बागकाम - एक छंद

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
21 Mar 2015 - 8:59 am

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

(फलांच्या प्रदर्शनांतले फोटो साभार)
बागकामाची आवड असणारे आपली हौस घराभोवती फळाफुलांची झाडे लावून पुरवतात. शहरातले, इमारतीच्या गच्चीवर अथवा बाल्कनीत फुलझाडे आणि पुदिना,आले,तुळस,गवतीचहा वगैरे उपयुक्त झाडे कुंड्यांतून वाढवतात. अगदी काहीच नाहीतरी खिडकीत एखादा मनिप्लांट असतो. आपल्या बागेतले फोटो इथे दाखवता येतील. काही प्रश्नही विचारता येतील.या छंदाविषयीची माहिती आणि फोटो एकाच ठिकाणी राहतील. आज गुढी पाडव्याच्या दिवशी सुरुवात करुया.

बाहेरगावी दहा दिवस गेल्यास बाल्कनीतली झाडे कशी जगवायची? मातीच्या कुंडीतले पाणी लगेच सुकते.- जी झाडे वाळली तरी चालतील -तुळस,सदाफुली,सोनटक्का,हळद,पुदिना अशी बाथरूममध्ये ठेवायची . महत्त्वाची झाडे गुलाब वगैरे,काही चमेली सायली वेली यांचे मातीपासूनचा एक फुट भाग ठेवून बाकी कापून टाकायचा .एक तासभर ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवायची. जी झाडे कुंडीतून काढून प्लास्टिक पिशव्यांत हलवता येतील ती आठ दिवस अगोदरच हलवावीत. पिशव्या पाणी अधिक दिवस धरून ठेवतात. एका ट्रेमध्ये या पिशव्या ठेवून दोन इंच पाणी ठेवावे. बाल्कनीच्या कट्ट्याच्या बाहेर लोखंडी ग्रिलमधल्या कुंड्या काढून आतमध्ये ऊन लागेल अशा जागी ठेवाव्यात.

प्रतिसादातले माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो-


३ भातावरच्या मुनिया

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

प्रतिक्रिया

माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो-
३ भातावरच्या मुनिया

पुदिना कसा लावावा :
बाजारातून काळसर हिरवी पाने दिसणारी पुदिनाची तजेलदार जुडी आणा. पाने काढून वापरा. आता या काड्या लावायच्या आहेत. एक पसरट ट्रे घेऊन त्याला चार बाजूला कडेला भोके पाडून टांगायची व्यवस्था करा एक इंच मातीचा थर पसरून त्यात मध्ये चारपाच इंच उंच आणि पाच सात इंच आडवी प्लास्टीक पिशवीत(तळाला भोके पाडून) थोडे गांडूळखत मिसळलेली माती भरून ठेवा. पिशवितल्या मातीवर पुदिना काड्या आडव्या पसरून ठेवा. त्यावर काड्या जरा झाकल्या जातील एवढी चाळलेली माती पसरून पाणी द्या. आठ दहा दिवसांत नवीन कोंब येतील आणि दीडमहिन्यात पुदिन्याचा ताटवा होईल.तीन तास सूर्यप्रकाश पुरेसा आहे कोणताही फवारा मारू नका.

पुदिन्याला पाणी रोज घालावे लागते, नाहीतर सुकून जातो असा अनुभव आहे. एकदा चांगला फुटला की मग फारशी काळजी घ्यावी लागत नाही.

छान उपक्रम आणि चांगली टिप. कोथिंबीर पण अशीच लावता येईल ना? तो फुलपाखराचा फोटो मस्त आलाय.

श्रीरंग_जोशी's picture

21 Mar 2015 - 9:24 am | श्रीरंग_जोशी

तुमची बाग खूप आवडली. पहिला अन फुलपाखराचा फोटो तर खासंच आहे.

वा! आमच्या बोन्सायप्रयोगांचे फोटो जमेल तितक्या लवकर टाकतो.

मस्त धागा.बागकाम माझा अतिशय आवडता छंद!लवकरच फोटो टाकते.

धाग्याचं माझं नाव काढून संपा मंडळ/webmaster/admin करून टाका.
===============

"स्वॅप्स
बोन्सायला आपल्याला
हवी त्या जागी नवीन फांदी
फुटायला हवी असेल तर T
budding ची युक्ती वापरता येईल
का?विशेषतः वडाच्या बोन्सायवर हा
प्रयोग करता येईल का?"

>>असे T Budding कलम बांधतांना यजमान झाडाचे वरचे शेंड्याकडचे कोंब छाटावे लागतात ते केले तरच कलम जगते. असे नाही करता येणार. यापेक्षा जिकडे फांदी हवी आहे तो भाग उजेडाकडे करा आणि इतर फांद्या कापडी पिशवीने अधूनमधून झाका.(खरडफळ्यावरून इथे आणले)

सर्वांचे बागेचे फोटो पाहायला खूप मजा येईल.

जुइ's picture

21 Mar 2015 - 7:59 pm | जुइ

खुप छान आहे बाग!!!

खेडूत's picture

21 Mar 2015 - 8:29 pm | खेडूत

मस्त धागा.
तुम्ही किंवा स्वॅप्स किंवा कुणीही....जमल्यास बोन्साय बाबत अधिक लिहा!

कंजूस's picture

21 Mar 2015 - 9:31 pm | कंजूस

खेडुत ,
भायखळयाच्या झाडे -फुलांच्या प्रदर्शनाच्या बोन्साय वर्कशॉपच्या दर्शकाचा फोन नंबरचा काही उपयोग होतो का पाहा

फोटोची लिँक इथे

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2015 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा

पहिला फोटू आणि ते फुलपाखरू मस्स्स्स्स्स्स्त आहे. ते फुलपाखरू म्हणजे, बालवाडीतून पहिलीत गेलेलं मूल्,वाढदिवसाला नवे कपडे घालुन शाळेला जाताना सारखं गोंदुश गोंदुश दिसतय. :)

पिलीयन रायडर's picture

23 Mar 2015 - 1:46 pm | पिलीयन रायडर

खुपच उपयुक्त धागा!! अजुन तरी मुलगा पान तोडत बसतो म्हणुन फार झाडं लावली नाहीयेत. पण तरीही इथे वाचनमात्र राहीन..

अप्रतिम...... फुलपाखरू मस्त......

Garden Planing/ Garden Designing काही कोर्सबाबत कोणास माहिती असल्यास जरूर कळवा......

कंजूस's picture

24 Mar 2015 - 4:23 pm | कंजूस

मॅक ->>Garden Planing/ Garden
Designing काही कोर्सबाबत>>
मुंबईत असाल तर कालिना (मुं युनि) येथे बागकाम झाडे वगैरेचा कोर्स (मराठी माध्यम,फी रु दहा हजार ,पाच सहली)आहे .एकदा का याची माहिती झाली की तुम्ही स्वत:च हे करू शकाल. आताच मागच्या बैचची परीक्षा झाली.
कोणती झाडे किती मोठी वाढतात, कधी फुलतात, फळतात आणि तुमच्या ठिकाणच्या वातावरणास योग्य आहेत हे कळले की काम सोपे आहे. एक व्यवसाय म्हणून करायचे झाल्यास प्रमाणपत्र असणे फायद्याचे आहे. नंतर जपान अथवा जर्मनीतल्या परीक्षा देता येतील .झाडांची सायंटिफिक नावे माहिती असल्यास संपर्कासाठी उत्तम.एक छंद म्हणून वरील कोर्स बराच चांगला आहे.

खूप धन्यवाद.... माहिती बद्दल बरेच दिवस शोध घेत होतो... पण माहिती मिळत नव्हती .... मी दोन वर्षाचा कृषी पदवीका कोर्स केला आहे.... पुढे काहीतरी करायच होत.... सध्या मुंबई महापालिकेत आहे..... पुन्हा एकदा धन्यवाद...

झाडांची माहिती आहेच तर आताच पुस्तके जमवायला सुरुवात करा. जागा आणि संपर्क हवाच.

सस्नेह's picture

25 Mar 2015 - 12:13 pm | सस्नेह

तुमच्या गॅलरीत तर माथेरानच अवतरलय की +)

छान कल्पना!! इथे जमेल तसे फोटो टाकते .

ब़जरबट्टू's picture

25 Mar 2015 - 4:58 pm | ब़जरबट्टू

बागकामाची लय हौस आहे.. पण जल्ला आमच्या बालकनीत सुर्यप्रकाशच येत नाय..
त्यामुळे फुलांचे ताटवे टिकत नाही... :(
सावलीत येणारी काही चांगली फुलझाडे सांगता येतील का ?

पॉइंट ब्लँक's picture

25 Mar 2015 - 10:13 pm | पॉइंट ब्लँक

एका चांगल्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा :)

पलाश's picture

26 Mar 2015 - 2:03 pm | पलाश

हे माझ्या बागेतले काही क्षण.
चित्रबद्ध करण्याचे श्रेय माझे नाही. फोटो इथे नीट टाकायलाही येत नव्हते. शिकण्याचा आत्ताच प्रयत्न केला. पाहू कसा आहे प्रयत्न ते. :)
टोमॅटो.
tomato fruit

जास्वंद
Hibiscus

रातराणी
Night Jasmine

अडुळशाच्या फुलांतला मध खायला आलेला (सनबर्ड) सूर्यपक्षी.
Sunbird on Adulasa tree

घरटे बांधण्यासाठी कापूस घेऊन चाललेला (टेलरबर्ड) शिंपीपक्षी.
Tailorbird with some cottonwool

(टेलरबर्ड) र्शिंपीपक्षी कुटुंब.
Tailorbird family

थोड्या वेळासाठी बागेत येऊन खाऊ खाउन जाणारी ही एक पाहुणी खारुताई.
kharutai

सविता००१'s picture

26 Mar 2015 - 2:10 pm | सविता००१

आहेत सगळे

पलाश's picture

26 Mar 2015 - 2:22 pm | पलाश

धन्यवाद.
ही बाल्कनीतली लहानशी बाग आहे. कॅमेर्‍याची कमाल आहे बाकी सगळी. :)

स्पंदना's picture

30 Mar 2015 - 7:49 am | स्पंदना

कमाल कॅमेरा पेक्षा, या पक्ष्या प्राण्यांना काहीतरी उपलब्ध आहे या बागेत याची आहे.
उगा कोणी येइल होय पलाश ताई?

स्पंदना, तुझे निरीक्षण अगदी १०० टक्के बरोबर आहे. :)
बाल्कनीतल्या या बागेत थोडा खाऊ आणि थोडं पाणी ठेवते. महत्वाचे म्हणजे घरी आणलेल्या भाजीपाल्याचा टाकाऊ भाग थोडा बारीक करून बादलीत भिजवून दुसर्‍या दिवशी गाळून ते पाणी झाडांना घालते. असे काही दिवस करून जो न विरघळणारा भाग रहातो तो मातीत मिसळते. शिवाय नीम तेल, हळद पूड, मिरची पूड हे कोमट पाण्यात विरघळवून ते कीटकनाशक म्हणून वापरते. गेली २७ वर्षे माझ्या बागेत रासायनिक खत / कीटकनाशक वापरलेले नाही. यामुळे या पक्षीमित्रांना लागणारा कीटकवर्गातला जिवंत खाऊ सुद्धा येथे उपलब्ध आहे. इथे फुलपाखरांचे अंडी, अळी, कोष, फुलपाखरू असे जीवनचक्र पाहायला मिळाले आहे. एकदा पक्षांनी घरटे बांधलेले पाहण्यात आले आहे. इथले नैसर्गिक वातावरण, अन्नपाणी आणि ही माणसे इजा करणार नाहीत असा वाटणारा विश्वास आमच्या बागेतली आकर्षणे असू शकतील.

सानिकास्वप्निल's picture

28 Apr 2015 - 12:39 pm | सानिकास्वप्निल

नीम तेल, हळद पूड, मिरची पूड हे कोमट पाण्यात विरघळवून ते कीटकनाशक म्हणून वापरते.

हि टिप नक्कीच लक्षात ठेवेन. फोटो सुंदर आहेत.

एस's picture

28 Apr 2015 - 1:08 pm | एस

धन्यवाद. मीही करून पाहतो.

कंजूस's picture

26 Mar 2015 - 5:01 pm | कंजूस

अप्रतिम फोटो पलाश!+10
तुमची बाग पाहून या छंदाकडे लोक वळणार हे नक्की.पक्षांचे डोळे छान आले आहेत.

पलाश's picture

26 Mar 2015 - 7:36 pm | पलाश

धन्यवाद!!

स्पंदना's picture

30 Mar 2015 - 7:50 am | स्पंदना

आता माझे फोटो टाकणे आले.
काढते आणी टाकते फोटो माझ्या शेताचे.

मदनबाण's picture

30 Mar 2015 - 7:53 am | मदनबाण

मस्त फोटो... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }

पुदिनासाठी पॅालिएस्टर कापडाची पिशवी(कु्ंडी) आणि टांगण्यासाठी प्लास्टिकचे झाकण.

पिशवी सच्छिद्र असल्यापे बाहेर आलेली मुळे.

काचेची बॅाटल आणि लाकडाचा भुस्सा(लाकुड तासलेला) मनीप्लान्ट लावण्यासाठी. भुस्सा ओलावा धरून ठेवतो,डासांच्या अळ्या होत नाहीत,बॅाटल उन्हात ठेवता येते.

एस's picture

28 Apr 2015 - 1:09 pm | एस

कल्पकता आवडली.

अजया's picture

21 May 2015 - 10:59 pm | अजया

खूप दिवसांपासून माझ्या बागेचे फोटो टाकायचे होते.आज मुहुर्त मिळाला!.मोबाईलवर काढलेले फोटो आहेत सर्व.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 11:16 pm | सानिकास्वप्निल

सुंदर आहेत गं, नावं ही देना सगळ्यांची.

एस's picture

22 May 2015 - 8:39 am | एस

अतिशय नेत्रसुखद! बरेच दिवस वाट पहात होतो तुमच्या बागेच्या फोटोंची. खूप छान आहे तुमची बाग. एकदा फक्त बाग बघण्यासाठी आणि तिचे फोटो काढण्यासाठी भेट द्यायला हवी.

इथे शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार.

जुइ's picture

22 May 2015 - 8:58 am | जुइ

खुपच सुदंर!!

सुंदर आहे बाग!!! वसंतबहार खुलून दिसतो आहे. :)

अमृत's picture

15 Jun 2015 - 2:27 pm | अमृत

:-)आमच्य सदनिकेला कधी असे अंगण मिळणार :-( हिरवागार लॉन बघुन मस्त अनवाणी चालायची इछा झाली.

अजया's picture

22 May 2015 - 8:55 am | अजया

जरुर जरुर या.

बागेचा वसंतबहार आवडला. दोन्ही मोगरे खासच. चिकू आणि हिरवळही सुंदर आहे. कुंडीत शेवग्याच्या शेंगेसारखे काय आहे?पामच्या झाडांनी भिंत झाकलेली कल्पना मस्त.

ते शेवग्यासारखे एक प्रकारचे कॅक्टस आहे.बिनकाट्याचे.दुर्मिळ जात आहे.माझ्या बागेतलं एक आवडतं झाड आहे ते.मेंटेनन्स शुन्य.एकापासुन आपोआप बाकीची येत रहातात.गुलाबाचे फोटो मात्र नाही देता आले.हिवाळ्यात एकेका झाडाला मोठ्ठे पाच सहा गुलाब आले होते.त्यांना दृष्ट नको लागायला म्हणून फोटो नाही काढले!!!

प्रभाकर पेठकर's picture

15 Jun 2015 - 1:34 pm | प्रभाकर पेठकर

>>>>त्यांना दृष्ट नको लागायला म्हणून फोटो नाही काढले!!!

सखेद आश्चर्य वाटले.

गंमतीत लिहिलंय काका!!फोटो नाही काढलेत ना म्हणून!

खुप सुंदर आहे.मलाही बागकामाची खूप आवड आहे.परंतु जागा नाही त्यामुळे ग्यालरी मध्येच कुंड्यांमध्ये झाडे लाऊन बागकामाची हौस पूर्ण करून घेत असते

कापडी कुंड्या---एक प्रयोग.------ १)चहाच्या पिशवीचा स्टेपलर पिन मारून ट्रे केला आहे. बाल्कनी कट्टयावर ठेवता येतो. २)मोठ्या पिशव्या असतील तर चौकोनी प्लास्टिक ट्रे घेऊन खाली एक इंच माती अंथरली आहे.कडा काळ्या प्लास्टिकने झाकल्यामुळे उन्हाने ट्रे फाटत नाही. ३)संक्रांतिचे सुघड आतमध्ये लाकडाचा भुस्सा भरला आहे-डासांच्या अळ्या होत नाहीत. ४)टिपॅायवर ठेवण्यासाठी ५) खालचा ट्रे कोमल तेलाच्या प्लास्टिक पिशवीचा आहे. ६)गवती चहा.-खाली जुन्या ब्लँकेटची घडी ठेवली आहे पाणी। धरून ठेवण्यासाठी

एस's picture

15 Jun 2015 - 11:13 am | एस

अतिशय कल्पक!

घरी मेहनीतीने फुलविलेली बाग असली की बाहेरगावी जाताना रोपट्यांना पाणी कोण देणार हा प्रश्न येतो. ऑफिसमधे एका मित्रानी प्रयोग करून पाहीलेत आणि निकाल उत्साहवर्धक होते.
एक मोठी बादली किंवा पसरट भांडे घ्या, पाण्यानी पूर्ण भरा. आता ज्या कुंड्यात पाण्याची सोय करायची आहे त्या कुंड्यांच्या मातीत एक जाड दोरी खोचा या दोरीचे दुसरे टोक पाण्याच्या बादलीत घाला. शक्यतोवर ही बादली उंच जागी असावी. केशाकर्शण सिद्धांतानूसार कुंड्या पाणी शोशून घेतील. हा उपाय २ ते ३ दिवसांसाठी नक्कीच फायदेशीर आहे. बादल्यांची संख्या कुंड्यांच्या संखेप्रमाणात कमी जास्त करा. शक्यतो पांढरा सुती नाडा या प्रयोगासाठी वापरावा.
टु बी ऑन सेफर साईड घरी असतानच हा प्रयोग करून बघा म्हणजे अंदाज येइल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2015 - 1:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक मोठी प्लॅस्टीकची पिशवी घ्या. त्यात पाणी भरुन तिचे तोंड दोर्‍याने बांधा. आता सुईने एक बारीक भोक पाडुन कुंडीत ठेवा. दोन दिवस तरी सोय होईल.