Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आयुर्हित on Mon, 04/13/2015 - 10:52
रोगप्रतिबंधात्मक उपाय १; २ अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)या स्टीफन कोवे यांच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे असे वाटते? आयुष्य कसे असावे? या आयुष्याचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तर उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करूनच आज घडवावा. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय, आरोग्यवान काया, सक्षम व सुसंस्कृत बुद्धी व समाजसुधारक व संस्कृतीप्रधान व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे! पण असे ध्येय ठरवण्यापूर्वी पण एक अंदाज घेता यावा म्हणून काही तथ्ये आपणासमोर मांडतोय, पटतंय का बघा! आपल्या बऱ्याच धार्मिक ग्रंथात लिहिल्याप्रमाणे अनेकांनी या जगात सुखी संसार करून, नातू/पणतूसोबत हसत खेळत जगत, चारी पुरुषार्थ पूर्ण करत आनंदाने जीवन जगले आहे. उदा: श्रीमद्भागवद्पुराणम: एकादश स्कंध, अध्याय:६ श्लोक:२५ यदुवंशेऽवतीर्णस्य भवत: पुरुषोत्तम । शरच्छ्तं व्यतीयाय पंचविशाधिकं प्रभो ॥ अर्थात (ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हणतात) पुरुषोत्तम सर्व शक्तिमान प्रभो! आपल्याला यदुवंशात अवतार धारण करून एकशेपंचवीस वसंत ऋतू व्यतीत केले आहेत. श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग श्लोक ९७ (या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमुनि पुढील वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल) दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च । रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥ अर्थात अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील. (कृपया लक्षात घ्यावे, रामायणकाळी असलेली कालगणना ही वेगळ्या पद्धतीची असल्याने व त्याप्रमाणे प्रभृरामांनी वयाच्या किमान ७०वर्षापर्यंत राज्य केले असावे, असा अंदाज आहे) The Bible Society of India प्रकाशित पवित्र शास्त्र या ग्रंथातील "उत्पत्ती" या जुन्या करारातील ५:५ आदम एकंदर ९३० वर्षे जगला; मग तो मरण पावला, ९:२९ नोहा एकंदर ९५० वर्षे जगला; मग तो मरण पावला ११:३२ तेरहाचे वय २०५ वर्षाचे होवून तो हरण येथे मरण पावला २५:७ अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे १७५ होती. ३५:२८,२९ इसाहाकाचे वय १८० वर्षाचे होवून, त्याचे प्राणोत्क्रमण झाले ४७:२८ याकोबाचे (इस्रायलचे) वय १४७ वर्षाचे झाले ५०:२६ योसेफ ११० वर्षाचा होऊन मृत्यू पावला. ज्योतिषशास्त्रात पूर्वापार चालत असलेली "विंशोत्तरी दशा पध्दती" चे जनक महर्षी पराशर ऋषींनी मनुष्याचे आदर्श आयुर्मान हे १२० वर्षाचे आहे हे मानूनच तयार केली गेली आहे, जी आजही उपयुक्त आहे. आजच्या घडीला पाहिले तरी १०० वर्षाच्या पुढे जगणारे भाग्यवान माणसेही आहेत. उदाहरणादाखल गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार गेल्या महिन्यापर्यंत जिवंत असणारी Misao Okawa ह्या वयाच्या ११७वर्षे जगल्या. श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३ श्लोक २१ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, 'सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'. त्याप्रमाणे आपण ह्या सर्व लोकांच्या काही चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या तर आपल्याही आयुष्याची दोरी बळकट होऊ शकेल व आपण सारे एक साथ म्हणू शकू या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
  • Log in or register to post comments
  • 8875 views

प्रतिक्रिया

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 10:59

Permalink

मी.... आता वाचीन सवडीनी

मी.... आता वाचीन सवडीनी
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 04/13/2015 - 11:20

In reply to मी.... आता वाचीन सवडीनी by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मी....

मी.... (धागाप्रतिबंधात्मक उपायाच्या शोधात) जेपी
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 04/13/2015 - 11:52

In reply to मी.... by जेपी

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/13/2015 - 12:52

In reply to मी.... by जेपी

Permalink

तुम्हाला

सापडला की मलापण सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Mon, 04/13/2015 - 11:18

Permalink

माझ्या छोट्याशा मेंदुला नाही

माझ्या छोट्याशा मेंदुला नाही झेपत आहे ही मालिका तुमची.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/13/2015 - 12:48

In reply to माझ्या छोट्याशा मेंदुला नाही by त्रिवेणी

Permalink

मग,

मेंदू वाढव. कसं ते माहिती नसेल तर व्यनि कर ..मला गं ! +D
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 04/13/2015 - 14:58

In reply to मग, by सस्नेह

Permalink

मग कवटी पण वाढवायला पाहिजे

मग कवटी पण वाढवायला पाहिजे मेंदू मावायला. तिचं वजन पेलवायचं तर एक तर मान जाड केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे रीढ की हड्डी आणखी जाड करायला पाहिजे. म्हणजे जास्त कॅल्शियम इनटेक झाला पाहिजे. म्हणजे तो पचवण्यासाठी किडनी जास्त परिणामकारक झाली पाहिजे. मोठ्या मेंदू ला जास्त रक्त त्यासाठी हृदयाची कपॅसिटी वाढवायला लागणार. मेंदूला जास्त उर्जा लागणार आणि त्यानं काम जास्त केलं की तो जास्त लवकर गरम होणार. म्ह्णजे न्युरल नेटवर्क मध्ये बदल करणं आलं. मोठ्या मेंदूला ज्यास्त अन्न किंवा जास्त अश्वशक्ती देणारं अन्न लागणार. त्यांचं आधी प्लॅनींग करून मग एक चेकलिस्ट बनवली पाहिजे. मग एक डॉक्टरांची टीम, एक फिजिऑलॉजीस्ट, एक प्रोजेक्ट मॅनेजर, एक नेटवर्कींग वाला (न्यूरल नेटवर्क साठी) इत्यादी इत्यादी लागतील. या सर्व क्रियांचे अपेक्षित उपपरिणाम आणि त्यांच्यावर होणार बदल साखळी परिणामाप्रमाणे आहेतच. तेव्हा त्यासाठी एक संशोधकांची टीम लागणारच. त्यात उर्जानिर्मीती संशोधकांपासून परिवहन संशोधकापर्यंत सगळेच जण येतील. खर्च परवडेल का विचारा त्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 04/13/2015 - 17:07

In reply to मग कवटी पण वाढवायला पाहिजे by काळा पहाड

Permalink

पण माणसाचा मेंदू अधिकाधिक

पण माणसाचा मेंदू अधिकाधिक लहान होत चालला आहे याचे काय ? ;) मुख्य म्हणजे आदिमानवाच्या काही प्रजातींत (Cro-Magnon) आधुनिक मानवापेक्षा जास्त मोठा मेंदू होता, पण त्या आधुनिक मानवापेक्षा जास्त हुशार नव्हत्या ! त्याचे काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 04/13/2015 - 23:07

In reply to पण माणसाचा मेंदू अधिकाधिक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

त्यांच्या 'वळ्या' (सरफेस

त्यांच्या 'वळ्या' (सरफेस एरिया) कमी होत्या. शिवाय तो मेंदू व्हर्जन ०.१ होता. सध्या १४.३ व्हर्जन चालू आहे. बदल होणारच ना. बाकी आपला ब्रेन छोटा आणि अधिक उत्क्रांत होतच जाणार आहे. मी फक्त फिजिकल साईझ मोठा झाला तर काय होईल हे सांगितलं. मोठा म्हणजे पॉवरफुल नै कै. नैतर टाटाचा ट्रक फेरारी पेक्षा वेगात धावला नस्ता का?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 04/13/2015 - 11:53

Permalink

ते सगळं खरंय.. पण ह्यात

ते सगळं खरंय.. पण ह्यात "रोगप्रतिबंधात्मक उपाय" कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 04/13/2015 - 12:09

In reply to ते सगळं खरंय.. पण ह्यात by पिलीयन रायडर

Permalink

+१

तुम्हाला सापडले की आम्हाला सांगा आम्ही किमान वयाची ७५ तरी गाठण्यासाठी उ@@@@@@@@@@@पाय करू. पिरा तै धागाकर्त्याला विचारले अस्ते पण काय करणार वाचक "व्यनी" ला घाबरतो ना!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/13/2015 - 12:22

In reply to ते सगळं खरंय.. पण ह्यात by पिलीयन रायडर

Permalink

@ सगळं खरंय.. पण ह्यात

@ सगळं खरंय.. पण ह्यात "रोगप्रतिबंधात्मक उपाय" कुठे आहेत?>> तेच तर म्हणतोय मी ही .. गेल्या भागापासून! प्रॉडक्ट कुठ्ठाय!?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 12:55

In reply to @ सगळं खरंय.. पण ह्यात by अत्रुप्त आत्मा

Permalink

तुम्ही व्यनि करा. तुम्हाला

तुम्ही व्यनि करा. तुम्हाला प्रोडक्ट, मार्केटींग स्किम, कमिशण वगैरेंची ब्रोशर्स सुद्धा मिलतील ;)!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Mon, 04/13/2015 - 12:13

Permalink

दुर्धर रोग दिसतोय. एवढे उपाय

दुर्धर रोग दिसतोय. एवढे उपाय करून काहीही फरक नाही. अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on Mon, 04/13/2015 - 12:18

Permalink

बोजड माहितीच्या वजनाने अवघड

बोजड माहितीच्या वजनाने अवघड झालेला लेख!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 04/13/2015 - 12:32

Permalink

काहिही काय लिहिता हो?

काहिही काय लिहिता हो? असले लेख त्या अदितीचे लोकमत मधील मत बनण्यास कारणीभूत ठरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 04/13/2015 - 12:45

Permalink

जिलबीप्रतिबंधक उपाय - एक आणि शेवटचा!

अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)या स्टीफन कोवे यांच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्यालेखमालेचे ध्येय काय असावे असे वाटते? आयुष्यलेखमाला कसेकशी असावेअसावी? या आयुष्यालेखमालेचा शेवट कुठे होऊ शकतो? कसा होऊ शकतो? केव्हा होऊ शकतो? याचा विचार करून मगच त्यानुसारच आपण योग्य अशी सुरवात करावी. थोडक्यात काय तर उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचामिपाकरांच्या अभिप्रायाचा विचार करूनच आज जिलबी घडवावापाडावी. अर्थात असे या क्षणी ठरवण्यासाठी लागणारे योग्य मानसिक वय, आरोग्यवान काया, सक्षम व सुसंस्कृत बुद्धी व समाजसुधारक व संस्कृतीप्रधानसमाज-तापहीन व्यापक हेतू डोळ्यासमोर असणे ह्या सर्व गोष्टी मुलभूत गरजेचे आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on Mon, 04/13/2015 - 13:15

In reply to जिलबीप्रतिबंधक उपाय - एक आणि शेवटचा! by एस

Permalink

+१००

+१००
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 04/13/2015 - 12:53

Permalink

सबगोलंकारी

अंतिम परिणाम (ध्येय) मनात समोर ठेवून सुरवात करा (BEGIN WITH THE END IN MIND)
आता या वाक्याची माहिती अजूनच पटते, नै? अवांतर - मौनाच्या महत्त्वावर तासभर व्याख्यान देणारे बाबा बर्वे आठवले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 04/13/2015 - 14:22

Permalink

जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी

जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी तयार करावी लागणार.कशी ते माहिती करुन घेण्यासाठी व्यनि करा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/13/2015 - 14:27

In reply to जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी by अजया

Permalink

लस??? दॅट इज़ सोऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

लस??? दॅट इज़ सोऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ वेस्टर्न बरंका! एखादा काढा किंवा आसव असेल तर बघा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 14:28

In reply to जिलबीप्रतिबंधक लस मिपासाठी by अजया

Permalink

रेसिपी आणि फोटो व्यनि करा.

रेसिपी आणि फोटो व्यनि करा. आणि शक्यतो अंड घालुन केली असेल तर उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 04/13/2015 - 14:31

In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मला बिगर अंड्याची हवी...

मला बिगर अंड्याची हवी...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Mon, 04/13/2015 - 14:32

In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

वैदिक कृती

चालणार नाही असं म्हणताय का ??
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 04/13/2015 - 14:39

In reply to रेसिपी आणि फोटो व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

एक

(छोटी लघु नव्हे) शंका.
आणि शक्यतो अंड घालुन केली असेल तर उत्तम.
काढ्यात अंडे हवे की काढाकर्त्याने अंडे .... निरागस नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 16:45

In reply to एक by नाखु

Permalink

निरागस =)) =)) =)) =)) =))

निरागस =)) =)) =)) =)) =)) आवडीप्रमाणे. अंडं घालुन मग काढ्यात घालायलाही मंडळाची ना नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 04/13/2015 - 16:57

In reply to निरागस =)) =)) =)) =)) =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

अंड की अंडं?

अंड की अंडं?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 17:59

In reply to अंड की अंडं? by काळा पहाड

Permalink

अंड चुकुन पडलं टिंब ;)

अंड चुकुन पडलं टिंब ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/13/2015 - 18:05

In reply to अंड चुकुन पडलं टिंब ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 04/13/2015 - 22:29

In reply to अंड चुकुन पडलं टिंब ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द

खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द वेगळ्या 'गोष्टी' साठी वापरला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/13/2015 - 22:34

In reply to खरा उच्चार अंडं आहे. अंड शब्द by काळा पहाड

Permalink

जौन दे ओ. मुद्दा कळला ना बस्स

जौन दे ओ. मुद्दा कळला ना बस्स!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/13/2015 - 14:33

Permalink

अत्यंत अभ्यासपुर्ण लेख !

अत्यंत अभ्यासपुर्ण लेख ! शुभेच्छा !! अवांतर : ह्या आयडीच्या रुपाने राहुल गांधीच मिपावर आलेत काय हो ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/13/2015 - 17:32

In reply to अत्यंत अभ्यासपुर्ण लेख ! by प्रसाद गोडबोले

Permalink

@राहुल गांधीच मिपावर आलेत काय

@राहुल गांधीच मिपावर आलेत काय हो ? >> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 04/13/2015 - 17:49

Permalink

रोगप्रतिबंधात्मक उपायः

त्याप्रमाणे आपण ह्या सर्व लोकांच्या काही चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या तर आपल्याही आयुष्याची दोरी बळकट होऊ शकेल
ही एक ओळ म्हणजे सबंध लेखाचं सार/सोलकढी/आंबट वरण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Mon, 04/13/2015 - 22:02

Permalink

तीन जिलब्या पडल्या पण अजून

तीन जिलब्या पडल्या पण अजून पाकाचा पत्ता नाही. पाकासाठी व्यनि करायचा आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/13/2015 - 22:44

In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी

Permalink

तेच तर अपेक्षित असतं अश्यांना

तेच तर अपेक्षित असतं अश्यांना! ;-) इथे टाकुन ठेवला गळ व्य.नि.त त्याचे मिळते फळ!!! :-D
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 04/13/2015 - 22:57

In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी

Permalink

पाकासाठीच्या जिलब्या वेगळ्या.

पाकासाठीच्या जिलब्या वेगळ्या. या बिनपाकवाल्या आहेत. मधुमेहींसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/14/2015 - 12:10

In reply to तीन जिलब्या पडल्या पण अजून by रामपुरी

Permalink

पाकव्याप्त प्रांतातले की काय

पाकव्याप्त प्रांतातले की काय तुम्ही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 04/14/2015 - 12:20

In reply to पाकव्याप्त प्रांतातले की काय by बॅटमॅन

Permalink

काय खोटी...आपलं ते हे.. कोटी

काय खोटी...आपलं ते हे.. कोटी केल्ये या खाटुकानी! हाय! हाय! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 04/14/2015 - 09:10

Permalink

ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि

फक्त असा सोड्वा (उन्हाळी सुट्टीतील गुर्‍हाळी चर्‍हाट या पुस्तकातली आहे) पाक डे आले लेपा कडे आ आले पाकडे आलेपाक डे (आत्ता कसं बरोब्बर जमलं) चला लागा आता या धाग्यातून कूटसंदेश शोधायला. स्वगतः हे "पुष्प" एखाद्या पेन्शनरांचे व्याख्यानमालेत गुंफावे काय (झोपेसाठी अक्सीर इलाज)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 04/14/2015 - 09:28

In reply to ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि by नाखु

Permalink

ह्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला

ह्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला आलेपाकाची एक बडी वडी देण्यात येत आहे. =))
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on Tue, 04/14/2015 - 09:52

In reply to ही लेखमाला एक कूट प्रश्न आहे आणि by नाखु

Permalink

:))

:))
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com