आहेच. नक्की जरब बसेल
नाग डसला नाही तर नुसता फणा काढून फुस- फुस्स आवाज तरी काढतोच की. मांजर हल्ला करायच्या आधी केस फुलवून गुर्र करतेच.
आपण एवढे जरी केले तरी खूप होइल.
http://kalekapil.blogspot.com/
1 Dec 2008 - 3:35 am | एक
हे शक्य आहे करायला आणि मी सरूवात कधीच केली आहे.
१. पाक कलाकारांच्या कार्यक्रम न बघणे.
२. पाकिस्तानी हॉटेल्स मधे न जाणे.
३. पाकिस्तानी कलिग्जबरोबर जरूरी पुरतच बोलणे.
याने त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण मला काहितरी केल्याचं समाधान मिळेल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे घरात घुसून (देशात) मारता सध्या तरि येणार नाही (संधी मिळाली तर अवश्य मारीन) पण वर दिलेल्या गोष्टी तरी नक्कि हातात आहेत. सुरुवात त्याने करू.
वर दिलेल्या गोष्टींमुळे काही भारतीयांचीच (?) मनं दुखावतील. (दूर्दैव दुसरं काय?)
1 Dec 2008 - 10:26 pm | वर्षा
पूर्ण सहमत.
मला जपानमध्ये असताना नाईलाजाने पाक हॉटेलमध्ये जावं लागत असे. (टीमबरोबर....टिममध्ये मुस्लिम मेजॉरिटी होती! त्याखालोखाल ख्रिश्चन...आम्हीच तिथे अल्पसंख्य होतो) पण मी एकटी असे तेव्हा पाकऐवजी नेपाळी हॉटेलमध्ये जाणं पसंत करत असे.
पाकशी खेळ/कला/संगीत आदी क्षेत्रातले संबंधही पूर्ण तोडले पाहिजेत.
पण हे आपल्याकडे कधीच घडणार नाही!!!!:(
1 Dec 2008 - 5:39 am | प्राजु
म्हणजे खरोखर एक बॉम्ब पडल्यासारखा आहे. बोथट झालेल्या मुर्दाड मनावर एक बॉम्ब फेकून त्याचे तुकडे तुकडे करावे तसा आहे तुझा लेख.
शेवटचा पॅरा आवडला जास्ती.
आता कोणी गांधीवादाचं नाव काढेल तर त्यानेच अतिरेक्यांसमोर खादी घालून जावं ... आणि जाउनच दाखवावं इथं निसत्या चर्चा करू नयेत. तर मग त्यांच्यात खरोखर गट्स आहेत असं मान्य करायला हरकत नाही.
जबरदस्त. भारताला एका अतिशय खंबीर आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे. कोणाल पटो वा न पटो पण इंदिरा गांधींसारख्या नेतृत्वाची गरज आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Dec 2008 - 6:45 am | स्वप्निल..
एकदम पटला तुझा लेख..तुझ्याशी पुर्णपने सहमत..
स्वप्निल
1 Dec 2008 - 6:51 am | llपुण्याचे पेशवेll
सहीच रे टार्या.. मस्तच लिहीले आहेस. पण अजूनही कोणीही त्याला हा योग्य मार्ग नाही.
किंवा कडव्या हिंदूनी सुधारायला पाहीजे अशी प्रतिक्रिया दिली नाही याचे आश्चर्य वाटते.
:O
पुण्याचे पेशवे
1 Dec 2008 - 8:51 am | अनिल हटेला
टा-या अगदी मनातलं बोललास बघ...
अगदी संसदेत घूसून हल्ला केला...
मुंबईत राडा घातला...आणी आपण काय करतोये.....
नेभळट पणाचा अंत आहे हा....
माझे चीनी कलीग तर नात -नाय ते बोलत होते.
म्हणे तुम्हा लोकाना अशा हल्ल्याची सवयच झालेली असेल नाही.....
काय बोलणार...
जगातले ३ क्रमांकाचे लष्कर ,भावी महासत्ता ...
आणी चाललये काय ,तर आमच्या घरात घूसून हल्ला करायची ह्या लोकाची हिंमत...
कहर म्हणजे इतके होउन देखील हे सगळे आम्हाला काही न करावे म्हणुन बौद्धीक दिलं जातये...
X-(
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
1 Dec 2008 - 10:14 am | खरा डॉन
टार्या मस्तच लिवलं आहेस रे. च्यायला सकाळी सकाळी हे वाचुन आपल्या पण डोक्याची मंडई झाली. अतिरेक्यांशी गांधीगिरी करा, अतिरेकी कुणाला म्हणावे ह्यावर कौल घ्या..काय मूर्खपणा चालला आहे हा? गांधीबाबा आता असता तर अतिरेक्यांना फुले घेउन गेला असता का?
खरा डॉन
1 Dec 2008 - 10:54 am | बकासुर
टारझन,
फारच छान लिहिलंय आपण.
पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. पूर्णत: सहमत.
काल एनडीटीव्ही वर " वी द पीपल" या कार्यक्रमातील चर्चा इथे पहा. आपल्याच मधील एक जण पाकिस्तानचे नाव घेऊ नका. पाकचा काही संबंध नाही.असे ओरडताना दिसेल.
चर्चा बरीच मोठी आहे.(५६ मिनिटांची) मी उल्लेखलेला भाग ४६व्या मिनिटापासून सुरु होतो.
शेवटी आपल्यातीलच घरभेदे आधी शोधले पाहीजेत.
1 Dec 2008 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार
टारु तुझ्याशी पुर्णपणे सहमत रे !
"मला काय त्याचे ?" हि व्रुत्ति संपलीच पाहिजे, तरच काहि आशा आहे ! अरे त्या छोट्याश्या थायलंड मधले नागरिक (कारण काहिहि असो) जर सरकार विरुद्ध रस्त्यावर येउ शकतात तर तुम्हि आम्हि ह्या पवशेर अर्धा किलो अतिरेक्यांच्या विरुद्ध उभे राहु शकत नाहि का ?
जंगलच्या राजकुमारच्या जबरदस्त लेखाला परिकथेतिल राजकुमाराचा जबरदस्त पाठिंबा !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Dec 2008 - 11:49 am | वेताळ
मस्त लिहिले आहेस. बौध्दिक वाझोंट्या चर्चा करण्यापेक्षा आपल्या नेभळट पंतप्रधानानी एकाद्या धाडसी निर्णय घ्यावा.
पण शक्यता कमी आहे.पुढच्या जन्मी भारतात परत जन्म घेण्यावेळी नक्कीच विचार करावा लागणार.
वेताळ
1 Dec 2008 - 11:49 am | वेताळ
मस्त लिहिले आहेस. बौध्दिक वाझोंट्या चर्चा करण्यापेक्षा आपल्या नेभळट पंतप्रधानानी एकाद्या धाडसी निर्णय घ्यावा.
पण शक्यता कमी आहे.पुढच्या जन्मी भारतात परत जन्म घेण्यावेळी नक्कीच विचार करावा लागणार.
वेताळ
1 Dec 2008 - 11:54 am | मदनबाण
टार यार अगदी योग्य लिहले आहेस तु..आता धडक कारवाई झालीच पाहिजे !!!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
7 May 2010 - 9:35 am | अप्पा जोगळेकर
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
हम्म्म्म. 'सहा सोनेरी पाने' वाचलंय वाटतं.
1 Dec 2008 - 12:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पंतप्रधान, सैन्य, झालंच तर गांधीवादी यांना काय करावं ते तर अगदी उत्तम लिहिलंस. आता माझा प्रश्न (अ मिलियन डॉलर क्वेश्चन?):
टारू, तू स्वतः काय करणार रे?
(नाव फक्त टारूचंच घेतलेलं असलं तरीही प्रत्येकाने तिथे वैयक्तिक पातळीवर विचार करावा आणि शांत डोक्यानेच उत्तर द्यावं अशी अपेक्षा!)
1 Dec 2008 - 12:18 pm | एक
त्यात लिहिलेल्या गोष्टई तर नक्की करू शकतो की.
जमल्यास इतरांना पण तसं करायला कन्विन्स करू.
-(एकेकाळचा पाकिस्तानी हॉटेल मधल्या बिर्याणीचा फॅन पण आता कट्टर विरोधक)
1 Dec 2008 - 12:29 pm | धमाल मुलगा
एक प्रसंगः
मुन्नाभाईला सुरक्षारक्षक एक थप्पड मारतो...
त्याला मारायला सर्किट (मिपावरले नव्हे!) धावतो तर मुन्ना त्याला अडवतो... म्हणतो, " बापूने बोला है कोई एक गाल पे थप्पड मारे तो दुसरा गाल आगे करो" असे म्हणुन दुसरा गाल पुढे करतो...
रक्षक त्याला दुसरी लगावतो,आणि ताबडतोब मुन्नाभाई त्या रक्षकाला एकच अशी ठेऊन देतो की तो रक्षक कोलमडून पडतो.
मुन्ना म्हणतो, "बापूने तो ये बताया ही नहीं के दुसरा थप्पड मारा तो क्या करने का!"
सध्यातरी हताशपणे मिडिया, राजकारणी आणि वैचारिक अतिरेक्यांचा नंगानाच पहात बसलोय..काहीतरी करायचंय पण नक्की काय हे सुचत नाहीय्ये....
कोणि सांगेल का काय करता येईल माझ्यासारख्या फुटकळ सर्वसामान्य 'कॉमन मॅन'ला????
1 Dec 2008 - 1:08 pm | विनायक प्रभू
बरेच काही करु शकतो तुम्ही म्हणता तो सामान्य माणुस. पहिल्यांदा आपल्याला सामान्य समजायचे बंद करा.
मी काय करु शकतो हा संभ्रम पडणे हीच तर खरी शोकांतिका आहे.
1 Dec 2008 - 2:30 pm | धमाल मुलगा
प्रभुसर,
शोकांतिका नव्हे लाजिरवाणी गोष्ट म्हणा, पण अक्षरशः कळत नाहीये काय करता येऊ शकतं हे!
लाज वाटते स्वतःची, कारण अशा घटना घडतात आणि आम्हाला जागच येत नाही. एक नागरीक म्हणून काही लक्षांशाची तरी नैतिक जबाबदारी नक्कीच प्रत्येकावर आहे, माझ्यावरही आहेच, पण ती पार कशी पाडावी, काय केलं म्हणजे ते योग्य ठरेल ह्याची मात्र मुळीच खात्री वाटत नाही.
दुर्दैवानं स्वानुभव मात्र वेगळंच सांगतो.
1 Dec 2008 - 9:35 pm | रेवती
जे करता येण्यासारखं आहे ते.
कोणतेही पाकिस्तानी प्रॉडक्ट्स वापरत नाही.
त्यांच्या कलाकारांचे कोणतेही कार्यक्रम बघत नाही.
स्वत:ला सामान्य समजत नाही.
माझ्या आजूबाजूला जे काही चार दोन मुंबईकर आहेत त्यांच्या संपर्कात तीन दिवस होतो आम्ही.
त्यांचे कोणी मुंबईत कुठे तर कोणी परगावी अडकलेले होते.
अश्यावेळी गरज असते विचारपूस करण्याची.
पण आत्ताच लायब्ररीतून परत आले. तेथे काम करणार्या (अमेरीकन)बाईंनी जे घडलं त्याबद्दल खेद व्यक्त केला.
त्याक्षणी प्रचंड असहाय्य वाटलं. कारमधे बसले आणी काही सुचेना थरथर कापत नुसतीच बसून होते दोन मिनिटं.
रेवती
1 Dec 2008 - 1:41 pm | अनामिका
टारझनराव!
आमच्या मनातल्या भावनांना आणि विचारांना तुम्ही शब्दात मांडलत.
सध्या इथे गांधीवाद ,अहिंसा , निधर्मीवाद या वर फुकटची प्रवचन आणि जमल्यास जोडधंद्याच्या स्वरुपात खासगी शिकवण्या सुरु झाल्यात.
तुझ्या या रोखठोक विचारांवर प्रतिसाद देण्याची अनावर इच्छा आहे पण या विषयावर संयमी प्रतिक्रिया देणे अथवा तुझ्या या विचारांना अनुमोदन देताना गुळगुळीत मुळमुळीत लिखाण करण अशक्य आहे .
आता आर या पार की लढाईच अपेक्षित आहे................!
गांधीवाद समजुन घेण्याची ज्याची पात्रता आहे त्यालाच तो कळेल.............गांधिवाद आणि अहिंसा जर इतकी आपल्या देशातल्या लोकांच्या अंगात भिनली असती तर काय हवे होते?गांधीवाद व अहिंसेवर विश्वास असणार्यांची टक्केवारी या एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात किती आहे यावरुन समजुन जाणे योग्य नव्हे काय?
अवांतर-(माझी पात्रता मुळीच नाही आणि समजुन घेण्याची अथवा आचरणात आणण्याची इच्छा अजिबात नाही?तेंव्हा या विषयावर प्रवचन द्यायला कुणी खरडवही अथवा व्यनि चा वापर करु नये हि नम्र विनंती)
"अनामिका"
1 Dec 2008 - 1:57 pm | घाशीराम कोतवाल १.२
एक पुर्णपणे वैयक्तिक विचार : कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. माहित आहे ह्यात आपलं पण नुकसान आहे. परंतू जर हे एकदाच केलं तर पुढचा त्रास टळेल.आर्थिक फटका बसेल पण भारत त्यातूनही सावरेल. नाही तरी ह्या आतंकवादी कारवायांमुळे किती नुकसान होतंय याचा ठोकताळाच नाहीये.
रोज मरण्यापेक्षा एकदाच राजासारखे जगून मरावे
एक्दम ठोकलास टार्या जबर्या
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
1 Dec 2008 - 2:02 pm | ऋचा
टार्स मनातलं लिहिल आहेस...
>>पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा.
सहमत.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
1 Dec 2008 - 2:09 pm | कुंदन
>>आज त्यांची मान ताठ आहे, कोणी हल्ला करताना विचार करेल. अमेरिका पुर्ण अलर्ट आहेत.
आपण पुर्ण अलर्ट नाही आणि तिथेच तर आपण मार खात आहोत ना.
आजकाल तंत्रज्ञान बर्यापैकी स्वस्त झाले आहे ( उदा. सीसीटिव्ही , मेमरी , ब्रॉडबँड वगैरे) , त्याचा आपण सुरक्षेच्या कारणांसाठी योग्य तो वापर करुन घेत आहोत का?
राज्यकर्ते जनतेला आपापसात झुंजवत ठेवतात : कधी धर्माच्या नावावर , कधी जातीच्या तर कधी भाषेच्या. आणि त्या झुंजण्यातच लोकांना भुषण वाटते.
1 Dec 2008 - 2:10 pm | वेताळ
पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा.
सरकार कडे मला सैनिक म्हणुन बंदुक घेवुन देता आली नाही तरी चालेल. आपण स्व खर्चाने बंदुक आणु शकतो.
वरिल कामासाठी आपले पहिले नाव सैनिक म्हणुन घावे ही विनंती.
वेताळ
1 Dec 2008 - 7:32 pm | साती
अफजलसारख्या अतिरेक्यासाठी मानवी हक्क मागणार्या ह्युमन राईटवाल्यांना तू म्हटलेली ट्रिटमेंटच योग्य!
गांधिगिरी कुठं ,भाईगिरी कुठं ह्याचं भानच आजकाल फुक्कट सल्ले देणायांना उरलेले नाही.
पाकची पण कमाल आहे नाही, आपण त्यांना दम देण्याचा विचार करण्याअगोदरच "india should not give knee jerk reaction" अशी उलटी धमकी देवून मोकळे झाले.
एक पुर्णपणे वैयक्तिक विचार : कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा.
सहमत.हा पूर्णपणे वैयक्तिक विचार मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आहे.
(त्यापेक्षा, खादी घालून गांधीवादी सोडूया का छावणीवर? अतिरेकी लगेच भजने म्हणायला लागतील!)
साती
1 Dec 2008 - 9:36 pm | रेवती
अगदी मनातलं बोललास.
रेवती
1 Dec 2008 - 9:54 pm | लिखाळ
टारोबा,
चांगला आहे लेख...
दोन्ही कडून बोलणे आणि बुद्धीभेद करणे ही आपल्या कडच्या अनेक 'विचारवंतां'ची सवय आहे.
-- लिखाळ.
1 Dec 2008 - 9:59 pm | llपुण्याचे पेशवेll
कृतीशून्य विचारवंत म्हणतात त्याना.
पुण्याचे पेशवे
12 May 2010 - 7:16 pm | राघव
लिखाळशेठशी सहमत.
टार्या, लेख "खुपसला".
मी त्यावेळेस लिहिलेली ही कविता आठवली - http://www.misalpav.com/node/4940
त्यावेळच्या परिस्थितीत अजून फारसे काही बदललेले नाही असे खेदाने म्हणावे लागते.
राघव
1 Dec 2008 - 9:58 pm | विनायक प्रभू
मी बाबा गांधीवादी आहे. मी सर्व अतिरेक्यांना पळिपात्र घेउन संध्या कशी करायची शिकवणारे वर्ग काढणार आहे. त्यामुळे त्यांना जन्नत मधे प्रवेश मिळेल.
26 Oct 2010 - 9:09 am | गांधीवादी
वर्ग सुरु झालेच असतील. प्रवेश मिळेल काय ?
1 Dec 2008 - 10:19 pm | चतुरंग
एक पुर्णपणे वैयक्तिक विचार : कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. माहित आहे ह्यात आपलं पण नुकसान आहे. परंतू जर हे एकदाच केलं तर पुढचा त्रास टळेल.आर्थिक फटका बसेल पण भारत त्यातूनही सावरेल. नाही तरी ह्या आतंकवादी कारवायांमुळे किती नुकसान होतंय याचा ठोकताळाच नाहीये.
रोज मरण्यापेक्षा एकदाच राजासारखे जगून मरावे
एकच बदल - पाकिस्तानात घुसायचे कारण नाही. आपली क्षेपणास्त्रे आहेत ना. पृथ्वी, अग्नी, नाग, त्रिशूल काय उगीच तयार केली आहेत का?
(आतल्याआत जळत असतील ती क्षेपणास्त्रे कधी एकदा जायला मिळतय म्हणून!!)
चतुरंग
12 May 2010 - 1:21 pm | Manoj Katwe
त्यांनी सुद्धा क्षेपणास्त्रे लाऊन ठेवली आहेत. आणि चीन सुद्धा वाटच पाहत आहे. सगळी क्षेपणास्त्रे एक दमात टाकून मोकळा होईल तो dragon . रोज रोज टाचणी टोचून टोचून घायाळ तर केलं आहेच पाकड्यांनी. चीन तर भालाच खुपसेल. आणि हे राजकारणी कुत्रे काय तुम्हा आम्हाला वाचवायला थोडीच येणार आहेत. ते युद्धाची खबर लागताच ***** ला पाय लाऊन पळून जातील कुठतरी दूर. त्यांच्या बायका पोर सुरक्षित आहे म्हणजे मिळवलं. हे असंच जगायचं . जर कोणी क्रांती जरी करायची म्हटला तरी त्याला हे विचारवंत, राजकरणी देशद्रोही म्हणून त्याचा भेजा खाऊन टाकतील. त्याला संपवून टाकतील. अहो इथे पुण्यात आता गुणदान विरुद्ध बरा सुद्धा काढता येत नाही. सगळे नगरसेवक हे गुंडा आहेत. राजकारण म्हणजे चांगल्या लोकांचा काम नाही. आपल्या सारख्या लोकांनी हे असला कुठतरी , कुठल्या तरी संकेत स्थळावर आपलं राग व्यक्त करायचा. बस्स. इतकंच
12 May 2010 - 4:27 pm | विजुभाऊ
पुण्यात आता गुणदान विरुद्ध बरा सुद्धा काढता येत नाही
हे गुणदान काय प्रकरण आहे?
7 May 2010 - 11:19 am | Dipankar
सही टार्या पटले एकदम
7 May 2010 - 1:23 pm | सुखदा राव
तमाम पुनेकरान्च्या मनातल बोल्लात हो. मिपा वर नविन आहे. चुभुद्याघ्या.
7 May 2010 - 1:33 pm | सुकामेवा
चीन त्याचीच वाट बघतो आहे, कि कधी आपण सैन्य घुसवतो आहे पाकिस्तान मधी आणि त्याना चान्स मिळतो आहे.
7 May 2010 - 1:42 pm | पाषाणभेद
टारूशी एकदम सहमत. इस्रायल चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा.
12 May 2010 - 11:51 am | शिल्पा ब
काही वाट्टेल ते झाले तरी भारताला युद्ध परवडणारे नाही...एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला चीन, १/३ भारत मओवाद्यानी ग्रासलेला...एकीकडे सैन्य घुसवले कि दुसरीकडून हल्ला होणार...किती ठिकाणी एकदम पुरे पडणार...आणि रशिया सोडले तर प्रगत म्हणावे असे कोण आपल्या बाजूला आहे? अमेरिका, फ्रांस, इंग्लंड आपल्याला मदत करणार नाहीत...फारतर बोलबच्चान्गिरी करतील...आपले किनारे आणि सीमा कायम दक्ष ठेवणे आणि corruption कमी करणे हेच उपाय हातात आहेत सध्या..
कमीतकमी सरकारने पाकिस्तानला जरबेत ठेवावं...ते शक्य आहे...
सारखं गुळमिळित कशाला बोलायला हवं? पुळचट काँग्रेजी...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 12:25 pm | Pain
१) जोपर्यन्त अमेरिकेचा हात त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यन्त लष्कर काहिही करु शकत नाही. (स्वयंपूर्ण नसल्याने अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून आहोत.)
२) सर्व राजकारण्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवून उपयोग नाही.(भ्रष्ट, फक्त स्वत:चा फायदा )
३) सामान्य माणसे ( सभ्य, नोकरदार) काहीही करू शकत नाहीत.
12 May 2010 - 12:55 pm | Manoj Katwe
कोणीच काहीच करू शकत नाही, हीच तर खरी लोकशाहीची गम्मत आहे. भारताला संपूर्ण लोकशाही हा एक शाप आहे. हजारो भ्रष्ट लोकांनी लोकशाहीला पोखरून काढले आहे. भारत एक अशी इमारत आहे जिचे सगळे वासे पोखरले गेलेले आहेत. कधी ढासळून पडेल सांगता येत नाही.
12 May 2010 - 1:09 pm | मी ऋचा
X( X( X(
>>> आज जर माझा कोणी त्या हल्ल्यात गेला असता तर ? तर मग आपण लग्गेच काठ्या घेउन जागे झालो असतो.
मला तर वाटत(God forbid)पण स्वतःच कोणी गेल्यावरही जागे होण्याइतकी धमक आपल्यात उरणार नाही or उरलेली नाही.
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
12 May 2010 - 7:53 pm | शिल्पा ब
thanks to गांधीबाबा ....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 7:53 pm | शिल्पा ब
thanks to गांधीबाबा ....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 5:39 pm | बारक्या_पहीलवान
टार्या, एकदम मनातलं लिहिल आहेस.
लेख वाचुन रक्त् सळ्सळल रे. टारोबा, मिसळ पाव वर पहिल्याद्दा प्रतिक्रिआ देत आहे. लेख वाचुन राहवले गेले नाही. मी सौदित आहे आनि बघतो आहे कि सौदि राजाने जे कडक नियम लावले आहे त्यामुळे सगळे कसे घाबुरुन वैव्सथित राहतात. नथुराम गोड्से चा राग येतो, जे काम त्याने केले ते जरा आधी म्हन्जे ~५-१० वर्श लवकर आधि केले असते तर हि वेळ कदचित आली नसति. पण आता बोलुन काय फायदा?
- हिटलरप्रेमी .
14 Jul 2011 - 4:15 pm | नन्दादीप
<<<नथुराम गोड्से चा राग येतो, जे काम त्याने केले ते जरा आधी म्हन्जे ~५-१० वर्श लवकर आधि केले असते तर हि वेळ कदचित आली नसति. पण आता बोलुन काय फायदा?>>
+१....
.
.
.
(बाकी टार्याभाऊ फार फार वर्षांपूर्वी तुम्ही जे बोलून गेलात ते आजही पटत बर का....)
12 May 2010 - 8:15 pm | डावखुरा
बारक्या पहिलवान सहमत आहे आपल्याशी.....
[नथुराम गोड्से चा राग येतो, जे काम त्याने केले ते जरा आधी म्हन्जे ~५-१० वर्श लवकर आधि केले असते तर हि वेळ कदचित आली नसति.]
बाकि लेखावर आधि प्रतिक्रिया दिली आहेच...
---------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
26 Oct 2010 - 9:11 am | गांधीवादी
काय लिव्हलय !
26 Oct 2010 - 11:14 am | आप्पा
सर्व प्रतिसाद बारकाईने वाचले. नेहमीचे हिरीरीने वादात उतरणारे प्रतिसादक सापडले नाही.
टारझन भाऊ मनातल बोललात. पुर्ण सहमत.
26 Oct 2010 - 1:39 pm | मितभाषी
मेनबोर्डाव टार्याचा लेख पाहुन टारुशेठचे पुनरागमण झाले कि काय असे वाटले.
लेख मस्तच्....नेहमीप्रमाणे.....
26 Oct 2010 - 9:54 pm | संजय अभ्यंकर
टारझनचे लिखाण दिसले आणी वाटले की टारझन आला.
15 Jul 2011 - 9:51 am | पिलीयन रायडर
मध्यंतरी एक विचार वाचला होता फेस्बुक वर.. प्रत्येकानि एक वाईट माणुस / भ्रष्ट राजकारणी मारायचा... मग जेल मध्ये जायचं... फाशी झाली..गुड्..जन्मठेप झाली... वेरी गुड...( उलट पण म्हणु शकतो)
तेव्हा हे जरा अतिरेकी वाटलं होतं...
पण आता वाटतय की असं काही करायची वेळ लवकरच येणार आहे.....
15 Jul 2011 - 10:25 am | गवि
रंग दे बसंती पाहिला असावा.. :) ....(ह.घे. गंमतीने म्हटले आहे..)
बादवे. कल्पना चांगली आहे. फक्त एक समस्या आहे.
वाईटांना आणि राजकारण्यांना मारण्याचा असा प्रोजेक्ट फक्त चांगली माणसेच हाती घेऊ शकतील.
आणि
चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... :)
15 Jul 2011 - 11:01 am | नितिन थत्ते
>>चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... Smile
इतकंच नाही तर तो १ चांगला तुरुंगात आणि बाकी ९८ वाईट लोक बाहेर फिरतायत.
15 Jul 2011 - 11:34 am | पिलीयन रायडर
मग एक नाही ग्रुप ग्रुप नि मारायचे... किंवा मारुन मग लपायच... ते आप्ल्या देशात मुळीच अवघड नाही...