अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)या स्टीफन कोवे यांच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे असे वाटते? आयुष्य कसे असावे? या आयुष्याचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तर उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करूनच आज घडवावा. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय, आरोग्यवान काया, सक्षम व सुसंस्कृत बुद्धी व समाजसुधारक व संस्कृतीप्रधान व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे!
पण असे ध्येय ठरवण्यापूर्वी पण एक अंदाज घेता यावा म्हणून काही तथ्ये आपणासमोर मांडतोय, पटतंय का बघा!
आपल्या बऱ्याच धार्मिक ग्रंथात लिहिल्याप्रमाणे अनेकांनी या जगात सुखी संसार करून, नातू/पणतूसोबत हसत खेळत जगत, चारी पुरुषार्थ पूर्ण करत आनंदाने जीवन जगले आहे. उदा:
श्रीमद्भागवद्पुराणम: एकादश स्कंध, अध्याय:६ श्लोक:२५
यदुवंशेऽवतीर्णस्य भवत: पुरुषोत्तम ।
शरच्छ्तं व्यतीयाय पंचविशाधिकं प्रभो ॥
अर्थात
(ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हणतात) पुरुषोत्तम सर्व शक्तिमान प्रभो! आपल्याला यदुवंशात अवतार धारण करून एकशेपंचवीस वसंत ऋतू व्यतीत केले आहेत.
श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग श्लोक ९७
(या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमुनि पुढील वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल)
दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ।
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥
अर्थात
अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील.
(कृपया लक्षात घ्यावे, रामायणकाळी असलेली कालगणना ही वेगळ्या पद्धतीची असल्याने व त्याप्रमाणे प्रभृरामांनी वयाच्या किमान ७०वर्षापर्यंत राज्य केले असावे, असा अंदाज आहे)
The Bible Society of India प्रकाशित
पवित्र शास्त्र या ग्रंथातील "उत्पत्ती" या जुन्या करारातील
५:५ आदम एकंदर ९३० वर्षे जगला; मग तो मरण पावला,
९:२९ नोहा एकंदर ९५० वर्षे जगला; मग तो मरण पावला
११:३२ तेरहाचे वय २०५ वर्षाचे होवून तो हरण येथे मरण पावला
२५:७ अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे १७५ होती.
३५:२८,२९ इसाहाकाचे वय १८० वर्षाचे होवून, त्याचे प्राणोत्क्रमण झाले
४७:२८ याकोबाचे (इस्रायलचे) वय १४७ वर्षाचे झाले
५०:२६ योसेफ ११० वर्षाचा होऊन मृत्यू पावला.
ज्योतिषशास्त्रात पूर्वापार चालत असलेली "विंशोत्तरी दशा पध्दती" चे जनक महर्षी पराशर ऋषींनी मनुष्याचे आदर्श आयुर्मान हे १२० वर्षाचे आहे हे मानूनच तयार केली गेली आहे, जी आजही उपयुक्त आहे.
आजच्या घडीला पाहिले तरी १०० वर्षाच्या पुढे जगणारे भाग्यवान माणसेही आहेत.
उदाहरणादाखल गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार गेल्या महिन्यापर्यंत जिवंत असणारी Misao Okawa ह्या वयाच्या ११७वर्षे जगल्या.
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३ श्लोक २१
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, 'सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'.
त्याप्रमाणे आपण ह्या सर्व लोकांच्या काही चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या तर आपल्याही आयुष्याची दोरी बळकट होऊ शकेल व आपण सारे एक साथ म्हणू शकू या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
प्रतिक्रिया
13 Apr 2015 - 10:59 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी....
आता वाचीन सवडीनी
13 Apr 2015 - 11:20 am | जेपी
मी....
(धागाप्रतिबंधात्मक उपायाच्या शोधात) जेपी
13 Apr 2015 - 11:52 am | अजया
=))
13 Apr 2015 - 12:52 pm | सस्नेह
सापडला की मलापण सांगा.
13 Apr 2015 - 11:18 am | त्रिवेणी
माझ्या छोट्याशा मेंदुला नाही झेपत आहे ही मालिका तुमची.
13 Apr 2015 - 12:48 pm | सस्नेह
मेंदू वाढव. कसं ते माहिती नसेल तर व्यनि कर ..मला गं ! +D
13 Apr 2015 - 2:58 pm | काळा पहाड
मग कवटी पण वाढवायला पाहिजे मेंदू मावायला.
तिचं वजन पेलवायचं तर एक तर मान जाड केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे रीढ की हड्डी आणखी जाड करायला पाहिजे.
म्हणजे जास्त कॅल्शियम इनटेक झाला पाहिजे.
म्हणजे तो पचवण्यासाठी किडनी जास्त परिणामकारक झाली पाहिजे.
मोठ्या मेंदू ला जास्त रक्त
त्यासाठी हृदयाची कपॅसिटी वाढवायला लागणार.
मेंदूला जास्त उर्जा लागणार आणि त्यानं काम जास्त केलं की तो जास्त लवकर गरम होणार.
म्ह्णजे न्युरल नेटवर्क मध्ये बदल करणं आलं.
मोठ्या मेंदूला ज्यास्त अन्न किंवा जास्त अश्वशक्ती देणारं अन्न लागणार.
त्यांचं आधी प्लॅनींग करून मग एक चेकलिस्ट बनवली पाहिजे.
मग एक डॉक्टरांची टीम, एक फिजिऑलॉजीस्ट, एक प्रोजेक्ट मॅनेजर, एक नेटवर्कींग वाला (न्यूरल नेटवर्क साठी) इत्यादी इत्यादी लागतील.
या सर्व क्रियांचे अपेक्षित उपपरिणाम आणि त्यांच्यावर होणार बदल साखळी परिणामाप्रमाणे आहेतच. तेव्हा त्यासाठी एक संशोधकांची टीम लागणारच. त्यात उर्जानिर्मीती संशोधकांपासून परिवहन संशोधकापर्यंत सगळेच जण येतील.
खर्च परवडेल का विचारा त्यांना.
13 Apr 2015 - 5:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण माणसाचा मेंदू अधिकाधिक लहान होत चालला आहे याचे काय ? ;)
मुख्य म्हणजे आदिमानवाच्या काही प्रजातींत (Cro-Magnon) आधुनिक मानवापेक्षा जास्त मोठा मेंदू होता, पण त्या आधुनिक मानवापेक्षा जास्त हुशार नव्हत्या ! त्याचे काय ? :)
13 Apr 2015 - 11:07 pm | काळा पहाड
त्यांच्या 'वळ्या' (सरफेस एरिया) कमी होत्या. शिवाय तो मेंदू व्हर्जन ०.१ होता. सध्या १४.३ व्हर्जन चालू आहे. बदल होणारच ना. बाकी आपला ब्रेन छोटा आणि अधिक उत्क्रांत होतच जाणार आहे. मी फक्त फिजिकल साईझ मोठा झाला तर काय होईल हे सांगितलं. मोठा म्हणजे पॉवरफुल नै कै. नैतर टाटाचा ट्रक फेरारी पेक्षा वेगात धावला नस्ता का?
13 Apr 2015 - 11:53 am | पिलीयन रायडर
ते सगळं खरंय.. पण ह्यात "रोगप्रतिबंधात्मक उपाय" कुठे आहेत?
13 Apr 2015 - 12:09 pm | नाखु
तुम्हाला सापडले की आम्हाला सांगा आम्ही किमान वयाची ७५ तरी गाठण्यासाठी उ@@@@@@@@@@@पाय करू.
पिरा तै धागाकर्त्याला विचारले अस्ते पण काय करणार वाचक "व्यनी" ला घाबरतो ना!!!!
13 Apr 2015 - 12:22 pm | अत्रुप्त आत्मा
@ सगळं खरंय.. पण ह्यात "रोगप्रतिबंधात्मक उपाय"
कुठे आहेत?>> तेच तर म्हणतोय मी ही .. गेल्या भागापासून! प्रॉडक्ट कुठ्ठाय!?
13 Apr 2015 - 12:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही व्यनि करा. तुम्हाला प्रोडक्ट, मार्केटींग स्किम, कमिशण वगैरेंची ब्रोशर्स सुद्धा मिलतील ;)!!!
13 Apr 2015 - 12:13 pm | विशाखा पाटील
दुर्धर रोग दिसतोय. एवढे उपाय करून काहीही फरक नाही. अवघड आहे.
13 Apr 2015 - 12:18 pm | पलाश
बोजड माहितीच्या वजनाने अवघड झालेला लेख!!
13 Apr 2015 - 12:32 pm | प्राची अश्विनी
काहिही काय लिहिता हो?
असले लेख त्या अदितीचे लोकमत मधील मत बनण्यास कारणीभूत ठरतात.
13 Apr 2015 - 12:45 pm | एस
अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)या स्टीफन कोवे यांच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्यालेखमालेचे ध्येय काय असावे असे वाटते? आयुष्यलेखमाला कसेकशी असावेअसावी? या आयुष्यालेखमालेचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तर उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचामिपाकरांच्या अभिप्रायाचा विचार करूनच आज जिलबी घडवावापाडावी. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय, आरोग्यवान काया, सक्षम व सुसंस्कृत बुद्धी व समाजसुधारक व संस्कृतीप्रधानसमाज-तापहीन व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे!
13 Apr 2015 - 1:15 pm | पॉइंट ब्लँक
+१००
13 Apr 2015 - 12:53 pm | नंदन
आता या वाक्याची माहिती अजूनच पटते, नै?
अवांतर - मौनाच्या महत्त्वावर तासभर व्याख्यान देणारे बाबा बर्वे आठवले ;)
13 Apr 2015 - 2:22 pm | अजया
जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी तयार करावी लागणार.कशी ते माहिती करुन घेण्यासाठी व्यनि करा.
13 Apr 2015 - 2:27 pm | बॅटमॅन
लस??? दॅट इज़ सोऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ वेस्टर्न बरंका!
एखादा काढा किंवा आसव असेल तर बघा. ;)
13 Apr 2015 - 2:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रेसिपी आणि फोटो व्यनि करा. आणि शक्यतो अंड घालुन केली असेल तर उत्तम.
13 Apr 2015 - 2:31 pm | जेपी
मला बिगर अंड्याची हवी...
13 Apr 2015 - 2:32 pm | अत्रन्गि पाउस
चालणार नाही असं म्हणताय का ??
13 Apr 2015 - 2:39 pm | नाखु
(छोटी लघु नव्हे) शंका.
काढ्यात अंडे हवे की काढाकर्त्याने अंडे ....
निरागस नाखु
13 Apr 2015 - 4:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
निरागस =)) =)) =)) =)) =))
आवडीप्रमाणे. अंडं घालुन मग काढ्यात घालायलाही मंडळाची ना नाही.
13 Apr 2015 - 4:57 pm | काळा पहाड
अंड की अंडं?
13 Apr 2015 - 5:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अंड चुकुन पडलं टिंब ;)
13 Apr 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा
13 Apr 2015 - 10:29 pm | काळा पहाड
खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द वेगळ्या 'गोष्टी' साठी वापरला जातो.
13 Apr 2015 - 10:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जौन दे ओ. मुद्दा कळला ना बस्स!!! =))
13 Apr 2015 - 2:33 pm | प्रसाद गोडबोले
अत्यंत अभ्यासपुर्ण लेख !
शुभेच्छा !!
अवांतर : ह्या आयडीच्या रुपाने राहुल गांधीच मिपावर आलेत काय हो ?
13 Apr 2015 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा
@राहुल गांधीच मिपावर आलेत काय हो ? >>
13 Apr 2015 - 5:49 pm | सूड
ही एक ओळ म्हणजे सबंध लेखाचं सार/सोलकढी/आंबट वरण आहे.
13 Apr 2015 - 10:02 pm | रामपुरी
तीन जिलब्या पडल्या पण अजून पाकाचा पत्ता नाही. पाकासाठी व्यनि करायचा आहे काय?
13 Apr 2015 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा
तेच तर अपेक्षित असतं अश्यांना! ;-)
इथे टाकुन ठेवला गळ
व्य.नि.त त्याचे मिळते फळ!!! :-D
13 Apr 2015 - 10:57 pm | काळा पहाड
पाकासाठीच्या जिलब्या वेगळ्या. या बिनपाकवाल्या आहेत. मधुमेहींसाठी.
14 Apr 2015 - 12:10 pm | बॅटमॅन
पाकव्याप्त प्रांतातले की काय तुम्ही ;)
14 Apr 2015 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
काय खोटी...आपलं ते हे.. कोटी केल्ये या खाटुकानी! हाय! हाय!
14 Apr 2015 - 9:10 am | नाखु
फक्त असा सोड्वा (उन्हाळी सुट्टीतील गुर्हाळी चर्हाट या पुस्तकातली आहे)
पाक डे आले
लेपा कडे आ
आले पाकडे
आलेपाक डे (आत्ता कसं बरोब्बर जमलं)
चला लागा आता या धाग्यातून कूटसंदेश शोधायला.
स्वगतः हे "पुष्प" एखाद्या पेन्शनरांचे व्याख्यानमालेत गुंफावे काय (झोपेसाठी अक्सीर इलाज)
14 Apr 2015 - 9:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला आलेपाकाची एक बडी वडी देण्यात येत आहे. =))
14 Apr 2015 - 9:52 am | पलाश
:))