बागकाम - एक छंद

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
21 Mar 2015 - 8:59 am

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

(फलांच्या प्रदर्शनांतले फोटो साभार)
बागकामाची आवड असणारे आपली हौस घराभोवती फळाफुलांची झाडे लावून पुरवतात. शहरातले, इमारतीच्या गच्चीवर अथवा बाल्कनीत फुलझाडे आणि पुदिना,आले,तुळस,गवतीचहा वगैरे उपयुक्त झाडे कुंड्यांतून वाढवतात. अगदी काहीच नाहीतरी खिडकीत एखादा मनिप्लांट असतो. आपल्या बागेतले फोटो इथे दाखवता येतील. काही प्रश्नही विचारता येतील.या छंदाविषयीची माहिती आणि फोटो एकाच ठिकाणी राहतील. आज गुढी पाडव्याच्या दिवशी सुरुवात करुया.

बाहेरगावी दहा दिवस गेल्यास बाल्कनीतली झाडे कशी जगवायची? मातीच्या कुंडीतले पाणी लगेच सुकते.- जी झाडे वाळली तरी चालतील -तुळस,सदाफुली,सोनटक्का,हळद,पुदिना अशी बाथरूममध्ये ठेवायची . महत्त्वाची झाडे गुलाब वगैरे,काही चमेली सायली वेली यांचे मातीपासूनचा एक फुट भाग ठेवून बाकी कापून टाकायचा .एक तासभर ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवायची. जी झाडे कुंडीतून काढून प्लास्टिक पिशव्यांत हलवता येतील ती आठ दिवस अगोदरच हलवावीत. पिशव्या पाणी अधिक दिवस धरून ठेवतात. एका ट्रेमध्ये या पिशव्या ठेवून दोन इंच पाणी ठेवावे. बाल्कनीच्या कट्ट्याच्या बाहेर लोखंडी ग्रिलमधल्या कुंड्या काढून आतमध्ये ऊन लागेल अशा जागी ठेवाव्यात.

प्रतिसादातले माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो-
३ भातावरच्या मुनिया

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

15 Jun 2015 - 1:20 pm | कंजूस

बाहेरगावी जातांना झाडे वाचवण्याचे उपाय मी नंतर मूळ लेखातच टाकले आहेत ते मी करतो.कोणती झाडे वाचवायचीच आहेत ती प्लास्टिक अथवा मातीच्या कुंड्यांतून काढून प्लास्टिक पिशवीत लावायची आणि एक दीघ फुटावरचे झाड छाटून टाकायचे. या पिशव्या पसरट ट्रेमध्ये ठेवून पाणी द्यायचे खाली ट्रे थोड़ा पाण्याने भरला तरी। चालतो.पंधरा दिवसांनी परत याल तेव्हा नवीन कोंब आले ले असतात.

या धाग्याला "कृषी" मध्ये हलवता येईल का..?

कंजूस's picture

5 Sep 2017 - 10:20 am | कंजूस

ते कृषी आता साहित्यप्रकारमध्ये कुठे आहे?

यशोधरा's picture

3 Dec 2018 - 10:15 am | यशोधरा

यशोधरा — 1 Dec 2018 - 18:09

कंकाका आहेत का?

मला एका जुन्या लाकडी खोडावर मॉस उगवून वाढवायचे आहे. कसे करावे? खोड आणि सुके मॉस आहे माझ्यापाशी. तुम्हाला ठाऊक आहे का

कंजूस — 1 Dec 2018 - 18:55

हे मॅास महाबळेश्वर, दांडेली, माथेरान इथलं असेल तर त्यासाठी योग्य ओला गारवा करावा लागेल. खोड मातीच्या कुंडीत उभे पुरून ओले ठेवत रहा तीन दिवस. मग शेवाळ दोऱ्याने बांधून पाण्याचा स्प्रे मारावा लागेल दोनचारवेळा. एक प्लास्टिक पिशवी वरून उलटी घालून तोंडाकडचा भाग खाली मातीत दाबा. रोज पिशवी काढून झटकून नवीन हवा भरून पुन्हा घालावी लागेल. थेट ऊन नको पण उजेड लागेल.
हेच रिकाम्या फिशटॅन्कमध्ये थोडंफार शक्य आहे. लाकडाचा ढलपा आत आडवा आणि वरती तोंडावर ओले कापड चालेल पण काच किंवा पत्रा नको. उन लागल्यास उलट ग्रीनहौसइफेक्टने आत तापते. ऊन नको.

मनी प्लांटसाठी आधार हवा असेल तर जुनी लाकडी फळी किंवा प्लाइवुडवर चढतो सहज. मॅासची गरज नाही. मी लोंबकळत ठेवतो तो अधिक चांगला दिसतो.

एक्का काकांनी दिलेल्या लिंक्स -

https://youtu.be/Pej6uyBJqjk

https://youtu.be/E7x7rFAF8BE

मला सापडलेली अजून एक लिंक -

https://youtu.be/xriOo2VSewA

आणि हे प्रयोगाचे फलित -

20181203-091749

कंजूस's picture

3 Dec 2018 - 12:00 pm | कंजूस

बरीच झाडे दिसताहेत.
मी रानातून वाळक्या डहाळ्या पडलेल्या असतात त्या गोळा करून ठेवल्या आहेत. त्याचे छोटे तुकडे जाळीच्या टोपलित भरून आर्किड वाढवायचा विचार आहे.

जाळीच्या टोपलीची कल्पना मस्त आहे. मला नेचे मिळाले तर मी राहिलेले मॉस त्यात भरून नेचे तसे वाढवेन आणि अजूनही तत्सम एकत्रच लागवड करेन त्यात.

ते मोठे नेचे असते ते मिळायला हवे. छान दिसते ते.

यशोधरा's picture

20 Nov 2019 - 4:25 pm | यशोधरा

कंकाका, मागील वेळी मी पुदिन्याची अयशस्वी लागवड केली होती. आता आज पुन्हा लावलाय. बऱ्याच काड्यांना मुळे फुटली होती, सगळ्या आडव्या लावल्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे. पाहू काय होतेय.

तितक्यात एक गोकर्ण, हळद, जास्वंदी, रेन लिली असे वाढतेय. अजून पण एक पांढऱ्या फुलांची वेल वाढतेय, फुले पण येत आहेत. सोनटक्का मिळालाय. चिनी गुलाब नुकताच तग धरतोय. मायाळू बरेचदा वाढून आता मात्र मेली. आता पुन्हा भाजी आणायला हवी. एक कोणत्या तरी शेंगेची वेल अगदी हळूहळू वाढतेय.

गवती चहा आणलाय - म्हणजे रोप.

चिनी गुलाब थंडीत मलूल होतो. त्यास अती कडक ऊन लागते.
पुदिनाच्या मुळांशी सतत ओलावा असल्यास भरपूर वाढतो. पण पाणी तुंबलेलं चालत नाही किंवा माती कोरडी पडता कामा नये.

जालिम लोशन's picture

21 Nov 2019 - 2:30 pm | जालिम लोशन

कोणता ते कळत नाही टोकाशी नवी पाने चुरगळल्या सारखी झाली आहेत. सुरवातीला एका फांदीला तसे झाले. आता पुर्ण झुडूपच तसे झाले आहे. काय ऊपाय करावा लागेल?

पुदिन्याची पाने तोडून लगेच वापरायची या हेतूने लावतो. त्यावर रोग पडला तर फवारणी वगैरे अजिबात न करता झुडुप काढून फेकायचे. मुळांशी अती पाणी तुंबणे किंवा ऊन न मिळणे हे कारण. फार कडक ऊन नको. पुदिना शक्यतो टांगलेल्या कुंड्यांत वाढवावा. गांडुळ खत दोनचमचे टाका. छान हिरवीगार मऊ पाने येतात.

जालिम लोशन's picture

21 Nov 2019 - 4:02 pm | जालिम लोशन

तोडुन टाकणे हा ऊपाय करतो. परत लावता येईल थर्माकोलच्या खोक्यात लावले आहे. बरोबर ब्राम्ही पण येत आहे. ती ठेवतो.

थर्माकोलच्या खोक्यात नको.
कापडी ( पॉलीएस्टर कापड कुजत नाही) पिशवीत माती घालून लावणे उत्तम. त्यातून पाणी पाझरते तेव्हा मुळांना गारवा तयार होतो. पुदिन्यासाठी फार उपयुक्त. ती पिशवी एका ट्रेमध्ये ठेवा. तळाशी एक इंच मातीचा थर. जास्तीचे पाणी ही माती धरून ठेवते आणि पुढचे बारा तास पाणी पुरवते. ट्रे टांगून ठेवणे.

जालिम लोशन's picture

22 Nov 2019 - 12:13 am | जालिम लोशन

वांगीपण लावायची आहे. बियाण मिळवण्यापासुन मार्गदर्शन मिळेल का? वांग्याचे बियाणे घरी तयार करता येईल का?

नर्सरीत वांग्याचे बियाणं (बरेच प्रकारची वांगी) मिळतं. आणि कधी रोपेसुद्धा विकायला येतात.
कृती - रोप आहे तिथेच वाढवायचं नाही. एका खड्यात ओंजळभर शेणखत टाकून त्यावर रोप लावायचं. तेव्हाच आधाराची काठीही रोवून ठेवायची. दीड महिना रोपाची वाढ आणि पुढे आणि महिनाभर वांगी लागतील.
स्वत:पुरती तीनच रोपे खुप झाली. कारण जास्ती लावल्यास भरमसाठ येणाऱ्या वांग्यांचं काय करायचं हा प्रश्न पडेल. वाटावी लागतात.
शेवटी एकेक वांगं झाडावरच पिकू देण्यास ठेवून बियाणं मिळेल.
(( २० बाई१० फुट जमीन अंगणामध्ये असेल तर बऱ्याच भाज्या एकदमच लावल्यास काम सोपे होईल. बियाणांची गरज नाही. आणलेल्या भाजीतूनच मिळते. फक्त तोंडल्याचा (मादी) वेल कुठुन तरी कटिंग आणावा लागतो. ))

जालिम लोशन's picture

22 Nov 2019 - 4:15 pm | जालिम लोशन

८०० चौ.फु. गच्ची आहे. त्यावर भाज्या ऊगवण्याचा प्रयत्न करतो आहे. वाळुत मेथी ऊगवण्याचा प्रयत्न केला तो फसला. बहुतेक पक्षांनी मेथी खावुन टाकली. आठ दहा मिॅरच्या मिळाल्यात. पेरु बर्‍यापैकी मिळतात. ते ही वटवाघळ खातात. टाॅमेटो, काकडी, कारली झाडावर कधी पोसली गेलीच नाही. किड पडते. विकत आणलेल्या बियाण्यांचे ऊगवणीकेचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. त्यापेक्षा घरी आणलेल्या भाज्यातुन ऊरलेल्या तुन रोपे चांगली मिळतात.

भाजीसाठी आणलेल्या चवळाईच्या(/चवळीच्या) जुडीतून हे चार शेंडे लावल्यावर रोपे तयार झाली. याच पद्धतीने लाल/हिरवा माठ रोपे मिळतात. यास लवकर फुले/तुरे येऊन बी खाली पडते त्यातून असंख्य रोपे उगवतच राहतात. त्याची भाजी सतत मिळेल.
फोटो

यशोधरा's picture

22 Nov 2019 - 9:23 am | यशोधरा

भारी. पिशवीत लावलंय का?

चवळीची भाजीच. त्याचे शेंडे आहेत. रुजलेत.

vcdatrange's picture

22 Nov 2019 - 4:58 pm | vcdatrange

कुठे होता हा धागा ? इतक्या दिवस कधी दिसलाच नाही . . . फर नाही पन सोसायटीच्या गच्चीवरील तीन एकशे झाडाचे बागायतदार आहोत आम्ही . . नुकताच म्हनजे तीन वर्षापासुन जोपासलेला छन्द . . . पुढ्च्या वर्षी घर बदलणार आहे. . त्यामुळे अजुन पसारा वाढ्वत नाहीय .

कंजूस's picture

22 Nov 2019 - 6:02 pm | कंजूस

@ vcdatrange ,
बागकाम - एक छंद भाग २
धागा तुम्हीच काढा. तुमचे अनुभव, फोटो टाका.

मिपाने या धाग्यानंतर "हिरवाई" सदर चालू केलं होतं. तिकडे टाका.